लघुकथा: सोबत वयाच्या पंचवीशीतील निशा नवीन घराच्या शोधात होती. खूप शोधाशोध केल्यानंतर शहरापासून दूर असलेल्या एका भागात छोटेखानी घर मिळाले होते. लोकवस्ती खूपच विरळ होती तसेच रस्त्यापासून दूर असल्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी त्याचा काही विशेष त्रास होणार नव्हता. त्यामुळे तिला लेखिका म्हणून आवडणारा एकांत येथे सापडणार होता त्यामुळे ती खुश होती. पण घर बरेच वर्षे बंद असल्यामुळे साफसफाई करावी लागनार होती . त्यातच तिला कामाचा कंटाळा आला होता म्हणून ती त्यासाठी एखादी बाई मदतीला मिळेल का? याच्या शोधात होती. पण दिवसभर आजूबाजूला विचारपूस करूनही बाई काही मिळाली नाही. रात्र झाली तरी पसारा तसाच पडला होता. आता सकाळी लवकर उठून पसारा आवरावा असा विचार करून ती आत जाऊ लागली. तेवढ्यात तिला गेटच्याबाहेर एक सत्तरीतली म्हातारी बसलेली दिसली. हिला मदतीला घेतले तर आपले काम सोपे होईल म्हणून तिने तिला आत बोलावून घेतले. म्हातारी आनंदाने लगेच आत आली. एवढ्या रात्री कुठे जाणार तुम्ही, आजची रात्र इथेच थांबा असे म्हणत निशाने पर्समध्ये हात घालून सोबत आणलेले स्नॅक्स तिला दिले. म्हातारीने मानेनेच ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers