“स्वप्न”
एकदा एका कावळ्याला छानसे स्वप्न पडले,
स्वप्नातच मग त्याचे एका चिमणीवर प्रेम जडले.
तासन् तास तिला न्याहाळणं मग रोजचंच झालं,
एक दिवस मग तिच्याही ते लक्षात आलं.
एक दिवस मग तो तिला भेटायला आला,
धाडस करुन मग तिला विचारता झाला,
काय गं तु माझ्याशी लग्न करशील.....!
हुशार चिमणी मग क्षणभर थांबली,
मग कावळ्याला म्हणाली, "काय रे! तु करतोस तरी काय?
कावळा म्हणाला, रोजी रोटी तर मी सहजच कमावतो
घराच्या सुखासाठी रात्र् न दिन झटतो.
विशेष म्हणजे माझं स्वतःचं छानसं घरटंही आहे,
आणि तुझ्यासाठी ते अतिशय योग्य आहे."
चिमणी मग कावळ्याला म्हणाली, "ते सर्व ठिक आहे
रे!
पण, तु तर माझ्यापेक्षा खुपच वेगळा वाटतोस,
रंगारुपाने तर फारच बेढब दिसतोस;
मला वाटतं तु खालच्या वर्गातला असावास;
म्हणुनच मला एवढा शुद्र दिसावास;
मी तर फार उच्चकुलीन आहे...!
माझ्या येथे कुळाला फार मान आहे,
जातीची माझ्या सर्वत्र शान आहे,
त्यामुळंच तुझं कर्तुत्व इथं शुन्य ठरतं.
तुझ्यासारखा विचार करणारं रोज इथं कुणीतरी मरतं!
म्हणुनच तु तुझ्या कुळातली वधु शोध
त्यातच तुझं अन् माझं हित आहे."
चिमणीचे बोल ऐकुन कावळा खडबडुन
जागा झाला.
पाहिल्या स्वप्नाचा त्याला पश्चात्ताप झाला.
मनाशीच मग कावळा म्हणाला,
"समाज प्रगल्भ व्हायला अजुन खुप वेऴ आहे,
बदलायला हे सगऴं काऴ हेच उत्तर आहे."
Comments
Post a Comment