सलमान तुझा सिनेमा ईदला रिलीज करू,
अक्षय तुला दिवाळीत थेटरं देऊ.
पण नागराजसाठी किमान शिमगा तरी राखून ठेवू.
म्हणशील तू यात मी उगाच जात-धर्म आणतोय,
दुखत नसताना काहीच उगीच मी कन्हतोय.
तू सांगशील ती तारीख आपण धरू,
पण अधून मधून मारुती कांबळेलाही हिरो म्हणून साईन करू.
सलमान तुझा सिनेमा............
सिनेमा म्हणजे जोक नसतो,
समाजमनाचा रोख असतो.
सिनेमा म्हणजे वारसा असतो,
बदलत्या समाजाचा आरसा असतो.
हा आरसा दाखवायला आता सुरू करू,
सलमान तुझा सिनेमा..........
सई, सोनाली, तेजस्वीनी, प्रिया
अन् मुक्ता सुद्धा रूळलीय,
सिनेमाची नस आता त्यांनी चांगलीच कळलीय.
साधी असली म्हणून काय झाले,
चाचपडणा-या आर्चीला सुद्धा सेट करू.
सलमान तुझा सिनेमा........
म्हणशील तू मी तर पडलो हिंदीतला,
मराठीशी माझा संबंध तरी काय?
हिंदी काय अन् मराठी काय,
भेद असतो सर्वत्र सुरू
म्हणून हा भेद अगोदर बंद करू,
सलमान तुझा सिनेमा...........
सिनेमाला नसते जात आणि धर्म,
पण असतो एक प्रवाह, जाती धर्माकडे नकळत वळवणारा.
सनीला हिंदू अन् शाहरुखला मुस्लिम ठरवणारा,
नको नको वाटत असताना, दमेपर्यंत पळवणारा.
तो प्रवाह आपण माणुसकीत बंदिस्त करू,
सलमान तुझा सिनेमा...........
म्हणतील कुणी यांना आता सिनेमातही आरक्षण हवंय,
ह्याची ही नेहमीचीच सवय.
बोंबलू दे कोणालाही काहीही,
त्यांच्याकडे आपण सगळे दुर्लक्ष करू.
सलमान तुझा सिनेमा..........
के. राहुल 9096242452
अक्षय तुला दिवाळीत थेटरं देऊ.
पण नागराजसाठी किमान शिमगा तरी राखून ठेवू.
म्हणशील तू यात मी उगाच जात-धर्म आणतोय,
दुखत नसताना काहीच उगीच मी कन्हतोय.
तू सांगशील ती तारीख आपण धरू,
पण अधून मधून मारुती कांबळेलाही हिरो म्हणून साईन करू.
सलमान तुझा सिनेमा............
सिनेमा म्हणजे जोक नसतो,
समाजमनाचा रोख असतो.
सिनेमा म्हणजे वारसा असतो,
बदलत्या समाजाचा आरसा असतो.
हा आरसा दाखवायला आता सुरू करू,
सलमान तुझा सिनेमा..........
सई, सोनाली, तेजस्वीनी, प्रिया
अन् मुक्ता सुद्धा रूळलीय,
सिनेमाची नस आता त्यांनी चांगलीच कळलीय.
साधी असली म्हणून काय झाले,
चाचपडणा-या आर्चीला सुद्धा सेट करू.
सलमान तुझा सिनेमा........
म्हणशील तू मी तर पडलो हिंदीतला,
मराठीशी माझा संबंध तरी काय?
हिंदी काय अन् मराठी काय,
भेद असतो सर्वत्र सुरू
म्हणून हा भेद अगोदर बंद करू,
सलमान तुझा सिनेमा...........
सिनेमाला नसते जात आणि धर्म,
पण असतो एक प्रवाह, जाती धर्माकडे नकळत वळवणारा.
सनीला हिंदू अन् शाहरुखला मुस्लिम ठरवणारा,
नको नको वाटत असताना, दमेपर्यंत पळवणारा.
तो प्रवाह आपण माणुसकीत बंदिस्त करू,
सलमान तुझा सिनेमा...........
म्हणतील कुणी यांना आता सिनेमातही आरक्षण हवंय,
ह्याची ही नेहमीचीच सवय.
बोंबलू दे कोणालाही काहीही,
त्यांच्याकडे आपण सगळे दुर्लक्ष करू.
सलमान तुझा सिनेमा..........
के. राहुल 9096242452
Comments
Post a Comment