महात्मा गांधी जीवन आणि विचार - ९० (भगतसिंग यांची फाशी आणि गांधीजींवर खोटे आरोप) गांधीजींनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी का रोखली नाही? असा प्रश्न ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी कृतघ्नता बाळगणारी मंडळी विचारत असतात. डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी जॉन स्कॉट ऐवजी २१ वर्षीय जॉन साँडर्सची हत्या केली. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधिमंडळात क्रूड बॉम्ब आणि पत्रकं फेकली. दोघांना अटक झाली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. १२ मार्च १९३० रोजी मिठाचा सत्याग्रह सुरू झाला आणि जुलै अखेर पर्यंत गांधी आणि काँग्रेस नेत्यांसहीत ९० हजार लोकांना अमर्याद काळासाठी अटक झाली. तरीही आंदोलन थांबलं नाही, कायदेभंगाची ही चळवळ मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या. चर्चा करता यावी म्हणून आयर्विन यांनी २६ जानेवारी १९३१ रोजी गांधींची सुटका केली. ६ फेब्रुवारी १९३१ रोजी मोतीलाल नेहरूंचे निधन झाले. आणि १७ फेब्रुवारी रोजी गांधी आयर्विन यांच्यात बोलणी सुरू झाली. ही बोलणी १६ दिवस चालली. अकरा मागण्यापैकी अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या काँ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers