वर्ण वर्चस्वाचे संघर्षमय चित्रण : काला कलीकरण बदलत्या काळात विशेषतः जागतिकीकरणामुळे जगातील प्रत्येक देशातील जातीय, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक समिकरणे बदलतात असे म्हटले जाते. हे बदल 1991 नंतरच्या खाऊजा धोरणानंतर भारतातही झपाट्याने घडून आले. पण त्या बदलांना अंगिकरताना जातीच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली आपण ज्या चुकीच्या प्रथा, परंपरा, जातीय आणि धार्मिक सत्ताकेंद्रे सांभाळण्याचा आटापिटा केला त्यातून देशाचे आणि समाजाचे नुकसानच झाले. रजनीकांतचा "काला" यावरच प्रकाश टाकतो. त्यामुळे त्याच्या चांगल्यावाईट बाजूवर प्रकाश टाकणे आवश्यक ठरते. रजनीकांतचा कोणताही चित्रपट म्हटले की तो सबकुछ रजनीकांत असतो. तसाच हाही चित्रपट असणार असे गृहीत धरून चित्रपटगृहात जाणाऱ्या प्रेक्षकांना रजनीकांत आणि नानाच्या जुगालबंदीची मेजवानीच अनुभवायला मिळते. परिंदानंतर नानाने साकारलेला हा खलनायक अत्यंत खतरनाक आहे. थंड डोक्याने आपला कार्यभाग साधणारा, देशप्रेमाचे ढोंग करून स्वहित पाहणारा, जातीने वागणारा, अपमानाने पेटून उठणारा नाना जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा रजनीपेक्षा...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers