Skip to main content

कविता : गावकुसाबाहेर...............

गावकुसाबाहेर...............

जग प्रसिध्द माझ्या गावात,
गावकुसाबाहेर माझी वस्ती हाय,
किती वर्षे सरली तरी,
बापाजाद्याच्या हातात हस्ती हाय.

गावामधी जायाला, 
माझ्या वस्तीवरनं रस्ता हाय.
गावकुसाबाहेरचा जीव,
कोल्या-कुत्र्यापेक्षा सस्ता हाय.

कितीतरी आया-बायांच्या अबरु,
तिथं वेशीवर टांगल्या,
गावधन्याच्या राती,
रोज धुंदीत झिंगल्या.

जाण्याआधी जीव,
आजा मुक्यानं तडफडला,
त्याला बघुन बाप माझा,
आतल्या आत चडफडला.
देह त्याचा सारा बाभळीत जळला,
त्या राती बाप रातभर मसणात लोळला.

जाणता जीव त्याचा,
तिळ तिळ तुटला.
संयमाचा बांध त्याचा,
वेशीबाहेरचं फुटला.

धगधगत्या मनानं,
गावधन्याला जाब ईचारला,
त्याला मातुर त्यो अपमान वाटला.

गावच्या पाटलाची गावभर सत्ता,
कित्येक पिढ्यांनी गिरवला हाच कित्ता.

 ---------------------------------------------

Comments