राहुल गांधींना नक्की करायचंय तरी काय? उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय जतीन प्रसाद यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. तसे पाहता ते मनाने कधीच काँग्रेसमध्ये नव्हते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका, २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. तेव्हाच २०१९ मध्ये ते मनाने भाजपमध्ये दाखल झाले होते पण प्रियंका गांधींच्या मध्यस्थीमुळे थांबले होते. त्यांनतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती तिथे काँग्रेसला सपशेल अपयश आले. त्यानंतर मात्र आता आपण काँग्रेसमध्ये थांबण्यासारखे काहीही राहिले नाही असा ठाम निश्चिय करून आता होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपकडे जाण्यासाठी उड्डाण भरले आहे. त्यामुळे राजस्थानातील युवा आणि प्रभावी नेते सचिन पायलट यांच्या बंडाला पुन्हा एकदा आकाश प्राप्त झाले आहे. जतीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण नेते असून तेथील ब्राह्मण लोकसंख्या १३% इतकी आहे आणि जतीन प्रसाद गेली तीन वर्षे ब्राह्मण संघटन करत होते. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपच...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers