कविता - मैत्रीचे राजकारण
एकदा ते दोघे शांतपणे बोलत होते,
एकमेकांचे विचार अधूनमधून कोलत होते.
एकाने दुसऱ्यावर जहरी टीका केली,
दुसरा कसा चुकतोय हे सांगताना अहमहमिका केली.
पहिला म्हणाला,
वाईट वाटून घेऊ नको,
मी दोष तुला देत नाही,
रोष तुझा घेत नाही.
पण माझीही मतं आहेत काही,
जाब विचारायची तु करू नका घाई.
मग दुसरा म्हणाला,
मनात माझ्या काही नसताना,
तुला मात्र जिथे तिथे जात दिसते.
इथेच तर तुझे गणित फसते.
पहिला म्हणाला,
तुझ्या बाजूने कदाचित तु बरोबर असशील,
पण माझ्या बाजूने मी सुद्धा चुकीचा नाही.
अधून मधून तुझ्या वागण्यात जात डोकावत असते,
जातीच्या जोरावरच तर तुझी डाळ शिजते.
वागत नसशील जातीने,
पण राजकारणात मात्र जाती धरतोस.
संधी मिळेल तेव्हा माझा पाणउतारा करतोस.
दुसरा म्हणाला,
मान्य मला मी जातीचे राजकारण करतो,
पण त्याचा मैत्रीशी संबंध काय?
पहिला म्हणाला,
हेच तर तुझे ढोंग आहे,
जाणून बुजून अजाणतेपणाचे सोंग आहे.
मैत्री सुद्धा एक राजकारण असते,
माझे सारखे कुणी तरी कधी तरी त्याला फसते.
जातीने वागण्यासाठी जातीचा उच्चार गरजेचा नसतो,
राजकारण हा विषयच मुळी बेरजेचा असतो.
एकदा ते दोघे शांतपणे बोलत होते,
एकमेकांचे विचार अधूनमधून कोलत होते.
एकाने दुसऱ्यावर जहरी टीका केली,
दुसरा कसा चुकतोय हे सांगताना अहमहमिका केली.
पहिला म्हणाला,
वाईट वाटून घेऊ नको,
मी दोष तुला देत नाही,
रोष तुझा घेत नाही.
पण माझीही मतं आहेत काही,
जाब विचारायची तु करू नका घाई.
मग दुसरा म्हणाला,
मनात माझ्या काही नसताना,
तुला मात्र जिथे तिथे जात दिसते.
इथेच तर तुझे गणित फसते.
पहिला म्हणाला,
तुझ्या बाजूने कदाचित तु बरोबर असशील,
पण माझ्या बाजूने मी सुद्धा चुकीचा नाही.
अधून मधून तुझ्या वागण्यात जात डोकावत असते,
जातीच्या जोरावरच तर तुझी डाळ शिजते.
वागत नसशील जातीने,
पण राजकारणात मात्र जाती धरतोस.
संधी मिळेल तेव्हा माझा पाणउतारा करतोस.
दुसरा म्हणाला,
मान्य मला मी जातीचे राजकारण करतो,
पण त्याचा मैत्रीशी संबंध काय?
पहिला म्हणाला,
हेच तर तुझे ढोंग आहे,
जाणून बुजून अजाणतेपणाचे सोंग आहे.
मैत्री सुद्धा एक राजकारण असते,
माझे सारखे कुणी तरी कधी तरी त्याला फसते.
जातीने वागण्यासाठी जातीचा उच्चार गरजेचा नसतो,
राजकारण हा विषयच मुळी बेरजेचा असतो.
Comments
Post a Comment