कविता : सत्तेचा बैल
काल सत्तेचा बैल मेला,
कुणी म्हणाले हे तर हात दाखवून अवलक्षण झाले,
कुणी म्हणाले, घड्याळाचे काटे उलटे फिरले,
टिकटिक थांबली, किटकीट उरली,
सत्ता सुंदरीची मती फिरली,
कुणी म्हणाले मुजोरांची खाशी जिरली.
काल सत्तेचा.......
सत्तेचा मालक सैरभैर झाला,
कुणी म्हणाले, बाण लागला,
कुणी म्हणाले वाण नाही पण गुण लागला,
सत्तेसाठी कुणी इमान खुंटीला टांगला,
कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी गवत खात नाही,
कुणी म्हणाले, हाव त्याची वाईट जाता जात नाही,
काल सत्तेचा............
कुणी म्हणाले, जहाज बुडाले,
कुणी म्हणाले, उंदीर पळाले,
कुणी म्हणाले फाईल उघडली,
कुणी म्हणाले, फाईल दाबली,
कुणी म्हणाले, नेम लागला,
कुणी म्हणाले, कसा वाकला,
काल सत्तेचा............
कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी मरत नाही,
एका जागी थरत नाही,
दावण मात्र बदलत जातो,
गेल्या घरी खात राहतो.
काल सत्तेचा बैल मेला,
कुणी म्हणाले हे तर हात दाखवून अवलक्षण झाले,
कुणी म्हणाले, घड्याळाचे काटे उलटे फिरले,
टिकटिक थांबली, किटकीट उरली,
सत्ता सुंदरीची मती फिरली,
कुणी म्हणाले मुजोरांची खाशी जिरली.
काल सत्तेचा.......
सत्तेचा मालक सैरभैर झाला,
कुणी म्हणाले, बाण लागला,
कुणी म्हणाले वाण नाही पण गुण लागला,
सत्तेसाठी कुणी इमान खुंटीला टांगला,
कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी गवत खात नाही,
कुणी म्हणाले, हाव त्याची वाईट जाता जात नाही,
काल सत्तेचा............
कुणी म्हणाले, जहाज बुडाले,
कुणी म्हणाले, उंदीर पळाले,
कुणी म्हणाले फाईल उघडली,
कुणी म्हणाले, फाईल दाबली,
कुणी म्हणाले, नेम लागला,
कुणी म्हणाले, कसा वाकला,
काल सत्तेचा............
कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी मरत नाही,
एका जागी थरत नाही,
दावण मात्र बदलत जातो,
गेल्या घरी खात राहतो.
Comments
Post a Comment