नेहमीप्रमाणे लेक्चर संपवून स्टाफरूममध्ये येऊन बसलो होतो. लेक्चर म्हंटले की ताण येतोच! त्यातही वर्ग जर फुल भरलेला असेल तर ताण येतोच येतो पण अध्यापन करायलाही मजा येते. तसा माझ्या लेक्चरला वर्ग नेहमीच भरलेला असतो. फार कमी शिक्षकांच्या नशिबी आजकाल हे सुख असते. त्याअर्थी स्वतःला नशीबवान म्हणायला हरकत नाही. त्यात कंपनी कायदा, मॅथेमॅटिक्स आणि अकाऊंटसारखे रटाळ प्रवृत्तीचे विषय शिकवायचे म्हणजे मुलांना भावेल आणि आवडेल अश्या पद्धतीने शिकविणे हेच कौशल्य असते आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर निसर्गाने ते मला बहालही केले आहे असे वाटते. त्याअर्थाने मी स्वतःला सुदैवी आणि समाधानीही समजतो. विद्यार्थ्यांना (यात मुले आणि मुली दोघेही आले) त्यांच्या पातळीवर जाऊन शिकविल्याशिवाय आणि त्यांच्या भावनांना हात घातल्याशिवाय विद्यार्थी आपल्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत हा अनुभव गाठीशी होता. वर्गात शिकवीत असताना मी ते करतोही. त्यामुळेच बरेच विद्यार्थी मनमोकळे बोलतातही, अगदी मुलीसुद्धा! तर झाले असे की, मी स्टाफरू...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers