*रानडे गांधी आणि जिन्ना*
*लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
पुण्याच्या डेक्कन सभेने *दिं. महादेव गोविंद रानडे* यांच्या १०१ व्या जन्मदिनानिमित्त एक समारंभ आयोजित करून मला भाषण देण्याचे निमंत्रण दिले. १८ जानेवारी १९४० ला रानडेंचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो.
हे निमंत्रण स्वीकारण्यास मी फारसा उत्सुक नव्हतो, याला एक कारण होते. रानडे संबंधित भाषणात सामाजिक आणि राजकीय समस्यावर माझ्या वैयक्तिक विचारांची छाप त्या चर्चेत उमटल्यावाचून राहणार नाही आणि ती श्रोत्यांना व कदाचित डेक्कन सभेच्या सभासदानाही आवडणार नाही, याची मला जाणीव होती . परंतु शेवटी मी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. जेव्हा मी हे भाषण दिले तेव्हा ते प्रकाशित व्हावे अशी माझी इच्छा नव्हती. थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त दिलेली भाषणे ही बहुदा प्रासंगिक असतात. त्यांना कायमस्वरूपी मूल्य नसते. माझे भाषणही याला अपवाद असावे असे मला वाटत नाही . परंतु माझे काही उत्पाती मित्र आहे. त्यांची इच्छा आहे संपूर्ण भाषण छापले जावे, अशी होती व त्यासाठी आग्रह करीत होते . भाषण प्रकाशित करण्याविषयी मी मात्र तटस्थ आणि उदासीन होतो !. तथापि या भाषणाला जी प्रसिद्धी मिळाली तेवढ्यावरच मी पूर्णतः समाधानी आहे. यापेक्षा त्याला अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी अशी माझी कोणतीही आकांक्षा व अपेक्षा नाही. परंतु विस्मृतीच्या पडद्याआड जाण्यापासून या भाषणाची सुटका व्हावी अशी जर काही लोकांची इच्छाच असेल तर त्यांना नाराज करण्याचे काही कारण आहे , असे मला वाटत नाही.
प्रकाशित भाषणामध्ये प्रत्यक्षात दिलेले भाषण हे दोन बाबतीत वेगळे आहे . वेळेअभावी भाषणाचा १० वा भाग प्रत्यक्ष देतेवेळी आला होता. १० व्या भागाशिवाय प्रत्यक्षात हे भाषण दीड तास झाले, हा पहिला फरक होय. दुसरा फरक म्हणजे त्या भागातील बराचसा भाग सोडून देण्यात आला. यामध्ये रानडयांची ज्योतिबा फुलेंशी तुलना करण्यात आली होती. याला वगळण्याची दोन कारणे आहेत . दोनही व्यक्तींना योग्य न्याय देऊ शकेल इतपत पूर्ण तपशिलासह अशी तुलना या भागामध्ये केली गेली नव्हती.
दुसरे कारण असे आहे की, यावेळी कागदाची टंचाई होती. यामुळे भाषणाचा काही भाग वगळावा लागणार असे दिसून आले. तेव्हा भाग वगळणेच योग्य असे मला वाटले.
एका विचित्र परिस्थितीमध्ये हे भाषण प्रकाशित होत आहे . साधारणतः समीक्षण हे प्रकाशनानंतर प्रसिद्ध होत असते. या पुस्तकाच्या बाबतीत मात्र परिस्थिती उलट झालेली आहे . समिक्षामधून या भाषणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे . प्रकाशकाला काळजी वाटावी अशी ही बाब आहे. पुस्तक प्रकाशित करण्यात गंभीर धोका आहे , हे प्रकाशकाला माहीत असूनही त्याने हा धोका पत्करलेला आहे . मला या टिकाकारांसंबंधी अधिक काही म्हणावयाचे नाही. माझ्या मित्रांनी या भाषणात प्रासंगिक मूल्यांपेक्षा अधिक मौलिक विचार आहेत , अशी जी भूमिका घेतलेली आहे तिला या टीकेमुळे उत्तर मिळते. मला स्वतःच्या बाबतीत सांगायचे झाले तर वर्तमानपत्रांमधून या भाषणावर जी निंदा करण्यात आलेली आहे , त्यासंबंधी मी जरासुद्धा विचलित झालो नाही . बरं , या लोकांना निंदा करायला आधार तरी कुठला आहे ?
माझी निंदा काँग्रेस वर्तमानपत्रकारानी केली आहे . या काँग्रेसवाल्या पत्रकारांना मी चांगलाच ओळखून आहे . त्यांच्या टिकेला मी मुळीच किंमत देत नाही. त्यांनी माझ्या युक्तीवादाचे कधीही खंडन केलेले नाही. माझ्याद्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक कार्याची निंदा करणे, टवाळी करणे ,धमक्या देणे व बनावट रिपोर्ट छापणे किंवा चुकीचा अर्थ लावणे आणि मी जे जे काही करतो त्याचा विपर्यास करणे इतके यांना माहित आहे. मी जे काही करतो त्यातील कोणतीही गोष्ट या काँग्रेसी पत्रकारांना आवडत नाही. हा काँग्रेस पत्रकारांचा माझ्याबद्दलचा वैरभाव हिंदूंच्या मनात अस्पृशयाबद्दल जो ज्वलंत द्वेष भरलेला आहे, त्याची केवळ प्रतिक्रिया आहे. मागील कित्येक वर्षापासून जिना हा कॉंग्रेस पत्रकारांच्या टीकेचा व थट्टेचा विषय होऊन बसलेला आहे . अशा जिनांवर मी टीका करताच मात्र हे काँग्रेसी पत्रकार दुखावले जातात. यावरून हे स्पष्ट होते की, हा त्यांचा माझ्या विषयीचा मुद्दाम वैरभाव आहे. माझ्यावर वर्षाव करण्यासाठी काँग्रेसी पत्रकारांनी कितीही जोरदार व कितीही घाणेरड्या शिव्या दिल्या तरीही मी माझे कर्तव्य केलेच पाहिजे.
मी मूर्तिपूजक नाही, मी मूर्तिभंजक आहे . मी आग्रहपूर्वक सांगतो की, मी त्यांचा द्वेष करीत नाही अथवा ते मला आवडत नाही. तर मी गांधी व जिना यांचा द्वेष करीतच असेन तर याचे कारण असे आहे की, *त्यांच्यापेक्षा भारतावर मी अधिक प्रेम करतो. ही त्या राष्ट्रवाद्याची खरी निष्ठा आहे. 'देश' हा व्यक्तीपेक्षा नेहमीच मोठा असतो, ही गोष्ट माझ्या देशबांधवांना सत्य घडून आलेली नक्कीच पहायला मिळेल किंबहुना गांधी व जिना यांची पूजा आणि भारत देशाची सेवा या दोन बाबींमधील मूलभूत अंतर आहे. एवढेच नव्हे तर या परस्परविरोधी बाबी आहेत*.
*बी.आर. आंबेडकर*
*१५ मार्च, १९४७*
*२२, पृथ्वीराज रोड,*
*नवी दिल्ली*.
----------------------------------------------
*
गांधी व जिना यांच्यावर मी टीका केली व या दोघांनी भारतीय राजकारण नासवून टाकले आहे, असे मी भाषणातच म्हणालो तसेच या दोघांविषयी मी अनादर व द्वेषभावना प्रदर्शित केली , असे माझ्या निंदकांचे म्हणणे आहे. त्यांना उत्तरादाखल मला एवढेच म्हणायचे आहे की , मी एक टीकाकार आहे व टीकाकार म्हणूनच मी माझी भूमिका पार पाडली आहे व यापुढे टीकाकार म्हणूनच पार पाडली पाहिजे. मी कदाचित चुकतही असेल परंतु चुपचाप बसून परिस्थिती अधिक बिघडू देण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचे मार्गदर्शन डोळे मिटून स्वीकारण्यापेक्षा चूक करणे अधिक चांगले आहे , असे मला नेहमीच वाटत आले आहे.
द्वेष भावनेने ग्रस्त झाल्याचा आरोप जे लोक माझ्यावर लावतात ते स्पष्टपणे दोन गोष्टी विसरतात. पहिली म्हणजे , हा आरोपित द्वेष हा माझ्या कसल्याही व्यक्तिगत लाभापोटी उद्भवलेला नाही. जर मी त्यांच्याविरुद्ध असेल तर त्याला कारण हे आहे की मला समझोता हवा असून एखाद्या आदर्श समझोत्यासाठी वाट पाहत बसण्याची माझी तयारी नाही.
एखाद्या शहंशहाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यासारखा त्यांच्या इच्छेवर व संमतीवर हा प्रश्न अडकून राहावा हे ही मी यापुढे सहन करणार नाही. दुसरी गोष्ट ही आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेम अथवा द्वेष भावना प्रबळ नसेल तर तो आपल्या जीवनाच्या कालखंडावर आपल्या कर्तृत्वाचा कसलाच ठसा उमटवू शकत नाही किंवा कोणत्याही आदर्श तत्त्वांना मूर्त रूप देऊन कोणत्याही महान कार्यासाठी प्रेरित होऊ शकत नाही. मी अन्याय-अत्याचार , ढोंगीपणा व भोंदूपणाचा द्वेष करतो. इतकेच नाही तर जे लोक या दुर्गुणांनी ग्रस्त आहेत, त्या सर्वांचा मी द्वेष करतो. परंतु दोष मात्र त्यांचाच आहे. मी माझ्या टिकाकारांना ठामपूर्वक सांगू इच्छितो की हा माझा द्वेषच माझी खरी शक्ती आहे. ज्या ध्येय आणि उद्देशावर माझा विश्वास आहे, त्याविषयीच्या प्रेमापोटीची द्वेष ही माझी व्यक्तिगत अभिव्यक्ती आहे.
याबाबतीत मला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही . याच कारण्यासाठी गांधी व जिना यांच्यावर टीका केल्याबद्दल क्षमायाचना अथवा दिलगिरी व्यक्त करीत नाही , कारण याच दोघा गृहस्थांनी भारतीय राजकारणाची प्रगती ठप्प केलेली आहे.
या निमंत्रणाबद्दल मी फार समाधानी, नाही हे मी तुम्हाला सांगितलेच पाहिजे. या प्रसंगाला अनुरूप असे भाषण मी देऊ शकेन अथवा नाही याबद्दल मला आशंका आहे. गेल्या वर्षी रानडे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त *श्रीनिवास शास्त्री* यांना *'प्रमुख वक्ता'* म्हणून बोलावण्यात आले . अनेक कारणामुळे ते या कार्याकरिता योग्य व्यक्ती होते. जीवनाच्या काही काळासाठी रानडे यांचे समकालीन असल्याचा दावा ते करू शकत होते . त्यांनी रानड्यांना जवळून पाहिले आणि रानडे यांनी ज्या कार्यासाठी आपले जीवन वाहून घेतले होते , त्याचे ते प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत. म्हणूनच त्यांच्या सहकार्यांबरोबर त्यांची तुलना करून त्यांचे योग्य मूल्यमापन करण्याची त्यांना संधी लाभली होती . म्हणूनच आत्मविश्वासपूर्वक व व्यक्तिगत संबंधांच्या नात्याने रानडयाविषयी ते आपले विचार व्यक्त करू शकले. रानडे यांच्या जीवनातील प्रत्यक्ष घटनांचे वर्णन करून रानड्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकू शकले. परंतु यापैकी कोणतीही योग्यता माझ्याजवळ नाही. रानडे यांच्याशी माझा कधीही संबंध नव्हता किंबहुना मी त्यांना पाहिले देखील नाही. त्यांच्याशी संबंधित असलेले माझ्या जीवनातील केवळ दोनच प्रसंग मला आठवतात . पहिल्या घटनेचा संबंध त्यांच्या मृत्यूशी संबंधित आहे.
त्यावेळी मी सातारा हायस्कूलचा पहिल्या वर्गाचा विद्यार्थी होतो . *१६ जानेवारी १९०१* ला शाळाना बंद ठेवण्यात आले आणि आम्हा मुलांना सुट्टी मिळाली होती. शाळा बंद ठेवण्याबाबत चौकशी केली असता *रानडे मृत्यू पावले*, असे आम्हाला सांगण्यात आले . मी त्यावेळी अंदाजे नऊ वर्षाचा होतो. रानडे कोण होते व त्यांनी कोणते कार्य केले , याबाबत मला काहीच माहीत नव्हते . इतर मुलांप्रमाणेच सुट्टी मिळाल्याबद्दल मी आनंदात होतो आणि कोण मरण पावले आहे याविषयी चिंता नव्हती.
रानडयांशी संबंधित दुसरा प्रसंग या पहिल्या प्रसंगा पेक्षा फारच नंतरचा आहे . एकदा माझ्या वडिलांच्या कागदपत्रांची बंडलं मी चाळून पाहत होतो . तेव्हा त्या बंडलांमध्ये १८९२ साली महारांना सैन्यामध्ये भरती करण्यात येऊ नये , या हुकमाविरुद्ध महार जातीतील कमिशन व नॉन कमिशनड् अधिकाऱ्याकरबी भारत सरकारकडे दाखल केलेल्या अर्जाशी संबंधित एक कागद मला आढळला.
एका सरकारी आदेशाद्वारे महारांची सैन्यभरती करण्यात येऊ नये , या आदेशाविरुद्ध न्याय मिळण्यास मदत व्हावी म्हणून रानड्यांनी लिहून दिलेल्या अर्जाची नक्कल आहे , असे विचारणा केल्यावर मला वडिलांद्वारे सांगण्यात आले . या दोन घटना व्यतिरिक्त रानडे यांच्या जीवनासंबंधित अन्य घटना मला आठवत नाही. रानडयांयाविषयी मी जे काही पुस्तकातून वाचलेले आहे आणि इतरांकडून ऐकले आहे , यावरच रानडयांसंबंधीचे माझे ज्ञान अवलंबून आहे. तुम्हास वाटेल किंवा काही ज्ञान मिळेल अशा स्वरूपाच्या वैयक्तिक माहितीची आपण माझ्याकडून अपेक्षा करू नये. एका सुप्रसिद्ध व्यक्तीविषयी माझे काय विचार आहेत आणि त्यांचे भारतीय राजकारणात कोणते स्थान आहे, केवळ याविषयीच बोलणार आहे.
आपणास माहीत आहे की , रानडे यांना महापुरुष मानणारे काही लोक आहेत , तसेच यांना महापुरुष न मानणारे देखील काही लोक आहेत . परंतु वास्तविकता काय आहे ? मला वाटते हा प्रश्न दुसऱ्या प्रश्नावर अवलंबून आहे . तो असा की , इतिहास हा महापुरुषांचे जीवन चरित्र असते का? हा प्रश्न प्रासंगिक आणि महत्त्वपूर्ण सुद्धा आहे. महापुरुषांची जीवन चरित्र जर इतिहास घडवित नसतील तर सिनेमा नटांपेक्षा त्यांना अधिक महत्त्व देण्याची आवश्यकताच उरत नाही. यावर मतभेद आहेत . काहींचे मत आहे की , व्यक्ती कितीही महान असला तरी तो काळाने निर्माण केलेला असतो . काळच त्याला कर्ताधर्ता असतो . काळच त्याच्याकडून सर्वकाही करवून घेत असतो . प्रत्यक्षात व्यक्ती मात्र काहीही करीत नसतो . याप्रकारच्या विचारसरणीचे लोक इतिहासाचा चुकीचा अर्थ लावत असतात.
ऐतिहासिक परिवर्तना संबंधि तीन वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत . आपल्याकडे इतिहासाची ऑगस्टेनियन प्रणित सिद्धांत आहे . या सिद्धांतानुसार इतिहास म्हणजे घटनांची क्रमबद्ध दैवी योजना आहे . या ईश्वरी योजनेनुसार माणसाला दुःख व युद्धाच्या प्रसंगातून काळ कंठावयाचा असून अंतिम निर्णयाचा दिवस (Day of Judgement) उजाडेपर्यंत हे असेच चालणार आहे . बकलच्या सिद्धांतानुसार इतिहासाची निर्मिती ही भूगोल आणि भौतिक परिस्थितीद्वारे केली जाते . कार्ल मार्क्स च्या तिसर्या सिद्धांतानुसार 'आर्थिक शक्ती ' ह्या इतिहास घडवित असतात . या तीन सिद्धांतापैकी कोणताही सिद्धांत इतिहास म्हणजे महापुरुषांचे जीवनचरित्र होय हे मात्र मान्य करीत नाही. हे तिनही सिद्धांत इतिहासाच्या निर्मितीत मानवाचे स्थान नाकारतात.
दैववादी वगळता कोणीही इतिहासाची ऑगस्टाइन प्रणित सिद्धांत मान्य करीत नाही. बकल आणि मार्क्सच्या सिद्धांतात काही तथ्य असले तरी याच्या सिद्धांतांना पूर्ण सत्य म्हणून स्वीकारता येत नाही. मानवनिरपेक्ष शक्तीच सर्वकाही आहेत आणि इतिहास घडविण्याच्या कार्यात माणसाला कसले स्थान नाही, असे प्रतिपादन करण्यात त्यांनी पूर्णतः चूक केलेली आहे. व्यक्तीशिवाय इतर शक्तींचा प्रभाव मानवी प्रभुत्वावर निश्चितच असतो . ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे . गारगोटी सर्व ठिकाणी आढळत नाही परंतु जिथेकुठे ती आढळते तेथे गारगोटी वर गारगोटी घासून अग्नी उत्पन्न करण्यास माणसाची गरज भासते. बी-बियाणे सर्वत्र आढळत नाही हे खरे , तथापि जेथे ते उपलब्ध आहेत तेथे ते पेरण्यासाठी मनुष्याची आवश्यकता भासते . नीट जमीन भुसभुशीत करून, नांगरून बी पेरावे लागते. त्याला खत आणि पाणी द्यावे लागते तेव्हाच पीक उत्पन्न होते . अशा प्रकारे शेती निर्माण होत असते. धातू सर्वत्र आढळत नाही परंतु जिथेकुठे आढळते त्या ठिकाणी त्यापासून यंत्र मशीन बनवण्यासाठी माणसांची आवश्यकता असते. आपली संस्कृती आणि सुधारणा ज्यावर अवलंबून आहे अशी शस्त्रे आणि यंत्रे बनवण्यासाठी माणसाची आवश्यकता पडेल.
पुरूष कोणाला म्हणता येईल? सिकंदर, अत्तीला, सिझर आणि तैमुरलंग इत्यादी शूरवीर योद्धा बाबत हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे कठीण नाही. वीर योद्धे युगनिर्माते असतात आणि त्यांच्याद्वारे व्यापक परिवर्तन घडून येतात . आपल्या प्रचंड विजयाद्वारे असे योद्धे आपल्या समकालीनाना स्तंभित आणि दिपवून सोडतात. कोणी आपणास महान पुरुष म्हणावे याची प्रतीक्षा न करताच ते महापुरुष होऊन बसतात.
हरणा मध्ये जसा सिंह त्याचप्रमाणे ते पुरुषांमध्ये - सिंह असतात. परंतु यांच्या कर्तृत्वाचा मानवी इतिहासावर चिरकालीन परिणाम फारच लहान प्रमाणात झालेला दिसून येत असतो, हेही तितकेच खरे आहे. त्यांचे विजय अल्पकालीन ठरतात. याबाबतीत नेपोलियनसारख्या महान सेनानायकाचा संपूर्ण विजयासंबंधी विचार केल्यास त्याला मुळच्या फ्रान्सच्या भागापेक्षाही आपल्या देशाच्या लहान सीमा बघाव्या लागल्या . जर दुरून त्यांच्यावर नजर फेकली तर या योद्ध्यांचे जगाच्या अवाढव्य कार्य - व्यापारांत महत्व तत्कालीन दिसून येते . त्यांचे चिरकालीन महत्त्व मात्र टिकून राहू शकत नाही . त्यांचे जीवन आणि नैतिक आचरणाचा तपशील जरी वेधक असला तरी ते समाजावर स्तायी परिणाम करु शकत नाही आणि संपूर्ण समाजाचे स्वरूप बदलण्याकरिता समाजाची पुनर्रचना करण्यासाठी किंवा समाजाला गती देण्यासाठी त्यांचे कर्तुत्व अपुरे पडते.
जेव्हा असा प्रश्न वीर योद्धा नसलेल्या पुरुषांविषयी विचारला जातो तेव्हा मात्र उत्तर देणे कठीण होऊन जाते . कारण तेव्हा तो प्रश्न वेगवेगळ्या कसोट्यावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या लोकांद्वारे तपासून बघितला जातो. नायक पूजेचे पक्षपाती असलेल्या कार्लाइलची महापुरुषांना ओळखण्याची कसोटी मात्र वेगळी आहे. खालील शब्दात त्यांनी ती वर्णिली आहे-
*महापुरुषांविषयी मी आग्रहपूर्वक सांगतो की, तो सत्यनिष्ठेव्यतिरिक्त काहीही नसतो... एखादा व्यक्ती तेव्हाच कर्तृत्वशाली होऊ शकतो जेव्हा तो सत्यनिष्ठ असतो. सत्यनिष्ठा आणि तीही अस्सल व गंभीर सत्यनिष्ठा त्याच्या ठायी असणे हीच कोणत्याही महापुरुषाची खरी कसोटी आहे.*
खरी कसोटी कोणती ? माझ्या मते सर्वच अपूर्ण असून कोणतीही कसोटी परिपूर्ण नाही . सत्यनिष्ठा ही महापुरुषाची कसोटी तर असलीच पाहिजे. क्लेमेंशु एकदा म्हणाला होता की बहुतेक राजकारणी पुरुष लुच्चे असतात राजकारणी पुरुष हे महापुरुष असतीलच असे नाही. शिवाय ज्यांच्या अनुभवावरून त्याने हे आपले मत बनविले त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठेचा अभाव असला पाहिजे हे उघड आहे. तथापि सत्यनिष्ठा ही एकमेव किंवा स्वयंपूर्ण तर कसोटी आहे , हे कोणीही स्वीकारू शकत नाही. सत्यनिष्ठा असलीच पाहिजे हे खरे कारण ती नैतिक सद्गुणांची निदर्शक आहे व तिच्या शिवाय कोणालाही महापुरुष म्हणता यावयाचे नाही परंतु केवळ सत्यानिष्ठे शिवाय माणसात आणखीही काही अधिक असावयास पाहिजे म्हणजेच तो थोर पुरुष होऊ शकतो .
एखादा माणूस सत्यनिष्ठ असूनही मूर्ख असू शकतो आणि मूर्ख माणूस तर थोर पुरुषाचे विरोधी ठोक होय. आणीबाणीच्या प्रसंगी नवा मार्ग शोधून समाजाला वाचविण्यामुळे माणूस थोर पुरुष होत असतो परंतु हा मार्ग शोधण्यात त्याला कोणत्या गुणांची मदत होऊ शकते ? केवळ आपल्या बुद्धीच्या मदतीनेच तो असे करू शकतो . बुद्धी हा प्रकाश आहे. तिच्याशिवाय दुसर्या कशाचाही उपयोग होण्यासारखा नाही म्हणून बुद्धी आणि सत्यनिष्ठा यांच्या समन्वयावाचुन कोणीही महापुरुष होऊ शकत नाही . थोर पुरुष घडण्यासाठी हे पुरेसे आहे ? काय मला वाटते या ठिकाणी आपण प्रसिद्ध पुरुष आणि थोर यात फरक केला पाहिजे कारण थोर पुरूष हा प्रसिद्ध व्यक्ती पेक्षा काहीतरी वेगळा असतो अशी माझी खात्री आहे. सत्यनिष्ठा आणि बुद्धी हे दोन विशेष इतरापेक्षा प्रसिद्ध पुरूषाला वेगळे करण्यास पुरेसे ठरतात . परंतु त्याला महापुरुषाच्या दर्जा इतके उच्च स्थानी उचलुन धरण्यास ते पुरेसे ठरत नाहीत.
केवळ प्रसिद्ध व्यक्तीपेक्षा महापुरुषाच्या ठिकाणी काही विशेष गुण अधिक असणे आवश्यक आहे . हे गुण कोणते असावेत ? या ठिकाणी तत्त्ववेत्त्यांनी केलेल्या महापुरुषाच्या व्याख्येचे महत्त्व उपयुक्त ठरते . महापुरुषाला समाजाच्या गतिमानते बद्दल कळकळ वाटली पाहिजे आणि त्याने समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकाचे काम केलेच पाहिजे. प्रसिद्ध पुरुष आणि महापुरुष यांच्यात भिन्नत्व दर्शविणारी हीच मूलभूत तत्वे असून यामुळेच त्याचे महापुरुष हे नाव सार्थ होते व त्याला समाजाकडून आदर आणि पूज्यभाव प्राप्त होतो.
रानडे हे महापुरुष होते काय ? व्यक्तिमत्त्वाने ते अर्थातच महापुरुष होते . त्यांचे शरीर इतके भव्य होते की त्यांना 'वजनदार व्यक्ती' म्हणून सहज म्हणतो येण्यासारखे होते . एक आयरिश नोकर आपल्या मालकाला - कार्डिनल - वाइजमन- युवर एमिनन्स अर्थात साहेब म्हणण्याऐवजी चुकीने इमेन्स (महाकाय) म्हणत असे. तसे रानडयांनाही म्हटल्या जावू शकले असते. ते आशावादी, आनंदी स्वभावाचे व अष्टपैलू पात्रता असलेले होते. सर्व नैतिक सद्गुणांचे निदर्शक असलेली सत्यनिष्ठा त्यांच्या ठायी होती. आणि त्यांची सत्यनिष्ठा कार्लाइलला अभिप्रेत असलेल्या सत्यानिष्ठेसारखीच होती . ती नकली व आत्मशलाघी सत्यनिष्ठा नव्हती . ती पूर्णतः नैसर्गिक सत्यनिष्ठ असून स्वभावागतच होती . ते सत्यानिष्ठेचे ढोंग नव्हते . केवळ शरीराने व सत्यानिष्ठेनेच नेते मोठे नव्हते तर बुद्धीनेही मोठे होते .
रानडे हे उच्च दर्जाचे बुद्धिमान पुरुष होते याबद्दल कोणाचेही दुमत होऊ शकणार नाही ते केवळ कायदे पंडित व हायकोर्टाचे न्यायाधीशच नव्हते तर ते प्रथम दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ , प्रथमदर्जाचे इतिहासपंडित, प्रथमश्रेणीचे शिक्षणतज्ञ आणि पहिल्या श्रेणीचे भक्त होते . ते राजकारणी नव्हते ते एकापरीने बरेही झाले . कारण तसे झाले असते तर ते कदाचित महापुरुष झाले नसते. कारण अब्राहम लिंकन म्हणतो, *राजकारणी लोक ही अशी माणसे असतात की त्यांचे हितसंबंध इतर लोकांच्या हितसंबंधापेक्षा वेगळे असून असेही म्हणता येईल की त्याच्यापैकी बर्याच लोकांना गट रूपाने निदान इतर प्रामाणिक लोकांपासून एक पाऊल दूरच ठेवले पाहिजे.*
रानडे राजकारणी नसले तरी राज्यशास्त्राचे गाढे विद्यार्थी होते. भारताच्या इतिहासात त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या विस्तृत शहाणपणाची आणि त्यांच्या अफाट दूरदर्शीपणाची बरोबरी करू शकेल असा माणूस क्वचितच सापडू शकेल. त्यांनी ज्याला स्पर्श केला नाही व ज्यावर प्रभुत्व मिळविले नाही असा विषय क्वचितच असेल. त्यांचे वाचन अवाढव्य प्रमाणात होते . ते खर्या अर्थाने आजीवन विद्यार्थी होते . त्यांच्या काळी मोठेपणाचा जो मानदंड होता त्यानुसारच नव्हे तर कोणत्याही मानदंडाने मोजले तरी त्यांचे मोठेपण सिद्ध होणार आहे. मी आधीच सांगितले आहे की केवळ सत्यनिष्ठ व ज्ञान यांचा समन्वयामुळे किंवा एकेकामुळे कोणीही माणूस 'थोर पुरुष' या पदवीला पात्र असल्याचा दावा करू शकत नाही. रानडे यांच्या जवळ हे दोनच गुण असते व त्यापेक्षा त्यांच्याजवळ अधिक काहीच नसते तर त्यांना 'महापुरुष' म्हणता आले नसते. त्यांनी समाजाला जे मार्गदर्शन करून समाजसेवा केली यावरच त्यांची 'महापुरुष' ही पदवी आधारित असली पाहिजे. याबाबतीत शंकेला मुळीच जागा नाही.
एक अर्थशास्त्रज्ञ , एक इतिहासतज्ञ किंवा शिक्षणतज्ज्ञांच्या नात्यापेक्षा रानडे एक समाजसुधारक म्हणूनच अधिक सुपरिचित आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक कठोर समाजसुधारणेचे व्रतच आहे. या त्यांच्या समाजसुधारकाच्या भूमिकेवरच त्यांची महापुरुषाची पदवी आधारलेली आहे . एका समाजसुधारकाला आवश्यक असलेली दूरदृष्टी व धैर्य हे दोनही गुण रानड्याजवळ होते आणि ज्या परिस्थितीत ते जीवन जगले त्या परिस्थितीसाठी त्यांचे ध्येय व ही दूरदृष्टी अत्यंत मूल्यवान होती. त्यांची दूरदृष्टी एखाद्या धर्मसंस्थापकाच्या (हा शब्द ज्यू परंपरेप्रमाणे मी वापरीत आहे) दूरदृष्टीच्या तोडीची असून ती त्या काळच्या सर्वांच्या आश्चर्याचा विषय झाल्यावाचून राहिली नाही.
मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणणाऱ्या खडकीच्या युद्धानंतर २४ वर्षांनी १८४२ साली रानडे यांचा जन्म झाला. मराठा साम्राज्याच्या विनाशामुळे भिन्न-भिन्न लोकांच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या. नातूसारख्या काही लोकांनी या प्रसंगापूर्वीची इंग्रजांचा मदतनीस म्हणून काम केले होते. तर काहींनी ब्राह्मण पेशवाईच्या अरिष्टाचा अंत झाल्यामुळे या प्रसंगानंतर इंग्रजांची मदतनीस म्हणून काम केले. तथापि महाराष्ट्रातील लोकांचा एक फार मोठा वर्ग या प्रसंगामुळे दिडमूढ झाला होता, याबद्दल शंका नाही. जेव्हा संपूर्ण भारत आक्रमण करणाऱ्या परदेशी सैन्याच्या कबज्यात क्रमाक्रमाने गेला व सर्व लोक पराधीन झाले तेव्हाही महाराष्ट्राच्या एका लहानशा कोपऱ्यात स्वातंत्र्याचे महत्त्व जाणणारी व त्यासाठी इंच इंच लढून मैलो-गणती प्रदेशावर आपल्या अंमल बसविणारी शौर्यशाली जमात वास्तव्य करीत होती. ब्रिटिशांच्या विजयामुळे त्यांची एक अत्यंत मूल्यवान वस्तू हिरावल्या गेली होती. महाराष्ट्रातील बुद्धिवंतांच्या मनात यावेळी कसा गोंधळ उडाला असेल व त्याच्यात कसा भयानक काळोख पसरला असेल याची कल्पना कोणालाही करता येण्यासारखी आहे .
या भयान अरिष्टांची प्रतिक्रिया कोणती ? इतरांपेक्षा भिन्न अशी त्यांची प्रतिक्रिया होती. खाली पडलेले पुन्हा उठून उभे होतील , अशी त्यांनी आशा बाळगली होती. त्यांनी नव्या श्रद्धा बाळगल्या व त्यावरच त्यांची ही आशा आधारलेली होती. त्यांचे स्वतःचे शब्दच मी उद्धृत करतो .
ते म्हणाले , ' माझ्या सिद्धांताच्या दोन मुद्दयावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपला हा देश उत्तम भवितव्याने परिपूर्ण असा सच्चा देश आहे . आपला वंश हा निवडक वंश आहे '.
या नव्या धर्मतत्त्वाचा पुरस्कार करूनच ते केवळ चांगले नाहीत तर ही आशा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या प्रश्नावर चिंतन करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी अर्थातच या पराभवाचे पृथःकरण करणे ही पहिली आवश्यक बाब होती .रानड्यांना दिसून आले की हिंदू समाजरचनेतील काही दोषांमुळे हा पराभव घडून आलेला असून हे दोष काढून टाकल्याशिवाय आशा फलद्रूप होऊ शकत नाही . यामुळे नव्या तत्त्वातून ते कार्य करण्याची गरज निर्माण झाली . हिंदू समाजाची सुधारणा करणे हेच ते कार्य होय. म्हणूनच समाजसुधारणा हा त्यांच्या जीवनाचा एक दुर्दम्य हेतू बनला.
त्यांनी या समाजसुधारणेची आवड वाढीला लावली आणि तिचा पुरस्कार करण्यात त्यांनी काहीही बाकी ठेवले नाही. त्यांच्या पद्धतीत सभा , मंडळे, भाषणे , प्रार्थना वर्तमानपत्रातील लेख-मुलाखती-पत्रे इत्यादींचा समावेश होता आणि हे सर्व अथक उत्साहाने पार पाडण्यात आले त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली . अनेक वर्तमानपत्रे त्यांनी सुरू केली परंतु त्यांचे समाधान झाले नाही. समाजसुधारणेच्या कामाचा पुरस्कार करण्यासाठी काहीतरी अधिक चिरस्थायी स्वरूपाची व अधिक सुव्यवस्थित बाब त्यांना हवी होती. म्हणून अखिल भारतीय स्वरूपाच्या "सामाजिक परिषदेची" त्यांनी स्थापना केली व इंडियन नॅशनल काँग्रेसला ती सोडून दिली. दरवर्षी सामाजिक दोषांची चर्चा करण्यासाठी व ते दूर करण्याचे उपाय उपाय शोधण्यासाठी या परिषदेची अधिवेशने घेण्यात आली. वर्षानुवर्षे एखाद्या यात्रेला जावे त्याप्रमाणे रानडे या परिषदेत हजर राहिले व त्यांनी समाजसुधारणेच्या कार्याला प्रोत्साहन दिले.
समाजसुधारणेच्या कार्याला प्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यात रानड्यांनी फार मोठे धर्य दाखविले आहे. अशा प्रकारच्या माझ्या दाव्यामुळे सध्याच्या पिढीतील पुष्कळसे लोक हसतील. सध्या भारतात जेलमध्ये जाणे हे हौतात्म्याचे लक्षण होऊन बसलेले आहे. ते एक देशभक्ती व हिंमतीचेही काम आहे, असे मानल्या जाते. काही लोक तर असेही आढळून येतात की जन्मभर लुच्चेगिरीची कामे करून सरतेशेवटी ते राजकारणात पडले आणि जेलमध्ये जाऊन प्रसिद्धीसही आले व हुतात्मा ही बनले. अशा पद्धतीने थक्क करून सोडणारे बरेच आहेत. टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेलमध्ये जशा यातना सोसल्या तशा यातना सध्याही जेलमध्ये भोगाव्या लागल्या असत्या तर त्यात काही तथ्य आहे , असे म्हणता आले असते. सध्या तुरुंगाच्या जीवनाची दहशत निघून गेलेली आहे. केवळ स्थानबद्ध करण्याचाच तो आज एक प्रकार उरलेला आहे. राजकीय कैद्यांना तर आता गुन्हेगारही समजण्यात येत नाही . एक स्वतंत्र वर्ग समजून त्यांची व्यवस्था करण्यात येते . तेथे त्यांना कठोर ताप सहन करावा लागत नाही. त्यामुळे त्यांची बदनामीही होत नाही आणि तेथे कंटाळवाणा एकांतवासही सहन करावा लागत नाही. याच्यासाठी कसल्याही धैर्याची गरज नाही. तथापि टिळकांच्या काळात जेलमध्ये जशा यातना भोगाव्या लागत असत अशा यातना जरी राजकीय कैद्यांना भोगाव्या लागल्या तरीही एका समाजसुधारकाला जितक्या धैर्याची आवश्यकता असते त्यापेक्षा जास्त धैर्याची गरज राजकीय कैद्याला आवश्यक नसते.
एखाद्या व्यक्तीला सरकार जितके छळू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात समाजही एखाद्या व्यक्तीला छळून दडपून टाकू शकतो, याची जाणीव बऱ्याच लोकांना नसते. समाजाची अशाप्रकारे यातना देण्याची साधने सरकारच्या साधनापेक्षा अत्यंत जहाल असून समाजाची यातना देण्याची मर्यादाही सरकारच्या मर्यादेपेक्षा अधिक विस्तृत असते.
विस्ताराच्या व कठोरतेच्या बाबतीत सामाजिक बहिष्काराची तुलना करता येईल, अशी कोणती शिक्षा पिनल कोड मध्ये आहे? समाजसुधारक समाजालाच आव्हान देतो व स्वतःवर सामाजिक बहिष्काराची आपत्ती ओढवून घेतो तर राजकीय कैदी सरकारला आव्हान देऊन काही महिन्यांची किंवा थोड्याशा वर्षाची कैदेची शिक्षा स्वतःवर ओढवून घेतो. या दोहोंपैकी अधिक धैर्यवान कोण? एका समाजसुधारकाने व एका राजकीय राष्ट्रवाद्याने दाखविलेल्या धैर्यात आणखी एक फरक असतो व तो बहुदा लक्षात घेतल्या जात नाही. जेव्हा एखादा समाजसुधारक संपूर्ण समाजाला आव्हान देतो तेव्हा त्याचे स्वागत करणारा कोणीही उरत नाही. त्याचा मित्र म्हणवून घेण्यासाठी कोणी तयार होत नाही .त्याचा तिटकारा करण्यात येतो व त्याला टाळण्यात येते. परंतु जेव्हा एखादा राजकीय देशभक्त सरकारला आव्हान देतो तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी असतो. त्याची स्तुती व कौतुक होते आणि रक्षणकर्ता म्हणून त्याचा उदो उदो होतो . कोण अधिक धैर्य दाखवतो? एकाकीपणे लढणारा समाजसुधारक की पाठिंबा देणाऱ्या समाजाच्या आवरणाखालून लढणारा राजकीय देशभक्त?
रानड्यांनी समाजसुधारणेचे कार्य आपल्या अंगावर घेऊन फार मोठे धैर्य दाखविलेले आहे . कारण ज्या काळात सामाजिक व धार्मिक रूढी; कितीही अनैतिक असल्या तरी त्या पवित्र मानण्यात येत असत व या रुढीच्या , दैवी असण्याबद्दल किंवा अनैतिक असल्याबद्दल एखाद्याने शंका घेतली तर त्याला केवळ पाखंडीचा म्हणण्यात येत नसे तर असह्य अशी ईश्वरनिंदा व भ्रष्टाचार समजण्यात येते, असे त्या काळात जीवन जगले , हेही या सोबतच लक्षात घेतले पाहिजे.
हिंदू धर्माचे हेच प्रमुख तत्त्व आहे . हिंदू तत्वज्ञान मग ते वेदांत असो , सांख्य असो, न्याय असो की वैशेषीका असो, ते हिंदू धर्मात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करता आपल्याच मर्यादेत चकरा मारीत आहे राहिले. त्यांना वरील तत्वाला आव्हान देण्याचे कधीही धैर्य झाले नाही . *सर्व वस्तू ब्रह्मरूप आहेत* हे हिंदू तत्त्वज्ञान केवळ बुद्धिगम्य विषय होऊन राहिले. एका सामाजिक तत्वज्ञानाचे स्वरूप त्याला कधीही प्राप्त झाले नाही . हिंदू तत्वज्ञानाजवळ अशा प्रकारचे दुहेरी तत्वज्ञान होते. त्यांच्या मनूनेच हे दोन प्रकारचे तत्त्वज्ञान प्रसृत करून आपल्या दोन हातात वेगवेगळे धारण केले होते . उजव्या हातात काय आहे याचा डाव्या हाताला पत्ता नाही . आपल्या असम्बद्धेबद्दल हिंदूना कधीही चिंता वाटली नाही. त्यांच्या सामाजिक पद्धतीपेक्षा अधिक वाईट गोष्ट दुसरी असू शकते काय ? हिंदूंच्या तथाकथित चातुर्वर्ण्याच्या आदर्शापासून जाती पद्धतीचा जन्म झाला . जन्मजात मूर्ख नसलेला कोणीही माणूस चातुर्वर्ण्य ही समाजरचनेची एक आदर्श पद्धती आहे हे कसे मान्य करु शकेल?
व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने समाज धारणेच्या दृष्टीने तो एक ती निखालस मूर्खपणा व गुन्हा आहे. केवळ एकमेव वर्ग *शिक्षणाला* पात्र आहे ! फक्त एकच एक वर्ग *शस्त्रे* धारण करण्यास पात्र समजला जातो ! केवळ एकाच एका वर्गाला *व्यापार* करण्याचे हक्क दिले जातात ! एकाच एका वर्गाने *सेवा* करीत राहावे ! याचे व्यक्तीवरील परिणाम उघड आहेत.
ज्याला चरितार्थाची साधने उपलब्ध झाले नसतानाही तो आपल्या शिक्षणाचा दुरुपयोग करीत नाही, असा माणूस जगाच्या पाठीवर आढळण्यासारखा आहे काय? ज्याला संस्कृतीचा व शिक्षणाचा गंध नाही, असा पराक्रमी पुरुष आपल्या शौर्याचा उपयोग विनाशासाठी न करतात संरक्षणासाठीच करीत , असे कोठेतरी आढळण्यासारखे आहे काय? ज्या व्यापाराजवळ साठा करण्याच्या प्रवृत्तीशिवाय अन्य कोणताही सद्गुण नाही असा व्यापारी पशूच्या पातळीइतका खाली उतरला नाही, असे उदाहरण दाखवून देता येईल काय ? ज्या सेवकाला शिक्षणाचा गंध नाही , ज्याला शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही आणि ज्याला उपजीविकेच्या अन्य साधनांचा अवलंब करण्याची परवानगी नाही, असा सेवक त्याच्या धन्याला अभिप्रेत असल्याप्रमाणे उत्कृष्ट सेवक ठरला , असे उदाहरण कोठेतरी सापडू शकेल काय ? जर एखादी गोष्ट व्यक्तीला नको असेल तर ती समाजाचे तुकडे करण्यास पात्र ठरते एखाद्या समाजाने खेळीमेळीच्या वातावरणाला तोंड दिले व त्यात तो जगून राहिला तर एवढेच त्याला पुरेसे नाही . वादळी वातावरणाला सुद्धा तोंड देण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असावी लागते. अतिक्रमणाच्या वादळाला हिंदू समाज समर्थपणे तोंड देऊ शकतो काय? तो देऊ शकत नाही हे स्पष्टच आहे.
संरक्षणाकरिता असो की कुरापतीसाठी असो एखाद्या समाजाला आपल्या शक्ती कार्यान्वित करण्याचा कोणता मार्ग उरला आहे? हिंदू समाज रचनेनुसार शेकडा ९०% हिंदू - ब्राह्मण , वैश्य आणि शूद्र हातात शस्त्रे धरू शकत नाहीत. संकटकाळी एखाद्या देशाचे सैन्यबळ वाढविण्यास जर तो असमर्थ ठरला तर त्या देशाचे संरक्षण व्हावे तरी कसे?
बुद्धाने आपल्या अहिंसेच्या तत्वांद्वारे समाजाला दुर्बळ केले, असा नेहमी प्रचार करण्यात येत असला तरी हिंदू समाजाला केलेले निर्बल केलेले नसून हिंदु समाजाच्या पराभवाला व ह्रासाला ब्राह्मणी उपपत्तीतील हिंदूंचे धार्मिक व सामाजिक सिद्धांत कारणीभूत ठरले , या माझ्या विधानाला तुमच्यापैकी काही लोक आक्षेप घेतील. परंतु सत्य काय आहे? हा आरोप नाकारले जाऊ शकतो काय? ज्या समाजात जवळ न जाण्याजोगे , ज्यांची सावली अंगावर पडू नये याची काळजी घेणे सारखे व आदर्शनिय लोक आहेत असा एक तरी समाज जगाच्या पाठीवर आहे काय? ज्यामध्ये गुन्हेगारी लोकांच्या टोळ्या अजून अस्तित्वात आहेत, असा दुसरा एखादा समाज दाखवता येईल काय? अजून जंगलात राहणारे, अजून कपडे कसे घालावेत याची जाणीव नसलेले,पाषाण युगातील लोक जसेच्या तसे कोणातरी अन्य समाजात आजही आढळतील काय? संख्येने ते किती आहेत ? काही शेकड्यांचा किंवा काही हजारांचा प्रश्न आहे काय? त्यांची संख्या शुल्लक स्वरूपाची असली तर बरे झाले असते असे मलाही वाटते .परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांची संख्या कोट्यावधी आहे . कोट्यावधी अस्पृश्य ! कोट्यवधी आदिवासी ! कोट्यवधी गुन्हेगार टोळ्यांचे लोक ! कोणाला ऐकून आश्चर्य वाटेल व तो म्हणजे हिंदू संस्कृती ही संस्कृती आहे की मानवतेवर कलंक !
हे सिद्धांता संबंधित झाले , आता रानडे ज्याकाळी जगाच्या रंगमंचावर अवतीर्ण झाले त्या काळी स्थिती कशी होती, याचा विचार करूया. ब्रिटिशांचे राज्य भारतात आले त्यावेळी रानड्यांना ज्या सामाजिक परिस्थितीला तोंड द्यावे लागले तिच्या निकृष्टअवस्थेची सध्या कल्पना करणेही कठीण आहे . बुद्धीजीवी वर्गाच्या स्थितीपासून सुरुवात करतो. कोणतीही संस्कृती तिच्या बुद्धिजीवी वर्गाच्या मार्गदर्शनावर व संगोपनावर अवलंबून असते. येथे ब्राह्मणी तत्वज्ञानावर ती अवलंबून होती. जुन्या हिंदू कायद्यानुसार येथील ब्राह्मण धर्मगुरूच्या पदाचा उपभोग घेत होता . आणि यामुळे त्यांनी कोणाचा खून केला तरी त्याला मृत्युदंड देण्यात येत नव्हता. ईस्ट इंडिया कंपनी ने ही या त्याच्या हक्काला १८१७ पर्यंत मान्यता दिली होती. त्याला पृथ्वीवरील एक सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून स्थान देण्यात आल्यामुळेच असे होत असे, याबद्दल शंका नाही . परंतु ब्राह्मणांमध्ये अशा प्रकारचे कोणते तरी श्रेष्ठ तत्व त्या काळी उरले होते काय? त्याच्या धंद्यातील उदात्तपणा पार निघून गेला होता. तो एक तापदायक प्राणी होऊन बसला होता . हा ब्राह्मण पद्धतशीरपणे समाजावर चरत होता. व धर्मकारणातून नफा उकळीत होता त्याने टनावरी निर्माण केलेली पुराणे आणि शास्त्रे हे त्याच्या मूल्यवान हत्याराचे त्याचे कोठार असून याद्वारेच तो अडाणी ,धर्मभोळ्या व सामान्य लोकांना मूर्ख बनवीत होता, फसवीत होता आणि लुबाडत होता . या लहानशा भाषणामध्ये याची उदाहरणे देणे अशक्य आहे . आपल्या हक्काद्वारे व सवलतीद्वारे हिंदू लोकांकडून पैसा उकळण्यासाठी त्यांची ज्या बळजबरीच्या मार्गाला पावित्र्याचा मुलामा दिला तेवढ्यांचाच मी उल्लेख करतो .
ज्यांना या बद्दल माहिती हवी असेल त्यांनी १७९५ च्या २१ व्या नियमाची प्रस्तावना वाचावी . तिच्या नुसार जेंव्हा जेंव्हा ब्राह्मणाला एखाद्याकडून त्याच्या इच्छेविरुद्ध काही वस्तू हवी असेल तेव्हा तेव्हा तो आपल्या शरीराला चाकूने वा वस्तऱ्याने कापणे किंवा विष खाण्याची धमकी देणे यासारख्या अनेक बळजबरीच्या मार्गाचा वापर आपल्या स्वार्थी हेतूने सिद्धीस नेण्याच्या दृष्टीने करीत असे . हिंदूवर बळजबरी करण्याचे आणखीही काही अदभूत व निर्लज्जपणाचे उपाय ब्राह्मण अंमलात आणीत होते एखाद्या गृहस्थाच्या घरासमोर हा ब्राह्मण एक कुर्हे ( गोल आकाराची झोपडी ) रचून तयार करीत असे व त्याच्या आत एक म्हातारी स्त्री ठेवीत असे .जर त्या गृहस्थांने इच्छित वस्तू दिली नाही तर या कुऱ्याला आग लावून आतील वृद्ध स्त्रीला जाळून टाकण्याची धमकी देत असे .
ही पद्धत तर सर्रास रूढ होती. अशाच प्रकारची दुसरी अशीही युक्ती होती की आपल्या मुलांना व पत्नीला त्या गृहस्थाच्या नजरेसमोर ठेवीत असे व त्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देत असे. तिसऱ्या युक्तीचे नाव नाव धुर्ण। असे होते . यामध्ये त्या गृहस्थाच्या घराच्या पायरीवर बसून उपोषण करण्यात येत असे . हे तर काहीच नाही ब्राह्मणांनी अब्राह्मणांच्या पत्नीशी सर्वप्रथम समागम करण्याचा आपला हक्क असल्याचे सुद्धा सांगितलेले आहे.
रुढी कालीकातच्या झामोरीन घराण्यात आणि वैष्णवांच्या वल्लभचारी पंथांमध्ये जारी होती, ब्राह्मणांनी अवनतिची केवढी भयंकर खोल दरी गाठली होती ! बायबल म्हणजे : *जर मिठानेच आपली चव सोडली तर त्याला खारटपणा कसा आणावा?* त्याकाळी हिंदू समाजाची नैतिक बंधने भयानक मर्यादेपर्यंत घसरली , याबद्दल आश्चर्य मानण्याण्यासारखे काही नाही . अखेर , या नैतिक अधोगतीला पायबंद घालण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला १८१९ साली एक कायदा पास करावा लागला (१८१९ चा ७ वा कायदा) या कायद्याची प्रस्तावना म्हणते की मोह घालण्यासाठी स्त्रियांचा सर्रास उपयोग करण्यात येत होता . आणि वेश्याव्यवसायासाठी स्त्रिया व मुली पळवून नेण्यात येत होत्या . त्याकाळी अनेक कुटुंबांची वाताहत अशा पद्धतीने सर्रास होत होती . लोकमताला तेव्हा कसलाच वाव नव्हता आणि लोकमताचा अभाव असल्यामुळे सामाजिक दोषांच्या विरोधात कोणी तरी आपला राग व्यक्त करावयास पाहिजे होता अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
ब्राह्मणांचे पोषण या सामाजिक दोषावरच होत होते . या साध्या कारणामुळे त्याने समाजातील प्रत्येक दोषांचे संरक्षण करण्यात आपली शक्ती वेचली. त्यांनी अस्पृश्यतेचे रक्षण केले व त्यामुळे कोट्यावधी लोकांच्या नशिबी गुलामीचे जीणे आले. त्यांनी जातींचे संरक्षण केले, बालविवाहाचे संरक्षण केले आणि त्यांनी बळजबरीचा वैधव्याचे ही रक्षण केले ( या दोन्ही रूढी जातिप्रथेचे आधार आहेत ) त्यांनी सती प्रथेचे रक्षण केले, त्यांनी क्रमिक असमानतेच्या सामाजिक प्रथेचे तिच्या बहुपत्नीत्वाच्या रूढीसह रक्षण केले. त्याचा परिणाम असा झाला की , राजपुतांना त्यांच्या अनेक कन्यांना ठार मारणे भाग पडले , किती लज्जास्पद गोष्ट ! किती भयंकर अनीती ! अशा प्रकारचा समाज जगातील सुसंस्कृत समाजासमोर आपले तोंड दाखवू शकेल काय ? असा समाज जिवंत राहण्याची आशा बाळगू शकेल काय काय? रानड्यांनी विचारलेले प्रश्न हे असे होते . त्यांनी शेवटी निष्कर्ष काढला की फक्त एका अटीवर या समाजाला वाचवल्या जाऊ शकते व ती म्हणजे कठोर *समाजसुधारणा.*
तथापि त्यांना जास्तीत जास्त विरोध करणारा पुरुषवर्ग बुद्धिजीवी वर्गातील राजकीय गटातून पुढे आला. या राजकारणी लोकांनी नवीन विचारसरणीला जन्म दिला . या विचारसरणीप्रमाणे सामाजिक सुधारणेआधी राजकीय सुधारणा होणे आवश्यक होती. या उपपत्तीचा प्रचार प्रत्येक व्यासपीठावरून करण्यात आला आणि मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश श्री न्यायमूर्ती तेलंग यांच्यासारख्याकडून एका समर्थ वकिलाच्या परिपूर्ण शैलीने तिचे समर्थन करण्यात आले. या उपपत्तीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. समाजसुधारणेच्या प्रगतीमध्ये कोणत्या एका गोष्टीने अडथळा निर्माण केला असेल तर ती हीच राजकीय सुधारणेची हाक होय.
वस्तुतः ही उपपत्ती असमर्थनीय असून रानड्यांचे प्रतिस्पर्धी चुकले यात मला मुळीच शंका वाटत नाही; आणि या उपपत्तीच्या पाठीमागे लागण्यात त्यांनी देशाची उत्तम प्रकारे सेवा केली नाही , असे मला वाटते. ज्या भूमिकेवरून श्री न्यायमूर्ती तेलंग यांनी या राजकारणी लोकांच्या उपपत्तीचा पुरस्कार केला ती भूमिका अर्थातच तर्कसंगत होती. परंतु तर्क म्हणजे शहाणपण नव्हे आणि पृथक्करण म्हणजे युक्तिवाद नव्हे , हे ते विसरले . इतकेच नव्हे तर *राजकीय* व *सामाजिक* यांच्या परस्पर संबंधाबद्दलची जशी सुव्यवस्थित कल्पना रानड्यांना होती तशी सुव्यस्थित कल्पनाही त्यांना नव्हती . या उपपत्तीमागील हेतू आपण तपासून पाहूया.
त्यांनी सादर केलेली कारणे फारशी समर्थ नव्हती. तथापि या संदर्भात आणखीही जी काही अत्यंत सामर्थ्यशाली कारणे दाखविता येण्यासारखी आहेत त्यांनासुद्धा उत्तर देऊन हा सिद्धांत टिकू शकत नाही , हे मी दाखवून देणार आहे. पुढील समर्थन अत्यंत मजबूत आहे , असे मला वाटते , प्रथमतः असे म्हणता येऊ शकले असते की आम्हाला लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करावयाचे असल्यामुळे आधी आम्हाला राजकीय शासन सत्ता हस्तगत केली पाहिजे . हे उत्तर अमेरिकन राजनीतीतज्ञ जेफरसन यांने सरकारचा जो अत्यंत संक्षिप्त सिद्धांत मांडला त्यानुसार उद्भवते . या सिद्धांतानुसार राष्ट्राचे रक्षण करून जनतेच्या हक्काचे संरक्षण शांततापूर्वक करणे एवढाच शासनाचा मूलभूत हेतू आहे. कल्पना करा की हा सिद्धांत समर्पक आहे. असा की जर लोकांना काही हक्कच नसतील तर , शासनाने संरक्षण करावे तरी कशाचे ?
संरक्षणाची बाब गंभीरपणे महत्त्वाची ठरण्यासाठी आधी हक्कांचे असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत समाजसुधारणेच्या आधी राजकीय प्रगती झाली पाहिजे, हा सिद्धांत म्हणजे केवळ एक मूर्खपणाची कल्पना ठरते. तथापि ज्यांच्याजवळ जबरदस्तीने हडपूण घेतलेले अधिकार आहेत त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे व ज्यांच्याच्याजवळ मुळीच अधिकार नाहीत त्यांना तसेच ठेवणे हा जर वरील सिद्धांतामागील गर्भित हेतू असेल तरच या सिद्धांताला काही अर्थ प्राप्त होतो . या उपपत्तीच्या समर्थनासाठी दुसऱ्या भूमिकेवरून आणखी युक्तिवाद करता येण्यासारखा आहे. तो असा की त्यांना कायद्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत अधिकार प्रदान करावयाचे असल्यामुळे त्यांना राजकीय शासनशक्तीची आवश्यकता होती व अशाप्रकारे प्रथम शासन सत्ता हाती आल्यावाचून ते लोकांना मूलभूत हक्क प्रदान करू शकत नव्हते . हा युक्तिवाद अर्थातच अतिशय भक्कम असल्यासारखा दिसतो . परंतु त्यात काही सार आहे काय ? अमेरिकेच्या व क्रांतिकारी फ्रान्सच्या घटनांमध्ये या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आल्यापासून ही मूलभूत हक्कांची कल्पना अत्यंत प्रसिद्धीस आली. प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क प्रदान करण्याची कल्पना अत्यंत प्रसंशनिय आहे , यात शंका नाही . प्रश्न असा की या हक्कांना वास्तवात कसे उतरवावयाचे ? एकदा कायद्यांमध्ये त्यांची तरतूद करण्यात आली की त्यांचे संरक्षण आपोआपच होते , असे प्रचलित मत आहे. हा ही पुन्हा असमर्थनीय मिथ्या पूर्वग्रह आहे. *अनुभवाद्वारे सिद्ध झालेले आहे की हक्कांचे संरक्षण कायद्याद्वारे होत नाही तर समाजाच्या नैतिक व सामाजिक सदसदविवेक बुद्धीमुळे होत असते.* कायद्याने प्रस्थापित केलेल्या हक्कांचे संरक्षण करण्यास कार्यक्षम अशी सामाजिक सदविवेक बुद्धी समाजात असेल तरच हे हक्क जसेच्या तसे सुरक्षित राहू शकतात. परंतु या हक्कांना समाजाचा विरोध झाला तर कोणताही कायदा, कोणतीही संसद वा कोणतेही न्यायालय खऱ्या गर्भित अर्थासह त्यांची जिम्मेदारी घेऊ शकत नाही.
अमेरिकेतील निग्रोना , जर्मनीतील ज्यूना आणि भारतातील अस्पृश्यांना या मूलभूत हक्कांचा काय उपयोग आहे ? बर्कने म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य जनसमूहाला शिक्षा करण्याची कोणतीही युक्ती अजून सापडलेली नाही. एकट्या, एकाकी एका शिरजोर गुन्हेगाराला कायदा शिक्षा ठोठावू शकतो , परंतु कायद्याला उलथून पाडण्यास सिद्ध झालेल्या संपूर्ण जनतेवर कायद्याचा प्रभाव चालू शकत नाही . कोलरीज च्या भाषेत सांगायचे म्हणजे *सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी भ्रष्ट न होण्यासारखा , हृदयापासूनचा व खरा प्रशांत असा कायदा असून त्यांच्यावाचून मूलभूत हक्कांचे किंवा प्रदान केलेला हक्कांचे संरक्षण करण्यास सर्व प्रकारच्या शक्ती केवळ मलमपट्टी सारख्या ठरतात*
राजकीय पक्षाच्या लोकांचा तिसरा युक्तिवाद स्वयंशासनाच्या पुरस्काराच्या भूमिकेवरून केल्या जाऊ शकला असता. स्वराज्य हे सुराज्यापेक्षा श्रेष्ठ असते हा आक्रोश सुपरिचित आहेच. कोणीही त्याला एखाद्या फसव्या घोषणेपेक्षा अधिक किंमत देऊ शकत नाही आणि स्वराज्यसुद्धा सुराज्य असलेच पाहिजे असे आश्वासन कोणालाही अधिक पसंत पडेल, परंतु या देशात लोकशाही शासनपद्धती शक्य आहे कि नाही हा विचार करण्याची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही.
*लोकशाहीच्या केवळ दिखाऊ साच्याला काहीच महत्त्व नसून सामाजिक लोकशाहीविना लोकशाहीची कल्पना करणे हास्यास्पद आहे . लोकशाही हा केवळ शासनाचा एक प्रकार नसून ती समाज जीवनाची एक पद्धती आहे, ही गोष्ट राजकारणवाद्यांना कधीच उमगली नाही. एखाद्या लोकशाही समाजामध्ये नजरेत भरण्यासारखे ऐक्य, समान उद्दिष्ट्ये, सार्वजनिक हिताविषयी प्रामाणिकपणा आणि परस्पर सहानुभूती या गुणांचा अभाव असू शकतो परंतु तिच्यात अनिवार्यपणे दोन बाबींचा अंतर्भाव असावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे परस्परांबद्दल आदर भावनेची प्रवृत्ती व आपल्या देशबांधवांविषयी समानतेची भावना. दुसरी बाब म्हणजे, दुर्लक्ष सामाजिक मर्यादा नसलेल्या संस्था, विशेष हक्कदार व हक्कविरहीत अशा लोकांमध्ये समाजाची विभागणी करणाऱ्या बहिष्काराच्या व राखीव हक्कांच्या पद्धतीशी लोकशाहीच्या कल्पनेचा मेळ बसू शकत नाही. दुर्दैवाने या वस्तुस्थितीतील सत्य रानड्यांचे प्रतिस्पर्धी कधीच ओळखू शकले नाहीत.*
कोणत्याही कसोटीने तपासून पाहिले तरी या वादामध्ये रानड्यांनी घेतलेली बाजू आणि त्यांची योजना योग्य व मूलभूत स्वरूपाची होती ; आणि कदाचित शासनाचे पूर्वतयारी म्हणून त्याला महत्त्व नसेल तरी लोकशाहीचा आधार म्हणून त्याला महत्त्व आहे, असे दिसून येईल . माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला मान्य होतील असे कोणतेही हक्क हिंदू समाजात व्यक्तीला नाहीत , असे त्यांचे प्रतिपादन होते . तेथे फक्त राखीव सुविधा आणि असुविध्याच होत्या. राखीव सुविधा फक्त थोड्याश्या लोकांसाठी व फार मोठ्या जनसंख्या साठी असुविधा होत्या . हक्काच्या निर्मितीसाठी रानड्यांनी धडपड केली. हिंदू समाजाच्या मरणोन्मुख व मृत:प्राय झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीत चैतन्य निर्माण व्हावे असे रानडे यांचे ध्येय होते . कारण त्यावाचून राजकारणात स्थिरता राहणे असंभव होते. हा वाद दोन परस्पर विरुद्ध मुद्द्यांविषयी होता आणि शेवटी या दोनपैकी राष्ट्राच्या जीवनासाठी अधिक महत्त्वाचा मुद्दा कोणता या प्रश्नाभोवती हा वाद केंद्रित झाला. ते दोन मुद्दे म्हणजे राजकीय स्वातंत्र्य की नैतिक घडण हे होते .राजकीय स्वातंत्र्यापेक्षा नैतिक सामर्थ्य अधिक महत्त्वाचे आहे, अशी बाजू रानडे यांनी स्वीकारली. लकी नावाच्या एका फार मोठ्या इतिहासकाराचेही हेच मत होते . इतिहासाचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांनी असा निष्कर्ष काढला.
*एखाद्या राष्ट्राच्या शक्तीचा व भरभराटीचा पाया त्याच्या विशुद्ध गृहस्थी जीवनावर , त्याच्या व्यापारातील सचोटीवर, त्याच्या उच्च दर्जाच्या सदाचारावर, त्याच्या सार्वजनिक स्फूर्तीवर , त्याच्या साध्या सवयीवर, धैर्यावर व सत्यनिष्ठेवर आणि त्याच्या बुद्धिनिष्ठ व चारित्र्यनिष्ठ निर्णयावर अवलंबून असतो . एखाद्या राष्ट्राच्या भवितव्याविषयी तुम्हाला जर अचूक अटकळ बांधावयाची असेल तर त्या राष्ट्रात या गुणांची वृद्धी होत आहे की नाही याचे बारकाईने निरीक्षण करा. सार्वजनिक जीवनात कोणत्या गुणांना अधिक वाव मिळतो , याची बारकाईने पाहणी करा . चारित्र्याला अधिक किंमत देण्यात येत आहे की कमी ? त्या राष्ट्रातील सामान्य लोक पक्षनिरपेक्ष विचार करून राष्ट्राच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीसंबंधी बोलताना खऱ्याखुऱ्या आदर भावनेने बोलतात की नाही ? त्यांच्या श्रद्धा प्रामाणिक, त्यांचे जीवन सुसंबद्ध व त्यांच्यामध्ये निर्विवाद ऐक्य आहे की नाही? ह्या विचारसरणीनुसार पर्यवेक्षण करून एखाद्या राष्ट्राची जन्मकुंडली तुम्ही उत्तम पणे मांडू शकता.
रानडे यांची तुलना इतरांशी करता येईल काय? अशी तुलना नेहमीच दुर्गंधीयुक्त व अप्रिय असते. त्याच वेळी हेही खरे आहे की तुलनेपेक्षा अधिक योग्य असा स्पष्टीकरणाचा दुसरा मार्गही नाही. अर्थातच अशी तुलना करीत असताना तुलना करणाऱ्याने ती चित्तवेधक व बोधप्रद व्हावी यासाठी दोन सारख्या दर्जाच्या व्यक्तीत व्हावी, हे पक्के मनात बाळगले पाहिजे . सुदैवाची गोष्ट म्हणजे अशा तुलनेसाठी आपणाला बराच वाव आहे. रानडे हे समाजसुधारक होते आणि त्यांची तुलना अन्य समाजसुधारकाशी केल्यास हितकारक ठरू शकेल .
विशेषत: रानडे आणि ज्योतिबा फुले यांची तुलना अधिक ज्ञानप्रद होईल. फुले १८२७ साली जन्मले आणि १८९० सारी निवर्तले . रानडे यांचा जन्म १८४२ साली झाला व ते १९०१ साली निवर्तले. अशाप्रकारे फुले आणि रानडे हे समकालीन होते आणि दोघेही मुख्यत: समाजसुधारकच होते . रानडयांची तुलना अन्य राजकारणी लोकांशी करण्याचे योजले तर काही लोक त्यावर आक्षेप घेतील. रानडे हे राजकारणी नव्हते या भूमिकेवरून हा आक्षेप येऊ शकतो . परंतु रानडे हे राजकीय मुत्सद्दी नव्हते, असे समजणे राजकीय मुत्सद्दी या शब्दाची मर्यादा अत्यंत संकुचित करणे होय. राजकारणी पुरुष हा केवळ प्रत्यक्ष राजकीय घडामोडीत गुंतलेला असतो . असे नसून तो राजनीतीची कार्यप्रणाली व भविष्याविषयी आपले वैशिष्ट्यपूर्ण मत व्यक्त करीत असतो.
रानडे हे एका वैशिष्ट्यपूर्ण राजकीय प्रणालीचे संस्थापक होते, या अर्थी आपण पाहिले तर रानडे हे राजनीतीज्ञ होते आणि उपयुक्तपणे त्यांची तुलना इतर राजनीतीज्ञ लोकांशी केल्या जाऊ शकते. रानडयांची तुलना अन्य समाजसुधारकांशी व अन्य राजनीतिज्ञाशी केली तर बोधप्रद झाल्यावाचून राहू शकत नाही व अशी तुलना करण्यासाठी सामग्रीही भरपूर आहे . हा प्रश्न प्रसंगोचित व रुचीकरही आहे. वेळेची बंधने लक्षात घेतली तर समाजसुधारकाशी आणि राजनीतीज्ञाशीही रानड्याची सविस्तर तुलना याठिकाणी करता येणे शक्य नाही. ही तुलना समाजसुधारकाशी करावयाची की राजनीतिज्ञाशी करावयाची याची निवड मला खचितच केली पाहिजे . हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे . माझ्या मर्जीवर ही निवड तुम्ही सोपविली तर ती मला प्राप्त झालेल्या वेळात त्यांची तुलना फुल्यांशी करीन . कारण राजकीय प्रगतीपेक्षा समाजसुधारणा अधिक मूलभूत आहे ,असे माझे मत आहे .
दुर्देवाने माझी ही आवड श्रोत्यांच्या आवडीपेक्षा भिन्न असल्यामुळे त्यांना येथे बसवून ठेवण्यासाठी मला माझ्या आवडीपेक्षा त्यांच्या रुचीचा विचार करणे भाग आहे . समाज सुधारणेची आग आता थंड पडलेली आहे. राजकारणाच्या वेडाने भारतीय जनतेला आपल्या पकडीत घट्ट धरलेले आहे .
राजकारण हे क्षुधा प्रदीप्त करणारे असे रसायन झाले आहे की जे जितके अधिक घेत जावे तितकी त्याच्यासंबंधीची हाव वाढत जाते . मी अंगावर घेत असलेले काम अत्यंत अप्रिय असून मी ते करण्याचे धाडस करीत आहे . याचे कारण म्हणजे या विषयाचे पूर्णत: स्पष्टीकरण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि रानडयांच्या राजकीय तत्त्वज्ञानाची ओळख खऱ्या अर्थाने करून घेण्याची व राजकारणी लोकांमध्ये त्यांचे आज स्थान कोणते हे जाणून घेण्याची जनतेचीही इच्छा आहे.
ज्याच्या पावन कारकिर्दीत पोपच्या अस्सखनशीलतेची चर्चा घोंगावत होती तो नववा पूज्य पोप म्हणतो - "पोप होण्याच्या आधी पोपच्या अस्सखलनशीलतेवर माझी श्रद्धा होती , आता मी तीचा 'अनुभव' घेत आहे . या दोघांचीही हीच वृत्ती असून आमच्या नशिबानेच ते आमचे स्वच्छंद पुढारपण करण्यासाठी जन्माला आले असावे , असे मला वाटते". या त्यांच्या सर्वश्रेष्ठतेच्या अस्सखनशिलतेच्या अहंभावाला पत्रकारांनी आणखीच पुष्ट केले.
गार्डिनरने नार्थक्लिकच्या वर्तमानपत्रीय व्यवसायासंबंधी जी भाषा वापरली तीच भाषा सध्याच्या भारतीय वार्ताकारांच्या धंद्याबद्दल वापरण्याचे कोणीही टाळू शकत नाही. वर्तमानपत्र चालवणे हा एकेकाळी भारतात व्यवसाय समजल्या जात होता . आता तो व्यापार झालेला आहे. त्याचा नीतीशी साबण निर्मितीच्या धंद्यापेक्षा अधिक संबंध उरलेला नाही . जनतेचा तो एक जबाबदार सल्लागार आहे, असे तो आता स्वतःला समजत नाही. आपल्या भावनेचा रंग न देता बातम्या देणे जनहिताच्या दृष्टीने सार्वजनिक धोरणाबद्दल विशिष्ट मतांचे प्रतिपादन करणे आणि चुकणारा कितीही मोठा असला तरी त्याचे दोष दाखविणे व त्याला शिक्षा करणे ही कामे आजच्या वर्तमानपत्रकाला सर्वात महत्त्वाची कर्तव्ये वाटत नाहीत. एखाद्याला महापुरुष मानणे आणि त्याची पूजा करणे हे त्यांचे महाकृत्य होऊन बसलेले आहे . आजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची जागा भावनांनी घेतली आहे. बुद्धिनिष्ठ मतांची जागा बुद्धीशून्य वासनांनी व जबाबदार लोकांच्या मनाला आवाहन करण्याचे स्थान बेजबाबदार लोकांना केलेल्या आवाहनाने घेतली आहे.
लॉर्ड सेल्स बरीने नार्थक्लिकच्या पत्रकारितेबद्दल म्हटले होते की कारकूनांनी कारकुनासाठी चालवलेले ते पत्र होते. भारतीय वर्तमानपत्राच्या व्यवसायात हे सर्वतर आहेच पण आणखीही काही अधिक आहे. *येथील वर्तमानपत्र ही ढोल पिटणार्यांनी आपल्या नायकाची स्तुती करण्यासाठी लिहिलेली असतात.* नायकपूजा रूढ करण्यासाठी अशाप्रकारे निर्दयपणे कधीही देशहिताचे बलिदान केल्या गेले नाही . आज नायकपूजा इतकी आंधळी झालेली आहे की असा प्रकार भारतात कधीही झाला नाही. याला काही अपवादही आहेत. हे सांगण्यात मला आनंद वाटतो. परंतु ते फारच थोडे आहेत आणि या गलक्यात त्यांचा आवाजही ऐकू येत नाही . समाचारपत्रांच्या स्तुतीमुळे यांनी इतके बेताल प्रदर्शन केले आहे की त्याला सीमा उरली नाही. आपल्या वरचष्म्यानी त्यांनी राजकारण भ्रष्ट करून सोडले. आपल्या प्रभुत्वाने त्यांनी आपल्या अनुयायांना मूर्ख बनवले व अर्ध्याना ढोंगी बनवले . आपला वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी बडे व्यापारी व भांडवलदार यांचे सहाय्य घेतले . *आपल्या देशात संघटित लोकशक्तीची जागा प्रथमच 'पैसा' घेत आहे . प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी जे मत अमेरिकेच्या जनतेसमोर विचारार्थ मांडले होते ते आज पर्यंत येथे लागू झाले नसले तरी यापुढे येथेही लागू होईल.* *"शासन कोण चालवणार - पैसा की माणूस? नेतृत्व कोण करणार - संपत्ती की बुद्धी? सार्वजनिक पदे कोण भूषविणार - सुशिक्षित व देश प्रेमी लोक की संघटित भांडवलदारांचे सेवक?"* *आज-काल भारतीय राजकारण - विशेषतः हिंदू राजकारण सुव्यवस्थित होण्याऐवजी इतके व्यापारी झालेले आहे की त्याचेच दुसरे नाव 'भ्रष्टाचार' हे होऊन बसलेले आहे. अनेक सज्जन माणसे या गटारगंगेत उतरण्याचे टाळत आहेत. भारतीय राजकारणाला 'गटर' (घाणवाहकनाल्या ) पद्धतीचे स्वरूप प्राप्त झालेले असून ते अत्यंत दुर्गंधीयुक्त ,असह्य व आरोग्यविघातक झाले आहे. राजकारणात उतरणं म्हणजे संडास वाहक नाल्यांमध्ये काम करण्यासारखेच ठरले आहे.
या दोन बड्या इसमाच्या हातातील राजकारण म्हणजे काळाच्या अपव्ययाची स्पर्धाच होय. जर गांधींना *महात्मा* म्हणून ओळखल्या जात असेल तर जीनांना *कायदेआझम* म्हणून ओळखल्या गेलेच पाहिजे. गांधीच्या जवळ काँग्रेस असेल तर जिनां जवळ मुस्लिम-लीग असलीच पाहिजे. काँग्रेसची तर कार्यकारी समिती व अखिल भारतीय काँग्रेस समिती वेगवेगळी असेल तर मुस्लिम-लीग चीही कार्यकारी समिती व तिची सर्वसाधारण समिती आहेच. काँग्रेसच्या परिषदेनंतर मुस्लिम- लीगची परिषद झालीच पाहिजे. काँग्रेस जर एखादे पत्रक जाहीर करीत असेल तर मुस्लिम-लीगचे ही त्याला तोडीस तोड पत्रक करीत जाहीर झालेच पाहिजे . काँग्रेस जर १७०० शब्दांचा निर्णय पास करीत असेल तर मुस्लीम- लीगने त्यापेक्षा निदान १००० शब्दानी तरी जास्त असलेल्या निर्णय पास केलाच पाहिजे ! काँग्रेस अध्यक्ष पत्रकार - परिषद बोलावीत असेल तर मुस्लिम - लीगच्या अध्यक्षाने ही आपली परिषद बोलावलीच पाहिजे ! काँग्रेस ने युनायटेड नेशन्स कडे आपली विनंती नोंदविली असल्यास मुस्लिम- लीगने ही त्यापासून अलिप्त राहू नये.
हे सर्व केव्हा संपणार आहे? याचा निकाल लागणार तर कधी? लवकर लागेल याची काहीच आशा नाही . गांधी हे एक हिंदू आहेत, असा जिनांचा आग्रह आहे. ते एक मुसलमान पुढारी असल्याने जीनाने मान्य करावे असा गांधींचा आग्रह आहे . या दोघांच्या ठिकाणी दिसून येणारी मुत्सद्दीपणा दिवाळखोरी दुसरीकडे शोधून पाहिल्यास कोठेही आढळणार नाही. कोणतीही गोष्ट मान्य न करता प्रत्येक बाबीला विरोध करीत राहण्याचा धंदा असलेल्या वकीला प्रमाणे ते लांबच लांब कधी न संपणारे भाषणे देत फिरतात . या दोघांपैकी कोणालाही हे कोडे सोडविण्याच्या बाबतीत तुम्ही सूचना देऊन पहा म्हणजे तुम्हाला नकार देणारे कधी न संपणारे उत्तर ऐकावयास मिळेल ! वस्तुत: हे कोड सोडवणे निखालसपणे असंभव आहे असे नाही परंतु त्या दोघांपैकी कोणीही ते सुटावे असा विचारच करीत नाही . बँकेच्या व्यवहारातील शब्दात सांगायचे तर या दोघांच्या हातामध्ये भारतीय राजकारण *गोठून* गेले असून कोणतीही राजकीय कार्यवाही असंभव झाली आहे.
या दोघांशी रानडे यांची तुलना केली तर काय दिसून येते? त्यांच्याबाबत माझा कोणताही व्यक्तिगत अनुभव मला सांगता येण्यासारखा नाही. परंतु इतरांनी लिहिलेले वाचून ते कसे होते, हे मी सांगू शकेन. त्यांच्यामध्ये अहंभाव लेशमात्रही नव्हता. आपल्या प्रगाढ विद्वतेबद्दल त्यांनी कितीही अभिमान किंवा गर्वसुद्धा बाळगला असला तरी तो समर्थनीयच ठरला असता परंतु ते अत्यंत नम्र स्वभावाचे होते . गंभीर प्रकृतीचे तरुण त्यांच्या या विद्वत्तेवर व बुद्धीवैभवावर लुब्ध होत असत. पुष्कळसे लोक त्यांच्या प्रभावामुळे व त्यांच्या सत्प्रवृत्तीमुळे प्रभावित होऊन त्यांचे सहकारी बनले व आपल्या गुरूबद्दल आदर बाळगून त्यांनी आपले संपूर्ण जीवन या कार्याला वाहून घेतले.
मूर्खाच्या स्तुतीने समाधान मानणे त्यांना नापसंत होते आणि स्वतःच्या बरोबरीच्या माणसांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत काम करण्यास व बौद्धिक देवाण-घेवाण करण्यास ते कधीही घाबरले नाहीत. आपण स्वतःच्या आतल्या आवाजानुसार वर्तन करणारा एक दिव्य पुरुष असल्याचा त्यांनी केव्हाच दावा केला नाही. प्रत्यक्ष अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीवर आपली मते तपासून पाहण्याची सदैव तयारी असलेले ते एक बुद्धिवादी पुरुष होते. त्यांचे मोठेपण हे स्वाभाविक होते. त्यासाठी त्यांना व्यासपीठाची , स्वतःला केंद्रीभूत करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे सतत वेधून ठेवण्याच्या युक्तीची किंवा स्वतःच्या पैशाने चालवलेल्या वर्तमानपत्रांची कधीही गरज भासली नाही . मी म्हटल्याप्रमाणे रानडे हे तत्वतः समाजसुधारक होते . राजकारणाचा व्यापार करण्याच्या अर्थाने ते राजकारणी नव्हते. तथापि भारताच्या राजकीय व प्रगतीच्या वाटचालीमध्ये त्यांनी भूमिका महत्त्वाची वठविली. काही राजकारणी लोकांना त्यांनी एखाद्या शिक्षका प्रमाणे मार्गदर्शन केले. त्यामुळे या त्यांच्या शिष्यांनी आपल्या टीकाकारांना दिपवून सोडले. त्यांनी मार्गदर्शनाचे कार्य केले असले तरी त्यांनी सर्वांसाठी एका खऱ्या तत्ववेत्ताचे कार्य केलेले आहे.
रानडे यांचे राजकीय तत्वज्ञान कोणते होते ?त्याचे सार तीन सिद्धांतामध्ये सांगता येण्यासारखे आहे.
१. एखाद्या पूर्णतः काल्पनिक वस्तूला आपण आपल्या आदर्शाचे स्थान देऊ नये . आदर्श अशा प्रकारचे असावे की ते व्यवहार्य आहे, याची खात्री पटली पाहिजे.
२. राजकारणामध्ये लोकांच्या भावना व श्रद्धा बुद्धीपेक्षा व सिद्धांतापेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात .घटनानिर्मितीच्या वेळी तर याचे महत्त्व विशेष प्रकारचे असते. आपल्या कपड्या संबंधी जसा आवडीनिवडीचा प्रश्न महत्त्वाचा असतो तितकाच घटनेसंबंधी असतो. दोन्हीही चपखल बसले पाहिजेत, दोन्हीही आल्हाददायक असले पाहिजे.
३. राजकीय तडजोडी मध्ये जे जे शक्य असेल त्या संबंधी नियम असले पाहिजे . याचा अर्थ असा नव्हे की जे मिळत आहे ते अपुरे असून तुमच्या प्रतिस्पर्ध्याला अधिक देणे भाग पडेल अशी व्यवस्था तुम्ही केली पाहिजे.
रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचे हे तीन प्रमुख सिद्धांत आहेत . त्यांच्या लेखनातून व भाषणातून सुयोग्य उतारे देऊन मला हे सहज सिद्ध करता येण्यासारखे आहेत. परंतु तसे करण्यास वेळही नाही आणि त्याची काही आवश्यकता दिसत नाही. कारण रानडे यांच्या भाषणाशी व लेखाशी परिचित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहित असलेच पाहिजे. या तीन सिद्धांता विरुद्ध रानडयांशी कोणीतरी भांडेल काय ? आणि जर तसा कोणी असेल तर तो कोणत्या सिद्धांताच्या विरोधात भांडेल? पहिल्याच्या विरोधात केवळ मनोराज्यात मशगुल राहणारी वृत्तीच भांडू शकते . त्याच्याकडे ध्यान देण्यास आपणास काहीही गरज नाही. दुसरा सिद्धांत इतका स्पष्ट आहे की आपणावर संकट ओढवून घेऊनच आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. केवळ तिसरा सिद्धांतच असा आहे की ज्यावर भिन्न मते पडू शकतात. आणि यामुळे उदारमतवादी व काँग्रेसवादी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले . मी स्वतः उदारमतवादी नाही . तरीसुद्धा रानड्यांनी मांडलेला दृष्टिकोण बरोबर होता, अशी माझी खात्री आहे. तत्त्वांमध्ये कधीही तडजोड होऊ शकत नाही व ती करूही नये. परंतु एखादे तत्त्व एकदा स्वीकारल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने अस्तित्वात आले तर त्याला विरोध करण्याचे कारण असू शकत नाही. राजकारणामध्ये क्रम अनिवार्यच आहे आणि एकदा तत्त्वाचा स्वीकार केल्यानंतर हा क्रम अपायकारक नसून काही विशिष्ट परिस्थितीत तो बराच लाभदायकही ठरू शकतो . वस्तूत: एक अपवाद सोडला तर या तिसऱ्या सिद्धांता बद्दल टिळक व रानडे यांच्यामध्ये मुळीच वाद नव्हता, तो अपवाद म्हणजे टिळक आपल्या संमतीद्वारा अधिकाधिक अधिकार प्राप्त करू इच्छित होते तर रानडे अशा अधिकाऱ्याकडे वक्र दृष्टीने पाहत होते . इतकाच फरक होता. बाकीच्या बाबतीत त्यांचे एकमत होते. रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानात *अधिकारांचा* अभाव असल्यामुळे त्यांच्याकडे उपेक्षेने पाहण्याची आवश्यकता नाही. आपणाला कोणकोणते अधिकार देण्यात आले हे आपणा सर्वांस माहितच आहे . सर्व जुन्या व नव्या अधिकारांचा आपण प्रयोग करून पाहिला . त्याचे काय परिणाम घडून आले हे सांगण्यासाठी खोळंबून राहण्याची गरज तरी दिसत नाही.
रानडे यांचा जन्म दिनाचा समारंभ करीत असतानाच त्यांचे टीकाकार व विरोधी लोक यांच्याकडून कोणती टीका होण्याचा संभव आहे, हे आपण विसरता कामा नये. रानड्यांच्या जन्मोत्सव साजरा करण्याचा मुख्य हेतू काय , असे त्याचे टीकाकार विचारतील . ' पुढाऱ्यांची पूजा करण्याचे दिवस आता भूतकाळ जमा झालेले आहेत ' . अशा प्रकारची त्यांच्या युक्तिवादाची रुपरेखा राहील. ज्याअर्थी श्री गांधी व श्री जिना यांच्या संबंधी चर्चा चालू असताना मी नायक पूजेची निंदा केली त्या अर्थी आता रानड्यांना नायक पूजेचे स्थान बनविण्याऱ्याच्या प्रयत्नात मी का सामील झालो , असे माझे टीकाकार मला विचारतील . हे प्रश्न अत्यंत समर्पक आहेत. नायकपूजा खऱ्या अर्थाने मरू घातली आहे यात मुळीच शंका नाही. ती कार्लाईलच्या युगातच मरू लागली होती याबद्दल आपला रोष प्रकट करताना तो म्हणतो : *हे असे एक युग आहे की महापुरुषांच्या अस्तित्वाचा स्वीकार ते करीत नाही, इतकेच नव्हे तर महापुरुषांची काही आवश्यकता आहे, हेच मानायला तयार नाही.* पुढे तो म्हणतो , *आमच्या टिकाकारांना एखादा महापुरुष दाखविल्यास ते त्याच्या आयुष्याचा जमाखर्च पाहण्यास सुरुवात करतात आणि तोसुद्धा त्याची पूजा करण्यासाठी नव्हे तर केवळ त्याचे आडवे उभे मोजमाप करण्यासाठी.*
*तथापि नेत्यांची पूजा भारतात निश्चितपणे अजुन मेलेली नाही. अजूनही भारत हा मूर्ती पूजेसाठी तरी बेजोड असा देश आहे. येथील धर्मांतही मूर्तीपूजा आहे आणि राजकारणातही मूर्तीपूजा आहे. नेतागिरी आणि नेतापूजा ही दुर्देवाची गोष्ट असली तरी ती अजूनही भारताच्या राजकीय जीवनातील कटू सत्य आहे. नेतेपूजा ही भक्तांना नीतिभ्रष्ट करणारी व देशासाठी धोकादायक आहे , हे मला मान्य आहे. जोपर्यंत अशी टीका एखाद्या नेत्याच्या पुजेला आरंभ करण्यापूर्वीच सुचवते की तुम्ही ज्याची पूजा करणारा आहात तो खरोखरच मोठा आहे की नाही हे तपासून पहा तोपर्यंत मी अशा टीकेचे स्वागतच करतो. दुर्दैवाने हे काम सोपे नाही. कारण सध्याच्या काळात वर्तमानपत्रे हातात बाळगून थोर पुरुष घडविणे हे फारच मामुली काम झालेले आहे. इतिहासातील या तथाकथित महापुरुषांचे वर्णन करण्यासाठी बँकेतील नोट असे मजेदार शब्द गार्डिनर ने वापरले आहेत. बँकेतील नोटे प्रमाणेच हे महापुरुष ही सोन्याचे प्रतिनिधित्व करतात. ते बनावट तर नाहीत ना एवढेच आपणास बघावयाचे असते. आपल्याकडील महापुरुषांची पूजा बांधताना आपल्याला अधिक चौकस राहिले पाहिजे, ते मला मान्य आहे. कारण आपल्या या देशात आपण अशा स्थितीला येऊन पोहोचलो आहोत की, खिसेकापूपांसून सावध राहा, अशा अर्थाचे जेथे फलक लावलेले आहेत तेथेच त्याच्या बाजूला महापुरूषापासून सावध राहा असे फलक लावण्याची पाळी आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. महापुरुषांच्या पूजेचे तरफदारी करणाऱ्या कार्लाइलनेही आपल्या वाचकांना सावधगिरीची सूचना दिली की,*
*इतिहासात मोठेपणाच्या पदवीला चढविण्यात आलेले पुष्कळसे तथाकथित महापुरुष केवळ ढोंगी व स्वार्थी माणसे होती याबद्दल खेद व्यक्त करताना तो म्हणतो , या तथाकथित महापुरुषांनी जगाचा पगार (सत्कार) फुकटच खिशात घातला. परंतु जगाचे काम काहीच झाले नाही. खरे महापुरुष नष्ट झाले असून ढोंगीच पुढे झालेले आहेत.*
आज भारतातील या दोन महापुरुषांनी ज्याप्रमाणे आपले पूजा व्हावी, अशी योजना करून ठेवली त्याप्रमाणे रानड्यांनी स्वतःवर देवत्व लादून लोकांकडून कधीही सत्काराची अपेक्षा केली नाही ते असे कसे करू शकले असते? त्यांनी सिनाईचा एखादा गरमागरम संदेश आणला नव्हता. त्यांनी कसलेही चमत्कार करून दाखविले नाहीत किंवा दुःखी व भयग्रस्त लोकांना पर्यंत सुटकेची त्यांनी आश्वासनेही दिली नाहीत. त्यांची नावे जशी प्रभाव आणि भव्यतेची निदर्शक आहेत त्याप्रमाणे रानडे यांचे नाव इतक्या समर्थपणे व स्पष्टपणे या गुणांचे निदर्शक कधीही बनू शकले नाही . ते कोणाचेही दैवत नव्हते आणि त्यांच्याजवळ मानव शक्तींच्या पलीकडचे कोणतेही गुण नव्हते.
तथापि याची भरपाई करणारेही गुण त्यांच्याकडे होते . रानडयांजवळ अशी प्रभावकारी दिव्यता नव्हती परंतु ते आपल्या एखाद्या अरिष्टाला कारणीभूतही ठरले नाहीत. त्यांच्याजवळ भारताची सेवा करण्यासाठी असे अलौकिक गुण नसले तरी त्याच्या शिव्या सहन करून त्यांनी देशाला विनाशापासून वाचविले. ते कोणाचे दैवत नसले तरी मूलतः विपर्यस्त व अप्रामाणिक अशा बुद्धी वैभवाचे व मनाच्या वृत्तीचे त्यांनी कधीही प्रदर्शन केले नाही किंवा अविश्वासाची बीजे रुजविणाऱ्या व समेट कठीण करून सोडणाऱ्या वृत्तीचेही प्रदर्शन केले नाही. रानडयांच्या जीवनात अतिशोक्ती आणि उधळेपणा मुळीच नाही. एका अतिरेकवाद्याची भूमिका पत्करून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची तयारी नव्हती .
जनतेच्या देशभक्तीपर भावनांचा खेळ करून त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही . जे मार्ग अपक्व आहेत ते विस्ताराने लंबेचौडे आहेत पण परिणामत: त्या निरर्थक आहेत , जे मुर्खापासून किंवा लुच्यांपासूनही सुरक्षित नाहीत आणि ज्यामुळे प्रामाणिक व एकनिष्ठ अशा देशसेवकांच्या माना मुरगळुन पुन्हा प्रयत्न करण्यास ते असमर्थ होऊन जातील . अशा प्रकारच्या मार्गांचा पुरस्कार करणाऱ्यांमध्ये सामील होण्याचे त्यांनी नाकारले. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले चातुर्य दाखवण्यासाठी भर समुद्रामध्ये जहाजाशी खेळ करून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणाऱ्या नावाड्याप्रमाणे ते नसून जहाज सुरक्षितपणे किनार्याकडे हाकणाऱ्या नावाड्या प्रमाणे नेतृत्व होते. थोडक्यात रानडे हे *गोठविलेल्या* बँक नोटेप्रमाणे नसून त्यांच्यासमोर नम्र होण्याने आपण एखाद्या ढोंग्याची पूजा करीत आहोत, असे वाटण्याचे काहीही कारण नाही.
दुसरी बाब म्हणजे रानडे यांचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ नायक पूजाच नव्हे. आपल्या मनातील अफाट कौतुक व्यक्त करण्यासाठी केलेली नायकपूजा ही भिन्न प्रकारची असून आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंधपणाने आचरण करणे ही वेगळ्या प्रकारची नायकपूजा होय. पहिलीमध्ये काहीही वाईट नसून दुसरी निर्विवादपणे अत्यंत भयावह आहे. जे जे उदात्त आहे त्याबद्दल आदर व्यक्त करण्याच्या वृत्तीची निदर्शक पहिली पूजा असून केवळ खऱ्या थोर पुरुषांपर्यंत ती मर्यादित राहते. दुसऱ्या प्रकारची पूजा म्हणजे एखाद्या दुष्ट नोकराने आपल्या मालकासंबंधी बांधलेल्या पूजेसारखी असते. पहिली सन्मानाशी संबंधित आहे तर दुसरी अध:पाताची निदर्शक आहे. कोणाचेही विचारस्वातंत्र्य व आचार- स्वातंत्र पहिलीमुळे नष्ट होत नाही तर दुसरी अनुयायाला ठोंब्या बनवून सोडते. पहिलीमुळे देश अरिष्ठांच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता नसते तर दुसरीमध्ये ही शक्यता पुरेपूर प्रमाणात असते. सारांश रानडयांचा जन्मोत्सव करीत असताना ज्याला कोणीच निवडून दिले नाही, जो कोणालाही उत्तरदायी नाही आणि ज्याला कोणीही काढून टाकू शकत नाही अशा सर्वोच्च साहेबाची आम्ही पूजा करीत नसून अशा एका नेत्याबद्दल आपला आदर व्यक्त करीत आहोत की त्यांनी लोकांना हाकलत नेले नाही तर त्यांना मार्गदर्शन केले. स्वतः घेतलेले निर्णय एखाद्या *ट्रिक* द्वारे किंवा जबरदस्तीने लोकांवर लादले नाही
तिसरी गोष्ट अशी की येथे जन्मलेला जनसमूह आपल्या नेत्याची पूजा बांधण्यासाठी गोळा झालेला नाही. रानड्यांच्या राजकीय उपपत्ती चे आपणाला स्मरण करून देण्याचा हा प्रसंग आहे. माझ्या मते वेळोवेळी या सिद्धांताचे स्मरण आपणाला होत राहणे आवश्यक झाले आहे. कारण त्यांचे सिद्धांत परिणामी मंद असले तरी ते सुरक्षित, मजबूत व खात्री बाळगण्या लायक आहेत. ते चकचकीत नसले तरी सुद्धा सोन्यापेक्षा कमी किमतीचे नाहीत. त्याबद्दल कोणाला शंका आहे काय? कोणाला अशी शंका असेल तर त्यांनी बिस्मार्क, बेलफोर आणि *मोर्ले* यांच्या पुढील वक्तव्याचा गंभीरपणे विचार करून पाहावे. जर्मनीतील एक फार मोठा तत्त्वचिंतक बिस्मार्क म्हणतो :- *राजकारण हा शक्याशक्यतेचा एक खेळ आहे*.
इंग्लिश राज्यघटनेवरील बॅगहॉटच्या पुस्तकाला जोडलेला आपल्या प्रस्तावनेत बेलफर म्हणतो.
ज्या प्रक्रियेने मध्यकालीन राजेशाहीचे रूपांतर हळूहळू सध्याच्या लोकशाहीमध्ये घडवून आणले, ज्या प्रक्रियेमुळे एवढा अधिक बद्दल फारसा विनाश न करता घडून आला त्या प्रक्रियेचा पाया आपणास जाणून घ्यावयचा असेल तर बौध्दिक उपपत्तीचा व सिद्धांताचा अभ्यास करण्याऐवजी आपण त्याकाळातील लोकांच्या भावना व चारित्र्याचा अभ्यास केला पाहिजे. ब्रिटीश संस्था जशाच्या तशा स्वरुपात इतर देशातही स्वीकारल्या जाव्या, अशी शिफारस करणाऱ्या लोकांनी हे सत्य नेहमी ध्यानात बाळगले पाहिजे. अशा प्रकारचा प्रयोग कदाचितच सुरक्षितपणे पार पाडू शकणार नाही. घटनांची नक्कल सहजगत्या होऊ शकते परंतु त्यामागे वृत्तीचे नक्कल करता येण्यासारखी नाही आणि असे झाले तर उसनी घेतलेली राज्यघटना व तद्देशीय लोकांची वृत्ती यांचा मेळ घालण्यात अयशस्वी ठरते आणि अशा डगलेवजा घटनेचे गंभीर परिणाम घडून येण्याची शक्यता निर्माण होते. त्या देशातील लोकांमध्ये अन्य कितीही चांगले गुण असले तरी वरील गुणांचा जर त्यांच्याठायी अभाव असेल तर याबाबतीत त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. उदाहरणार्थ जन निष्ठांचा अनुक्रम लावून त्यानुसार आचरण करण्याची क्षमता त्यांच्यात नसेल , जर स्वातंत्र्याची स्वाभाविक आवड त्यांना नसेल , कायद्याचा आदर करण्याची त्यांची वृत्ती नसेल, जर ते विनोदप्रिय नसतील व विश्वासघात सहन करण्याची त्यांची वृत्ती असेल, तडजोड केव्हा व कशी करावी हे त्यांना माहीत नसेल, कधी कधी तर्कशून्य म्हणून ज्यांचे चुकीचे वर्णन केले जाते अशा एककल्ली एकांतिक निर्णयाबद्दल अविश्वास नसेल, भ्रष्टाचाराची त्यांना किळस येत नसेल, आणि त्यांच्यात पडलेले गट जर खूप असतील किंवा दोनच असले तरी अतिशय गंभीर स्वरूपाचे असतील तर ब्रिटिशांच्या धर्तीवरील संस्था त्या देशात चढविणे तरी जाईल किंवा असंभव तरी होईल. ज्या देशात सांसदीय व्यवहाराची कला आणि पक्षबद्धता आधीच कळसाला पोहोचली असेल तेथे तर अशी शक्यता फारच कमी उरते.
मार्ले लिहितो की :-
*राजकारणी पुरुषाने समाजरचनेतील काही बाबीकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते परंतु याकडे लक्ष न देता केवळ तार्किक पूर्णावस्थेच्या मागे लागणे म्हणजे स्वतःचे अज्ञान व्यक्त करणेच होय. समाजाच्या लहानशासुद्धा मूलभूत बदलाकडे, मग तो वैचारिक असो की संस्थागत असो तुच्छतेने पाहणे म्हणजे एक प्रकारचा उन्मादच समजला पाहिजे. अशा प्रकारचे बदल पुन्हा पुन्हा किंवा तशी शक्यता निर्माण झाली असतानाही घडवून आणण्याची अपेक्षा बाळगणे म्हणजे मुर्खांचा आडदांडपणाच होय . लहान सुधारणा, या मोठ्या सुधारणाच्या शत्रू असतात. ही फ्रेंच म्हणही याच अर्थाने वापरल्या जात असून अशा पद्धतीने समाजाचा सर्वनाश घडविण्याचा तो उपाय आहे , हेच तिच्या द्वारा सूचविल्या जाते.*
पारतंत्र्यात असलेले राष्ट्र गुलामगिरीची बेडी तोडून आपले स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी नेहमी उत्सुक असते. परंतु स्वातंत्र्याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्याची तसदी घेत नाही, तथापि असा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. परतंत्र राष्ट्राचा राज्यकर्ता राष्ट्राशी बांधलेली गाठ बरेचदा राज्यकर्त्या राष्ट्रापेक्षा परतंत्र राष्ट्रालाच अधिक आवश्यक असते. याचा विचार बहुदा पडत असतो. हे परतंत्र राष्ट्राच्या आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते. परतंत्र राष्ट्र एककेंद्री असू शकते ते अनेक विभागांनी मिळून बनलेही असू शकते. हे विभाग कधीही एककेंद्री होऊ शकणारेही नसू शकतात किंवा हे विभाग सध्या जरी अखंडपणे एकत्रित झाले नसतील तरी बऱ्याच काळपर्यंत एककेंद्रिय ठेवले तर एक अखंड राष्ट्र बनू शकतील असेही असू शकतात. अशा तऱ्हेने पारतंत्र्याची बेडी तोडण्याचे काय परिणाम होऊ शकतील हे परतंत्र राष्ट्राच्या अंतर्गत स्थितीवर अवलंबून असते. जे राष्ट्र एकसंघ आहे त्याला गुलामगिरीच्या बेड्या तोडणे कदाचित सर्व तऱ्हेने उपकारक ठरू शकेल. ज्या राष्ट्राचे विभाग कधीही एकसंघ होण्याची शक्यता नाही त्याला या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यापासून कोणताही फायदा किंवा नुकसान होण्याची शक्यता नाही. हे पाहण्याऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परंतु तिसऱ्या प्रकारच्या राष्ट्राच्या बाबतीत मात्र निश्चितपणे ते घातकच होऊ शकते. अपरिपक्वतेच्या स्थितीतच पारतंत्र्याची बेडी तुटल्यामुळे एरवी हे विभाग एकत्र येऊन एकसंघ राष्ट्र बनण्याची शक्यता व अपेक्षा असते ती नष्ट होऊन विघटनाचीच निश्चिती निर्माण होते अशा स्थितीत ते एक स्वैराचारी कृत्यच ठरते. आपल्या देशबांधवांच्या लक्षात आणून देण्याचा रानडयांनी ज्याबद्दल प्रयत्न केला तो हा दुसरा धोका होय.
ही जाणीव करून देण्यात रानडयांनी शहाणपणा केला नाही, असे कोणी तरी मिळू शकेल काय? याच्या आवश्यकते बद्दल ज्यांना शंका असेल त्यांनी फक्त चीन कडे नजर फेकावी. चीनची क्रांती होऊन गेल्याला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. चिनी - जनतेत स्थैर्य आले आहे काय? नाही. " चीनची सुरू झालेली क्रांती केव्हा थांबणार? असे चिनी जनता विचारीत आहे आणि त्यांना चीनमधील परिस्थितीचे ज्ञान आहे. ते कदाचित पुढील शंभर वर्षांमध्ये ", असे त्या प्रश्नाला उत्तर देण्या वाचून अन्य काहीच करू शकत नाहीत. संपूर्ण चिनी जनतेचा विश्वास संपादन करणारे स्थिर सरकार चीन स्थापू शकला काय? मुळीच नाही. सत्य सांगायचे म्हणजे चीन पूर्वी कधीही नव्हता इतका आज क्रांतीनंतर विघटित व अस्ताव्यस्त अशाप्रकारचा देश झालेला आहे. क्रांतीने अशा प्रकारचा गोंधळ माजविलेला आहे त्याचे स्वातंत्र्य धोक्यात आलेली आहे. चीन या गोंधळातही आपले स्वातंत्र्य गमावून बसला नाही , याचे कारण म्हणजे त्याला इतके शत्रू आहेत की त्याला कोणी गिळंकृत करावे याबद्दल त्यांचा निर्णय होऊ शकला नाही. ही परिस्थिती बऱ्याच भारतीयांना माहीतही आहे. चीनी क्रांती ही एक घोडचूक होती. हे युनान-शी-कै यांचेच मत आहे. तो म्हणतो :-
चीनची जनता लोकशाही सरकारसाठी परिपक्व आहे की नाही किंवा सध्याच्या परिस्थितीत चिनी जनतेला लोकशाहीचा स्वीकार करता येण्यासारखा आहे की नाही याबद्दल मला शंका वाटते. मर्यादित राजेशाही जर स्वीकारण्यात आली तर परिस्थिती पूर्ववत होईल व अधिक वेगाने स्थैर्य येईल परंतु जर येथील बुद्धिवंतांशी व परिस्थितीशी मेळ न खाणाऱ्या एखाद्या प्रायोगिक सरकारचा स्वीकार केल्या गेला तर मात्र असे स्थैर्य येण्यास वेळ लागेल. सध्याच्या राजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची बाजू घेण्यात माझा एकमेव हेतू हाच आहे की घटनांबद्द राजेशाहीवर माझा विश्वास आहे. जर दुसऱ्या पद्धतीचा आपण स्वीकार केला तर सध्याच्या राजाच्या सर्वोच्च जागी सर्व लोकांना मान्य होऊ शकेल असा कोणीही नाही. या संकटाप्रसंगी चीनला खंडित होण्यापासून आणि तदनंतर उद्भवणाऱ्या अनेक धोक्यापासून वाचवावे एव्हडाच माझा हेतू आहे. चीनमधील परिस्थिती केवळ उदाहरणच नव्हे तर आपणासाठी एक धोक्याची सूचना आहे . असे ज्यांना वाटते ते रानडयांनी स्वातंत्र्याला विरोध केल्याबद्दल खूष होऊन म्हणतील की परिपक्वतेपूर्वीच्या क्रांतीचे दुष्परिणाम पाहू शकण्याची व आपल्या देशबांधवांना तशी पावले न उचलण्याची धोक्याची सूचना देण्याची दूरदृष्टी रानडयांजवळ होती.
थोर पुरुषांच्या अंतिम शब्दाबद्दल व अंतिम पश्चातापा बद्दल पुढील पिढ्यांना नेहमीच उत्सुकता वाटत असते. महापुरुषांचे अंतिम संदेश नेहमीच या जगातील त्यांच्या अनुभवाविषयी किंवा परलोकांविषयी लक्षात घेण्याजोगे असतातच असे नाही. उदाहरणार्थ, सॉक्रेटिसने शेवटी क्रितोला बोलावून सांगितले, "आपणाला आस्कूलेपियस चा एक कोंबडा परत करावयाचा आहे. या कर्जाची परतफेड करा, कोणत्याही प्रकारे ते टाळू नका." तथापि त्यांचे अंतिम पश्चाताप नेहमीच अत्यंत महत्त्वाचे व चिंतन करण्यासारखेच असतात. नेपोलियन चे उदाहरण घेऊया , नेपोलियन चा सेंट हेलेना येथे मृत्यू होण्यापूर्वी त्याचे तीन महत्त्वाचा मुद्द्याबद्दल अस्वस्थ असल्याचे सूचित केले. त्यातच त्याचे अंतिम दुःख सामावलेले आहे, ते असे होते:-
त्याच्या जीवनातील अत्युच्च शिखरावर तो असताना त्याला मरण आले नाही; त्याने इजिप्तला सोडून दिले आणि पौर्वत्य देश जिंकण्याच्या अपेक्षेचा त्याग केला आणि शेवटचा पण कोणत्याही अर्थाने कमी महत्त्वाचा नसलेला मुद्दा म्हणजे वाटंरलू येथील त्याचा पराजय . रानडयाचा असा एखादा खूद विषय होता काय ? एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, त्यांना काही दुःख असेलच तर नेपोलियनच्या मनाची शांती नष्ट करणाऱ्या अशा काही बाबी होत्या तशा त्यांना नसल्या पाहिजे. रानडे हे कीर्तीसाठी जगले नसून सेवेसाठी जीवन जगले. त्यांचा मृत्यू किर्तीच्या अत्युच्च क्षणी झाला काय किंवा मामुली क्षणी झाला काय किंवा त्यांना एक महापुरुष, एक विजेता किंवा स्वामी म्हणून मरण येवो की एक सामान्य व्यक्ती म्हणून थंडीने कुडकुडून येवो, ही बाब त्यांच्यासाठी फारच शिल्लक होती. वस्तुस्थिती कशी की रानडे कसल्याच पश्चातापाने दग्ध झाले नव्हते. लेखी नोंदीवरून पाहता रानड्याना आपल्या कोणत्याच कर्तृत्वाची जाणीव असल्याने किंवा त्यांना कशाचा तरी पश्चाताप झाल्याचे दिसून येत नाही. त्यांना सुखाचे व शांततेचे मरण आले तथापि आज जर रानडे या जगात पुन्हा अवतीर्ण झाले तर रानड्यांना कोणत्या एखाद्या बाबीबद्दल खेद वाटेल काय? असे विचारणे उपयुक्त ठरेल. मला खात्री आहे की एका बाबींबद्दल त्यांना अत्यंत दुःख होईल, ती बाब म्हणजे लिबरल पार्टीची सध्याची भारतातील स्थिती.
लिबरल पार्टीची सध्या भारतात स्थिती कशी आहे? लिबरल पार्टीचे केवळ प्रेत उरले आहे. हे विधान खरे पाहता, अतिशय सौम्यच आहे . लिबरल लोक म्हणजे भारतीय राजकारणाचा *घृणेचा विषय* झालेले आहेत. नार्टन ने दुसऱ्या एक संदर्भात योजलेली भाषा वापरून सांगायचे म्हणजे ते लोकांना मोकाट सोडलेले, सरकारला थारा न दिलेले, या दोघांपैकी कोणाच्याही दृष्टीने उपयुक्त नसलेले पण दोघांच्याही शिव्या खाणारे असे लोक आहेत. एक काळ असाही होता लिबरल पार्टी ही काँग्रेसची प्रतिस्पर्धी होती. आज लिबरल पार्टीचे व काँग्रेस चे संबंध हा कुत्रा आपल्या धन्यावर भुंकतोही परंतु आपल्या बहुतेक उर्वरित जीवनात त्याच्या मागेमागे जाण्यातच तो समाधान मानतो. लिबरल पार्टी म्हणजे काँग्रेस चे जर शेपूट नाही तर आणखी काय आहे? बरेच लोक तर असेही विचारतात की लिबरल पार्टीचे लोक काँग्रेस मध्ये सामावून का जात नाहीत - इतके त्यांचे अस्तित्व निरर्थक झाले आहे. लिबरल पार्टीचे हे गंडांतर पाहून रानडयांना खेद वाटल्यावाचून कसे राहील? हे पाहून कोणा भारतीयाला दुःख वाटणार नाही? लेबल पार्टीचा विनाश ही उदारमतवादी ( लिबरल ) लोकांची मोठी शोककथा आहे. पण खरे पाहता हे देशावरील एक संकटच होय. या पक्षाचे अस्तित्व लोकप्रणित सरकारसाठी इतके आवश्यक आहे की तिच्यावाचून पुढे मार्ग काढण्याची कल्पनाच असंभव वाटते. एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार म्हणतो :-
"आमच्या रचनात्मक संस्थांपैकी काही नष्ट करण्याची किंवा घटनेमधील एखादा मोठा भाग रद्द करण्याची कल्पना करणे सोपे काम आहे ; परंतु राजकीय पक्षावाचून निर्वाह करण्याची कल्पनाच करवत नाही. त्या आमच्या जीवनाला अत्यावश्यक अशा संस्था आहेत." पक्षाचे अनुशासन व नियंत्रणाशिवाय केवळ मतदात्यांच्या जथ्याद्वारा शासन चालविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जेम्स ब्राईस च्या भाषेत :
" कसलीही सूचना ज्यांना नाही अशा भागीदारांच्या मतांच्या आधारावर रेल्वेबोर्ड चालवण्यासारखे किंवा यात्रेकरूंच्या मतांच्या आधाराने जहाज कोणी चालवावे हे ठरविण्यासारखेच आह
*लोकप्रशासनासाठी पक्षांचे अस्तित्व असणे ही अनिवार्य अशी बाब आहे, परंतु केवळ एक पक्ष सरकार असणे ही तितक्याच प्रमाणात प्रशासनासाठी गंभीर धोकादायक बाब आहे, हे नाकारता येण्यासारखी नाही.* या मुद्द्यासंबंधी जर्मनी व इटली ही याची अत्यंत ढळढळीत उदाहरणे आहेत. एकपक्षीय सरकार असलेल्या देशापासून आपण धडा घेण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेच्या नावावर आपण त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जे असे करीत आहेत ते एकपक्षीय शासनसत्तेत अत्याचार होण्याची व अशा पद्धती मुलत:च अंतर्भूत असलेली लोकांची दिशाभूल केल्या जाण्याची शक्यता लक्षात घेत नाहीत. *एका पक्षाद्वारा लोकतंत्र शासन चालविणे म्हणजे लोकशाहीच्या नावाआडून जुलमी राज्य चालविणेच होय. काँग्रेसच्या कारकिर्दीत एकपक्षीय सरकारच्या जूलमामध्ये बहुमत या शब्दाचा अर्थ कसा दिखाऊ होतो व कशी भयानक वस्तू ठरते , याचा अनुभव भारतातही आपणाला आलेला आहे.*
ब्रिटीश राज्यात न्यायखाते व प्रशासनखाते जसे वेगवेगळे होते तसे ते आता ठेवण्याची गरज नाही, असे राजगोपालचारी द्वारा आपणास सांगण्यात आले नाही काय? जुलमी शासकाची रक्ताची आवड या विधानाद्वारे व्यक्त होत नाही काय? अशाप्रकारच्या जुलमी सत्तेला जुलमी असल्याबद्दल खंतही वाटत नाही. कारण ती निवडलेली असते. अशा जुलमी सत्तेशी मिळते घेण्यासारखेही नसते, कारण हे जुलूम करणारे लोक आपणापैकीच असतात. अशा जुलमी सत्तेला निवडणुकीत आव्हान देऊनही तिच्या बदलण्याची खात्री देता येण्यासारखी नसते. अशा सत्तेपासून मुक्त होण्याचा खरा मार्ग म्हणजे दुसऱ्या पक्षाद्वारे त्याला पदच्युत करणे, त्याची किंमत कमी करणे किंवा दुसर्या पक्षाने त्याला आळा घालणे हाच असतो. प्रत्येक सरकार निर्णय घेताना चुका करण्याची शक्यता असते; त्याचे शासन वाईट असल्याचीही शक्यता असते. भ्रष्टाचार करणारी, अन्याय करणारी, जुलूम करणारी व चुकीच्या श्रद्धा असणारीही अनेक सरकारे असू शकतात. म्हणून टीकेपासून कोणतेही सरकार मुक्त असू नये.
परंतु सरकारवर टीका कोण करू शकतो? व्यक्तीवर ही जबाबदारी सोपविल्यास ती कधीही पार पाडल्या जाऊ शकत नाही. आपल्या शत्रूशी सामना कसा करावा यासाठी सर टॉयनबी यांनी आपला उपदेश नोंदवून ठेवलेला आहे. ते म्हणतात : *तुम्ही त्याला पाहताच ताबडतोब थोडे मागे सरा; आणि मागे सरल्यानंतर एकदम त्याच्यावर हल्ला करा.* परंतु सरकारविरुद्ध जो यशस्वीपणे लढू इच्छितो अशा एका व्यक्तीला हे शक्य नसते. ब्राईस ज्याला बहुजन समाजाचा विनाशवाद म्हणतो तशी परिस्थिती या पद्धतीत अंतर्भूत असते. व्यक्तीला या परिस्थितीत असहाय्य स्थिती प्राप्त होते व एकाकीपने या शक्तीशी लढणे शक्य नाही, असे वाटल्यामुळे तो हार खातो. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती बहुमताच्या मतानुसार वागत नाही त्याच्यावर अन्याय व अत्याचार होण्याची शक्यता असल्यामुळे कोणीही अशा कार्यात पुढाकार घेण्यास इच्छुक राहत नाही. काँग्रेसच्या राजवटीत याचा अनुभव आपणापैकी बर्याच लोकांना येऊन चुकलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीला गुप्त पोलिसांची व सरकारजवळ असलेल्या इतर सर्व साधनसामग्रीची भीती असते. कारण आपल्या टिकाकाराला नेस्तनाभुत करण्यासाठी व त्याला चूप करण्यासाठी सरकार त्यांचा उपयोग करून घेत असत.
लिबरल पार्टीत असलेल्या त्रुटी स्पष्ट करणे हा एक हितकारक विषय होण्यावाचून राहणार नाही. पेन्डलीटन हॅटिंग यांनी आपल्या *पॉलिटिक्स ऑफ डेमोक्रेसी* या ग्रंथात लिहिले आहे की, पक्षाचे संघटन एककेंद्रीय अशा तीन वर्तुळात पसरलेले असते. आदी आतील वर्तुळ पक्ष संघटनेतील ज्येष्ठ व्यक्तीचे निदर्शक असते; यालाच उच्च अधिकारी *(High Commands*) असे म्हणतात. याच्याशी संबंधित असलेले कार्यकर्ते पक्ष संघटनेद्वारेच आपला जीवननिर्वाहसुद्धा चालवीत असतात. ते पक्षाचे पदाधिकारी म्हणून तरी आपला उदरनिर्वाह करतात किंवा सार्वजनिक पदे प्राप्त करून ते आपला निर्वाह करतात. त्यांना धंदेवाईक राजकारणी प्रकारच्या अंतरिक दलांना लागूनच उच्च अधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाभोवती गर्दी करणाऱ्या लोकांचे एक फार मोठे दुसरे वर्तुळ असते व हे वर्तुळ परंपरागत भक्ती भावनेच्या व रुढीच्या रस्सीने पक्षाला बांधलेले असते. पक्षाद्वारा पुरस्कारीत सिद्धांताचा हे लोक विचार करतात. त्याचा संबंध पक्षाच्या नेत्या ऐवजी किंवा कार्यकर्ते ऐवजी पक्षाच्या सिद्धांताशी व प्रतिमांशीच अधिक असतो.
पक्षाच्या पूर्वेतिहासाला नव्हे तर तत्त्वप्रणालीला ते मते देत असतात. या दुसऱ्या वर्तुळाच्या बाहेर कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या जनतेचा विशाल समूह असतो. हा वाहत जाणारा जनसमूह होय. हे लोक अनिर्बंध राहण्याचे कारण असे की एकतर हे लोक ध्येयहीन व विचारशून्य तरी असतात किंवा त्यांचे हितसंबंध एका विशेष प्रकारचे असल्यामुळे ते कोणत्याही पक्षाचे सामील होत नाहीत. हे दुसऱ्या वर्तुळाच्या बाहेर असलेले लोक पक्षासाठी एक फार मोठे कार्यक्षेत्र ठरतात. हे एखाद्या बक्षीसासारखे असून पक्षाला ते हस्तगत करावयाचे असते. यांना हस्तगत करण्यासाठी केवळ आपल्या सिद्धांताचे व पक्षनीती चे निर्धारण करणे पुरेसे ठरत नाही. या लोकांना सिद्धांताशी व पक्षनीतीशी काहीच कर्तव्य नसते तर जनहिताची कामे पूर्ण होण्यामध्ये त्यांची अभिरुची असते. म्हणून कोणत्याही पक्षाला निरंतर या जनहिताच्या कार्यात व्यग्न असावे लागते. कारण प्रेसिडेंट वूड्रो विल्सन म्हणतात त्याप्रमाणे बहुमताद्वारे निर्णय पारित होणाऱ्या शासनप्रणाली मध्ये एक व्यक्तीच्या केवळ बोलण्याने कोणतेच कार्य तडीस जात नाही. परंतु सुयोग्य कार्यवाहीने मात्र यश मिळू शकते.
आता या सुयोग्य कार्यासाठी व्यक्तिगत मताचे रूपांतर जनमतात करून घेणेही आवश्यक असते . एखाद्या विशिष्ट सिद्धांताला जनमताचा पाठिंबा मिळवण्यासाठी तसे जनमत तयार करणे हे पक्षाचे प्रमुख कार्य असते. तत्वतः राजकीय पक्ष हे जनतेच्या आकांक्षा व्यक्त करण्याचे व लोकमत प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे माध्यम होय. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र पक्षच जनमत तयार करतात तयार करतात, जनतेला मार्गदर्शन करतात , त्यांच्यावर दबाव आणतात व बहुधा जनमताला नियंत्रणही करतात. पक्षाचे नि:संदिग्धपणे हेच प्रमुख कार्य होय. याकरिता पक्षाला दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली अशी की त्याने जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे. त्याने जनतेत मिसळण्यासाठी आपल्या माल - मसाल्यासह आपले सिद्धांत, राजनीती, आदर्श व उमेदवार यांच्यासह घराबाहेर पडलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या माल - मसाल्याच्या प्रसिद्धीसाठी त्याने जनतेत गाजावाजा केला पाहिजे; आणि लोकांना स्फूर्ती देऊन त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पुन्हा ब्राईसचे मत उद्घृत करतो .तो म्हणतो, *ज्या राजकीय प्रश्नांवर लोकांना निर्णय हवा असेल त्या प्रश्नासंबंधाचे त्यांना थोडे ज्ञान करून द्या, त्यांच्या पुढाऱ्यासंबंधी त्यांना काही माहिती द्या , आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या दोषाची जाणीवही त्यांना करून द्या. अपेक्षित कार्य घडवून आणण्याचे हेच पायाभूत मुद्दे आहेत जो पक्ष असे अपेक्षित कार्य घडवून आणण्यात अपयशी ठरतो त्याला स्वतःला पक्ष म्हणवून घेण्याचा काहीच अधिकार नाही.
एक संघटन या नात्याने यापैकी कोणती गोष्ट लिबरल पार्टीने केली? लेबर पार्टी जवळ फक्त नेते होते; परंतु तिच्याजवळ यंत्रणा नव्हती. कार्यवाही करणारी यंत्रणा नसल्यामुळे नेते केवळ शून्यवत झाले केवळ रुढीच्या बंधनानी काही लोक त्या पक्षात होते व दुसऱ्या वर्तुळाबाहेर पक्ष नेत्याजवळ काहीही उरले नव्हते. लोकांचा घोळका जमवण्यासाठी या पक्षाजवळ कोणतीही युद्ध घोषणा नव्हती. लिबरल पक्षाचा जनसंपर्कावर विश्वास नाही. पूर्णता एकटा पडलेल्या पक्षाची कल्पना करणेही कठीण असून त्यांचा जनतेच्या प्रमुख गटाकडून उपहास होत होता. पक्षाबदलाच्या कल्पनेवरही त्याचा विश्वास नव्हता. त्यांच्याजवळ उपदेश करण्यासारखे काही तत्व नव्हते म्हणून नव्हे तर हिंदू धर्माप्रमाणेच हा पक्षही धर्मांतरावर अविश्वास असलेला पक्ष होता. केवळ तत्वांच्या व धोरणाच्या पुरस्कारावर त्याची मदार होती. परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने कार्य केले नाही. प्रचार कार्यक्रम या वस्तू लिबरल पक्षासाठी बहिष्कृत होत्या. जेव्हा कोणी क्रिप्स येथे येतो तेव्हा किंवा व्हाइसरॉय काही व्यक्तींचा सल्ला घेऊ इच्छितो तेव्हा निमंत्रणाची अपेक्षा करणे, यातच सिमित झाल्या.
लिबरल पार्टी जनतेद्वारा बहिष्कृत झाली याबद्दल काही आश्चर्य वाटण्याचे कारण आहे काय? पक्षाच्या सुसंगत संघटनेसाठी नितांत आवश्यक असलेल्या व विशेषतः जेथे एखाद्या राजकीय पक्षाला प्रतिरोधक अशा अनेक बाबी आहेत अशा भारतासारख्या देशात लिबरल पक्षाने पक्षसंघटनेच्या प्राथमिक बाबीकडे दुर्लक्ष केले.
भारतातील लिबरल पक्षांच्या विघटनासाठी जबाबदार कोण आहे? आपणाला कितीही दुःख झाले तरी हे कबूल करणे भाग आहे की या दुर्घटनेची जबाबदारी बरीचशी रानडयांवरच पडत असे मला वाटते. रानडे हे विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित राहिले. ते त्या वर्गातच जन्मले आणि वाढले. ते जनतेचे नेते कधीच झाले नाहीत. लिबरल पक्षाजवळ कार्यकारी यंत्रणा नव्हती. आणि अशी यंत्रणा त्याने का उभारली नाही याचे कारण म्हणजे त्यांचा जनसंपर्कावर विश्वास नव्हता. जनसंपर्काविषयीची ही उदासीनता हा रानडे कडून चालत आलेला वारसा होता. जनसंपर्क टाळण्यात लिबरल पार्टी रानडे यांची परंपरा चालवीत आहे. आणि तो म्हणजे केवळ सिद्धांत व पक्षनीती लोकांना आकर्षित करू शकेल, इतके शक्तिशाली मानणे हा होय. एकदा मॅझिनी म्हणाला होता :
*"तुम्ही माणसांना ठार मारू शकाल परंतु भव्य विचारांना ठार मारू शकत नाही "* *या विचारानुसार वर्तन करणे म्हणजे फार मोठी चूक आहे, असे मला वाटते. मनुष्य मर्त्य आहे व त्या प्रमाणेच विचारही मर्त्य आहे. आपल्या योग्यतेमुळे विचार अमर होऊन जातील, अशी स्वतःची समजूत करून घेणे चुकीचे आहे. रोपट्यांना पाणी घालणे आवश्यक आहे त्याप्रमाणेच विचारांनाही प्रचाराचे पाणी घालणे आवश्यक असते. नाहीतर हे दोन्हीही सुकून मरून जातील.* रानड्यांनी मॅझिनचे मत मान्य केले आणि विचार फलित होण्यासाठी त्याची मशागत करण्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रमपूर्ण उपायांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. जर केवळ सिद्धांत व धोरणांचा पुरस्कार करण्यातच लिबरल पार्टीचे समाधान होत असेल तर त्याचे कारणही रानड्यांची परंपराच होय.
आता उदारमतवादयांचे *( Liberals )* कर्तव्य कोणते? आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सर्व उदारमतवादी म्हणतील, हे मला माहित आहे. एकनिष्ठ अनुयायांच्या समूहाचे आणखी दुसरे कोणते कर्तव्य असू शकते? परंतु यापेक्षा दुसरी एखादी गोष्ट अधिक चुकीची किंवा भ्रांतीपूर्ण असू शकेल काय? या वृत्तीमध्ये दोन बाबी अंतर्भूत आहेत. याचा अर्थ असा होतो की महापुरुष आपली मते आपल्या अनुयायांवर लादून कार्य करीत असतो त्याचा असाही अर्थ होतो की अनुयायी आपल्या नेत्यांपेक्षा अधिक बुद्धिमान असू नयेत. वस्तुत: कोणताही महापुरुष आपली मते किंवा निर्णय आपल्या अनुयायांवर लादून व त्यांना बुद्धीभ्रष्ट करून आपले कार्य करीत नसतो. याउलट महापुरुष जर काही करीत असेल तर तो आपली मते आपल्या शिष्यावर कधीच लादत नाही. याउलट तो त्यांना स्फूर्ती देतो, त्यांना जागृत करतो, त्यांच्यात जोम निर्माण करतो आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, त्यांना चालना देतो. शिष्य आपल्या गुरु कडून केवळ मार्गदर्शन घेत असतो. आपल्या गुरुची मते स्वीकारलीच पाहिजे असे बंधन त्याच्यावर नसते. अशाप्रकारे आपल्या गुरूची मते व सिद्धांत न स्वीकारण्यात गुरुशी कृतघ्नपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्याने जरी गुरूच्या मताचा अव्हेर केला तरी तुम्ही मला जागृत करून माझा मार्ग दाखविला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असे म्हणणे त्याला भाग पडते. यात गुरुची नाचक्की होत नाही. आणि यापेक्षा अधिक देणे शिष्याला बंधनकारक नाही.
म्हणून गुरूची मते व सिद्धांत शिष्याला बंधनकारक असतात, असे समजून चालणे हे शिष्याच्या व गुरूच्या दृष्टीनेही चुकीचे आहे. शिष्याचे कर्तव्य तत्त्वे माहीत करून घेणे एवढेच असते आणि त्याचे महत्त्व व मूल्य त्याला पटले तर त्याने त्याचा प्रसार करावयाचा असतो. प्रत्येक गुरूसाठी हेच शहाणपणाचे ठरते. येशूख्रिस्ताची व भगवान बुद्धाचीही अशीच अपेक्षा होती. माझी खात्री आहे की रानडयांचीही हीच अपेक्षा असली पाहिजे. यावरून असा निष्कर्ष निघतो की जर उदारमतवाद्यांना रानडयांबद्दल प्रेम आणि आदर असेल व त्यांच्या सिद्धांतावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी केवळ रानडे यांची स्तुतिस्तोत्रे गाण्यासाठी एकत्र जगून भागणार नाही तर स्वतःचे संघटन मजबूत करणे व रानडे यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य ठरते.
हे कर्तव्य पार पाडण्यासाठी उदारमतवाद्यांनी पुढे येण्याची काही अशा आहे काय? त्यांचे संकेत तर अत्यंत निराशाजनक आहेत. मागील निवडणुकीत उदारमतवाद्यांनी एक ही जागा लढवली नाही. अर्थातच ही काहीशही आश्चर्याची बाब झालेली आहे. परंतु राईट ऑनरेबल श्रीनिवास शास्त्री सारख्या लिबरल पार्टीच्या जाज्वल्यमान नेत्याने जेव्हा " मी काँग्रेसला यश चिंतीतो " असे आपले मत जाहीर केले तेव्हा जागा न लढविण्याचे आश्चर्य फिक्के पडले. कौरवांच्या अन्नावर पोसलेल्या भीष्माने केलेल्या पांडवाच्या यशाची राजद्रोही व विश्वासघातकी घोषणा वगळली तर अशा प्रकारचा विश्वासघाताचा प्रसंग इतिहासात दुसरा आढळणार नाही ! यावरून असे दिसून येते की उदारमतवाद्यांचा आता रानड्यांच्या तत्वज्ञानावरून विश्वास उडालेला आहे. लिबरल पार्टीची तब्येत जर इतकी बिघडली असेल तर ती मेली तरच बरे होईल यामुळे नवीन संघटनेचा मार्ग मोकळा होईल आणि उदारमतवादी व उदारमतवाद यांच्या पोकळ बडबडीपासून आम्ही मुक्त तरी होऊ, असे घडले तर रानडेही आपल्या समाधीत समाधानच पावते.
-----–---////-------------------
*‘गांधी हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते, हाच त्यांचा अपराध होता’ !*
- प्रमोद मुनघाटे
गेल्या काही वर्षात महात्मा गांधींवर मराठीत चांगली पुस्तके आली आहेत. मात्र गांधींच्या हत्येचे विश्लेषण करणारी पुस्तके तुलनेने तशी अत्यल्पच आहेत. जगन फडणीस यांचे *‘महात्म्याची अखेर’* आणि अलीकडे तुषार गांधी यांचे *‘लेटस किल गांधी’* या पुस्तकात गांधीहत्येचे सूक्ष्म पदर उलगडले आहेत. गांधींच्या खुनाचा कट कसा रचला गेला त्याचा कालानुक्रमे धांडोळा घेऊन गांधीहत्येला नेमके कोण जबाबदार आहेत, याचा त्यांनी शोध घेतला आहे.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी *‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’* या पुस्तकात गांधींवर आरोप करणाऱ्या विचारांचे वर्गीकरण करून, त्या पलीकडे जाणारे गांधीचे मोठेपण स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत वानखडे यांचे *‘गांधी का मरत नाही ?’*
(मनोविकास प्रकाशन, पुणे ऑक्टोबर २०१९) हे पुस्तक आगळेवेगळे आहे. त्यांच्या या पुस्तकात गांधींच्या हत्येचा कट, मारेकऱ्यांचे कृत्य आणि कोर्टातील खटल्याच्या साक्षी अशा प्रकारचा तपशील नाही.
*१८१८ मधील पेशवाईचा अस्त आणि ब्रिटीश सत्तेचा भारतावर सर्वंकष अंमल या बिंदूपासून ते गांधींच्या हत्येचा विचार करतात.*
भारतातील सत्तेचे राजकारण हे जात, वर्ण, अस्पृश्यता आणि धर्म अशा सांस्कृतिक पायावर आजही उभे आहे आणि तेंव्हाही होते.
*गांधीच्या हत्येचे मूळ हे सांस्कृतिक वर्चस्ववादाचे राजकारण कसे आहे ते प्रारंभीच सांगितले आहे.*
*‘भारतीय असंतोषाचे जनक’* असे लोकमान्य टिळकांचे वर्णन केले जाते. पण टिळकांच्या मागे उभे असलेली महाराष्ट्रातील बुद्धिवंतांची वर्णीय भूमिका वानखडे कठोरपणे नोंदवितात.
*"राजकारण व समाजकारणात अठरापगड जातीतील कष्टकऱ्यांचे काय काम ?"* अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणे ही लेखकाला जातीय भूमिका वाटते.
आणि गांधींचा भारताच्या राजकारणातील प्रवेशच मुळात सामान्य लोकांच्या सहभागाच्या आग्रहाने झाला आहे.
*तेंव्हा हा संघर्ष अभिजन विरुद्ध बहुजन असा तेंव्हापासून दिसतो आणि त्याचे पर्यवसान गांधींच्या हत्येत झाले,* असा अन्वयार्थ चंदुभाऊ काढतात.
या पुढे जाऊन ते स्पष्टच म्हणतात, की *“आद्य क्रांतिकारक ते टिळकांपर्यंत चित्तपावन ब्राह्मण होते, हा योगायोगाचा भाग नव्हता.”* हेच गृहीतक घेऊन त्यांनी पुढील दीडशे पानांमधून गांधींच्या हत्येच्या मागे एका व्यापक सांस्कृतिक विद्वेषाचा आणि सत्तासंघर्षाचा कट कसा कार्यरत होता, याचे विवेचन केले आहे. या मुद्याला त्यांनी व्यापक स्वरूप दिले आहे.
*गांधींना केवळ स्वातंत्र्याचे आंदोलनच नव्हे तर राज्यकारभाराच्या निर्णयप्रक्रियेत शेवटच्या माणसाला कसे स्थान मिळेल याचा ध्यास कसा होता, आणि त्यांची सर्व आंदोलने याच मार्गाने कशी जातात याचे विवेचन वानखडे करतात.*
*गांधींचे हे शेवटच्या माणसाच्या हाती देशाची किल्ली देणे, यालाच या देशातील अभिजनवादी प्रवृतीचा कसा विरोध होता;* हे सांगताना वानखडे यांनी गांधींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचा आधार घेतला आहे.
अशा विविध प्रसंगांमधूनच गांधी हत्येचा कट कसा पूर्णत्वास गेला ते सिद्ध करू पाहतात.
*हा कट संपूर्णत: राजकीय सत्तेच्या वर्चस्वासाठी असला तरी त्याचे स्वरूप मात्र सांस्कृतिक आणि धार्मिक होते;* हे त्यांचे सूत्र आहे.
*गांधींची हत्या झाली आणि त्यांचा देह नष्ट झाला तरी गांधीनंतरच्या भारतात गांधीहत्येच्या कटातील सांस्कृतिक व धार्मिक सूत्रे लक्षात घेतली तर आजही गांधी संपले नसून ते जिवंत असल्याचे आढळते, आणि गांधी विरोधकांची हीच मोठी समस्या आहे.* असं वानखडे स्पष्ट करतात.
गांधीहत्येला जबाबदार सर्व घटकांचा एकत्रित विचार केला तर *‘कट्टर राष्ट्रवाद’* या संकल्पनेपर्यंत आपण पोचतो.
या राष्ट्रावादात जात, वर्ण, धर्म आणि भाषा अशा सगळ्या बाजू एकवटलेल्या आढळतात. पण दुसऱ्या बाजूला गांधी हे स्वत:च “मी सनातन हिंदू” आहे, असे म्हणतात तेंव्हा त्यांचा या राष्ट्रवादाशी कसा संबंध आहे, याचाही विचार केला पाहिजे.
*गांधींचे हिंदू असणे आणि दुसरीकडे हिंदूराष्ट्राच्या निर्मितीच्या उद्दिष्टासाठी अधिकाधिक कट्टर होत गेलेला राष्ट्रवाद यातील सुसंगती आणि विसंगतीचा शोध घेताना वानखडे तत्कालीन नेमक्या काही घटनांचा सूक्ष्मपणे छडा लावण्याचा प्रयत्न करतात.*
*बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘हिंदुत्ववाद’ जोपासण्यासाठी संघटना कां स्थापन करावी लागते आणि सर्व पातळ्यांवर हिटलर-मुसोलिनीच्या तत्त्वांचा सुप्तपणे प्रचार कां करावा लागतो, या प्रश्नांची उत्तरे शोधताना वानखडे यांना पुनः पुन्हा गांधींच्या बहुजनवादी सर्वसमावेशक राजकारणापाशी यावे लागते.*
*आधी राजकीय की आधी सामाजिक स्वातंत्र्य असा प्रश्नच गांधींच्या समोर नव्हता.*
दोन्ही सारखेच महत्त्वाचे आणि त्यासाठी एकाचवेळी आंदोलन करण्याचे गांधींचे धोरण अर्थातच स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल पक्षाला डिवचणारे होते.
गांधींच्या आधीचे राजकारण मुंबई, कलकत्ता व मद्रास अशा महानगरात एकवटलेले होते.
*गांधींनी याही अभिजनवादाला धक्का दिला. त्यांनी चंपारणसारख्या मागास भागापासून आपल्या आंदोलनाची सुरवात केली. त्यांच्या राजकारणाचा प्रारंभच शेवटच्या माणसापासून झाला.*
म्हणूनच १९१६च्या लखनौ अधिवेशनात प्रथमच शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांचे दु:ख पुढे आले.
तर दुसरीकडे
● *“शेतकऱ्यांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर धरावयाचा आहे ?*
● शिंप्यानी शिलाई मशीन चालवायचे आहे ?
● आणि वाणी तेथे जाऊन काय तराजू हाती धरणार आहेत ?”
असे लोकमान्य टिळक विचारतात याची नोंद वानखडे करतात.
■ गांधींचा राजकारणात प्रवेश होताच कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून अस्पृश्यतेच्या सामाजिक प्रश्नाची चर्चा व्हायला लागली, हेच मुळात काही अभिजनवादी नेत्यांच्या हितसंबंधाच्या विरोधी होते.
■ गांधींचे धोरण त्यांना कसे असह्य होऊ लाग, याची ती सुरवात होती. “लोकशाहीत शेतकरी हा राज्यकर्ता असला पाहिजे” किंवा “चांभार वा भंग्याची मुलगी जोपर्यंत भारताच्या सर्वोच्चपदी बसत नाही, तोपर्यंत मला समाधान नाही आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे.” असे गांधी म्हणतात तेंव्हा हळूहळू गांधींचे अस्तित्वच काहींसाठी धोक्याचे कसे ठरत होते, हेही वानखडे लक्षात आणून देतात.
■ थोडक्यात सामाजिक प्रश्नासंबंधी टिळक आणि गांधी यांचा दृष्टीकोन एकदमच कसा भिन्न होता, हे अनेक उदाहरणे देऊन वानखडे पटवून देतात. *टिळक अस्पृस्यता निवारण परिषदेच्या जाहीरनाम्यावर सही करीत नाही. तर दुसरीकडे गांधी आपल्या आश्रमात आपल्या अनुयायांच्या विरोधाची पर्वा न करता अस्पृश्य जोडप्याला प्रवेश देतात.*
*गांधींची प्रत्यक्ष हत्या होण्या आधी त्यांची यथेच्च टिंगलटवाळी महाराष्ट्रात सर्वाधिक झाली,* ह्याची अशी अनेक कारणे या पुस्तकात सांगितली आहेत.
*आधी राजकीय की आधी सामाजिक अशी स्वातंत्र्याची विभागणी न करता गांधींचे राजकारण मानवतावादाच्या व्यापक पातळीवर जाणारे कसे होते, ते त्यांच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ अशा तात्त्विक संकल्पनांवरून लक्षात येते.*
‘गांधी मरत का नाही’ या प्रश्नाचे उत्तर अशाच सनातन तत्त्वांत सापडू शकते. सामान्य जनतेला कार्यक्रम देतांना गांधींनी वापरलेली भाषा ही सुद्धा स्थलकालाच्या पलीकडे जाणारी आहे, म्हणूनच गांधी आजही जिवंत आहे.
*गांधींच्या राजकारणाची भाषा जशी त्यांच्या अभिजन अनुयायांना कळली नाही तशीच त्यांच्या विरोधकांनाही कळली नाही. म्हणूनच विरोधकांना गांधींना विरोध कसा करावा हेही कळत नव्हते.*
‘रणाविन स्वातंत्र्य कोण मिळाले’ असे तुणतुणे ते वाजवीत राहिले, असे वानखडे म्हणतात. पण असे करूनही देशातील सामान्य स्त्रीपुरुष ज्या संख्येने गांधींच्या मागे आले, तसे त्यापूर्वी कोणत्याही नेत्याच्या मागे नव्हते, हा खरा त्यांचा पोटशूळ होता आणि त्यासाठी गांधींना सदेह संपविणे हाच एक मार्ग त्यांना दिसू लागला होता, हेही पुढे खरे ठरले.
*गांधींना देहाने संपवूनही ते आपल्या जात-धर्मविशिष्ट राष्ट्रवादाच्या आड येतात म्हणून त्यांच्याविषयी अपसमज पसरविणे हा गांधींना मारण्याचा प्रयोग त्यांच्या विरोधकांनी दीर्घकाळ केल्याचे लक्षात येते.*
*म्हणजे पुस्तक किंवा सिनेमा जर टिळक, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र किंवा डॉ. आंबेडकर यांच्यावर असेल तर तिथे गांधीना खलनायक दाखविल्याशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही.*
*भारतात कुणाही व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावरून दंगली होतात. पण अपवाद फक्त गांधींचा पुतळा आहे.*
गांधींच्या समलैंगिक संबंधाची वावडी उठवणे असो की सेवाग्राम मधील त्यांच्या चष्म्याची चोरी असो किंवा अलीकडे त्यांचे पुतळे हटवणे असो, कुठेही क्षोभ होत नाही, दंगल तर नाहीच नाही.
थोडक्यात, नथुराम गोडसेच्या बंदुकीने गांधींना मारले असले तरी ‘तो’ अजूनही जिवंत आहे, हे त्यांच्या विरोधकांचे खरे शल्य असल्याने ते कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन गांधींचा प्रभाव संपविण्याचा प्रयत्न करतात.
*त्यासाठी कधी भगतसिंग, कधी सुभाषबाबू तर कधी सरदार पटेल यांचा वापर केला जातो.* या संदर्भात वस्तुस्थिती कशी आहे, याचे विस्तृत व संदर्भ या पुस्तकात वानखडे यांनी केले आहे.
गांधींच्या या बदनामीची मोहीम कशी पद्धतशीर आखली गेली ते वानखडे या पुस्तकात तपशीलवार सांगतात आणि प्रत्येक अपसमजाचे सामर्थ्याने निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. उदा. *‘मजबुरी का नाम महात्मा गांधी.’*
आजही भारताचे प्रतिनिधित्व जगानेच गांधींकडे सोपविले आहे; असे त्यांच्यावरील पोस्टाची तिकिटे किंवा जगभरच्या विद्यापीठातील त्यांच्या नावाची अध्यासनांवरून सिद्ध होते.
*भारताच्या पंतप्रधानांनाही परदेशात फक्त गांधींचे नाव घेण्याशिवाय पर्याय नसतो, तेंव्हा ती त्यांची खरी मजबुरी असते, गांधींची नाही;* असे वानखडे लिहितात.
खरे तर भारताच्या सामर्थ्याचे नाव महात्मा गांधी आहे. असे बराक ओबामासारखे जागतिक नेते मान्य करीत असताना *‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’* असे भारतात कोण पसरवते हेही आता उघडकीस आले आहे.
‘माझ्या एका गालावर कोणी मारलं तर मी माझा दुसरा गाल पुढे करेन’ असे लांच्छन गांधींना चिकटविण्यात निदान महाराष्ट्रातील *कुजबुज मोहीम* यशस्वी झाली आहे.
परिणामी ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमात संजय दत्तच्या तोंडी सुद्धा हे वाक्य येते.
*वस्तुतः भूतकाळात हरिजनांवर सवर्णांनी इतका अन्याय केला आहे की, “हरिजनांनी माझ्या एका गालावर थप्पड मारली तर मी दुसरा गाल पुढे करेन आणि तरी देखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही.” असे ते मुळातील विधान आहे.*
हे वानखडे स्पष्ट करतात.
गांधींचा ‘धर्म’ आणि त्यांचे ‘अहिंसा’ या तत्त्वांची विरोधकांनी जाणीवपूर्वक विपर्यास केला आहे. यात डावे आणि आंबेडकरवादी पुढे असतात. वानखडे म्हणतात, *"गांधींची अहिंसा ही भेकडांची अहिंसा तर अजिबात नव्हती. उलट ते म्हणत, ‘भित्रेपणापेक्षा काहीही चांगलं. भित्रेपणात दुसरी हिंसा आहे.’*
गांधींच्या अहिंसेत प्राणीहत्येचा भाबडा निषेध नव्हता.
● प्लेगच्या साथीत गांधी उंदरांना मारायला सांगतात.
● अन्नधान्याच्या तुटवड्यात ते मांसाहाराला मान्यता देतात.
● साबरमती आश्रमातील फळझाडांची नासधूस करणाऱ्या माकडांना मारून टाकण्याचा प्रस्ताव ते स्वतच मांडतात.
थोडक्यात, गांधीना कोणी ‘मुस्लीमधार्जिणा’ म्हणतात तर कोणी ‘हिंदूधार्जिणा’ पण गांधी खरे तर ‘माणूसधार्जिणे’ कसे होते हे वानखडे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात.
*‘गांधी आणि आंबेडकर’* हा मराठी विचारविश्वातील अत्यंत वादग्रस्त आणि नाजूक मुद्दा मानला जातो.
*गांधींचे सनातनी हिंदू असणे, त्यांचा चातुर्वण्यावर विश्वास असणे आणि दलितांच्या विभक्त मतदारसंघाला विरोध असणे यावरून गांधी आणि आंबेडकर दोन ध्रुव असल्याचे चित्र महाराष्ट्रात जाणीवपूर्वक कसे निर्माण करण्यात आले आहे.* याचे अत्यंत विवेकनिष्ठ व वस्तुनिष्ठ विवेचन वानखडे या पुस्तकात करतात.
पुणे करारावर सही केल्यावर *‘गांधी आणि माझ्यात इतके समान धागे आहेत, हे पाहून मी चकित व कमालीचा आश्चर्यचकित झालो.’* अशी आंबेडकरांची प्रतिक्रिया होती.
नेहरूंनी बनविलेल्या पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कां नाही? असा प्रश्न गांधी नेहरुंना विचारतात.
भारताची घटना लिहिण्यासाठी कुणा परदेशी विद्वानाला आमंत्रित करावे का अशी चर्चा सुरु असताना ‘कां? आपल्या देशात कोणी असा तज्ज्ञ सल्लागार नाही का ?’ असा सवाल ते सरोजिनी नायडू यांना विचारतात. ‘कोण आहे ?’ या त्यांच्या प्रतिप्रश्नावर
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे उत्तर ते देतात.
*परंतु दुर्दैवाने महात्मा गांधीबद्दल पराकोटीचा द्वेष आंबेडकरवाद्यांमध्ये मध्ये दिसतो,* याची चिंता वानखडे व्यक्त करतात. परिवर्तनवादी चळवळीची यामुळे कशी हानी झाली आहे, ते लक्षात आणून देतात.
गांधींना अभिप्रेत असलेल्या ‘धर्म’ व ‘ईश्वर’ या संकल्पनांचे अत्यंत मार्मिक विश्लेषण चंद्रकांत वानखडे यांनी या पुस्तकात केले आहे.
*गांधी स्वत:ला सनातनी हिंदू मानत असले तरी हिंदुत्वाच्या कोणत्याही खुणा बाळगायला नकार दिला.*
त्यांच्या आयुष्यात ‘राम’ दिसतो पण रामाचे मन्दिर, रामाची मूर्ती, पूजा अर्चा किंवा रामाचा साधा फोटोही दिसत नाही.
म्हणजे गांधीना आस्तिक म्हणावे की नास्तिक असाही प्रश्न निर्माण होतो.
वानखडे म्हणतात, गांधीनी परमेश्वराच्या संकल्पनेलाच उलटे केले. ‘परमेश्वर’ सत्य आहे अशी रूढ धारणा होती. पण त्यांनी *‘सत्य हाच परमेश्वर’* असे आपल्या एकूण प्रयोगातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
धर्माची व्याख्या करताना गांधी म्हणतात, *‘अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणे म्हणजे हिंदू धर्म.’*
थोडक्यात गांधीच्या दृष्टीने ईश्वर म्हणजे सत्य व प्रेम. आणि सत्याचा आग्रह ते धरतात, या अर्थाने ते स्वतःला सनातनी हिंदू समजतात. पण मी वेदप्रामाण्य मानत नाही, असेही स्पष्टपणे सांगतात. शंकराचार्यांनी केलेल्या हिंदू धर्माच्या व्याख्येलाही ते नाकारतात. विवेकाला आणि बुद्धीला जे पटणार नाही अशा गोष्टी ते स्वतःवर बंधनकारक मानत नाही. त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, *‘ब्राह्मण वेदाचे अध्ययन केल्यामुळे जर धर्मगुरू होत असतील, तर वेद जाणणारा म्याक्समुलर आमचा धर्मगुरू राहिला असता.”*
गांधींच्या मते देशातील प्रत्येकाला आपण पोटभर अन्न व अंगभर वस्त्र देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने धर्माला काही अर्थ उरत नाही.
अनेक संदर्भ देऊन वानखडे म्हणतात, *“गांधीच्या तथाकथित देवाची, रामाची अडचण पुरोगामी, डाव्या परिवर्तनकारी लोकांना जेव्हढी झाली, त्याहीपेक्षा जास्त अडचण धर्माचा बाजार मांडलेल्या हिंदुत्ववाद्यांना अधिकच झाली. गांधींनी धर्माचे शेपूट धरून ठेवले नसते तर त्यांना मुस्लीमधार्जिणे ठरवून त्यांना जनमानसाच्या नजरेतून पार उतरवून टाकायला ते अधिकच यशस्वी ठरले असते.”*
*थोडक्यात गांधी हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते.*
‘स्वातंत्र्या’ची गांधींची संकल्पना जशी भौगोलिक सीमारेषांनी मर्यादित नव्हती, तशीच धर्माची संकल्पनादेखील कर्मकांड आणि शब्दप्रामाण्य यांचे बंधन नसलेली होती.
स्वातंत्र्य असो की धर्म गांधींना माणूस महत्वाचा वाटतो. शुद्ध मानवतावाद हेच त्यांचे अंतिम ध्येय होते.
*थोडक्यात, गांधीच्या हत्येमागे 'पंचावन्न कोटी' वगैरे जी तात्कालिक करणे सांगितली जातात, ती खोटी आहेत.*
*वर्णवर्चस्ववादी सत्तेच्या राजकारणात सामान्य बहुजनांना सत्तेत वाटा मागणारा गांधी त्यांना नको होता हे खरे सत्य आहे,*
या वास्तवाची अनेक सुप्त पैलू उलगडून दाखविण्यात ‘गांधी का मारत नाही’ या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखडे यशस्वी झाले आहेत.
*- प्रमोद मुनघाटे*
*‘गांधी का मरत नाही’*
- लेखक : चंद्रकांत वानखडे
➖➖➖➖➖➖➖

Comments
Post a Comment