महात्मा गांधी जीवन आणि विचार - ९०
(भगतसिंग यांची फाशी आणि गांधीजींवर खोटे आरोप)
गांधीजींनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी का रोखली नाही?
असा प्रश्न ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी कृतघ्नता बाळगणारी मंडळी विचारत असतात.
डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी जॉन स्कॉट ऐवजी २१ वर्षीय जॉन साँडर्सची हत्या केली. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधिमंडळात क्रूड बॉम्ब आणि पत्रकं फेकली. दोघांना अटक झाली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला.
१२ मार्च १९३० रोजी मिठाचा सत्याग्रह सुरू झाला आणि जुलै अखेर पर्यंत गांधी आणि काँग्रेस नेत्यांसहीत ९० हजार लोकांना अमर्याद काळासाठी अटक झाली.
तरीही आंदोलन थांबलं नाही, कायदेभंगाची ही चळवळ मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या.
चर्चा करता यावी म्हणून आयर्विन यांनी २६ जानेवारी १९३१ रोजी गांधींची सुटका केली.
६ फेब्रुवारी १९३१ रोजी मोतीलाल नेहरूंचे निधन झाले. आणि १७ फेब्रुवारी रोजी गांधी आयर्विन यांच्यात बोलणी सुरू झाली. ही बोलणी १६ दिवस चालली.
अकरा मागण्यापैकी अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसहीत ९० हजार राजकीय कैद्यांना सोडण्यात यावे ही एक मागणी होती.
आयर्विन यांनी ही मागणी मान्य केली. (भाग ८८, ८९)
पण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जीवनदान देण्याची गांधीजींची मागणी व्हाईसरॉय आयर्विन यांनी ठामपणे नाकारली.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे साम्यवादी आणि नास्तिक विचारसरणीचे होते. त्यांना अभिप्रेत असणारा भारत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारशी, बौध्द, जैन या सर्वांचा होता. कुणीही धर्माधारीत राष्ट्राचे समर्थक नव्हते.
काँग्रेसचे नेते आसिफ अली यांनी त्यांची केस लढवली, तर ब्रिटिश सरकार तर्फे संघी विचारधारेचे राय बहादूर सूर्यनारायण हे सरकारी वकील होते.
भगतसिंग यांच्या वडिलांनी आणि आपल्या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यावर खुद्द महात्मा गांधींनी अंतिम पर्याय म्हणून भगतसिंग व सहकाऱ्यांना माफी मागण्यास सुचवले होते.
"माफी मागणे म्हणजे आम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप व्यक्त करणे ठरेल आणि आम्हाला कोणताही पश्चाताप नाही." असे सांगून त्या तिघांनीही माफी ऐवजी फाशीची निवड केली.
गांधीनी सहावेळा, नेहरूंनी आणि काँग्रेसने अनेक वेळा प्रयत्न केले, पण इंग्रज बधले नाहीत. कारण इंग्लंड मध्ये आयसीएस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याची हत्या करणाऱ्यास फाशी द्यावी असा दबाव सरकारवर टाकला होता. ब्रिटिश सरकारला पण, "जर शिक्षा नाही दिली तर अधिकारी भारतात जाऊन काम करण्यास नकार देतील." अशी भीती वाटत होती.
१९२२ साली चौरीचौरा येथे घडलेल्या हिंसक घटनेनंतर गांधीनी असहकार आंदोलन मागे घेतले. कारण हे प्रकरण इंग्रजांनी प्रतिष्ठेचे बनवले होते आणि हजारो निष्पाप भारतीय त्यांच्या रागाचे बळी पडले असते. त्यावेळी हजारो भारतीयांचे प्राण वाचले आणि यावेळी मिठाच्या सत्याग्रहात ९० हजार लोकांना सोडवले गेले. त्यांची कुटुंबं आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होण्यापासून वाचली.
हिंसेने काहीही मिळणार नाही हे गांधीजी चांगलेच जाणून होते. हिंसा करणे हे इंग्रजांना अत्याचार करण्याची संधी देण्यासारखे होते.
उलट असा प्रश्न उपस्थित होतो की, आज देशभक्त म्हणून मिरवणाऱ्या संघोट्यांनी भगतसिंग यांना फाशी होऊ नये यासाठी काय केले होते?
सावरकरांनी तर "कोण तो भगतसिंग त्याला काय एवढं महत्त्व देता." असे उद्गार काढले होते.
स्वातंत्र्यलढ्यात शून्य योगदान होता म्हणून न्यूनगंडाने पछाडलेले संघोटे स्वातंत्र्यलढा आणि त्यातील नेत्यांची बदनामी करत असतात. हा त्यांचा न्यूनगंडातून आलेला उद्धटपणा (Arrogance out of Inferiority Complex) आहे.
क्रमश:
पुढील भाग - गांधीजी आणि दुसरी गोलमेज परिषद
अजय मक्तेदारमहात्मा गांधी जीवन आणि विचार - ९१
(गांधीजी आणि दुसरी गोलमेज परिषद)
व्हाइसरॉय आयर्विन सोबत गांधींचा चांगला ताळमेळ होता, आयर्विन नंतर कट्टरपंथीय विलिंग्डन नवीन व्हाइसरॉय झाले. याच दरम्यान भारताच्या भविष्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी लंडनमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले होते. या परिषदेत सहभागी होण्यासाठी विविध गटाचे नेते सामील झाले होते. गांधी काँग्रेसचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत महिला प्रतिनिधी म्हणून सरोजिनी नायडू पण होत्या.
जहाजाने प्रवास करताना इजिप्शियन लोकांनी सुएझ आणि पोर्ट सैद येथे गांधींना भेटायला गर्दी केली होती पण त्यांना तशी परवानगी दिली गेली नाही. कवी अहमद शौकी यांनी लोकांना गांधींचं स्वागत करण्याचं आवाहन केलं होतं.
मार्सेलिसमध्ये कालाईसला जाण्यासाठी ब्रिटिश खाडीच्या किनाऱ्यावर ट्रेन पकडण्यासाठी गांधी गेले असता शेकडो लोकांनी, पत्रकारांनी त्यांना गराडा घातला, त्यांचं स्वागत केलं.
१२ सप्टेंबरला इंग्लंडला फॉकस्टोन इथे गाडी पोचली तेंव्हा पाच हजार लोकांनी त्यांचे स्वागत केले. गांधी जेंव्हा किंग्जले हॉलला पोचले, तेंव्हाही ईस्ट लंडनच्या लोकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं.
लंडन प्रवासात गांधी धोती आणि पंचा अशा साध्या वेशभूषेतच होते आणि कुठल्याही महागड्या हॉटेलात न थांबता ते लंडनमधील गरीब वस्त्यांमध्ये राहिले. त्यांची वेषभूशा हा कुतूहलाचा विषय बनला होता.
भारतातून मुस्लिम, शिख, पारशी, अँग्लो-इंडियन, युरोपियन संस्थानिक व महाराष्ट्रातून अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करणारे आंबेडकर, इत्यादी प्रतिनिधी परिषदेसाठी आले होते.
बैठकीमध्ये गांधीजींनी स्वातंत्र्याची मागणी करून अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीला विरोध केला. अस्पृश्य हे हिंदूच आहेत आणि त्यांना अशा रीतीने तोडता येणार नाही, हे गांधीनी ठामपणे सांगितलं.
लंडनची गोलमेज परिषद गांधींसाठी यशस्वी ठरली नाही. गांधींच्या स्वातंत्र्याच्या मागणीला आंबेडकर आणि आगा खान यांनी समर्थन दिलं नाही. विभक्त मतदारसंघासाठी मुस्लिम, शिख, पारशी सहीत सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. गांधीजी एकटे पडले होते.
इंग्रजांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब होती. त्यांची भारतातील लोकांना जाती-धर्मात विभागून फोडा व राज्य करा ही रणनीती आणखीनच मजबूत झाली होती.
या यात्रेदरम्यान गांधीजींना इंग्लंडमध्ये एका पत्रकाराने विचारलं की, भारतातील अस्पृश्यांना मिळत असलेल्या विभक्त मतदारसंघाला असलेला विरोध पाहून अस्पृश्य तुमच्यावर नाराज आहेत. अशामध्ये जर कुण्या दलीत व्यक्तीने तुम्हाला मारलं तर तुम्ही काय कराल?
अहिंसक गांधीजींनी शांतपणे उत्तर दिलं, "त्याने जर एका गालावर मारलं तर मी दुसरा गाल पुढे करेन."
सर्व पत्रकार आश्चर्याने बघत होते, त्याने पुन्हा विचारलं, "तुम्ही असं का कराल?"
त्यावर गांधीजी म्हणाले,
"आम्ही हजारो वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करत आहोत. त्यांचा राग जर मला मारून शांत होणार असेल तर मी मरायला ही तयार आहे."
त्यावेळी यात्रेदरम्यान इंग्लंडमध्ये गांधीजींनी अनेक ठिकाणी भेट देऊन कामगार, विद्यार्थी, सामान्य जनता, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि आपले विचार परखडपणे मांडले.
"त्याने जर एका गालावर मारलं तर मी दुसरा गाल पुढे करेन." हे विधान अर्धवट सांगून हिंदुत्ववादी संघटना गांधीजींच्या अहिंसेची टर उडवत असतात.
कारण या लोकांना यांच्या पूर्वजांनी केलेल्या अन्याय, अत्याचाराला लपवायचे असते. सनातनी हिंदूंनी बहुजन हिंदूंवर जेवढे अत्याचार केले तेवढे इंग्रज आणि मुस्लिमांनी कधीही केले नाहीत.
क्रमश:
पुढील भाग - गांधींच्या परखड विचारांची ब्रिटिशांना अनुभूती
अजय मक्तेदार यांच्या वॉलवरून
========
गांधी सिनेमा १९८२ साली आला. त्याच्या पन्नास एकावन्न वर्षं आधी म्हणजे १९३२ साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाइनने ह्या जगात कुणालाच माहीत नसलेल्या आणि जगभरात ज्यांचे पुतळे आहेत अशा व्यक्तिला पत्र पाठवले होते. असे रिकामे उद्योग करायला आईनस्टाइनला वेळ होता हे म्हणजे भलतच. https://ncert.nic.in/del/pdf/3_Patrachaar.pdf इथे वाचता येईल.
राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद ह्यांच्या साईटवर आहे.
Source: Words and Expressions, Workbook in English, Class-IX, NCERT Publication
...
पत्रातील मजकूर -
Respected Mr. Gandhi,
I use the presence of your friend in our home to send you these lines. You have shown through your words, that it is possible to succeed without violence even with those who have not discarded the method of violence. We may hope that your example will spread beyond the borders of the country, and will help to establish an international authority, respected by all, that will take decisions and replace war conflicts.
With sincere admiration
Yours
(Signed, ‘A. Einstein’)
I hope that I will be able to meet you face to face someday.
Gandhi’s response
LONDON,
October 18, 1931
...
गांधी कुणालाही माहीत नसतानाही अमेरिकेतल्या न्यूयार्कस्थित टाईम मॅगझिनने १९३० साली गांधींचा उल्लेख ' मॅन ऑफ द इयर ' असा केला होता. मॅगझिन कव्हरवर गांधीजी होते. नंतर १९३१ मध्येही गांधीजींचा मॅगझिन कव्हरवर ' सेंट अर्थात संत गांधी ' असा उल्लेख व फोटो टाईमने केला. त्या काळात परमेश्वराशी संवाद वगरे होत नसल्या कारणानं भविष्यात आपण गांधी सिनेमा बनवणार आहोत हे एटनबरो ह्यांनाही माहीत नसावे.
गांधी सिनेमा येण्याआधी फ्रेंच फोटोग्राफर हेनरी कार्टिअर ब्रेसों ह्यांनी गांधी चालते बोलते असतानाचे आणि त्यांच्या अंत्ययात्रेचे जे फोटो काढले त्याचा फोटो एस्से मॅग्नमवर उपलब्ध आहे.
https://www.magnumphotos.com/newsroom/religion/henri-cartier-bresson-india-death-gandhi/
ह्यातील अंत्ययात्रेच्या फोटोंमधली हजारो लाखोंचा जनसमुदाय पाहता गांधींची लोकप्रियता दिसेल. हे फोटो १९४८ सालचे आहेत. अगेन विश्वगुरू म्हणतात त्याप्रमाणे गांधींबद्दल जगात कुणालाही माहीत नसण्याचा काळ होता तो.. ब्रेसॉंसारख्या जगविख्यात फ्रेंच फोटोग्राफरला भारतात येऊन महात्मा गांधींचे फोटो काढावे वाटले तेही ते मोर बदकाला चकली चिवडा भरवत नसताना हे म्हणजे कायच्या काय आहे. असं कुठे असतं का !
केवळ ब्रेसांच नव्हे तर अनेक परदेशी छायाचित्रकारांनी गांधींचे फोटो काढलेले आहेत. त्यातील एक Margaret Bourke-White ह्या अमेरिकन वॉर फोटोग्राफर होत्या. त्यांचा जन्म १९०४ साली आणि मृत्यू १९७१ साली झाला म्हणजे गांधी सिनेमा यायच्याआधी त्यांना गांधी कसे काय माहीत झाले असतील हे एक नवलच आहे. गांधीचे फोटो काढून ते लाईफ मॅगझिन, टाईम मॅगझिनला देऊन वगरे मार्गारेट निर्वतल्या त्याआधीच त्यांना गांधी सिनेमातले डीटेल्स कळले हा दैवी चमत्कारच म्हणायला हवा किंवा येड्याचा बाजार. त्याशिवाय का त्या तडमडत आल्या असतील भारतात गांधींना भेटायला?
https://www.life.com/people/gandhi-and-his-spinning-wheel-the-story-behind-an-iconic-photo/
देश विदेशातल्या लोकांना गांधींचे नेमके का आकर्षण वाटत होते? की गांधी व गांधी विचारांबद्दलचा आदर, उत्सुकता गांधी सिनेमा आल्यानंतर लोकांच्या मनात तेवू लागली हे एटनबरो किंवा बेनजी सांगू शकतील.
गांधीजींच्या एका ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण १९६८ मध्ये लंडनमध्ये Tavistock Square येथे झाले. बाकी जगभरात त्यांचे पुतळे स्मारकं गांधी सिनेमा येण्याआधी आणि नंतर बनवली जात होती. सिनेमामुळेच गांधी लोकांना माहीत झाले त्याआधी ते कुणालाही माहीत नव्हते असे बोलचेंडू उडताना पाहून जगभरातील गांधीजींच्या पुतळ्यांनी हातातली काठी भिंतीला टेकवून ठेवली असेल आणि टिव्हीसमोर जाऊन कोपरापासून हात जोडले असतील. पण ही ब्रेक्रिंग न्यूज उघडा डोळे झोपा नीट टाईप मिडिया दाखवणार नाहीत. अशा बातम्या येतच नसतात. ठेंगा.
गांधींचे विचार आणि गांधी कुणालाही पटोत न पटोत गांधीबाबा फेमस आहेत. कोबी समर्थक गांधींबद्दल भलंबुरं बोलतात त्यांच्या नावाने बोटं मोडतात. पण पोपट हा होतो की नेमके तेव्हाच कोबीजी गांधींचे कौतुक सुरू करतात. त्यांच्या स्मारकांना भेटी देतात फुले वाहतात. असं करण्याची काय गरज पडली ह्यांना हे भक्त त्यांना का विचारत नाहीत? कितीही शिव्या घाला गांधींसमोर झुकावेच लागते. दिखाव्यासाठी का होईना..
रेणुका खोत यांच्या FB वॉलवरून
Comments
Post a Comment