रात्रीचे दहा वाजून गेले होते. आजोबा अजून पुण्याहून आले नव्हते. शेवटी ची गाडी आज अचानक लेट झाली होती म्हणून गायकवाड आजी ग्रहण मालिका बघत बसल्या होत्या. अचानक दरवाजावर टक टक झाली. आजोबा आले असावेत असा विचार करून आजीने गडबडीने दार उघडले तर दारात एक युवती उभी होती कपडे फाटलेले होते. अंगातून रक्त वाहत होते ती काकुळतीला येऊन आजीला म्हणाली, मला जर माझी जखम पुसन्यासाठी कापूस मिळेल का? आजीला तिची दया आली. तिला आत घेऊन आजींनी कापूस देत काय झाले असे विचारले तर ती म्हणाली, " चार दिवसांपूर्वी मी रात्री कामावरून सुटून घरी चालले होते अचानक चार गुंडांनी मला अंधारचा फायदा घेऊन तोंड दाबून गाडीत घातले आणि तुमच्या घरामागच्या झाडीत आणून माझ्यावर पाशवी बलात्कार केला". काळजी वाटून आजींनी दरवाजा लावत मग इतके दिवस पोलिसात तक्रार का केली नाही असे विचारले. त्यावर ती तरुणी म्हणाली," मी त्यांचा प्रतिकार करून पोंलीस स्टेशनलाच चालले होते पण त्यांनी मला खूप मारहाण करून माझा गळा दाबून खून केला. माझा मृतदेह अजून तिथेच पडून आहे. तुम्ही जर पोलिसांना माझ्या खुनाची बातमी सांगाल का? आजीने घाबरत घाबरत मागे पहिले तर घरात कोणीच नव्हते.
©के. राहुल 9096252452
©के. राहुल 9096252452
Comments
Post a Comment