विक्रम वेताळ कथा: नव्या देशाची मागणी या वेताळाला आपण कधी पकडून शकू की नाही, या विचारात असलेल्या राजा विक्रमाला अचानक लक्षात आले की, आज अमावस्या आहे. त्यातही 'सोमवती अमावस्या म्हणजे चांगलाच मुहूर्त!' हे लक्षात घेऊन आज काहीही करून वेताळाला पकडायचेच, असा पक्का निर्धार करून विक्रम राजाने घाईगडबडीने आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी वेताळाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची चूक यावेळी करायची नाही, असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. वेताळानेही विक्रम राजाला पाहिले आणि काहीही झाले तरी आज याला आपल्या पाठीवर बसू द्यायचे नाही, या विचारात असलेल्या विक्रम राजाच्या डोळ्याचं पातं लवण्याच्या आत वेताळाने चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले. वेताळ दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची तात्काळ हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers