खरे तर याविषयावर बोलायला नको. पण गेल्या दोन तीन दिवसात स्त्रीदेवीच्या मृत्यूनंतर अनेक उलटसुलट प्रतिकिया ऐकायला मिळाल्या. जो तो आपापल्या पद्धतीने तिच्या कर्तृत्त्वाने मूल्य मापन करत आला आणि आपण आलेली पोस्ट काहीही विचार न करता forward करत आलो. यातल्या काही प्रतिक्रिया खूपच टोकाच्या होत्या त्यात जे काही आक्षेप होते त्यात प्रमुख्याने तिची देशाच्या सैनिकांशी केलेली तुलना सैनिक सीमेवर हुतात्मा झाल्यावर आपण एवढा शोक करत नाही हा या मंडळींचा प्रमुख आक्षेप पण मुळात या तुलनेला काहीच आधार नाही कारण दोन्ही क्षेत्रे हि पूर्णपणे भिन्न आहेत सैनिकांच्या हुतात्मा होण्याला जशी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणे, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत असते तसेच सरकार सैनिकांप्रति किती संवेदनशील आहे यावर अवलंबून असते. याअगोदरही सरकारी अनास्थेमुळे सीमेवर सैनिक मरत आलेले आहेत पण गेल्या साडेतीन वर्षात सीमेवरील चकमकीत प्रचंड वाढ झाली आहे. शेजाऱ्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपण शेजाऱ्याकडेही आपल्यासारखीच शस्त्रे आहेत हे विसरलो आणि सैनिक जणू मारण्यासाठीच असतात अश्या अविर्भावात वागत आलो त्याचा परिपाक म्हणजे सैनिकांच्या हुतात्मा होण्यात तिपटीने वाढ झाली पण आपण मात्र शत्रूला शिव्या घालत देशप्रेमच्या गप्पा हाणत दुर्लक्ष करतो. यातल्या(एखादा सन्मानिय अपवाद वगळता) कोणी आपल्याजवळची एक दमडीहि सैनिकांना किंवा त्याचा कुटुंबाना दिल्याचे ऐकवीत नाही. काही महाशयांनी असाही आक्षेप घेतला की अब्दुल कलाम गेल्यावर सुद्धा लोकांना इतके दुःख झाले नाही की मीडियाने याची इतकी दखल घेतली नाही. पण कलामांनी ज्या क्षेत्रात काम केले ते क्षेत्र असंख्य लोकांसाठी आजही अनभिज्ञच आहे. कलमासाठी आता गळा काढनाऱ्या कित्येकांनी त्यांनी कोणत्या क्षेत्रात योगदान दिले ते सांगता येणार नाही किंवा कलामांनी आपल्या आचरणाने घालून दिलेला वस्तुपाठ अवलंबत येणार नाही. ज्या देशात मुळातच चांगल्या प्राथमिक शिक्षणाची सिद्ध वानवा आहे तिथे ज्ञान आणि विज्ञानाची समज करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच. त्यामुळे भारतरत्न मिळून आणि विज्ञानाच्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करूनही कलाम मृत्यूनंतर आणि मृत्यूपूर्वी उपेक्षित राहणे हे आपल्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेशेच.
राहता राहिला प्रश्न श्रीदेवीचा. तिच्या मृत्यूच्या वार्तांकनाचे जे स्तोम मीडियाने माजवले तो जागतिक आश्चर्याचा काळासाध्यायच. काही वाहिन्यांचे वार्ताहर अगदी स्वत: बाथटबमध्ये पडून स्त्रीदेवी बाथरूम कश्या पडल्या असतील हे प्रात्यक्षिक करून दाखवत होते आणि आपल्याला ते कळले कारण आपले ते पहिले. आणि आपण ते पहिले कारण आपल्याला असले उथळ पाहायला आणि ऐकायला आवडते त्याहीपेक्षा आपली एक आवडती गोष्ट म्हणजे आपल्याला विनाकारण गरजेपेक्षा जास्त दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला आवडते. आपण आपले टीव्ही बंद करून ठेवले असते तर cable वल्याने आपली cable काढून नेली असती काय? तर नाही. देशातला मीडिया सध्या अत्यंत सुमार झाला असून pacakege बरोबरच तो फक्त TRP साठी काम करतात. लोक काहीही पाहताहेत ना मग आम्ही काहीही दाखवू असे साधे सरळ आर्थिक गणित त्यामागे आहे. त्यामुळे आल्या बातम्याकडे दुर्लक्ष करून ह्या चॅनेलवाल्याना अनुल्लेखाने सहज मारता आले असते पण आपल्याला ते जमले नाही.
आता श्रीदेवीचा यासाठी पात्र होत्या का असा प्रश्न कोणी उपस्थित करत असेल तर त्याचे उत्तर माझ्यासाठी तरी हो असेच आहे आणि त्याला माझ्याकडे ठोस अशी काही कारणे आहेत. श्रीदेवी ज्या क्षेत्रात कार्यरत होत्या ते क्षेत्र मुळातच सर्वसामान्यांच्या मनोरंजनाशी निगडित आहे. त्यासाठी श्रोत्यांना विशेष अक्कल असलीच पाहिजे असे काही बंधन नाही मग असे श्रोतेच नंतर श्रीदेेवी याांचे निस्सिम चाहते बनले सुरुवातीच्या काळात श्रीदेवी गल्लाभरू आणि मसाला पटाच्या नायिका होत्या. त्यातही त्यांनी आपल्या नृत्य अभिनय आणि अदाकारीने वेगळा ठसा निर्माण केला ५४ वर्षाच्या वयात ५० वर्षे एखाद्या क्षेत्रात यशवीपणे कार्यरत राहणे हे खायचे आणि बोलायचे काम नाही. त्यामुळे बोल्ड अभिनेत्री ते सशक्त अदाकारा हि त्यांची वाटचाल अतिशय वेगाने झाली. सतत 11 वर्षे सुुुपरस्टार पद मिरवीणे, ते टिकवून ठेवणे आणि ज्या अमिताभ बरोबर काम करण्यासाठी इतर अभिनेत्री फुटकळ रोल करायला सहज तयार असत त्या अभिताभला नाही म्हणायची ताकद त्यांच्याकडेच होती(स्मिता पाटील सारख्या सशक्त अभिनेत्रीलाही हा मोह आवरला नाही) नगिना हिट झाल्यानंतर एका वर्षात सात हिंदी चित्रपट पूर्ण करून ते यशस्वी पडद्यावर आणणे आजपर्यंत जगातील कोणत्याही स्त्री वा पुरुष कलाकाराला जमले नाही. हा विक्रम फक्त त्यांच्या नावावर आहे हे आपण विसरतो. कॉमेडी, शोषिक आणि डॅशिंग रोल सहज हाताळणे हि तर त्यांची हातोटी होतीच पण त्याची नक्कल करणारा एकही कलाकार आज फिल्म क्षेत्रात नाही हे त्यांचे वेगळेपण ठरत नाही का? सदमातील श्रीदेवी, चालबाजमधील श्रीदेवी, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम मधील श्रीदेवी ह्या त्यांच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणाऱ्या आणि समस्त स्त्री वर्गाला आत्मभान देणाऱ्या भूमिका होत्या. यशस्वी पुनरागमन करून त्यांनी फिल्म दुनियेच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. आता ही बाई पुन्हा धुमाकुळ घालणार असे वाटत असतानाच त्यांच्या कारकिर्दीचा दुर्दैवी अंत झाला. म्हणूनच श्रीदेवी इतर सरस लोकांपेक्षा जास्त सरस ठरतात आणि कालच्या गर्दीने आपल्याला दाखवून दिले आहे त्यासाठी कुणाच्या पावतीची गरज नाही.
- ©राहुल खरात 9096242452

Comments
Post a Comment