बबनच्या निमित्ताने..........
काल दोन भाऊंचा बबन चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट गृहासमोर लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा आणि नंबर यायच्या आत लागलेला हाऊस फुलचा बोर्ड. ,सैराटनंतर अशी गर्दी पाहायला परत नागराजचाच चित्रपटाची पुन्हा वाट पाहावी लागतेय कि काय असे वाटत असतानाच बबनने हि अपेक्षा पूर्ण केली. पण सैराटबाबत जशी सर्वमुखी उत्कृष्ट अशी प्रतिक्रिया होती तशी बबनबाबत चित्रपट गृहामधून बाहेर आलेल्याकडून दिसत नव्हती. तसेच सर्व शो हाऊस फुल असले तरी महिलावर्ग आणि मुलींची संख्या अत्यंत बोटावर मोजन्याइटपत होती. त्यामागचे कारण घेण्याचीही उत्सुकता होती. तसे पाहायला गेले तर तो फारच अश्लील सिनेमा आहे असे म्हणावे तर तसेही काही नाही. किंवा भाषा फारच कठीण आहे असे म्हणावर तर तेही नाही. मग तरीही असे का? याची काही कारणे आहे का? तर त्याचे उत्तर हो असेच आहे. त्याकारणांकडे जाताना अगोदर चित्रपटाच्या जमेच्या बाजू बघुयात:
१. बबन हा अत्यंत वास्तवदर्शी आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण मांडणारा सिनेमा आहे. ग्रामीण भागातील जातीव्यवस्थेवर जरी तो प्रकाश टाकत नसला तरी एकाच जातीतील दोन गटांमधील आर्थिक संघर्ष आणि त्यात सामान्य माणसाचे होरपळणारे जीवन याचे अतिशय समर्पक चित्रण केले आहे.
२. चित्रपटाची भाषा शिवराळ असली तरी मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ आठवला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे या काळात आलेल्या जवळपास सर्वच चित्रपटांना ग्रामीण पार्श्वभूमी असायची. चित्रपटाची बोली भाषा ही ग्रामीण असायची. चंद्रकांत सूर्यकांत बंधू ते दादा कोंडके असा एक मोठा कलाकार वर्ग ग्रामीण भाषेशी जोडला होता. त्यांनी त्या त्या काळातील ग्रामीण जीवनाचे चित्रण आपल्या अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीतून मांडले आणि प्रेक्षकांनी ते स्वीकारलेही. भाऊराव शिंद्यांनी बाबनमधून ग्रामीण जीवनाचा एक पक्का बाज प्रेक्षकांसमोर आणला आणि लोकांना तो भावला. शिवी हे ग्रामीण बोलीभाषेचा एक अविभाज्य अंग आहे. शिवीच्या माध्यमातून कमी शब्दात भावना व्यक्त होतात. (येथे शिव्यांचे समर्थन करायचा उद्देश नाही) एखादा सरळ मानाचा माणूस व्यवस्थेकडून सतत नागवला गेला की आपसूकच त्याच्या तोंडात शिवी येते. फक्त येथे शिव्याचा अतिरेक झालाय. तोच महिला वर्गाला खटकत असणार.
३. भाऊसाहेब शिंदेंचा अभिनेता म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. ख्वाडातून निर्माण केलेल्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. बापाच्या कर्मदारिद्र्यामुळे सतत वाटयाला आलेला अपमान नि त्यातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी त्याची चाललेली धडपॅड त्यातून निर्मान झालेली अगतिकता त्यांनी चांगलीच दाखविली आहे.
४. सगळ्यात जास्त कमाल केलीय ती बैजू पाटीलांनी. ग्रामीण आणि अस्सल नगरी ठेक्यातील त्यांनी केलेला संवाद सतत विनोदाची पेरणी करत राहतो. त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटावरील पकड सैल होत नाही. अभिनेता म्हणून या माणसाचा हा पहिलाच चित्रपट आहे असे कुणीही म्हणणार नाही इतक्या सफाईने त्यांनी बैजू पाटील साकारला आहे.
५. बैजू पाटील यांच्या प्रमाणेच लक्षत राहते ती पपी. तिने तीन दृश्यातच साकारलेली पपी आपली छाप पडून जाते. तिला आणखी काही दृश्ये मिळाली असती तर तिने गायत्री जाधवला खाऊन टाकले असते.
६. बबनच्या आईने तिच्या वाट्याला फार संवाद नसतानाही हावभावातून साकारलेली व दारुड्या नवर्यामुळे होरपळ झालेली ग्रामीण स्त्री बहुसंख्य ग्रामीण स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करते. गावातील अश्या अनेक स्त्रिया आपल्या भेटीला येतात ज्यांची स्वप्ने परिस्थितीच्या रेट्याखाली भरडली आहेत. हातात शेळी घेऊन रानात जाणारी सरपंचीन, पोरगा काहीच काम करत नाही म्हणून त्रागा करणारी म्हातारी आई, आपल्याला पण गळ्यात दिन चार तोळ्याचा दागिना हवा यांची आस असणाऱ्या, कामधंदा न करता पारावर बसून पत्ते सुटणारी तरुण पिढी, कुठेच काम मिळत नाही म्हणून शेवटी वॉटमनची नोकरी करणारा, बाबांचा सुरळीत व्यवसाय धुळीत मिळविण्यासाठी गावाच्या सारकारापासून बँकेच्या चेअरमनपर्यंत सगळ्यांनी केलेला कट, पतसंस्था आणि सहकारी संस्थामधून चालणारे राजकारण आणि दुग्धवयवसायातील वर्चस्वसाठीचा धारदार संघर्ष मन विषण्ण करून टाकतो. हातात पावाचा तुकडा घेऊन कोरडाच खाणारा पोरगा ग्रामीण गरिबांचे जीवन दाखवतो. तसेच गरीब श्रीमंत यांच्यातील दरी अधोरेखित करतो.
५.चित्रपटात दाखवलेला निसर्ग अत्यन्त विलोभनीय असून सिनेमॅटोग्राफी अत्यंत सुंदर आहे. सैराटने हि ग्रामीण भागातील सौंदर्याची करून दिलेली ओळख बबन ने व्यवस्थित पुढे नेली आहे.
६. बबनचे हे गुण पुण्या मुंबईच्या पेठांमधून आयुष्य जगलेल्यानं कधीच दिसणार नाहीत. याच संस्कारात मराठी चित्रपट इतके दिवस अडकून पडला होता त्यामुळेच तो स्पर्धेत इतके दिवस मागे पडला होता की काय याविषयी शंका आल्याशिवाय राहत नाही.
अश्या बबन मध्ये अर्थातच बऱ्याच त्रुटी राहिलेल्याआहेत:
१. चित्रपटात बबनचा संघर्ष दाखविताना मुळातच तो तोकडा दाखविलेला आहे. अन्यायाने नायकाचे पेटून उठणे बबनमध्ये दिसत नाही. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीचे भविष्य आपण गेल्यावर काय असेल याचा त्याला प्रश्न पडत नाही.किंवा तिलाही आपल्याबरोबर तो का घेऊन जात नाही हा प्रश्न सतावत राहतो.
२. बबनच्या प्रेयसीची भूमिका एकदम संधिग्ध झाली आहे. बबन, त्याची पार्श्वभूमी टवाळ पोराकडून होणार त्रास याबाबत तिची कोणतीच भूमिका दिसत नाही.
३. सगळा गाव ज्याच्या मागे हात धुवून लागला त्याची त्याच गावातील प्रेयसी कोण हे कोणालाच माहित नाही. शेवटी तर तिला गावातील महिला ओळ्खठी नाहीत. ज्यापोरीमुळे बबन आपल्या भावाच्या जीवावर उठतो तिची साधी तो बँकेचा चेअरमन असताना चौकशीही करत नाही हेही अनाकलनीय.
४. आपली पोरगी कोणाच्यातरी प्रेमात आहे, तो पोरगा तिला घेऊन घरापर्यंत येतो तरी तिच्या घरातल्या कोणालाच थांगपत्ता लागत नाही.
५. चित्रपटाच्या नायिकेला बँकेचा चेअरमन अत्यंत अश्लील शिव्या देतो हे मनाला पटत नाही. त्यामुळेच चित्रपटगृहात महिला आणि मुलींची संख्या रोडावलेली दिसते. यापेक्षा आणखी प्रभावी संवाद देता आले असते.
६.चित्रपटाच्या नायिकेने शेवटी केलेले कृत्य सर्वमान्य नाही. काहीतरी वेगळं आणि सनसनाटी शेवट करण्याच्या नादात हा प्रसंग पूर्णपणे अनैसर्गिक वाटतो.
७. परिवर्तनाच्या वाटेवरचा हा चित्रपट वेगळे आत्मभान देणारा असला तरी उठसूट शिव्या देण्याने परिवर्तन घडत नाही याची जाणीव चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ठेवलेली नाही.
८. चित्रपटाचा प्लॉट मध्यंतराला घसरलेला असल्यामुळे मध्यंतरानंतरची उत्सुकता वाढत नाही. पटकथा लेखक म्हणून ही जाणीव सतावत राहते.
असे अनेक मुद्दे असले तरी या त्रुटीमुळे चित्रपटाचे महत्त्व आजिबात कामी होत नाही म्हणून संपूर्ण टीमचे अभिनंदन करावेच लागेल. निर्माता दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमने नवीन असताना घेतलेले कष्ट याची दखल घ्यावीच लागेल. विशेषतः सैराटच्या यशात कलाकार आणि दिग्दर्शकाबरोबरच झी टॉकीज सारख्या बॅनरचा मोठा वाटा होता. असा कोणताही बॅनर नसताना उच्च निर्मिती मूल्य टिकवून प्रसिद्धचे तंत्रहि निर्मात्याला गवसले आहे. ख्वाडाला चित्रपटगृह मिळू नये म्हणून सामूहिक कट करणार्यांना दोन भाऊंनी दिलेले हे सणसणीत उत्तर आहे. त्यामुळेच एकदातरी सिनेमागृहात जाऊन बबन पहायला हरकत नाही. शिव्याचे फार काही वाटणार नसेल तर महिलांनी आणि मुलींनीही जरूर पाहावा.
©के. राहुल 9096242452

Comments
Post a Comment