सलमान तुझा सिनेमा ईदला रिलीज करू, अक्षय तुला दिवाळीत थेटरं देऊ. पण नागराजसाठी किमान शिमगा तरी राखून ठेवू. म्हणशील तू यात मी उगाच जात-धर्म आणतोय, दुखत नसताना काहीच उगीच मी कन्हतोय. तू सांगशील ती तारीख आपण धरू, पण अधून मधून मारुती कांबळेलाही हिरो म्हणून साईन करू. सलमान तुझा सिनेमा............ सिनेमा म्हणजे जोक नसतो, समाजमनाचा रोख असतो. सिनेमा म्हणजे वारसा असतो, बदलत्या समाजाचा आरसा असतो. हा आरसा दाखवायला आता सुरू करू, सलमान तुझा सिनेमा.......... सई, सोनाली, तेजस्वीनी, प्रिया अन् मुक्ता सुद्धा रूळलीय, सिनेमाची नस आता त्यांनी चांगलीच कळलीय. साधी असली म्हणून काय झाले, चाचपडणा-या आर्चीला सुद्धा सेट करू. सलमान तुझा सिनेमा........ म्हणशील तू मी तर पडलो हिंदीतला, मराठीशी माझा संबंध तरी काय? हिंदी काय अन् मराठी काय, भेद असतो सर्वत्र सुरू म्हणून हा भेद अगोदर बंद करू, सलमान तुझा सिनेमा........... सिनेमाला नसते जात आणि धर्म, पण असतो एक प्रवाह, जाती धर्माकडे नकळत वळवणारा. सनीला हिंदू अन् शाहरुखला मुस्लिम ठरवणारा, नको नको वाटत असताना, दमेपर्यंत पळवणारा. तो प्रवाह आ...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers