विक्रम वेताळ कथा: सत्तापालट पौर्णिमेच्या रात्री उजेडात वेताळाला पकडणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन विक्रमने अमावस्येच्या रात्री अंधारात वेताळाला पकडायचे असे ठरविले. त्यात आजच अमावस्या आहे हे लक्षात आल्यावर काहीही करून वेताळ आजच आपल्या हातात आलाच पाहिजे असा निश्चय करून विक्रम गडबडीनेच उठला. कसेबसे आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी बोलण्याची चूक यावेळी करायची नाही असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. आज याला पाठीवर बसू द्यायचे नाही असा विचार करत असतानाच वेताळाने विक्रमच्या डोळ्याचे पाते लवण्याच्या आत चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले आणि दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण होशील. वेताळाच्या काव्याला बळी पडायचे नाही हे मनोमन ठरवून आलेला विक्रम नाइलाजानेच त्याला म्हण...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers