लघुकथा: सोबत
वयाच्या पंचवीशीतील निशा नवीन घराच्या शोधात होती. खूप शोधाशोध केल्यानंतर शहरापासून दूर असलेल्या एका भागात छोटेखानी घर मिळाले होते. लोकवस्ती खूपच विरळ होती तसेच रस्त्यापासून दूर असल्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी त्याचा काही विशेष त्रास होणार नव्हता. त्यामुळे तिला लेखिका म्हणून आवडणारा एकांत येथे सापडणार होता त्यामुळे ती खुश होती. पण घर बरेच वर्षे बंद असल्यामुळे साफसफाई करावी लागनार होती . त्यातच तिला कामाचा कंटाळा आला होता म्हणून ती त्यासाठी एखादी बाई मदतीला मिळेल का? याच्या शोधात होती. पण दिवसभर आजूबाजूला विचारपूस करूनही बाई काही मिळाली नाही. रात्र झाली तरी पसारा तसाच पडला होता. आता सकाळी लवकर उठून पसारा आवरावा असा विचार करून ती आत जाऊ लागली. तेवढ्यात तिला गेटच्याबाहेर एक सत्तरीतली म्हातारी बसलेली दिसली. हिला मदतीला घेतले तर आपले काम सोपे होईल म्हणून तिने तिला आत बोलावून घेतले. म्हातारी आनंदाने लगेच आत आली. एवढ्या रात्री कुठे जाणार तुम्ही, आजची रात्र इथेच थांबा असे म्हणत निशाने पर्समध्ये हात घालून सोबत आणलेले स्नॅक्स तिला दिले. म्हातारीने मानेनेच होकार दिलेला बघून सामोसा खाता खाता तिने म्हातारीला 'मला उद्या पसारा लावायला मदत कराल का आजी?' असे विचारले. "उद्या कशाला, आज रात्रीच मी सगळा पसारा लावून घेते", असे म्हणून आजी समोश्याचा घास चावत उठल्या आणि पसारा आवरू लागल्या. आजी यात सगळी रात्र जाईल आपण उद्या सगळे काम पूर्ण करू असे निशा म्हणाली. "पोरी गेली पंचवीस वर्षे झाले रोज रात्री येथे येऊन मी पसारा आवरत असते. मला सवय आहे त्याची", आजी आपल्या फोटोला लावलेला हार काढत म्हणाल्या. "बरे झाले आजी मी पण गेली पंचवीस वर्षे झाली अश्याच सोबतीच्या शोधात होते" निशा आपले सरळ पाय उलटे करत म्हणाली आणि दोघीही हातात हात घेऊन खो खो हसू लागल्या.
©के. राहुल 9096242452

Comments
Post a Comment