लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : सामाजिक-राजकीय आणि साहित्यिक योगदान - डॉ . राहुल स . खरात प्रस्तावना महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात ज्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या हयातीतच दंतकथेचे स्वरूप धारण केले , त्यांत तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णा भाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. एकही दिवस शाळेची पायरी न चढलेला , वयाच्या अकराव्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या गावातून पायी मुंबई गाठलेला , हमाली-भांडी घासणे-बूट पॉलिश यांसारखी कष्टाची कामे करत जगणारा एक मांग समाजातील मुलगा पुढे "साहित्यरत्न" , " लोकशाहीर" , " संयुक्त महाराष्ट्राचा शिल्पकार" म्हणून ओळखला जावा , ही घटनाच मराठी समाजमनाच्या अंतर्विरोधांचे आणि त्याचबरोबर त्या समाजातील तळागाळातील प्रतिभेच्या असीम सामर्थ्याचे निदर्शक आहे. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य केवळ साहित्यिक चौकटीत मोजता येण्यासारखे नाही. ते एकाच वेळी शाहीर होते , कादंबरीकार होते , कथाकार होते , नाटककार होते , पटकथाकार होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी मार्क्स...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers