बजेट २०२१ आणि शेती : घोषणा आणि सद्यस्थिती. ©के.राहुल, ९०९६२४२४५२ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या सरकारचे अंदाज पत्रक २०२१ लोकसभेत सादर केले. कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, सरकार आणि विरोधी पक्षांकडून होत असलेले विविध आरोप प्रत्यारोप याबरोबरच सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांमुळे गेली दोन महिने दिल्लीच्या चारही सीमावर चालू असलेले शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अर्थव्यवस्थेला आणि त्यातही कृषी क्षेत्राला उर्जित अवस्था देण्यासाठी काय घोषणा करणार? याकडे जाणकारांचे लक्ष होते. नोकरदार वर्गाला कोणताही कर दिलासा न दिल्याने नोकरदार वर्गाची घोर निराशा झालेली आहे. सरकार सरसकट सर्व सार्वजनिक कंपन्या आणि सरकारच्या मालकीच्या उद्योगांचे खाजगीकरण करत असल्याच्या चर्च्यांच्या पार्श्वभूमीवर भाग बाजाराने मारलेली उसळी सरकारला दिलासा देणारी ठरली. पण याचा कृषीक्षेत्राशी काहीच संबंध नसल्याने सरकार उद्योगधर्जीणे आहे की काय? असा संशय शेतकरी वर्गात मनात बळवण्याची जाणीव सरकारला झाली असणार! त्यावर मत करण्यासाठी व तीन कृषि विधेयकांमुळे शे...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers