लघुकथा: ऑपरेशन
रवीने गडबडीनेच डॉक्टर अस्थानांच्या हॉस्पिटलमध्ये फोन लावला . तर मॅडम एका अर्जंट सर्जरीसाठी मुंबईला गेल्याचे कळाले म्हनून त्याने थेट त्यांच्या मोबाईलवर फोन लावला. मॅडम प्रवासात होत्या त्यातच त्यांचा ड्रायव्हर आज नेमका सुट्टीवर असल्याने त्या स्वतःच गाडी चालवत होत्या. रवीने प्रियाला अचानक कळा येत असल्याचे सांगितले. तिची डिलिव्हरी डेट जवळ आली होती पण चार पाच दिवस अवकाश असतानाही तिलाआज अचानक बसल्या बसल्या त्रास होत होता. तसे तिला बरेच कॉम्प्लिकेशन्स होते पण डॉक्टर आस्थानांची ती जवळची पेशंट होती अगदी मुलगीच म्हणलं तरी चालेल. त्यातच प्रिया लहानपणापासून अनाथ अगदी रविसारखीच. त्यामुळे घरात कोणी थोर माणूस नाही त्यामुळे रवी स्वतः डॉक्टर असूनही घाबरून गेला. शिवाय तो हाडांचा डॉक्टर होता. त्यामुळे गायनेकॉलॉजिमधील विशेष ज्ञान नाही. आस्थाना मॅडम चे पती जो अनाथआश्रम चालवायचे त्याच आश्रमात प्रिया वाढलेली असल्याने आणि आस्थाना दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने त्यांनी या दोघांनाच आपली मुले मानले होते. त्यामुळे प्रियाची सगळी जबाबदारी मॅडमने स्वतः घेतली होती पण आज नेमका निर्वाणीचा प्रसंग आला होता. सर्वात जास्त गरज असताना आज मॅडम बाहेरगावी होत्या. तरीही त्यांनी फोनवरून रवीला धीर दिला आणि प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितले. रविचा फोन कट करून त्यांनी आपल्या ज्युनिअर डॉक्टरला फोन लावला आणि ओटी तयार करून प्रियाला आतमध्ये घ्यायला सांगितले. काही झाले तरी माझ्या मुलीचे बाळंतपण मीच करणार दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरला call देऊ नका असेही बजावले.
रवीने रुग्णवाहिकेची वाट न बघता प्रियाला कारमध्ये झोपविले आणि तो हॉस्पिटलकडे वेगाने जाऊ लागला. मॅडमने हि लवकर पोहचावे म्हणून आपल्या गाडीचा वेग वाढविला. रवी हॉस्पिटलमध्ये पोहचताच त्यांनी प्रियाला तात्काळ ओटीमध्ये शिफ्ट केले आणि ज्युनिअर डॉक्टर्स ने ऑपेशनची तयारी करून मॅडमच्या येण्याची वाट पाहू लागले. प्रियाची त्रास वाढला होता. गर्भाशयातील बाळाचाही श्वास गुदमरला होता. रवी दरवाज्याकडे डोळे लावून बसला होता. तेवढ्यात त्याला मॅडम येताना दिसल्या. पण त्यांचे कपडे फाटलेले होते. अंगातून रक्तही वाहत होते त्याची साडी रक्ताने माखली होती. त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.त्यांची अवस्था बघून रवी घाबरून गेला पण मॅडम म्हणाल्या," मला काही झालेले नाही तू घाबरू नको . मी प्रियाला मोकळं करते तू शांत बस". असे म्हणून त्या आत गेल्या आणि ऑपेशन सुरु झाले. बराच वेळ ऑपेशन चालू होते रवी उभा राहून आणि येरझाऱ्या घालून कंटाळला होता. म्हणू त्याने रिसेप्शन च्या तिथला टी. व्ही चालू केला आणि बातम्या पाहू लागला . बातम्या पाहून त्याला धक्काच बसला. लोणावळा येथे पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आस्थाना यांचा अपघाती मृत्यू अशी बातमी सगळ्याच न्यूज चॅनेलवर झळकत होती. मॅडमचा मृतदेहही गाडीतच असल्याचे दिसत होते. रवी जोराने ओरडत ऑपेशन थिएटर कडे पळाला. आणि ओटीचे दार वाजवू लागला. बाहेर बरेच लोक जमा झाले होते. बाहेरचा आवाज ऐकून नर्सने मॅडमच्या सांगण्यावरून दरवाजा उघडला. आतील सगळे डाक्टरहि दरवाज्याजवळ आले . त्यांना सगळ्यांना बाजूला ढकलून रवी आत गेला तर प्रिया बेशुद्ध होती आणि शेजारी एक छोटेशे गोंडस स्त्री जातीचे बाळ शांत पहुडले होते आणि रवी निशब्द होऊन एकटक पाहत होता
©के. राहुल 9096242452

Comments
Post a Comment