“प्रित”
प्रित तुझी माझी,
सखे खेळ ऊन-पावसाचा,
ऊन पडता अंगणी,
तेवढ्यापुरता बरसायचा.
ऊन-पावसाच्या खेळात,
म्हणे लग्न चिमणा-चिमणीचं लागतं.
उघड्या डोळ्यांनी सखे,
सपान माझं रातभर जागतं.
क्षणिक त्या पावसाचा,
क्षणभर गारवा,
बरसतो श्रावण ऋतू होऊन बरवा.
बरव्या त्या ऋतुला साथ हिरव्या बनाची,
क्षणभराच्या त्या पावसाला नसते कदर मनाची.
प्रित असावी सखे जसा पाऊस मृगाचा,
बंद ओठातल्या शब्दांना जो फोडेल वाचा.
शब्द होऊन श्रावणधारा,
बरसतील तुझ्या अंगणी,
साठवेल माझी प्रित तुझ्याच मनी.
Comments
Post a Comment