ती मला म्हणाली,
सांग तू प्रेमात कधी पडलास का?
तोडले कोणी हृदय म्हणून एकांतात कधी रडलास का?
मी तिला म्हणालो,
खरे प्रेम कधी कोणाला रडू देत नाही,
प्रेमभंगाची ठेच लागून पडू देत नाही.
झाल्या किती चुका जरी,
उगी अबोला धरत नाही.
दिला कोणी धोका म्हणून,
प्रेम कधी मरत नाही.
प्रेम हे असेच असते,
पुन्हा पुन्हा होत नाही.
धरला किती अबोला जरी
सोडून कधी जात नाही.
प्रेम असेल आईचे तर,
प्रेम असते आंधळे.
प्रेम असेल अल्लड प्रेयसीचे तर,
प्रेम असते वेंधळे.
प्रेम असेल समजूतदार तर,
प्रेम असते उदार,
Comments
Post a Comment