क्रांतीने खाल्लेली पिल्ले! कोणताही लढा किंवा क्रांती दीर्घकाळ चालू राहिली तर त्याचा मूळ उद्देश संपुष्टात तरी येतो किंवा जेव्हा त्या क्रांतीचे उद्देश साध्य झाले आहेत असे वाटते तेव्हा सामाजिक-राजकीय-आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ इतके बदललेले असतात की त्याचा समाजाला , व्यवस्थेला किंवा त्या देशाला काहीच उपयोग राहत नाही. बऱ्याचवेळा ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती केलेली असते त्यांना जर क्रांतीचा उद्देश साध्य करता आला नाही तर ज्यांनी क्रांती करण्यात मोलाची भूमिका बजावलेली असते तेच लोक क्रांतीच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून उठतात. त्या बंडाला ऐतिहासिक संदर्भ असतील तर बऱ्याचवेळा त्याला प्रतिक्रांती असेही म्हटले जाते. यातही क्रांतीचा प्रणेता आपल्या विचारांवरून किंवा ध्येयावरून भटकला तर त्याचे अनुयायीच त्याच्या जीवावर उठले असल्याचे इतिहासात डोकावले असता लक्षात येते. क्रांती होताना जर ती रक्तरंजित आणि अतिजीवीत हानी करणारी असली तर प्रतिक्रांती त्याहूनही अधिक भडक आणि भयंकर असण्याची दाट शक्यता असते. सध्या म्यानमार आणि आंग सान स्यू की यांच्याबाबत घडत असलेल्या घटना पाहिल्या की याचा ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers