२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची मालिका २०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतरही कायम राहिली अगदी काल परवा झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेच्या निवडणुक निकालातही त्याची पुनरावृत्ती झाली. पण त्याची सखोल मीमांसा करण्याची किंवा कारणे शोधण्याची तसदी पक्ष म्हणून काँग्रेसच्या देशपातळीवरील आणि राज्यातीलही कोणत्याही जबाबदार नेत्याने घेतली नाही. मुळात पक्षात आता कोणी जबाबदार नेते शिल्लक आहेत की नाही? याची शंका यावी इतका काँग्रेस पक्ष गलितगात्र अवस्थेत आहे. आम्ही गलितगात्र आहोत हे सांगणारेही बहुदा पक्षात कोणी शिल्लक नसावे अशी एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यत निर्विवाद सत्ता गाजविलेल्या या पक्षाची अवस्था आहे.
प्रत्येक माणसाच्या पराभवामागे जशी बहिर्गत कारणे असतात तशी ती अंतर्गत कारणेही असतात आणि हा नियम राजकीय पक्षालाही तंतोतंत लागू होतो. काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला बहिर्गत कारणे जबाबदार आहेतच पण त्याहीपेक्षा जास्त अंतर्गत कारणे आहेत. त्यावर पक्षातील कोणीही चर्चा करताना दिसत नाही. त्याची प्रामुख्याने दोन कारणे दिसून येतात ती म्हणजे एकतर ही कारणे कोणाच्या लक्षातच आलेली नसावीत किंवा लक्षात येऊन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते आणि दुसरे म्हणजे काँग्रेसने स्वतः हा पर्याय निवडला असावा. या दोन्हीपैकी कोणत्या कारणाने काँग्रेसची दुरावस्था झाली हे अगोदर समजावून घेणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षाची ही दुरावस्था गेल्या दहा वर्षात मुळीच झालेली नाही याची पायाभरणी स्वातंत्र्यपूर्व काळातच झालेली होती. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी अगोदर समजून घ्यावी लागेल.
सामाजिक सुधारणा अगोदर की स्वातंत्र्य अगोदर या मुद्द्यावर काँग्रेस मधील जहाल आणि मवाळ गटात वाद झाल्यानंतर हे दोन गट आपापली विचारधारा घेऊन पुढे वाटचाल करू लागले. खरे तर काँग्रेसमध्ये पडलेली ही पहिली फूट. जहाल गटाला सामाजिक सुधारणा हव्या होत्या पण त्या धर्माच्या चौकटीत राहून. अर्थातच त्या मवाळ गटाला मान्य नव्हत्या. पहिल्या महायुद्धातच इंग्लंडची आपल्या वसाहती वरील पकड ढिली पडली होती आणि त्याचा फायदा उठवून स्वातंत्र्य पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न मवाळ गट करत असताना जहाल गटाचे महत्व कमी कमी होत चालले होते. टिळकांच्या मृत्यूनंतर मरणासन्न अवस्थेत हा गट असताना त्याला मूठमाती ध्यायची संधी असतानाही काँग्रेसने आणि नेहरूंनी त्याला संजीवनी दिली आणि विदर्भ काँग्रेसचे अध्यक्ष हेडगेवार यांना जनसंघाच्या अध्यक्षपदी बसविले. जहाल गटाच्या अपेक्षांना कुरवाळन्याच्या नादात काँग्रेस कर्मठ धर्मवादी गटांना आणि धर्मांधांना पोसत राहिली. काँग्रेसने आपल्या सवर्णकेंद्री राजकारणाचा भाग म्हणून धर्मवाद्यांचे सुभे निर्माण केले आणि ते कायम राहतील याचीही सोय केली. त्यांना वरचेवर आर्थिक रसद मिळत राहील याचीही पद्धतशीर व्यवस्था केली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर धर्मवाद्यांची नांगी ठेचण्याची नामी संधी चालून आलेली असतानाही नेहरूंनी ती दवडली. सरदार पटेलांनी जनसंघावर दहशतवादी संघटना ठरवून घातलेली बंदी नेहरूंनी धर्मवाद्यांना चुचकारण्याच्या धोरणातून दवडली. कदाचित त्याकाळात आपलीच माणसे आहेत तेव्हा त्यांना सुधारण्याच्या संधी द्यायला हव्यात असा नेहरूंचा विचार असण्याची शक्यता असली तरी त्यात या धर्मांध शक्तींच्याया विचार आणि आचरणात काहीच बदल झाला नाही. उलट भारतात हिंदू बहुसंख्य असल्याने भारत हे हिंदू राष्ट्र असले पाहिजे यासाठी लोकशाहीविरोधी जितकी कृत्ये या विचाराचे लोक आणि विविध संघटना करत राहिल्या आणि काँग्रेसचे प्रत्येक नेतृत्व त्याकडे कानाडोळा करत राहिले. त्यातून भारतातील लोकशाही मूल्यांचा आणि धर्मनिरपेक्ष तत्वांचा संकोच होत राहिला.
मुळात काँग्रेसचे समूळ उच्चाटन हा या धर्मांधांचा मुख्य कार्यक्रम होता कारण काँग्रेस तळागाळात रुजली होती आणि पिढ्यानपिढ्या या धर्मांधांच्या अत्याचाराला बळी पडलेला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व वंचित समाज आणि मुस्लिम समाज काँग्रेस पक्ष आपल्याला आत्मभान आणि आर्थिक स्थैर्य देईल म्हणून काँग्रेसला अगदी १९९० च्या दशकापर्यत डोळेझाकुन साथ देत होता. त्यामुळे काँग्रेसच्या गडांना अनेक तडाखे बसून बुरुज ढासळले तरी तटबंदी कायम राहिली आणि कॉंग्रेसपक्ष सत्तेत येत राहिला. काँग्रेसला थेट निवडणुकीच्या मैदानात हरविणे शक्य नाही ही बाब या धर्मांध शक्तींच्याया लक्षात आल्यानंतर यातील अनेकजण समाजवादाचा आणि पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून काँग्रेसच्या कळपात सामील झाले. त्यांना सक्रिय साथ मिळाली ती इंदिरा गांधींनी तनखे बंद केल्याने आर्थिक नाकेबंदी झालेल्या खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिकांची. काही सन्मानीय अपवाद वगळता हे संस्थानिक महिला, शोषित, वंचित आणि इतर मागास घटकांची पिळवणूक करण्यात आघाडीवर होते. त्यातच स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी असलेल्या अनेक नेत्यांचा स्वर्गवास झालेला होता जे होते त्यांच्यात नेतृत्वावरून संघर्ष चालू होता त्यामुळे हे सगळे भोंदू अलगद काँग्रेसच्या कळपात घुसले. आपले आर्थिक हित साधत असतानाच काँग्रेसची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कशी तुटेल याची खबरदारी घेतली गेली.

Comments
Post a Comment