मतदान हाच उपाय जयराज साळगांवकर , बुधवार , २५ जानेवारी २०१२ लोकशाहीचे स्थर्य टिकवायचे असेल , तर लोकशाहीची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. आणि याची सुरुवात मतदानातून होऊ शकते. जबाबदार लोकांनी , जबाबदार लोकांना , जबाबदारीने निवडून आणले आणि त्यांच्या कामाचा त्रमासिक किंवा सहा महिने तरी आढावा घेतला तरच लोकशाहीवर लोकांची मालकी राहील. नेत्यांच्या श्रीमुखात लगावून , मेणबत्त्यांचे मूकमोच्रे काढून , फेसबुकवरील ‘ स्टेटस ’, ‘ लाइक ’ करून काही होईल ही अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. त्यासाठी एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे आपला संवैधानिक अधिकार वापरण्याचा! मतदानाचा अधिकार निवडणुकीत वापरणे हे आपले सर्वाचे परमकर्तव्य आहे. टय़ुनेशियामधील उठावानंतर एकापाठोपाठ एक असे उठाव मध्यपूर्वेत झाले. या सर्व उठावांपकी इजिप्तमधील उठाव हा सर्वाधिक ताकदीचा होता. सुएझ कालवा , आसवान धरण आणि इतर अरब राष्ट्रांच्या तुलनेत खूप मोठे सन्य असलेल्या इजिप्तमध्ये अशा प्रकारचा गोंधळ होईल याची कोणाला कल्पनाही नव्हती. इजिप्तकडे तेल नसले तरी क...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers