ज्याने त्याने आपला देव जपावा, आपल्या मनातला भाव जपावा. कोणी, कधी आणि काय करायचे, हे कोणी कोणाला सांगू नये. आपल्या शब्दाला किंमत नाही, म्हणून कोणी कुणाला टांगू नये. आपल्या आवडीचे आचरण, हा ज्याच्या त्यांच्या मनाचा भाव असतो. आपल्या भावना जपणे, हाच मनाचा ठाव असतो. कोणी, कधी आणि काय खावे, हे कोणी कुणासमोर घोकू नये. उगीच आपले तत्वज्ञान जगासमोर ओकू नये. ईश्वर काय, अल्ला काय आणि येशू काय सगळे एकसारखेच असतात, आपण ज्या चष्म्यातून पाहू तसे आपल्याला देव दिसतात.
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers