परमाणू आणि पोखरण: काल जॉन अब्राहम निर्मित आणि अभिनीत परमाणू हा चित्रपट पाहिला. चित्रपट भारताने 1998 साली केलेल्या अणुचाचण्यांवर आधारित असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता होतीच. ज्यांना साधारण 1990 नंतरचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आठवत असेल त्यांना याचे महत्व आणि गांभीर्य निश्चितच जाणवत असेल. ते महत्त्व आणि गांभीर्य कायम राखत जॉनने हा चित्रपट बनवला असून एक निर्माता आणि अभिनेता म्हणून कामगिरी अत्यंत चोख बजावलेली आहे. मुळात हा विषय संवेदनशील असल्याने त्याबाबतची चित्रपट म्हणून मांडणी करणे अत्यंत कठीण आणि जबाबदारीची गोष्ट होती ती जॉन आणि त्याच्या संपूर्ण टीमने यशस्वीपणे पेलली आहे. एक ठोकळा अभिनेता ते उत्कृष्ट निर्माता आणि अभिनेता हि जॉनची वाटचाल खूपच विस्मयकारक आहे. याअगोदर त्याने राजीव गांधींच्या हत्येवर आधारित "मद्रास कॅफे" या चित्रपटातून याची झलक दाखविली होती. त्यामुळे तो आणि त्याची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. जॉनच्या "परमाणू" चित्रपटाने 1998 च्या अणुबॉम्ब चाचण्यांची आठवण ताजी झाली. तसा भारत हा 1974 पासून अणूवस्त्रधारी देश आहे. १९६२ भारत-चीन युद्ध...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers