लिंगभेदात अडकलेला शिक्षण दिन ........ ©के.राहुल, ९०९६२४२४५२ बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे आणि त्यानुसार तो ते बदल घडवून आणतो. मात्र त्यासाठी निमीत्त ठरतात ती माणसे! त्यामुळे कोणत्याही बदलाकडे नवनिर्मितीची सुरवात म्हणून पाहता येते आणि सुजाण माणूस म्हणून त्याकडे पहायलाही हवे. पण या बदलांचे अधिकार कळत नकळत ज्या माणसांकडे असतात ती माणसे त्याकडे कसे पाहतात यावर त्या बदलांचे परिणाम, प्रभाव आणि यशापयश अवलंबून असते. साहजिकच जी माणसे इतिहासात रमणारी असतील किंवा इतिहासाची मीमांसा करण्यात कमी पडत असतील त्यांना हे बदल रुचत नाहीत किंवा ह्या बदलांनी आपल्या सत्तास्थानाला धक्का लागेल अशी त्यांची धारणा असेल तर मात्र हे बदल करणे जाणूनबुजून टाळले जाते किंवा ते करत असताना त्यामुळे होणारा प्रभाव सीमित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे साहजिकच जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग आणि आणखी बरीच काही असू शकतात. बदलत्या काळात शिक्षणासारखे क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही ही तितकीच दुर्दैवाची गोष्ट. महाराष्ट्र सरकारने नुकताच सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हण...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers