गर्मी: लोकशाहीतील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण भारतीय चित्रपट सृष्टीतील विशेषता हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक नाव म्हणून तिगमांशू धुलिया या दिग्दर्शकाकडे पाहिले जाते. भारतीय समाजव्यवस्थेचे, समाजव्यवस्थेतील घटकांचे, व्यवस्थेचे चालक-मालक आणि त्या व्यवस्थेला बळी पडणारे यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार यांच्यामध्ये तिग्मांशू धुलिया हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते त्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीमुळे! दिलसे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पानसिंग तोमर, साहेब बीबी और गँगस्टर, हासिल, चरस, गॅग्ज ऑफ वासेपुर, शहीद, मांझी : द माउंटन मॅन यासारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर येतो. भारतीय चित्रपटसृष्टीची विशेषता हिंदी चित्रपटांची एक व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे चित्रपट बनवायचे याची एक मर्यादा घालून दिलेली आहे. त्यातही विशिष्ट विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत हस्तक्षेप केल्याने चित्रपटांतून सत्य पर...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers