वटसावित्रीचा खेळ.........
मारू नको फेऱ्या आता,
श्वास माझा गुदमरतोय.
सांगू कसे तुला आता,
मी आतल्या आत तडफडतोय.
दोरे गुंडाळून का कधी,
जोडी नक्की होते?
करून असले उपद्व्याप,
अंधश्रद्धा मात्र पक्की होते.
सात जन्माची सोबत म्हणे,
खरं सांग याला काही अर्थ आहे?
नसेल नात्यात आपुलकी,
माणूस जन्मच व्यर्थ आहे.
पाखरं सुद्धा संसार करतात,
पण आरक्षण नसते कुणाचे.
सात जन्मी तोच नवरा,
खेळ सगळे मनाचे.
शिकली सावरलेली तू,
अपराध निराक्षरांचा क्षम्य आहे.
वट सावित्रीची कल्पना,
गॊष्टीसाठी रम्य आहे.
विज्ञानाच्या युगातली,
सुपर वूमन ना ग तू.
अंधश्रद्धा जोपासल्या तर,
होते बर का छि थू.
अडाणी बाया- बापाड्यांना,
शहाणं करणं हे तर तुझं खरं काम
सॊडून खरा स्त्रीधर्म,
मुखात मात्र सदा राम.
घ्यावा मोकळा श्वास,
मला सुद्धा वाटते.
काची दोऱ्याची धार तुझ्या,
साल माझी कापते.
कारायचीयच ना तुला वट सावित्री,
अजून एक झाड लाव.
जोडीने कर संगोपन,
वाढेल माझा भाव.
निक्षून सांग साऱ्यांना,
वट सवित्रीचा खेळ म्हणजे थोतांड आहे सारे.
हिच योग्य वेळ आहे,
जाग्या साऱ्या व्हा रे.
©के.राहुल ९०९६२४२४५२
मारू नको फेऱ्या आता,
श्वास माझा गुदमरतोय.
सांगू कसे तुला आता,
मी आतल्या आत तडफडतोय.
दोरे गुंडाळून का कधी,
जोडी नक्की होते?
करून असले उपद्व्याप,
अंधश्रद्धा मात्र पक्की होते.
सात जन्माची सोबत म्हणे,
खरं सांग याला काही अर्थ आहे?
नसेल नात्यात आपुलकी,
माणूस जन्मच व्यर्थ आहे.
पाखरं सुद्धा संसार करतात,
पण आरक्षण नसते कुणाचे.
सात जन्मी तोच नवरा,
खेळ सगळे मनाचे.
शिकली सावरलेली तू,
अपराध निराक्षरांचा क्षम्य आहे.
वट सावित्रीची कल्पना,
गॊष्टीसाठी रम्य आहे.
विज्ञानाच्या युगातली,
सुपर वूमन ना ग तू.
अंधश्रद्धा जोपासल्या तर,
होते बर का छि थू.
अडाणी बाया- बापाड्यांना,
शहाणं करणं हे तर तुझं खरं काम
सॊडून खरा स्त्रीधर्म,
मुखात मात्र सदा राम.
घ्यावा मोकळा श्वास,
मला सुद्धा वाटते.
काची दोऱ्याची धार तुझ्या,
साल माझी कापते.
कारायचीयच ना तुला वट सावित्री,
अजून एक झाड लाव.
जोडीने कर संगोपन,
वाढेल माझा भाव.
निक्षून सांग साऱ्यांना,
वट सवित्रीचा खेळ म्हणजे थोतांड आहे सारे.
हिच योग्य वेळ आहे,
जाग्या साऱ्या व्हा रे.
©के.राहुल ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment