महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना (NPS) नियम 2026 लागू : NPS नियम 2026 चे सविस्तर विश्लेषण – प्रा. डॉ. राहूल खरात.
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना ( NPS) नियम 2026 लागू : NPS नियम 2026 चे सविस्तर विश्लेषण – प्रा. डॉ. राहूल खरात. Link for video in Marathi: https://youtu.be/GxyFTNoqh5I Link for video in English: https://youtu.be/0FZIN7SBLeE प्रस्तावना महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र नागरी सेवा (राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी) नियम , 2026" या अधिसूचनेद्वारे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन व्यवस्थेला एक स्पष्ट आणि कायदेशीर चौकट प्रदान केली आहे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीला ( NPS) प्रथमच स्वतंत्र नियमावलीच्या स्वरूपात व्यापक आधार मिळाला आहे. या नियमांमध्ये कर्मचारी आणि शासनाचे योगदान , PRAN नोंदणी , निधी व्यवस्थापन , मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीतील लाभ , कुटुंबाचे अधिकार , विलंबित योगदानावरील व्याज , तसेच निवृत्तीपश्चात लाभांची प्रक्रिया यांचे सविस्तर नियमन करण्यात आले आहे. या नियमांमुळे NPS संदर्भातील अनेक वर्षा...