असंतोषाचे कारण 'संतोष'च! भारतात सध्या एखाद्या सामाजिक विषयावर चित्रपट बनविणे इतके जिकरीचे झाले आहे की त्याचे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम काय होतील हे सांगणे अशक्यप्राय होऊन बसलेले आहे आणि त्याहीपेक्षा तो चित्रपट अनेक अडथळ्यांवर मात करून बनवून तयार झाला तर त्याचे यशस्वी प्रदर्शन होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. कारण स्वतःला सेंसॉर बोर्डाशी समांतर समजणा-या अनेक जाती आणि धर्मांच्या विविध संघटना त्यावर इतके रान माजवतात की, जणू काही हे वाटच बघत बसलेले आहेत की कधी एखाद्या विषयावर चित्रपट येतो आणि आम्ही त्याला विरोध करून त्याचे प्रदर्शन हाणून पाडतो. हे झाले भारतातील चित्रपटात पुरते मर्यादित. परंतु आता याचे लोन विदेशात तयार झालेल्या चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचलेले आहे आणि त्याचे कारण म्हणजेच भारतात नुकत्याच प्रदर्शनावर बंदी घातलेल्या संतोष या चित्रपटाविषयी! "संतोष" चित्रपटाची कथा ही भारतावर बेतलेली असली तरी त्याची निर्मिती, दिग्दर्शन, कथा-पटकथा या सर्व बाबी विदेशी मंडळींनी सांभाळलेल्या आहेत. तरीही त्याला विरोध होण्याचे कारण म्हणजे कथा भारतातील ज्वलं...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers