लघुकथा : पुनरावृत्ती सुनील आणि स्मिता आपली बॅग भरून पसारा न्यायला येणाऱ्या गाडीची वाट पाहत होते. रमाकाकू कोपऱ्यात उभ्या राहून अश्रू ढाळत होत्या. एकुलता एक मुलगा सुनीलला त्यांनी आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर मोठ्या काबाडकष्टाने आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाढविले होते. आपल्या अनेक स्वप्नांना, सुखांना आणि इच्छा आकांक्षाना मुरड घालून त्याला काहीही कमी पडणार नाही याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती. असा हा एकुलता एक मुलगा लग्न करून सहा महिने झाले नाही तर आपल्या आईला उतारवयात एकटीला टाकून दुसरीकडे राहायला चाललाय ही बाब त्यांना सहन होत नव्हती. खाली मान घालून त्या असवे ढाळत असतानाच बाहेर मालगाडी आणि टॅक्सी येऊन उभी राहिल्याचा आवाज आला. सुनील आणि स्मिता बॅग उचलून जाऊ लागले. शेवटचा प्रयत्न म्हणून त्या सुनीलला आर्जवे करू लागल्या. "आई, मी थांबलो असतो, नक्कीच थांबलो असतो! जर तू माझ्यावर तसे संस्कार केले असते तर. पण तू स्वतः माझी लाडकी आजी आणि तुझी सासू आजारी असताना, तुझी आणि बाबांची सर्वात जास्त गरज असताना तू माझ्या डोळ्यासमोर तिला एकटीला टाकून बाबांना घेऊन घराबाहेर पडलीस. बाबांना त्...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers