Skip to main content

कविता :"काऴ”


काऴ

वर्तमानाच्या भिंतीवर,
रेखाटीत बसलो भविष्याची चित्रे,
कुठून अचानक जागी झाली,
मग भुतकाळातील पितरे.

बसुन माझ्या मग बोकांडी,
घायाऴ त्यांनी, मजला केले.
भुतकाऴाच्या त्या पापसरीत,
पुण्य सारे वाहुन गेले.

व्याकुऴ होऊन मी नियतीला,
साद घातली आशेने,
कुठुनतरी मग आवाज आला,
धावत आली ती त्वेषाने.

मुठीत घेऊन वर्तमानाला,
वाचाळपणा मग तिने केला.
तो-यात येऊन मला म्हणाली,
हिशोब माझा न चुकता करताच बाप तुझा रे मेला.

पाप-पुण्यांचा पुन्हा एकदा,
होऊन जाऊदे निवाडा.
जे बापाचे, ते लेकाचे,
हाच नियतीचा ओढा.

त्या न्यायाने आज तुझ्यावर,
ऋण माझे रे आहे.
त्या ऋणाच्या परतीसाठी,
वर्तमानाला घेऊन संगती,
पुण्यांची तु वाट धरावी,
समतेला तु प्रमाण मानुन,
सत्याची तू वाट स्मरावी.

काळ सुध्दा मग येईन धावुन,
दुःख तुझे रे नेईन वाहुन.
खुशाल रेखाटित बस मग तु,
भविष्याची चित्रे.
टाकीन गाडुन पाताळात मी,
भुतकाळातील पितरे......! (2)
©के.राहुल 9096242452

Comments