Skip to main content

कविता : "घरटं”

घरटं

आता आपण लग्न करावं,
असं एका पाखराच्या मनात आलं.

शोध घेता घेता रानावनात, एक पाखरु भेटलं.
पाखरानंही त्या लाजुन हळुच हो म्हटलं.

मनातले विचार मग सत्यात आले,
तिच्याशी एकदिवस लग्न त्याचे झाले.
संसाराचं स्वप्न त्याचं सत्यात आलं,
दोघांनी मिळुन छान घरटं बांधलं.

दिस-मास जाता मन मनात गुंतलं,
संसाराच्या वेलीवर छान फुल बहरलं.
सा-या घरट्याचं मग गोकूळ झालं,
पाखराचं मन आनंदुन गेलं.

किलबिलाटात अशा कित्येक वर्षे सरली,
एक दिस मग येगळीच पहाट झाली,
पिलांचंही मन मग घरट्याबाहेर रमलं,
एक दिस पिलु घरटं सोडुन गेलं,

विसरलं मायबाप ज्यांनी जिवापाड जपलं,
घेऊन सखीला नवं घरटं थाटलं.

पाखराला मग तेव्हा कऴुन चुकलं,
आपुल्याच वागण्याचं अनुकरण घडलं.
आपुनही असंच मायबाप सोडलं,
म्हणुनच आज आपलं घरटं मोडलं....! (2)
©के.राहुल ९०९६२४२४५२

Comments