“स्वप्नातला राजहंस”
स्वप्नातला सखे तुझ्या,
मीच आहे तो एक राजहंस.
प्रणयाच्या या धुंदराती,
मालवुन टाक दिपकंस.
नकोत आता कुठली नाती,
नकोच आता कसली भिती.
विसरुन जाऊ आज जगाला,
बहरुन येऊ दे प्रिती.
श्वासामध्ये श्वास मिळुनी,
सुर बनावा आज नवा.
मिलनाच्या या रात्रीचा,
सखे कधीच ना शेवट व्हावा.
धडधडणा-या दोन हृदयांचा,
आवाज एक व्हावा.
बेधुंद अशा या रात्री,
मनाचा मनाला स्पर्श व्हावा.
आर्त सुरात माझ्या,
मिसळुन सुर तु,
ऐक माझे एकच म्हणणे.....
स्वप्नातला सखे तुझ्या,
मीच आहे तो राजहंस एक.
प्रणयाच्या या धुंदराती,
मालवुन टाक दिपकंस.
Comments
Post a Comment