तु राम होऊ नको मला सीता होणं जमणार नाही माझ्याच्यानं अग्निपरिक्षा देणं तर होणारच नाही आणि तुझ्याविना तर सोडच तुझ्यासोबतचाही वनवास जमणार नाही लग्नात घेतलेल्या सप्तवचनातलं 'जन्मभर तुला साथ देईन' हे वचन पाळता न आलेल्या तुला माझ्याच्याने एकवचनी न्यायनिष्ठ म्हणणं होणारच नाही... तु लक्ष्मणही होऊ नकोस मला उर्मिला होणं जमणार नाही राजवाड्यातली सुखं टोचतील मला बंधुप्रेमाचं वचन पाळताना सप्तपदीतलं तेच सात जन्माच्या सोबतीच वचन तु ही तुझ्या भावासारखंच कोलून दिलंस विरहात जळत तुला श्रेष्ठ बंधुप्रेमी म्हणणं मला जडच जाईल.... तु बुद्धही होऊ नकोस मला यशोधरा होणं जमणार नाही दुःखाचं मुळं शोधायला घर सोडणाऱ्या तुला ते भेटणार नाही कारण तु ते माझ्या हृदयात घर सोडताक्षणी ठेऊन जाशील शांततेच्या प्रेमात असणारा तु माझ्या मनातला गोंधळ ऐकुही शकला नाहीस ज्या गोष्टींच्या शोधार्थ तु गेलास त्याच गोष्टी माझ्याजवळ सोडून गेल्यानं त्याचं ज्ञान तुला झालं हा दावा मी खोटा पाडीन आणि सप्तपदीत तुला दिलेलं विश्वासार्हतेचं वचन माझ्याकडुन मोडलं जाईल तु तरी साथ देण्याचं कुठं पाळलंस हां,व्हायचंच असेल तर तुकाराम ह...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers