रुपया झाला मोठ्ठा.....! गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एके ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो. माझ्या अगोदर एक वक्ते बोलणार होते. त्यांचा विषय होता, "बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय न्यायव्यवस्था". विषय मांडत असताना माझ्या आजपर्यत न वाचनात आलेले एक वाक्य त्यांनी सांगितले. त्यांच्यामते न्यायव्यवस्थेबद्दल मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात की, " न्यायव्यवस्था भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी तिथे न्यायदानाचे काम करणारे न्यायाधीश ही माणसेच असून ते सरकारचे पगारी नोकर आहेत त्यामुळे त्यांचा कल हा सरकारच्या बाजूने राहण्याची शक्यता जास्त आहे. कारण नोकराने मालकाच्या बाजूने राहणे हे त्याची गरज असू शकते. इथे न्यायव्यवस्थेचा मालक म्हणजे कोण हे वेगळे सांगणे नको. त्यामुळे केंद्रातील सत्तेत असेलेले सरकार लोकशाही मूल्यांची बूज राखणारे नसेल किंवा पक्षपाती असेल तर न्यायव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि न्यायव्यवस्था चुकीचे निर्णय देऊ शकते. त्यातून लोकशाही मूल्यांचा संकोच होण्याची शक्यता वाढते. म्हणून देशातील जनतेने आणि लोकशाही मूल्यांची बूज असणाऱ्यांनी सत...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers