छद्मविज्ञानाची लक्षणे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने दोन वर्षांसाठीच्या ज्योतिष विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याची घोषणा केली. आपण शालेय जीवनापासून आपल्या मुलांना पृथ्वी हा फक्त ग्रह आहे, सूर्य हा लाखो किलोमीटरवर अंतरावरील फक्त एक तारा आहे हेच शिकवत आलो आहोत आणि आता त्याच मुलांना आपण पदव्युत्तर शिक्षणात सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तो चंद्राच्या समांतर पातळीवर असतो हे शिकवणार आहोत. भारतातील संख्येने 1000 च्या जवळपास असलेल्या विद्यापीठांपैकी 20 विद्यापीठात ज्योतिष विषयांतील अभ्यासक्रम शिकवला जातो. बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृती भाषेशी संबंधित अनेक विभाग आहेत जेथे ज्योतिष विषय संस्कृतमधून अगोदरपासूनचशिकवला जातो. पण आताचा हा निर्णय एका वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या सामाजिक परिस्थितीत आलेला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत IGNOU सारख्या नामांकित आणि मुख्य प्रवाहातील विद्यापीठाने घेतलेला ज्योतिष विषयातील पदवीला वरदहस्त दाखविणे हे पहिलेच उदाहरण आहे. खरेतर ज्योतिष हा विषय दोन पातळ्यांवर चर्चिला जाणे आवश्यक आहे, पहिले म्हणजे आजच्या प्रग...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers