कविता - बलात्कार आता रोज निघेल कुठे ना कुठे मोर्चा, आणि झडत राहतील चर्चा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तुला ओरबडून जिवंत जाळल्याच्या. सो कॉल्ड उच्चभ्रू काढतील कॅडल मार्च, येतील वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आणि दिले जातील मीडिया बाईट, तुझ्या देहावर झालेल्या अत्याचाराच्या वर्णनांनी भरून जातील वृत्तपत्रांची पाने. चौका चौकात होईल रोष व्यक्त गुन्हेगारांचे पुतळे जाळून, म्हणतील सगळे त्यांना तात्काळ फासावर चढवा किंवा मरेपर्यत बडवा. दिल्या जातील मुलाखती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या, म्हणेल कुणी त्या पुरुषांचे लिंग छाटून टाका, त्यांनाही जाळा जिवंत भर चौकात. परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा राजकारणी घेतील दखल आणि करतील नराधमांना अटक, पहिल्याच तारखेला मिळेल त्यांना जामीन, चालू होतील कोर्ट कचेऱ्या आणि पडत राहतील तारखा, सामान्यांना विस्मरण होईपर्यंत. हळू हळू पहिल्या पानावरची बातमी शेवटच्या पानावर जाऊन विरून जाईल. थकून जातील तुझ्या घरचे न्यायाची प्रतिक्षा करून, कदाचित न्याय मिळण्याअगोदर जातील मरून. एवढे करूनही त्यांना मरेपर्यत फाशीची शिक्षा होईल की नाही सांगता येत नाही, ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers