Skip to main content

मेंदूशी मैत्री- डॉ श्रुती पानसे यांची सदरे



================
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १२०*
    *दिनांक- १९ जून १९*

🎯 *तरुण समाज*

‘मला पासष्टाव्या वर्षी नवी भाषा शिकायची आहे.’ ‘मला कम्प्युटरवर काम करणं जमायला हवं.’ ‘लांबच्या सहलीला जायचं आहे.’ ‘नवीन पद्धतीचे पदार्थ करून बघायचे आहेत’ असे अत्यंत सकारात्मक विचार कित्येकांच्या मनात येत असतात. ही चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेस आपली खरी आवड सापडते, तेव्हा आतमध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते. कधीच कशातून मिळणार नाही असा आनंद आपल्याला जे आवडतं ते करण्यात मिळतो. या आवडीच्या कामात कितीही वेळ गेला, कितीही कष्ट पडले तरी चालतं. अशा पद्धतीने मूलभूत स्वरूपाचं काम हातून  घडण्याची शक्यता असते.
पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं. मात्र आज तेच वय नवं काहीतरी शिकू बघतंय, ही आपला समाज तरुण झालाय याची खूण आहे.अशाच प्रकारे, आपल्या स्वत:ला नक्की काय आवडतं याचा शोध सगळी प्रौढ माणसं घेतात का? वास्तविक, आपल्या आत नक्की कसली ‘पॅशन’ आहे हे प्रत्येकाने शोधायला हवं. पण सगळी माणसं असं काही शोधतातच असं नाही. जी थोडी माणसं हे शोधत असतील, ते जर आत्ताच्या वयात काय आवडतं? काय आवडेल? काय झेपेल? शोभेल? याचा विचार आणि स्वत:च्या इच्छांना मुरड घालत राहू नये.
पण कित्येक प्रौढ माणसांना आपला खरा आनंद कशात लपलेला आहे हेच माहीत नसतं. म्हणून कितीतरी माणसं नुसता आला दिवस घालवत असतात. जे काही समोर उपलब्ध असेल त्यात वेळ  घालवतात. आणि त्या वेळ घालवण्यातच आनंद आहे असं वाटायला लागतं. नवीन कौशल्यं शिकण्याला कसलंच वय नसतं. त्यासाठी आपला मेंदू अतिशय तत्पर असतो. उलट शिकायला नवीन काहीतरी मिळणार याने मेंदूला चालनाच मिळते. मेंदू न्युरॉन्सच्या जोडण्यांचं काम जोमाने करायला घेतो. आपल्याला काय करायला अजिबात आवडत नाही हे तर मोठं होईपर्यंत व्यवस्थित कळलेलं असतं. न आवडणाऱ्या गोष्टी हातात घ्यायची काहीच गरज नाही. त्यापेक्षा वेगळं काही तरी करायला हवं. हीच तर आहे कोणत्याही वयातली मेंदूशी मत्री!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
===============
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१२१*
    *दिनांक-२० जून १९*

🎯 *नियंत्रणाचं काम*

मेंदू काही गोष्टींना प्रोत्साहित करतो. तर काही गोष्टींना नियंत्रित करतो. आपण नेहमी म्हणतो की मेंदूला चालना द्यायला हवी म्हणजे मेंदू तरतरीत राहील. चालना देणं हे महत्त्वाचं आहेच. पण त्याबरोबर मेंदूला शांत करणं आणि काही गोष्टी करण्यापासून चक्क रोखणं हे शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक असतं. काही गोष्टी करण्यापासून रोखण्याची मेंदूमध्ये स्वतची क्षमता असते. उदाहरणार्थ, प्रत्येक माणसाला वेळच्या वेळेला भूक आणि तहान लागायला हवी हे खरं. पण त्याचबरोबर योग्य खाणं-पिणं झाल्यावर आता भूक-तहान शमली आहे हा संदेश जाणं ही अत्यंत आवश्यक असतं. हे काम हायपोथॅलॅमस या लहानशा अवयवाकडे असतं.
अनेकदा माणसांमध्ये विविध भावनांचे अतिरेक होत असतात. हर्षवायू होण्याइतका आनंदही चांगला नव्हे आणि दु:खात बुडून जाणं, अपमानाच्या, सूडाच्या धगीत जळून जाणं हे अजिबातच योग्य नाही. म्हणून कोणत्याही भावना प्रमाणात हव्यात. या भावनांना नियंत्रित करण्याचं कामदेखील हायपोथॅलॅमसकडे सोपवलेलं आहे.
लैंगिक कृती ही मानवी शरीराची गरज असली तरी त्या कायम चालू राहणं शरीरासाठी योग्य नसतं. या कृतींचं नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. हे काम हायपोथॅलामस कडे सोपवलेलं आहे. या सर्वच जीवनावश्यक कृती असल्या तरीसुद्धा ‘कुठे थांबायचं’ हे कळलं पाहिजे, असे शब्द आपण बोलीभाषेत नेहमी वापरतो. ‘कुठं थांबायचं’ याच्या किल्ल्या हायपोथॅलॅमसकडे असतात.
थंड, उष्ण, अतिथंड, अतिउष्ण या वातावरणात शरीरात आपोआप काही बदल होतात. आपल्याला कधी घाम येतो तर कधी हुडहुडी भरते हे सर्व संदेश देण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो.
काही प्रयोग असेही झालेले आहेत की हायपोथॅलॅमसला गुंगवून, फसवून बघितलं. एका प्रयोगामध्ये उंदराला समाधान वाटेल अशा एका कळीपाशी तो पुन्हा पुन्हा गेला. छान वाटतं म्हणून, त्याने ती कळ इतक्या वेळेला दाबली की शेवटी तो दमून अक्षरश: कोसळला. पण आता हे पुन्हा करायला नको हे त्याच्या लक्षात आलं नाही. कारण हायपोथॅलॅमसला फसवलं होतं. हा छोटासा अवयव म्हणूनच फार महत्त्वाचा आहे, तो आपल्याला थांबायची योग्य सूचना करतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
==============
आपले अनुभव खऱ्या अर्थाने जपण्याचं काम ग्लायल पेशी करतात, याशिवाय इतर अनेक कामं करतात. आजच्या लोकसत्तेतला लेख -
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१२२*
    *दिनांक- २१ जून १९*

🎯 *काळजीवाहक ग्लायल*

माणसाचं माणूसपण राखण्याचं फार महत्त्वाचं काम आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या घडवून आणत असतात. या जोडण्या कशामुळे झाल्या, किती झाल्या, झालेल्या जोडण्यांपैकी किती टिकल्या यावरच आपलं माणूसपण अवलंबून आहे, हे शास्त्रीय सत्य आहे. या कामात मेंदूला अनेकांची मदत लागते. यातल्याच एक आहेत ग्लायल पेशी. न्यूरॉन्सना ग्लायल (glia / glial) नावाच्या पेशींची फार मदत होत असते. या ग्लायल पेशींचं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे  न्यूरॉन्सच्या आसपास राहणं. त्यांना वेढणं. ग्लायलचा अर्थ आहे ग्लू. चिकट द्राव. म्हणूनच या पेशी त्यांचं संरक्षण करतात. त्यांना जागेवर ठेवतात. न्यूरॉन्सच्या काळजीवाहक म्हणून त्या काम करतात. हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, कारण ग्लायल पेशी समजा नसत्या, तर न्यूरॉन्सच्या जोडण्या कदाचित झाल्याही असत्या, पण त्या टिकल्या असत्या असं काही सांगता येत नाही.
या काळजीवाहक पेशींचं महत्त्वाचं काम म्हणजे शरीरातली उत्तम पोषक द्रव्यं आणि ऑक्सिजन न्यूरॉन्सना पुरवण्याचं. त्यामुळेच न्यूरॉन्सच्या जोडण्या तंदुरुस्त राहतात. मेंदूच्या एकूण प्रकृतीसाठी चांगला आहार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय मेंदू नीट काम करू शकत नाही. ग्लायल पेशी आणखी एक महत्त्वाचं काम करतात ते म्हणजे जे न्यूरॉन्स अजूनही वापरात आलेले नाहीत किंवा मृत झालेले आहेत, त्यांची स्वच्छता करण्याचं कामही ग्लायल पेशी करत असतात. एखादं नुकसान झालं तर दुरुस्तीचं काम या पेशी करतात. मेंदूची गुंतागुंत एवढी आहे की या सर्व ग्लायल पेशींदेखील एकसारख्या, एका साच्यातल्या नसतात. त्यांचेही वेगवेगळे आकार- प्रकार असतात. त्या प्रकारांनुसार त्यांची कार्य चालू असतात.
आपण यापूर्वीच्या भागांत पाहिलं की न्यूरॉन्सच्या जोडणीवर मायलिन नावाचं एक आवरण तयार होत असतं. तोसुद्धा ग्लायल पेशींचाच एक प्रकार आहे. न्यूरॉन्सच्या जडणघडणीत या पेशी प्रामाणिक मदतनीसाचं काम निभावतात. त्यांच्या कार्यात थोडाही बिघाड झाला तर मेंदूच्या कामकाजात धोका निर्माण होतो. आहाराची- आहारावर अवलंबून असलेल्या रसायनांची योग्य काळजी घेतल्या मेंदूही तंदुरुस्त राहील
===============
मेंदू तरतरीत ठेवायचा असेल, त्याने व्यवस्थित काम करावं असं वाटत असेल तर या तीन गोष्टी पुरवायला हव्यात! आपण हे मेंदूला रोज, पुरेशा प्रमाणात देतो का?
🧠 *मेंदूशी मैत्री*
       (दै.लोकसत्ता)

🎯 *ऑक्सिजन, ग्लुकोज आणि पाणी*

ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींचं आपल्या मेंदूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. का महत्त्वाच्या आहेत या तीन गोष्टी? आपण दिवसभरात जे काही खातो ते केवळ पोट भरण्यासाठी असतं, अशी आपली समजूत असते. मात्र, शरीरातले इतर अवयव जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने चालावेत यासाठी हेच खाणं त्यांना मदत करत असतं, हे काही आपल्या नीटसं लक्षात येत नाही. आपला मेंदू चालतो तोही आपल्या आहारावरच. आपण जे काही खातो, त्यातूनच त्याला ऊर्जा मिळत असते.
शिकणाऱ्या व्यक्तींनी मेंदूतल्या पाण्याची पातळी कायम राखायला हवी. ती राखायची असेल तर सतत पाणी प्यायला पाहिजे. जर मेंदूतली पाण्याची पातळी बरीच कमी झाली (डीहायड्रेशन) तर त्याचा शिकण्यावर निश्चितच वाईट परिणाम होतो. याउलट जर योग्य प्रमाणात पाणी प्यायलं, तर एकाग्रता आणि स्मरणशक्तीदेखील शाबूत राहते.
पाण्याइतकी गरज असते ऑक्सिजनची. मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होण्यासाठी गरज असते ती नियमित व्यायामाची. हल्ली वर्गात, शिकवणीच्या क्लासमध्ये मुलं सतत बसून असतात. वाहनानं प्रवास करत असतील, तर तिथंही बसावंच लागतं. सध्या टीव्ही हाही त्यांना बसवून ठेवतो. अशा प्रकारे सततच्या या बैठय़ा कारभारामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा व्हायला हवा, यासाठी त्यांना खेळायला द्यायला हवं.
मेंदूला पोषक ठरणारा तिसरा घटक म्हणजे ग्लुकोज. हे ग्लुकोज रक्तप्रवाहातून शोषलं जातं. यासाठी ठरावीक वेळेला आणि नियमित योग्य प्रकारचा आहार घेणं हे खूपच आवश्यक आहे.
कधीकधी असं होतं की, पोषक नसलेले पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये ग्लुकोज नसतं. जेवायच्या वेळेला भूक निघून जाते. जेवावंसं वाटत नाही. जर असं झालं तर समजावं, की शरीरात आवश्यक ते पौष्टिक पदार्थ न गेल्यामुळे ग्लुकोज तयार झालेलं नाही. जर ग्लुकोज तयारच झालेलं नसेल, तर ते मेंदूला मिळणार कुठून? आणि मेंदू आपलं काम करणार कसं? मेंदूकडून नीट काम करून घ्यायचं असेल, तर त्याला पोषक पदार्थ वेळच्या वेळी देण्याची जबाबदारी आपलीच. ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींची रसद मेंदूला पुरवली पाहिजे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे
 *लेखांक-१२३* दिनांक-२४ जून १९*
contact@shrutipanse.com
*संकलक~नितीन खंडाळे* - चाळीसगाव
============
मेंदूशी मैत्री
 खरे प्रश्न
शाळेत शिकताना सर्वात जास्त वेळा कोणती गोष्ट करावी लागत असेल तर ती आहे- प्रश्नांची उत्तरं सोडवणं. तेच तेच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारांनी विचारले जातात. कधी कारणं द्या, कधी स्पष्टीकरणं द्या, गाळलेल्या जागा भरा किंवा जोडय़ा लावा. हे सगळे प्रश्न सोडवायचे कसे याच्या उत्तरांचा साचादेखील ठरलेला असतो. त्यात आपलं उत्तर बसवायचं असतं. कधीकधी तर तेवढाही विचार करावा लागत नाही.

आत्ताचं काम सोपं करण्याच्या नादात एकूण आयुष्यभराचं काम मात्र अवघड होऊन बसतं. याची कल्पना कोणालाच येत नाही. भूगोलात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला परिसराच्या भूगोलाचं ज्ञान नसतं किंवा गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्याला बाजारात जाऊन हिशेबाने वस्तू आणता येतातच असं नाही.
वास्तवातले प्रश्न कसे सोडवायचे, खऱ्याखुऱ्या आयुष्यात जे प्रश्न नेहमी पडणार आहेत, त्याची झलक शालेय जीवनात मिळायला हवी. यासाठी जॉन डय़ुई यांनी असं सांगितलं आहे की, जीवनाची खरी ओळख शाळेत व्हायला हवी.
अशी ओळख होण्यासाठी शालेय जीवनातच भरपूर अनुभव मिळायला हवेत. म्हणजे समजा, तुमच्या शाळेच्या बागेतल्या झाडांची पानं अचानक पिवळी पडून गळायला लागली, तर काय करायचं, हा प्रश्न तुमच्यापर्यंत येतो का? शाळेच्या आवारात सायकली लावण्यासाठीची सोय आहे, पण ती जागा आता अपुरी पडू लागल्यामुळे शाळा भरताना आणि सुटताना खूप गोंधळ होतो, तर अशा वेळी काय करावं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं का?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हीही सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला योग्य अनुभवी बागकामतज्ज्ञाकडून त्याची माहिती मिळवावी लागेल आणि तसे उपाय योजावे लागतील. शाळेतल्या किंवा अगदी घरातल्याही व्यवस्थांशी निगडित अशा किती तरी प्रश्नांची उत्तरं आपसात चर्चा करून सोडवता येईल. या खऱ्याखुऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा मेंदूला व्यायाम आहे. या व्यायामातून मेंदू घडणार आहे.
कागदावर प्रश्नांची उत्तरं सोडवणं हा एक छोटासा भाग झाला. वास्तवातले प्रश्न सोडवता येणं हेच जास्त महत्त्वाचं आहे.
आपल्या प्रश्नांशी सोडवणूक करण्याचा अनुभव आपल्याला मिळतो. जेवढय़ा या न्यूरॉन्सच्या जुळण्या जास्त, तेवढीच आपल्यातली प्रगल्भता जास्त आणि हाच तर शालेय जीवनाचा हेतू असायला हवा.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
==================
आपली बुद्धी म्हणजेच या चौघांचं काम!!

मेंदूशी मैत्री
               *मानवी बुद्धीचं आवरण*

आपला मेंदू आणि इतर प्राण्यांचा मेंदू यात मुख्य फरक आहे तो सेरेब्रल कॉर्टेक्सचा. हा आहे आपल्या मेंदूचा बाह्य़ भाग. मेंदूमधलं सेरेब्रल कॉर्टेक्स हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्राण्यापासून माणूस वेगळा झाला त्या काळात या बाह्य़ भागातली कार्ये वाढली. जास्त उच्च प्रतीची कामं माणूस करू लागला. हत्यारं- अवजारं तयार करणं, टोळ्यांमध्ये एकमेकांशी जुळवून घेऊन राहणं, आपल्या कृतींना योग्य अशी भाषा बनवून ती टोळीतल्या प्रत्येकाने वापरणं, अशा काही गोष्टी म्हणजे या सेरेब्रल कॉर्टेक्सची देणगी आहे.
माणसातल्या सेरेब्रल कॉर्टेक्सला अनेक वळ्या आणि सुरकुत्या पडलेल्या असतात. इतर प्राण्यांचं कॉर्टेक्स मात्र त्या तुलनेने गुळगुळीत असतं. माणसाच्या क्षमता प्राण्यांपेक्षा बऱ्याच अंशी वाढलेल्या आहेत त्याचं कारण आपल्याला या सुरकुत्यायुक्त सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये मिळतं. मेंदूच्या बाहेरचा साधारण इंचभराचा भाग या कॉर्टेक्सने व्यापलेला असतो.

सेरेब्रल कॉर्टेक्स हा मेंदूच्या दोन अर्धभागांमध्ये विभागलेला असतो आणि हे दोन अर्धगोल चार विभागांमध्ये विभागलेले असतात. यांना लोब्ज असं म्हणतात. हे चारही लोब्ज एकमेकांशी हातात हात घालून काम करत असतात. त्यांच्या अखंड कामातूनच आपला मेंदू अक्षरश: धावत असतो.
या चारपैकी एक भाग आहे फ्रंटल लोब. हा भाग कपाळाच्या आतल्या भागामध्ये असतो. नियोजन, समस्या निराकरण, विचार, भावनांवर नियंत्रण ही याची कामं आहेत. दुसरा ऑसीपेटल लोब मेंदूच्या मागच्या भागात असतो. हा मुख्यत: बघण्याचं काम करतो. मेंदूच्या वरच्या भागात सरळ असतो तो पेरिएटल लोब. स्पर्श, वेदना, तापमान, दिशाज्ञान हे याचं काम. चौथा टेम्पोरल लोब हा दोन्ही अर्धगोलात मिळून खालच्या भागात असतो. ध्वनी, संगीत, चेहरे व वस्तू  ओळखणे, दीर्घ स्मृती अशा प्रकारची कामं इथे घडून येतात. हे चारही लोब्ज एकमेकांशी जुळवून घेऊन कामं करत असतात. या सर्व क्षेत्रांमध्ये न्यूरॉन्सचं जाळं पसरलेलं असतं. त्यामुळेच आपला संपूर्ण मेंदू महत्त्वाचा आहे. यातल्या एखाद्या भागामधला थोडासाही भाग काम करेनासा झाला, नादुरुस्त झाला तर इतर लोब्ज आपापली कामं चालू ठेवतात. ही मेंदूची एक खासियत म्हणावी लागेल.

  डॉ. श्रुती पानसे, contact@shrutipanse.com
लेखांक- १२५,  दिनांक- २६ जून १९
==============
जास्त वेळ स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहू नका, उठा आणि अवघड गोष्टी करायला घ्या! हेच ग्रीनफ सरांना सांगायचं आहे. आजच्या लोकसत्तामध्ये आलेला लेख-
मेंदूशी मैत्री
खेळणारा उंदीर
विल्यम ग्रीनफ नावाच्या शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची ही गोष्ट. त्याने उंदरांवर एक वेगळाच प्रयोग केला. दोन मोठे पिंजरे घेतले. दोन्हीत वेगवेगळ्या उंदरांना ठेवलं. एका पिंजऱ्यात खेळण्यासाठी भरपूर साधनं ठेवली. काही दिवसांनी जुनी खेळणी बदलून नवीनवी खेळणी ठेवली. दुसऱ्या पिंजऱ्यात मात्र कोणतीच खेळणी ठेवली नाहीत.

याचा परिणाम असा झाला की ज्यांना खेळायला मिळालं, नव्या नव्या खेळण्यांशी खेळताना ज्यांना आपलं डोकं चालवावं लागलं, त्यांच्या मेंदूत खूपच चांगले बदल घडले होते.
परंतु ज्यांना खेळायला खेळ नव्हते, अतिशय कंटाळवाणं वातावरण होतं. त्यांच्या मेंदूत काहीही बदल झाला नाही. ते काहीही नवीन शिकले नाहीत. त्यांनी खूपच कमी हालचाल केली, त्यांच्यासमोर कधीही कोणताही खेळ खेळण्याचं आव्हान नव्हतं. त्यांना कधीही डोकं चालवावं लागलं नाही. यामुळे असं घडलं.
जे उंदरांच्या बाबतीत घडतं, तेच आपल्या मेंदूच्या वाढीबद्दलही घडतं. म्हणून जर आपल्याला आपला मेंदू सशक्त आणि तरतरीत करायचा असेल तर खेळणाऱ्या उंदराप्रमाणे वागायला हवे, म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टी करून सतत डोक्याला चालना द्यायला हवी. कोडी सोडवणं हा एक चांगला व्यायाम समजला जातो. ती देखील वेगवेगळ्या प्रकारची हवीत. किंवा मुद्दाम अवघड गोष्टी करायला हव्यात. अवघड गणितं सोडवायची. ते शिकायचे असल्यामुळे मेंदूला आव्हान मिळतं. मेंदू शिकण्यात गुंतला पाहिजे. मेंदूसमोर जितक्या अवघड गोष्टी आपण ठेवू त्यातून तो शिकत जाईल.
आपण काय करतो? नेमकं याच्याविरुद्ध करतो.
सोप्या सोप्या गोष्टी करत राहतो. अवघड गोष्टींना घाबरतो. सतत कोणाची तरी मदत मागतो. त्यापेक्षा आपलं आपण करावं. खेळताना, अभ्यास करताना अंधाऱ्या, उदास, कोंदट जागेपेक्षा मोकळ्या वातावरणात जा. ‘अमुक एक गोष्ट मला जमतच नाही, जमणारच नाही’ असं म्हणू नका. जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत जमेल की नाही, हे कसं कळणार? खूप खूप वेळा एकाच जागी जखडल्यासारखे बसून राहू नका.
यातल्या जेवढय़ा गोष्टी जमतील तेवढय़ा करा. नाहीतर त्या दुसऱ्या पिंजऱ्यातल्या उंदरासारखं होईल.

  डॉ. श्रुती पानसे/  contact@shrutipanse.com
=============
मेंदूशी मैत्री
 झोपेतलं शिक्षण
जागेपणी आपला मेंदू अनेक कामांत गुंतलेला असतो. आपण सतत काहीतरी बघत असतो, ऐकत असतो, निरनिराळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूवर सतत नवनवीन माहिती आदळत असते. त्यामुळे ही माहिती आतमधे नीट झिरपावी यासाठी फारसा वेळ होत नाही. आणि म्हणून हे काम तो रात्रीच्या शांत वेळी करायला घेतो.

जेव्हा आपण अगदी गाढ झोपेत जातो, तेव्हा मेंदू दिवसभरात साचलेल्या गोष्टींची वर्गवारी करायला घेतो. जो अनुभव पुढील काळासाठी आवश्यक आहे, तो शॉर्ट टर्म मेमरीमध्ये पाठवला जातो. तिथून तो लाँग टर्म मेमरीमध्ये जातो. गाढ झोपेत हिप्पोकॅम्पस हे स्मरणकेंद्राचं काम चालू असताना डॉ. जोनाथन विन्सन या मेंदूशास्त्रज्ञाला आढळलं. दिवसभरातला जो अनुभव पुढे कधीही गरजेचा नाही तो डिलीट केला जातो.
अनेकदा दिवसभरात घडलेल्या घटनांवर आधारित स्वप्नं आपल्याला पडतात. आपण जसं टेपवरचं एखादं गाणं पुन्हा ऐकावंसं वाटलं की ‘रीप्ले’ करायचो, तसाच आपला मेंदू या घटना रीप्ले करत असतो. म्हणूनच दिवसभरात घडलेली एखादी घटना आपल्याला पुन्हा स्वप्नात दिसते.
या संशोधनातून असं दिसतं की एखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या कामात आपल्याला आपली झोप मदत करते. गाढ आणि पुरेशी झोप. पूर्ण झोप झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी कामात/ अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिड होते. कारण मेंदूचं वर्गवारी करण्याचं काम अपुरं राहिलेलं असतं.
झोप या विषयावरच्या अजून एका प्रयोगात एका गटाला एक विषय एक दिवस शिकवला आणि तो किती लक्षात राहिला आहे हे तपासलं. दुसऱ्या गटाला तोच विषय अर्धा- अर्धा करून दोन दिवसात शिकवला. किती लक्षात राहिला आहे हे तपासलं. तर दुसऱ्या गटाचा अभ्यास जास्त चांगला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. याचं कारण एक विषय दोन दिवसात शिकवला तेव्हा रात्रीच्या झोपेच्या काळात शिकवलेल्या विषयावर मेंदूने प्रक्रिया केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विषय चांगल्या प्रकारे शिकता आला. या संशोधनाचा वापर शिक्षक/ पालकांना होऊ शकतो. तसंच स्व-आकलन तपासण्यासाठीही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.

डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
============
मेंदूशी मैत्री
   
  निरर्थकता

‘काच’, ‘फूल’, ‘चादर’, ‘आनंद’, ‘पाचशे एकोणतीस’ अशा शब्दांची एक यादी आहे. आणि ‘दप्तर’, ‘पेन’, ‘पुस्तक’, ‘वही’, ‘पट्टी’ अशा शब्दांची एक यादी केली. या याद्या पाठ करायला सांगितल्या, तर कोणती यादी पटकन पाठ होईल?
अर्थातच दुसरी यादी. कारण या दुसऱ्या यादीतले शब्द एकाच विषयाशी संबंधित आहेत. तर पहिल्या यादीतल्या शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो. ही पहिली यादी पाठ नक्कीच होईल; पण त्याला तुलनेनं जास्त वेळ लागेल.

अशा प्रकारचा अभ्यास हेर्मन एबिंगहॉस या शास्त्रज्ञांनी फार पूर्वीच करून ठेवलेला आहे. पूर्वी- म्हणजे १८८५ मध्ये. ज्या शब्दांना काहीही अर्थ नाही, असे शब्द पाठ करण्याचा एक प्रयोग त्यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की असे निर्थक शब्द पाठ करणं ही अवघड गोष्ट आहे. त्याऐवजी अर्थपूर्ण माहितीचं पाठांतर सोपं आहे. कारण मेंदूचा नेहमीच अर्थपूर्ण माहिती लक्षात ठेवण्याकडे कल असतो. जे अर्थपूर्ण नाही, ते लक्षात राहत नाही.
एक- समजेल अशा भाषेत सांगितलं गेलं; दोन- अर्थ लक्षात आला; तीन- पूर्वी मिळालेल्या माहितीशी नव्या माहितीची सांगड घालता आली; चार- संबंध जोडला गेला, तर त्यावर मेंदू चिंतन करतो. त्या विषयावर दुसऱ्या कोणाशीही बोलून ही माहिती दृढ होते. याचाच अर्थ अभ्यास होतो. यातली एक जरी साखळी जोडली गेली नाही, तर आकलन होत नाही. शिकवलेल्या गोष्टी निर्थक वाटतात. एकदा निर्थक वाटायला सुरुवात झाली, निर्थक गोष्टींवर काम झालं नाही, प्रयत्न केले गेले नाहीत, तर सगळ्यातून लक्ष उडतं.
‘लक्षातच राहत नाही’ अशी ज्यांची तक्रार असते, त्यांनी या गोष्टी निश्चितच तपासून पाहाव्यात : आपल्याला जे पाठ करायचंय ते आधी समजलंय का, हे बघणं आवश्यक आहे. आपल्याला निर्थक माहितीही पाठ करता येते. परंतु त्याला जास्त कष्ट पडतात आणि दुसरं म्हणजे, ते कधीही कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. अवघ्या काही तासांत, काही दिवसांत विसरून जातं. समजलेलं सगळं लक्षात ठेवायलाही नियमित सराव लागतो. अभ्यास तयार आहेच, फक्त त्यावरची धूळ झटकून तो उजळवून ठेवायचाय, असा त्याचा अर्थ. तेवढं मात्र आपल्याच हातात; नव्हे मेंदूत आहे!

 🖋 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com  /  लेखांक- १२८
    दिनांक- १ जुलै१९
==========
आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, असंच प्रत्येकाला वाटत असतं. तर मग भाषा का अशी? आजच्या लोकसत्तेतला लेख

मेंदूशी मैत्री
शब्दांच्या नकारात्मक जोडण्या

काही घरांत मुलांना उद्देशून बरेचदा तुच्छ उद्गार ऐकू येतात. ‘तो हा असाच आहे मठ्ठ’, ‘तिला दोन वेळा समजून सांग, म्हणजे एकदा तरी कळेल’ , ‘किती मंद आहेस तू!’ असं बोलणं मुलांच्या कानावर सतत पडत असतं. हे खूपच साधेसुधे उद्गार इथे लिहिले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटींनी वाईट दूषणं, काही वेळा शिव्या आणि सोबत हाताचा वापरही चालतो.  यामुळे वाढत्या वयातल्या मुलां-मुलींच्या मनात ‘आपले पालक जसे म्हणतात, तसाच मी असणार’, यावर विश्वास बसतो. कारण मुलांचं आईबाबांवर अतिशय प्रेम असतं. क्षणिक संतापातून उद्गारलेल्या शब्दातून त्यांच्या मनात केवढी खळबळ माजत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
लहान मुलांच्या मनात तर ‘आई / बाबा म्हणतात म्हणून आपण चांगले’/ ‘ते वाईट म्हणतात म्हणून आपण वाईट’ हे पक्कं होऊन बसतं. या संवादातून, प्रसंगातून त्यांचं मन घडत असतं.

मुलांच्या मनात स्वत:विषयीची प्रतिमा तयार होत असते. आत्मविश्वास निर्माण होण्याचा तो काळ असतो. आपण जसे आहोत, तसे खूप चांगलेच आहोत, याबद्दल त्यांच्या मनात काही दुमत नसतं. स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो.  अशा वेळी दुसऱ्यांमधले दोष वास्तविक पद्धतीने सांगायला हवेत. अतिगोड किंवा अतिवाईट नव्हे; तर योग्य शब्दात सांगण्याची गरज असते. त्यांना न खचवताही हे काम आई-बाबा चांगल्या पद्धतीने करू शकतात.  अभ्यासामुळे तर नात्यात दरी पडायलाच नको; किंवा आधीच दरी निर्माण झाली असेल तर ती रुंदावायला नकोच नको. शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. शिक्षणाला नाकारून किंवा कमी महत्त्व देऊन चालण्यासारखं नाही. पण अडचणी समजून घ्यायला घेणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या मेंदूत न्युरॉन्समध्ये नकारात्मक शब्दांच्या जोडण्या तयार करण्याचं काम आसपासच्या माणसांकडून होत असतं. ते व्हायला नको.
आईबाबा जेव्हा शांतपणे, योग्य शब्दात मुलांशी प्रेमाने संवाद साधतात, तेव्हा ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे मुलांच्या मनात आईबाबांबद्दल विश्वास निर्माण होतो. मुलं त्यांच्या सूचनांचा नक्कीच विचार करतात. स्वत:मध्ये असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करतात.  पण वाईट शब्दांचा सतत भडिमार केला तर त्यांना योग्य मार्ग सापडत तर नाहीच. उलट मानसिक गोंधळ मात्र वाढतो.
 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
==========
मेंदूशी मैत्री
डिस्लेक्सिया
डिस्लेक्सिया ही एक वाचनाशी संबंधित समस्या आहे. ज्या मुलांना वाचनात अडथळे आहेत, अशा अनेक मुलांचा अभ्यास केला तेव्हा त्यातले पॅटर्न्‍स लक्षात आले आणि डिस्लेक्सिया या समस्येचा शोध लागला. यावर अनेक संशोधनं झाली. तेव्हा असं लक्षात आलं की ज्यांना अशी समस्या आहे त्यांच्या नजरेसमोर अक्षरं स्थिर होऊ शकत नाहीत. ती नाचल्यासारखी वाटतात. लहानपणी आरशात अक्षरं बघणं हा एक मजेदार छंद असतो. ही अक्षरं आरशात बघतो, तेव्हा ती आपल्याला उलटी दिसतात. मग उलटी अक्षरं काढण्याचा आणि ती अक्षरं आरशात बघून सुलट वाचण्याचा खेळच सुरू होतो. हे जे इतर मुलं गंमत म्हणून करतात, नेमकी तीच समस्या असते डिस्लेक्सिक मुलांची. त्यांना अक्षरं उलटीच दिसतात. आणि म्हणूनच ती मुलं अक्षरं काढतातही उलटीच.
एमन मॅक्ररी, कॅथी प्राईस या संशोधकांनी प्रयोग केले. तेव्हा डिस्लेक्सिक मुलांच्यामध्ये असलेल्या या शैक्षणिक समस्यांचा संबंध मेंदूच्या डाव्या भागातल्या विशिष्ट क्षेत्रांशी असतो, असं लक्षात आलं. डाव्या भागात वाचन आणि बोलण्याची केंद्रं असतात, त्या भागात समस्या असतात.

इंग्लंड, फ्रान्स आणि इटली या देशांमध्ये हे प्रयोग करण्यात आले. या तीनही भाषा वाचताना मेंदूत काय घडलं हे संशोधकांनी बघितलं. सामान्य मुलं वाचन करतात तेव्हा त्यांच्या डाव्या मेंदूतली तीन क्षेत्रं एकमेकांशी जोडून घेऊन काम करत असतात, असं त्यांना दिसलं. मात्र डिस्लेक्सिक मुलं वाचन करत असताना केवळ दोनच क्षेत्रं काम करत असतात. तर तिसरा म्हणजेच या दोघांना जोडणारा भाग मात्र काम करत नसतो, असं नेमकेपणानं लक्षात आलं. तीनही भाषांच्या वाचनाच्या बाबतीत हेच घडलं.
या मुलांना वाचता येत नाही, याचं कारण मेंदूमध्ये आहे याची खात्री पटल्यावर संशोधकांनी पुढचे प्रयोग केले ते या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी. एखादी वस्तू आणि तिचं नाव सतत सांगितलं, सतत लिहून दाखवलं तर मुलांना ते हळूहळू लक्षात राहतं. पुन्हा पुन्हा ते शब्द लिहिले तर लिहायला जमू शकतं. मेंदूच्या डाव्या भागातल्या भाषेच्या केंद्रांना चालना मिळावी असे प्रयत्न सातत्यानं केले तर ही मुलं इतर मुलांसारखीच नीट वाचू-लिहू शकतात हे लक्षात आलं.

 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
=============
आपलं मूल कशात सक्षम आहे हे शोधून काढायला हवं. आजचा लोकसत्तेतला लेख-
मेंदूशी मैत्री
अध्ययन सक्षम
गेल्या काही वर्षांपासून ‘अध्ययन अक्षमता’ हा एक नवीन विषय चर्चेत आलेला आहे. १९०५ मध्ये क्लीव्हलँड इथले नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. डब्ल्यू. ई. ब्रुनर यांनी ‘लहान मुलांच्या वाचन क्षमता’ या विषयावर एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर १९६३ मध्ये सॅम्युअल कर्क या मानसशास्त्रज्ञानं ‘लर्निग डिसॅबिलिटी’ हा शब्द प्रथम वापरला.
वास्तविक हे लक्षात घ्यायला पाहिजे, की ‘अक्षमता’ हा शब्द अत्यंत नकारात्मक आहे. ‘वेगळ्या क्षमता’ असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण ‘लर्निग’- म्हणजे ‘शिकणं’- या शब्दाची व्याप्ती खूप आहे; पण इथे हा फक्त ‘लेखन, वाचन, अंकगणित’ एवढय़ाचसाठी वापरला जातो. तरीही सध्या हाच शब्द वापरात असल्यामुळे तोच वापरावा लागत आहे.

या मुलांना वाचन, लेखन आणि गणित यात अक्षम ठरवलं, तरी या मुलांमध्ये उच्च दर्जाची सर्जनशीलता असते. जग ज्या पद्धतीने विचार करत नाही, अशा वेगळ्याच आणि अतिशय स्वतंत्र बुद्धीने ही मुलं विचार करू शकत असतात.
प्रत्येक मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. मुलांमधल्या बुद्धिमत्ता शोधून त्यांना योग्य संधी दिली, तर मुलांना त्याचा अत्यंत फायदा होईल. ही मुलं कोणत्या विषयात, कलेत, खेळात, उच्च बौद्धिक क्षेत्रात सक्षम आहेत, हे प्राधान्याने शोधून काढायला हवं.
या संदर्भातली बहुतेक संशोधनं परदेशात झालेली असल्यामुळे आणि भारतात हा विषय अजून त्या तुलनेत नवीन असल्यामुळे भारतीय मुलांवर केलेलं संशोधन-  तेही मेंदूशास्त्रीयरीत्या-  होण्यास काही काळ जावा लागेल. कारण या विषयावरील संशोधन अजूनही चालू आहे.
या विषयावरचा एक आक्षेप म्हणजे- अध्ययन अक्षमता या शहरी भागातल्या मुलांना जास्त जाणवतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना मात्र त्या जाणवत नाहीत का? याचं उत्तर असं की, या विषयावर संशोधन करणाऱ्या किंवा या विषयावरचा विशेष अभ्यास असलेल्या संस्था या शहरी भागात जास्त आहेत आणि शहरी भागात त्यांचं काम जास्त आहे. परंतु ग्रामीण मुलांचा अभ्यास गेल्या काही वर्षांपासून होत आहे आणि तो होणं, त्यातून संशोधन आकाराला येणं अत्यंत गरजेचं आहे.  म्हणजे सर्वच मुलांना आपण अध्ययन सक्षम करू शकू!

डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
================
मेंदूशी मैत्री
     लेखन समस्या
ज्या मुलांना अक्षरांचं वाचन करण्यात काही समस्या असतात, त्यांच्यामध्ये डिस्लेक्सिया ही अध्ययन अक्षमता असते, असं दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्या मुलांना लेखनामध्ये समस्या असतात त्यांच्यामध्ये डिसग्राफिया ही अध्ययन अक्षमता असते, असं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.

काही मुलांना अक्षरं लिहिता का येत नाहीत, याचं मुख्य कारण अजूनही समजलेलं नाही. परंतु आनुवंशिकता, मेंदूच्या दुखापतीमुळे किंवा काही आघात झाल्यामुळे  काहींना लिहिता येत नाही. अक्षर काढण्यासाठी अनेक क्षमता आवश्यक असतात. त्यात प्रामुख्याने दृश्य-अवकाशीय क्षमता आणि हस्त – नेत्र समन्वय साधता येण्याची गरज असते. जर या दोन गोष्टींचा अभाव मुलांमध्ये असेल, तर त्याला लेखन अक्षमता आहे असं म्हटलं जातं.
अशी मुलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करतात, पण ती अनेकदा उलटी काढली जातात. किंवा दोन अक्षरांमध्ये वा शब्दांमध्ये खूपच जास्त अंतर असतं. तर काही वेळेला एकावर एक शब्द लिहिले जातात. अक्षरं तिरकी, काही लहान- काही मोठी येतात. कधी खूप वर, कधी खूप खाली अशी अक्षरं काढली जातात. विरामचिन्हं कशी वापरायची, यात मुलांचा गोंधळ उडतो.  खूप वेगळ्या पद्धतीनं, ओळखू येणार नाही असं अक्षर काढलं जातं. काही मुलं पेन किंवा पेन्सिल वेगळ्या पद्धतीनं धरतात; ती कशी धरायची, हे त्यांना समजत नाही आणि जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांना ते करायचं नसतं. कारण कदाचित विशिष्ट पद्धतीनं पेन धरून त्यांचा हात दुखतो.
सुरुवातीच्या काळात सगळीच मुलं लिहायला शिकत असतात तेव्हा अशा अडचणी येतात. मात्र काही जणांच्या बाबतीत समस्या निर्माण होतात असं या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं मत आहे.
मात्र, अशा मुलांना कधीच लिहिता येणार नाही असं नसतं. योग्य पद्धतीनं शांतपणे सुरुवातीला खूप मोठी अक्षरं काढली, त्यांना योग्य अवकाश दिला, तर त्या अक्षरांची प्रतिमा व्यवस्थितरीत्या मेंदूमध्ये तयार झाली की ही मुलं लिहू शकतात. त्याचबरोबर हस्त –  नेत्र समन्वयाच्या वेगळ्या कृती अथवा खेळ घेतले, तर मुलं योग्य पद्धतीनं लिहू शकतात.

डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com

===========
मेंदूशी मैत्री
मूर्त ते अमूर्त
अनेक माणसांना गणित या विषयाची भीती वाटत असते. याचं मुख्य कारण हे गणिताच्या आकडेमोडीत नसून गणित ही अमूर्त संकल्पना आहे, इतर विषयांपेक्षा याचं व्याकरण थोडं वेगळं आहे हे समजून घ्यायला पाहिजे.
अंक ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व अमूर्त संकल्पना असतात. या सर्व गोष्टींची आकडेमोड मेंदूत करावी लागते. त्या नंतरच ती कागदावर किंवा कृतींमध्ये उतरते हे लक्षात घ्यायला हवं . त्यामुळे गणित शिकवण्याची सुरुवात ही फळ्यावर किंवा वहीत न करता मूर्त संकल्पनांमधून करावी लागते. प्रत्यक्ष आकडे लिहायला किंवा वाचायला न देता विविध वस्तू दाखवून त्यांच्यावरच्या क्रिया मुलांच्या पातळीवर जाऊन, मजेदार पद्धतीने शिकवल्या गेल्या, आधी भरपूर वेळा साधनांच्या सहाय्याने, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमधून गणित घेता येतं आणि यामुळे मुलं हळूहळू अमूर्त संकल्पनांकडे जाऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही मूल गणितात मागे राहणार नाही. मात्र  संकल्पना स्पष्टीकरणासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तो दिला जात नाही.
आकडेमोड करताना हातचा घेणं, बेरीज (+) आणि गुणाकाराच्या (x) चिन्हांमध्ये गोंधळ, डावीकडून उजवीकडे आकडेमोड करायची की उजवीकडून डावीकडे,  संख्या आणि संख्यानामं स्पष्ट नसणं, अशा आधीच्या छोट्या पाय-यांवर छोट्या अडचणी येऊ शकतात. त्या लगेच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
 काही वेळेला स्मरणक्षेत्रांमध्ये समस्या असेल तर गुणाकार, भागाकाराच्या पायर्‍या लक्षात न राहणं, पदावलीचे नियम लक्षात न राहणं, मोठ्या वर्गामध्ये गणित अधिक गुंतागुंतीचं होतं. यात भर म्हणून आपल्याला समजत नाही, येत नाही, असा ताण मेंदूत निर्माण झाल्यामुळे ही समस्या केवळ गणिताची राहत नाही. भावनिक होते. परीक्षेत गुण न मिळाल्यामुळे पालकांचा राग, ओरडा आणि शिक्षा ही पाठोपाठ येतात. त्यामुळे ही प्रक्रिया अजूनच अवघड होऊन बसते.
अशा प्रकारच्या चुका वारंवार आणि वरच्या वर्गात गेल्यावर ही होत असतील तर त्याला डिसकॅल्क्युलिया किंवा गणिताची अक्षमता असं नाव या क्षेत्रातल्या अभ्यासकांनी दिलेलं आहे. मुलांना शांतपणे, त्यांच्या कलाने, गतीने आणि पुरेसा वेळ देऊन शिकवलं तर या समस्येचंही निराकरण करता येईल.
डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
===========
'तुला कळत नाही का??' असं म्हणणं खूप सोपं आहे. पण का कळत नाही, याचा शोध घेतो का आपण? स्वतः च्या आणि मुलांच्या मेंदूचा? तो घ्यायला हवा!
मेंदूशी मैत्री
आकलनातल्या अडचणी
‘माकडापासून माणूस घडला’ किंवा ‘आदिमानवाने चाकाचा शोध लावला’ ही संकल्पना तिसरीतल्या आठ वर्षांच्या मुलांना स्पष्ट करून सांगायची तर त्यांना काळाच्या केवढं तरी मागे न्यावं लागेल. त्यांच्या मनात उमटणाऱ्या छोटय़ा छोटय़ा प्रश्नांना समजतील अशा भाषेत आणि समजतील अशा उदाहरणांसह उत्तरं द्यावी लागतील. अशा संकल्पना स्पष्ट करत करत शिक्षक शिकवत असतील तर मुलांना त्या संकल्पना समजतील. अन्यथा अशा अवघड, कल्पनेच्या पलीकडच्या संकल्पनांची नोंद घेणं हे अनेकदा त्यांच्या मेंदूच्या आवाक्याबाहेर असतं.

जे शब्द आधीपासून माहीत आहेत, ज्या संकल्पना माहीत आहेत, त्या शब्दांना मेंदू प्रतिसाद देतो. ज्या विषयाशी संबंधित अनुभव घेतलेले आहेत, त्या संदर्भातले शब्द कृतींसह पक्के कळलेले असतात. त्या बाबतीत प्रश्न नसतो. प्रश्न असतो तो माहीत नसलेल्या शब्द- संकल्पनांबद्दल. पालक किंवा शिक्षक शिकवत असतात, त्यावेळी  ऐकलेल्या माहितीतले बरेचसे शब्द कळलेच नाहीत, तर तिथे ‘रिकाम्या जागा’ तयार होतात. तांत्रिक भाषेत सांगायचं तर मेंदूत विद्युत-रासायनिक प्रक्रिया घडून येत नाही. ते शब्द केवळ कानांवरून जातात. मेंदू अर्थासह त्याची दखल घेत नाही. त्यामुळे त्या शब्दांचं आकलन होत नाही.
प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत. माहीत नसलेली भाषा ऐकत असताना तर सगळेच शब्द आकलनाशिवाय तसेच पुढे जातात. परंतु या शब्दांचा लगेच शब्दकोषात अर्थ बघितला तर बातमीचा एकूण अर्थ चटकन लागतो. तसाच मुलांचाही आकलनाशिवाय ऐकलेला मजकूर तसाच वाया जातो. दिवसभरातल्या विविध विषयांच्या तासांमध्ये असे अनेक ‘मजकूर’ वाया जातात.
अशा रिकाम्या जागा भरणं हे पालक – शिक्षकाचं खरं काम आहे. विषय शिकवणं म्हणजे समोरच्याला जे माहीत नाही ते नीटपणे माहीत करून देणं. पण असं नीटपणे माहीत करून दिलं जातं का, याचं उत्तर शोधावं लागेल. वर्गात जर खूप मुलं असतील तर एका शिक्षकाला प्रत्येकाची दखल घेणं कदाचित जमणार नाही.

 डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
===========
आपलं अस्तित्व जपण्याचं काम ब्रेन स्टेममार्फत होत असतं. आजच्या लोकसत्तेतला लेख -
मेंदूशी मैत्री
धोक्याची जाणीव करून देणारा – ब्रेन स्टेम
जरा कुठे नेहमीपेक्षा वेगळा आवाज आला, वेगळी हालचाल जाणवली की आपण कितीही कामात असलो तरी त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतलं जातं. एखादा कीटक जरी आपल्या डावी-उजवीकडून हलक्या पावलांनी चालत गेला तरीसुद्धा डोळ्याचा एक कोपरा आजही ती हालचाल टिपतो, कोणी आपल्या मागून चालत आहे का याचा कानोसा आपण घेतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रियं प्रत्येक क्षणाला काही ना काही माहिती आपल्या मेंदूकडे पाठवत असतात. अत्यंत तत्परतेने ती माहिती मेंदूकडे पाठवली जात असते. योग्य माहिती आपल्या निर्णयकर्त्यां मेंदूकडे पोचते. याचं कारण या ब्रेन स्टेममध्ये आहे.
फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल. आपलं अस्तित्व इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी, कुठल्याही दिशेने आणि कितीही अंतरावरून, कोणताही धोका समजावा, यासाठी सर्व बारीकसारीक हालचालींकडे आणि छोटय़ा मोठय़ा आवाजाकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं काम होतं. आणि हे काम तेव्हापासूनच ब्रेन स्टेम या अवयवाकडे होतं.
आपल्या मेंदूतला हा आदिम भाग. आपण माणूस म्हणून जी काही मूलभूत कामं दिवसभरात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत करत असतो, श्वासोच्छ्वास, दोन्ही पायावर व्यवस्थित तोल साधून उभं राहणं, चालणं, यावेळी ब्रेन स्टेम हा अवयव कार्यरत असतो.  सावधपणा हा या अवयवाच्या रोजच्या कामाचा एक भाग. तसंच, ठराविक काळानंतर ज्ञानेंद्रियांनी टिपलेले काही संदेश थांबवून मेंदूला विश्रांती घेऊ देण्याचं काम हा बजावतो.  त्यालाच आपण झोप असं म्हणतो.
त्यामुळेच एखादी हालचाल जाणवली तर त्या हालचालीला झटपट प्रतिसाद द्यायला हवा हे सांगण्याचं काम याच अवयवाचं. शरीराकडून आलेले संदेश मेंदूकडे पोहचवण्याच्या मधलं नियंत्रकाचं काम ब्रेन स्टेमकडे असतं.  ज्यामुळे त्या माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल, त्या धोक्यांपासून वाचवण्याचं काम या अवयवामार्फत होत असतं. झटपट निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे जीव वाचवला जातो. ब्रेन स्टेमचा  भाग असलेले मेडय़ुला, पॉन्स आणि सेरेबलम हे अवयव एकमेकांच्या मदतीने जीव वाचवत असतात, असं म्हटलं तरी चालेल.

 डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
=========
मेंदूशी मैत्री
अल्कोहोल : मेंदूपासून शरीरापर्यंत परिणाम
शहाण्या, समजूतदार, तथाकथित बुद्धिमान व्यक्तीच्या – पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या हातून प्रचंड चुका होतात, जेव्हा या व्यक्ती अल्कोहोलच्या अमलाखाली असतात.
आपण सर्व लहानपणीच आपल्या दोन पायांवर व्यवस्थित चालायला शिकतो. पण दारूच्या नशेत मात्र कितीही मोठा माणूस असला तरीसुद्धा त्याला व्यवस्थित चालता येत नाही. त्याचा तोल जातो. त्यामुळे ही माणसं सरळ रेषेत चालू शकत नाहीत. याचं कारण अल्कोहोलचा परिणाम मेंदूतल्या सेरेबलम नावाच्या अवयवावर होत असतो. लहानपणी चालण्याचं कौशल्य शिकताना सेरेबलमचाच आधार असतो. हा अवयव विकसित होतो तेव्हापासून चालण्याचं कौशल्य शिकलेलं असतं. पण इथे सेरेबलमवरच अल्कोहोलचा पडदा असतो. त्यामुळे एक वर्षांचं असताना शिकलेलं मूलभूत कौशल्यही जमेनासं होतं. लहानपणी मूल डुगडुगत चालत असतं, तेव्हा त्याचं कौतुक होतं, त्याला प्रोत्साहन मिळतं. अल्कोहोलमुळे माणसं डुगडुगतात, तेव्हा इतरांचं मनोरंजन होतं!
माणसं अल्कोहोल घेतात तेव्हा त्यांना आसपासच्या जगाचा विसर पडतो, माणसं खूप बोलतात. अतिशय आत्मविश्वास निर्माण होतो. मेंदूत सेरोटोनिन निर्माण झाल्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते. लिंबिक सिस्टीम या भावनांच्या क्षेत्रावर परिणाम झाल्यामुळे भावना नियंत्रणात राहत नाहीत. उचंबळून येतात. त्यामुळे माणसं खूप जास्त हसतात, खूप जोरजोरात आणि अश्रू ढाळून रडतात. काही जण विनाकारणच शूरवीर आणि आक्रमक होतात. यामुळेदेखील इतरांचं मनोरंजन होतं. दिसणं – ऐकणं यावरही परिणाम होतो. वेदना झाल्या तर त्याही जाणवत नाहीत. मेंदूला अल्कोहोलनं गुंगवलेलं असतं.
अल्कोहोल पीत राहिल्यामुळे मेंदूतली भाषा आणि विचार करण्याच्या क्षेत्रावरचं – सेरेब्रल कॉर्टेक्सवरचं नियंत्रण सुटतं. सारासार विवेकाचं
हेच केंद्र असतं, ते योग्य रीतीने काम करेनासं होतं. यामुळे हातून मारामारी, खून, बलात्कार, अपघात यांसारखे टोकाचे गुन्हे घडतात. उत्तम शिक्षण घेतलेल्या, उत्तम करिअर करणाऱ्या माणसांच्या हातून केवळ या अमलाखाली असल्यामुळे गुन्हे घडतात. काही लोक दिवसभर राबून जे काही पैसे कमवतात, ते रात्री संपवून टाकतात. याचा परिणाम काही काळापुरता असतो. परिणाम संपला की माणसं पुन्हा मूळ पदावर येतात. पण व्यसन लागतं. त्यामुळे मेंदूवर आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत.
=============
सतत नवीन शिकणं, जुनी मतं बदलणं, याला कारण न्यूरॉप्लास्टिसिटी

मेंदूशी मैत्री
   
न्यूरोप्लास्टिसिटी

एकदा शिकलेल्या गोष्टी बदलता येतात का, त्या पुसून टाकून तिथे नवीन माहिती वा ज्ञान भरता येईल का? एखादी अत्यंत आवडती व्यक्ती अत्यंत नावडती होऊ शकते का? एकदा मनावर किंवा मेंदूवर ठसलेलं शिक्षण बदलतं, की कधीच बदलू शकत नाही? यावर मेंदूशास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की, लहान मुलांचा मेंदू हा बदलत, वाढत असतो. त्याला जसजसे नवे अनुभव येतील तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात. असेच बदल प्रौढांच्या मेंदूत होतात का? शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलेलं आहे, की हे बदल प्रौढांमध्येसुद्धा होऊ शकतात. यालाच ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ असं म्हणतात. मेंदू विचार बदलू शकतो, घडवू शकतो.
आपल्याला जी माहिती उपलब्ध झालेली आहे वा करून देण्यात आलेली आहे, त्या माहितीचं गारूड माणसांच्या मेंदूवर पसरवता येतं. कोणत्याही नव्या, वेगळ्या, चांगल्या, सकारात्मक शब्दांवर, भुरळ घालणाऱ्या भावनांवर माणसांचा विश्वास बसतो. त्यातून त्यांचं मत बनतं. मात्र, आज हे मत कितीही पक्कं असलं तरी उद्या ते असेलच असं ठामपणे सांगता येत नाही.
माणसांना वाईट अनुभव येत राहिले तर मत बदलूही शकतं. कारण सारासार विचारशक्ती ही प्रत्येक माणसाकडे असते. हे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे, तसंच जनमानसाच्या बाबतीतही शक्य आहे. कोणताही माणूस किंवा समाज हा चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभा राहतो. नकारात्मक भावनांमुळे माणूस काही काळ गोंधळून जाईल, विचारांचा गुंता निर्माण होईल; पण अंतिमत: हिंसा, दुफळी, क्रौर्य, खोटेपणा यापेक्षा शांतता, चांगुलपणा, अहिंसा यावर माणसाचा विश्वास असतो, म्हणूनच ओढाही तिकडेच असतो. समूह मानसशास्त्र अस्तित्वात असलं तरी त्यापैकी प्रत्येकाचा मेंदू घडलेल्या, समोर येणाऱ्या घटनांचं विश्लेषण करू शकतो. या विश्लेषणशक्तीमुळेच समाज शाबूत राहण्याची शक्यता वाढते. मानवजातीसाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुसंख्य माणसं समाजाच्या भल्याचा विचार करत असतात. म्हणूनच कोणत्याही समाजात युद्ध सुरू झालं, अनाचार माजला, की तो संपवून सकारात्मक परिस्थिती लवकरात लवकर कशी निर्माण होईल, याचे प्रयत्न चालू असतात. ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ हा मेंदूचा अतिशय सुंदर गुण यासाठी मदतच करतो.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
===========
मेंदूशी मैत्री
सहकार्य

आपली सर्व ज्ञानेंद्रियं एकमेकांना मदत करत असतात, हे आपल्याला माहीत आहेच. आपण नेहमीच बघतो की, पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय काम करेनासं झालं तर इतर सर्व इंद्रियं त्यांना मदत करतात. अंध व्यक्तींचे कान अतिशय दक्ष असतात. आसपासच्या परिसराचा योग्य कानोसा घेण्याचं काम त्यांची कर्णेद्रियं करत असतात. मेंदू स्वत:च्या अस्तित्वाला समतोल स्थितीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आजारी पडल्यावरसुद्धा विनाऔषध शरीराला बरं करण्याचा प्रयत्न (हीलिंग) चालू असतो.
एका माणसाच्या मेंदूत डावीकडे टय़ूमर झालेला होता. त्यामुळे त्या माणसाच्या भाषेवर परिणाम झालेला होता. कारण भाषेची क्षेत्रं ही मेंदूच्या डाव्या भागामध्ये असतात. मात्र, त्याच वेळी मेंदूशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांमध्ये असं दिसून आलं, की उजव्या अर्धगोलातल्या काही भागांनी त्या माणसाला मदत करायला सुरुवात केली आणि त्या माणसाला विविध प्रकार वापरून बोलता कसं करता येईल, हे बघितलं. यासाठी नजर, हावभाव, हातवारे यांची मदत झाली. संबंधित अवयवांनी ही मदत केली.

एखाद्या परभाषिक माणसाला आपली भाषा समजत नाही हे लक्षात येतं, त्याक्षणी मेंदू कामाला लागतो. समोरच्या माणसाला संदेश द्यायचा आहे, हा निरोप मेंदूपर्यंत जाताच तो संपूर्ण शरीराला संदेशवहनाच्या कामाला लावतो.
फॉक्स नावाच्या एका मेंदूशास्त्रज्ञाच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं की, जर एखाद्या माणसाचं एखादं बोट काम करेनासं झालं, तर इतर बोटांमधले ज्ञानतंतू त्याचं काम अंगावर घेतात आणि वेळच्या वेळेवर मेंदूकडे आवश्यक ते सर्व संदेश जातील असं बघतात. या विषयावर आणखी संशोधन चालू आहे. ज्याप्रमाणे त्वचा एखादी जखम बरी करण्याचं काम करते आणि हळूहळू त्वचेचा नवीन स्तर निर्माण होतो, त्याप्रमाणे न्यूरॉन्स नव्याने निर्माण होतात का/ होतील का, एका क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले न्यूरॉन्स दुसरं क्षेत्र निकामी झाल्यास तिथं जाऊन काम करू शकतात का, या विषयावर संशोधन चालू आहे. हे संशोधन यशस्वी झालं, तर एखादं ज्ञानेंद्रिय काम करेनासं झाल्यास त्याठिकाणी आवश्यक ती औषधयोजना करून त्या ठिकाणचे न्यूरॉन्स दुसरीकडे जाऊन काम करतील का, यावर विचार चालू आहे.

 डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
===========
मेंदूशी मैत्री
ब्रेन वायरिंग
आपण माणसं केवळ दिसायलाच नाही, तर सर्व बाबतीत.. सवयी, स्वभाव, आवडीनिवडी, आचारविचारांत एकमेकांपेक्षा वेगळे असतो. याचं कारण आपल्या प्रत्येकाचं ‘ब्रेन ’ वायरिंग वेगळं असतं. प्रत्येकाला आलेल्या अनुभवांनुसार माणूस घडत असतो. माणसाच्या भूतकाळावर त्याचा भविष्यकाळ बऱ्याच अंशी अवलंबून असतो. एका देशातल्या सर्वसामान्य माणसांचं समूहमन दुसऱ्या देशातल्या समूहमनापेक्षा वेगळं असतं. म्हणून भारतीय माणसाचं वागणं इंग्रज, जर्मन, जपानी माणसापेक्षा वेगळं आहे, असं म्हटलं जातं. कारण तिथल्या देशांमधलं हवामान, त्यांचा इतिहास, तिथली शिक्षणाची पद्धत, सामाजिक शिष्टाचार हे वेगळं असतं. म्हणून ती जडणघडण वेगळ्या प्रकारे होते. परदेशात स्वच्छता पाळणारी आपल्याच देशातली माणसं स्वदेशात मात्र कचरा करतात. कारण ब्रेनवायरिंग ! ‘इथे असं चालतं’ हाच संदेश मेंदूला दिला गेला आहे. हाच नियम वेगळ्या राज्यांतल्या,  गावांतल्या माणसांच्या प्रतिक्रियांनाही लागू पडतो.

वर्गामध्ये शिक्षक सर्वाना एकच प्रकारे एकाच वेळेला शिकवतात; पण प्रत्येकजण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षेतून बघत असतो. एखाद्या कार्यालयात एकाच पदावर कर्मचारी एकच काम करत असले तरी आपापल्या पद्धतीने करतात. सख्खी वा जुळी भावंडंही एकमेकांसारखी नसतात. कदाचित दिसायला एकसारखी असली तरी दोघांचे स्वभाव वेगळे असतात. जसजसा समाजाशी संपर्क वाढतो, तसा त्यांच्या स्वभावात, गुण-दोषांमध्ये, प्रतिक्रिया/प्रतिसादांत,अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांत फरक पडू लागतो. घरात दोघांनाही मिळणारे अनुभव एकसारखे असतील; पण वर्गात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि समाजात मिळणारे अनुभव वेगवेगळे असतात.
हेच मानवजातीचं वैशिष्टय़ आहे. ही जात एक असली तरी मेंदूच्या ‘फ्रंटल लोब’मध्ये होणाऱ्या न्यूरॉन्स कनेक्शन्समुळे आपण वेगळे असतो. चांगले अनुभव मिळालेला माणूस वा समाज इतरांवर प्रेम करायला शिकेल. लहानपणी त्याला कोणी समजून घेतलं असेल, तर तो इतरांना समजून घेण्याच्या शक्यता वाढतील; पण प्रेमहीन अभावग्रस्त वातावरणात, भीती आणि, विषमतेला तोंड देत, हिंसेच्या वातावरणात  मोठं झालेल्या युवकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील. असा समाजच वेगळा असेल, कारण त्यांचं ब्रेन  वायरिंग त्याच समाजात राहून वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे!  समाजस्वास्थ्य टिकावं म्हणून प्रत्येकाच्या जडणघडणीकडे लक्ष द्यायल
==========
मेंदूशी मैत्री
 
कल्पना : विद्युत-रासायनिक स्वरूपात

‘कल्पना करणं’.. फक्त मानवजातीला मिळालेली मेंदूतली एक सुंदर शक्ती. फार पूर्वी होमो सेपियन्सना आसपास विखुरलेली पानं पाहून ही आपण शरीराला गुंडाळली तर उन्हापावसापासून बचाव होऊ  शकेल असे वाटले, ही कल्पना. लाकडाचे गोल ओंडके होते, त्याच्या चकतीसारख्या आकाराचा उपयोग घरंगळण्यासाठी होतोच आहे तर याचा वापर करून काय करता येईल, याच्या कल्पना. ‘कल्पना’ या शक्तीचं सामर्थ्य मोठं आहे.

आपल्याला सर्वत्र विविध आकार-प्रकारांच्या वस्तू दिसतात, माणसांनी उभी केलेली कामं दिसतात, विविध खेळ, विविध प्रकारच्या संस्कृती, भाषा, वाद्यं, कला, यंत्रं इत्यादी दिसतात. या सर्वाचं मूळ एकच- कल्पना!
माणसाच्या मेंदूत प्रथम एक कल्पना तयार होते. ही कल्पना म्हणजे नेमकं काय असतं? कदाचित ती शब्दांच्या स्वरूपात असेल, कधी एखाद्या चित्राच्या स्वरूपात असेल, तर कधी फक्त विचारांच्या स्वरूपात. या कल्पनेवर काम केलं, ती कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले, की तिला एक स्व-रूप प्राप्त होतं. हे रूप कशाचं असेल, याच्या शक्यता लाखो आहेत.
या कल्पनेचाही शोध मेंदूशास्त्रज्ञांनी घेतला आहे. कल्पना करायला एक वेगळी प्रतिभा लागते, हा विचार पुढे नेत भामह, दंडी, वामन, रुदट्र अशा अनेक संस्कृत अभ्यासकांनी प्रतिभेची व्याख्या केली आहे. काव्यप्रतिभेला वर्डस्वर्थ यांनी ‘स्पॉन्टॅनिअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्ज’ मानलं.
आधुनिक यंत्राच्या साहाय्याने जिवंत मेंदूला इलेक्ट्रोड्स लावून संगणकाच्या पडद्यावर पाहिलं असता, कल्पनांचं उगमस्थान आणि प्रवाह दिसला. आपण एखादी प्रतिमा डोळ्यांनी बघतो, त्याची माहिती मेंदूकडे पाठवली जाते. तेव्हा ती मेंदूतल्या ‘ऑक्सीपेटल लोब’मधून ‘परायटल लोब’कडे जात असते. मात्र, कल्पनेच्या बाबतीत उलट प्रक्रिया घडते. कल्पना आधी परायटल लोबमध्ये तयार होते, तिथून ऑक्सीपेटल लोबमध्ये पाठवली जाते. तिथे गेल्यावर ती दृश्य स्वरूपात डोळ्यांना वा मनश्चक्षूंना जाणवते. ही एक विद्युत-रासायनिक प्रक्रिया आहे.  अशा प्रकारे जाणवलेली कल्पना कदाचित सेकंदात विरूनही जाते. अशा विरलेल्या कल्पनांची संख्याही फार मोठी असते. कल्पना सुचली होती; पण पुढे त्याचं काही झालं नाही, असं किती तरी वेळा घडतं. काही कल्पना मात्र पुन:पुन्हा जाणवतात..
==============
मेंदूशी मैत्री
    अनुकरणीय चेहरे (!)
लहान मुलं अनुकरणप्रिय असतात, हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. घरातली माणसं पुस्तकं वाचत असतील तर मुलंही पुस्तकं वाचायला शिकतात. ती माणसं मोबाइलवर वेळ घालवत असतील तर मुलंही मोबाइलसाठी हट्ट करतात, वगैरे.

कधी कधी कुटुंबावर वाईट परिस्थिती ओढवते. उदाहरणार्थ, कोणाचा मृत्यू, कर्ज, जवळच्या माणसाने केलेली फसवणूक, आर्थिक ताणतणाव, मुलांचे किंवा मोठय़ांचे आजार.  अशा परिस्थितीत घर प्रसन्न असणं अवघड असतं.  माणसांना खूपच ताण येतो. पूर्ण वातावरणात कळा पसरते. या वातावरणाशी जुळवून घेता आलं नाही की माणसं एकमेकांवर चिडचिड करतात. नकारात्मक रसायनांच्यामुळे राग दुसऱ्यांवर निघतो. निघतच राहतो.
वातावरणाचा एकमेकांवर नकारात्मक  परिणाम होत राहतो. तर घरातल्या लहान मुलांवर किती होईल?  माणसं जे शब्द बोलत नसतात, ते त्यांचा चेहरा बोलत असतो. मुलं हा चेहरा वाचत असतात. त्यातून शिकत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या परीने, त्यांच्या सीमित अनुभवकक्षांमधून प्रसंगांचा अर्थ लावतात. तणावपूर्व, खचलेले, निराशाच्या गत्रेत गेलेले, कावलेले, चिडचिडलेले, उग्र, कठोर, एकाकी  चेहरे बघून ते अर्थ काढतात.
त्यांनी काढलेले अर्थ हे कदाचित घडलेल्या घटनांपेक्षा गंभीर असू शकतात. या सर्वावरचा त्यांचा निष्कर्ष असा असू शकतो की आपलंच काहीतरी चुकतं आहे, म्हणूनच आईबाबा नाराज आहेत. म्हणून मुलं कितीही लहान असतील – एक वर्षांच्या पुढे –  तरी त्यांच्याशी बोलून त्यांना समजेल अशा भाषेत समस्या सांगायला हव्यात. आईबाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते.
चेहऱ्यावर भाव कसे हवेत, हेदेखील मेंदूच ठरवतो. कारण चेहऱ्याच्या स्नायूंनी कसं, किती व्यक्त व्हायचं आहे हे मेंदूतली कॉर्टसिॉलसारखी ताणकारक रसायनं काबूत आणून योग्य दिशेने विचार करायला लागलो की मेंदूतली परिस्थिती बदलते.  राल्फ अ‍ॅडॉल्फ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संशोधनातून असं दिसलं आहे की चेहऱ्यावरच्या भावभावना ओळखणं आणि समजून घेणं यासाठी अमिग्डालातले न्युरॉन्स कारणीभूत असतात. चेहऱ्याकडे बघून ते विद्युत संदेश तयार करण्याचं काम ते करतात. अ‍ॅडॉल्फ यांच्या मते, यात न्युरॉन्सचे दोन समूह काम करतात.  हा अभ्यास ‘सामाजिक आकलन’ या विषयात येतो.
============
वाढत्या वयातली मुलांचे आईबाबांशी मतभेद का होतात?
मेंदूशी मैत्री
लिंबिक सिस्टीम विरुद्ध फ्रंटल कॉर्टेक्स
घरात वा ऑफिसात अनेकदा दोन पिढय़ांमधला विसंवाद घडतो. ते विरुद्ध हे. नवे विरुद्ध जुने. समाज बदलतो, माणसं बदलतात, विज्ञान- तंत्रज्ञानात नवे शोध लागतात. शाश्वत मूल्यं तीच असली तरी मूल्यांच्या हाताळणीत बदल होतो. अशा परिस्थितीत, पूर्वी ज्या आधारावर निर्णय घेतले, त्याच आधारावर नव्या पिढीने निर्णय घ्यावेत, हा आग्रह धरणं योग्य नसतं.
‘नव्या पिढीने स्वत:ला जे वाटतं ते सुचवावं. दोन्ही पिढय़ांनी हवा तितका वेळ घेऊन शांतपणे चर्चा करावी. अंतिम निर्णय सर्वाच्या सहमतीने झाला तर चांगलंच. अर्थातच, जो काही निर्णय घेतलेला आहे, तो कोणत्याही संदर्भात असला तरी त्या निर्णयाची जबाबदारीदेखील सर्वावर येते. या निर्णयातून चांगलं व्हावं, हीच अपेक्षा असते. पण वाईट झालं तर कोणीही कोणावर दोष ढकलू नये. ही एक शिक्षणाची प्रक्रिया आहे असं त्याकडे बघावं. निर्णयांची जबाबदारी घेतली, तरच स्वतंत्र निर्णयक्षमता विकसित होते. पण याऐवजी नुसतेच मतभेद होत राहिले तर त्यातून कोणीच काही शिकत नाही,’ हे सर्वाना माहीत असतं.
दोन पिढय़ांमधला झगडा हा खरं म्हणजे न्युरॉन्सच्या नेटवर्कचा झगडा. प्रत्येक माणूस स्वत:च्या अनुभवांवरून बोलत, वागत असतो. कोणाचे न्युरॉन्स कसे जोडले गेले असतील, हे सांगता येत नाही.  प्रत्येकाला आपली बाजू खरीच वाटते. कारण ती त्याच्यासाठी खरीच असते,  त्याच्या मेंदूत ती साठवलेली असते.
अशा भांडणांमुळेच कित्येक वेळा माणसांमध्ये अंतर पडतं. दुसरी माणसं आपलं काहीएक ऐकत नाहीत हा विचार दृढ होतो. कार्यालयामध्ये असे मतभेद झाले तर कार्यसंस्कृतीवर बरे-वाईट परिणाम होतात.
आणि घरात असं झालं,  तर घरात दुमत तयार होतं. किंवा एकाला पडती बाजू घ्यावी लागते. विशेषत: टीनएज मुलांबाबतीत भांडणं  झाली  तर लिंबिक सिस्टीम आणि फ्रंटल कॉर्टेक्समधला झगडा असतो. या काळात मुलं लिंबिक सिस्टीममधून म्हणजेच भावनांच्या केंद्रातून विचार करत असतात. आणि मोठी माणसं वैचारिक केंद्रामधून.
वास्तविक या दोन्ही केंद्रांच्या समन्वयातून निर्णय झाले पाहिजेत. नव्या-जुन्या पिढीचा झगडा हा केवळ दोन माणसांचा नाही, दोन काळांचा नाही, तर दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडल्या गेलेल्या मतांचा झगडा असतो. तो मिटवता येतोच.
===========
कुतूहल  असणं ही केवढी तरी मोठी शक्ती आहे.

मेंदूशी मैत्री
‘फक्त’ कुतूहल?

‘माझ्यात तसं काही विशेष टॅलेंट नाही. फक्त मला फारच कुतूहल वाटत असतं,’ असं अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे.
कुतूहल ही माणसाला मिळालेली एक फार आगळीवेगळी अशी देणगी आहे. व्यवहारात कदाचित आपण कुतूहल या गोष्टीचं महत्त्व विसरून गेलो आहोत. कुतूहल या एका गोष्टीमुळेच प्रत्येक नवा शोध लागला आहे. झाडावरून फळ नेहमी खालीच का पडतं? आकाशातले ग्रह, गोल आपल्याला लांबून जसे दिसतात तसेच ते प्रत्यक्षात असतात का? ते प्रत्यक्षात कसे असतात? या पृथ्वीचा शोध कसा लागला असेल? पृथ्वी निर्माण कशी झाली असेल? चंद्रावर गेलं तर काय होईल? माणसाला पंख असते तर काय झालं असतं? आपल्याला जर समुद्राच्या तळाशी जाऊन बघायचं असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? असे प्रश्न आपल्याला पडतात. त्या वेळी महत्त्वाची असते ती कुतूहलाची भावना. कुतूहल निर्माण झालं की डोपामाइन निर्माण होतं. ते प्रश्नाचं उत्तर शोधायला प्रवृत्त करतं.

मनात प्रश्न उभे राहणं हीसुद्धा मेंदूची एक विशेष क्षमता आहे. योग्य आणि अर्थपूर्ण प्रश्न मनात उभे राहण्यासाठीसुद्धा मानसिक परिस्थिती ताणतणावविरहित असायला लागते.
जे प्रश्न मनात निर्माण होतात, त्या प्रश्नांना योग्य संदर्भ असायला लागतात.  मनात निर्माण झालेला एखादा प्रश्न योग्य आहे की नाही, हे समजण्याचीदेखील एक किमान क्षमता असावी लागते. कारण अर्थहीन आणि संदर्भहीन प्रश्नसुद्धा मनामध्ये येतात. त्या वेळी थोडा विचार केल्यानंतर हे संदर्भहीन आणि अर्थहीन आहेत हे आपल्याला कळू शकतं आणि असे प्रश्न आपोआपच आपण रद्द करतो. हे निर्णय वेळोवेळी आपलं मन घेत असतं.
मनात प्रश्न निर्माण झाल्यावर पुढची पायरी असते ती या अर्थपूर्ण प्रश्नांचा शोध घेण्याची. कुतूहल कोणत्याही बाबतीत निर्माण होऊ शकतं.
– आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो ही जाणीव,
– उत्तर शोधायलाच हवं ही ऊर्मी आणि
– कोणाला तरी विचारून किंवा पुस्तकात शोधून उत्तरापर्यंत पोहोचण्याइतकी किमान परिस्थिती उपलब्ध असली पाहिजे.
यामुळे कोणताही माणूस कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो.
==========
मेंदूशी मैत्री
जागवलेलं कु्तूहल

खरं तर लहान मुलांच्या मनात प्रश्नांचं मोठं भांडार असतं. याचं कारण म्हणजे त्यांच्या नजरेतून त्यांना दिसणारं जग हे पूर्णपणे नवीन असतं. त्यामुळे ‘हे असं का?’ असे असंख्य प्रश्न मनामध्ये सतत गोळा होत असतात.

हे प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी योग्य माणसं आसपास असायला हवीत. समजा, काही कारणाने तशी माणसं मिळाली नाहीत तर कुतूहलाची आत्मिक प्रेरणा हळूहळू कमी होते, नाहीशी होते. याचा अर्थ ती पूर्णपणे संपत नाही, कारण आपल्याला एखाद्या गोष्टीचं कुतूहल वाटतं आहे आणि त्या कुतूहलाचं निराकरण करण्याची परिस्थिती जर आपल्या आसपास पुन्हा निर्माण झाली तर मनातलं कुतूहल पुन्हा जागतं.
या दृष्टीने जेव्हा आपण मुलांच्या कुतूहलाकडे, त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे किंवा ते प्रत्यक्ष बोलले नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसणाऱ्या- जाणवणाऱ्या शोधक वृत्तीकडे पाहिलं तर  आपली जबाबदारी लक्षात येईल. लहान मुलांच्या संगतीत असणारी सर्व मोठी माणसं, आई-बाबा, शिक्षक, मदतनीस या सर्वानी त्यांच्या कुतूहलयुक्त प्रश्नांना योग्य उत्तरं दिली तर हे कुतूहल जागं राहू शकतं.
कोणत्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये कुतूहलाचं महत्त्व अपार आहे. हे असं का आहे? असा प्रश्न पडलाच नाही तर तो प्रश्न आणि त्याच्यापुढे निर्माण होणारी असंख्य प्रश्नांची मालिका याचं उत्तर मिळणार नाही.
‘पेडियाट्रिक रीसर्च’ या जर्नलमध्ये या संदर्भात एक लेख प्रकाशित झालेला आहे. एका संशोधनातून असं दिसून आलेलं, की आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातील मुलांचे दोन गट केले. एका गटातील मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होईल, अशा प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण केल्या. दुसऱ्या गटासाठी असं काहीही केलं नाही. यानंतर असं दिसलं की, पहिल्या गटात कुतूहलाच्या प्रेरणेमुळे त्यांचा अभ्यासातला रसही वाढला आहे. आपण एखादी गोष्ट शोधून काढतो तेव्हा त्यातून आनंद मिळतो. ज्याचं उत्तर आपल्याला माहीत नाही ते शोधून काढण्याची प्रेरणा ज्यांना मिळाली, त्या मुलांमध्ये तसा बदल दिसून आला.
वास्तविक सर्वच मुलांबरोबर – त्यातही सामाजिक- आर्थिक वंचित गटातल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी हे समजून घेण्यासारखं आहे.
=========
मेंदूशी मैत्री
   
आम्हाला गणित शिकवा!
सडबरी व्हॅली स्कूल या नावाची एक शाळा होती. (या संदर्भातील एक पुस्तक गरवारे बालभवनने काढलेलं आहे.) तिथे गणित शिकवायला एक शिक्षक होते; पण ते गणित शिकवायला कधीच आपणहून वर्गावर गेले नाहीत. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं. आपल्याला गणित शिकण्याची गरज आहे. त्या वेळेला सर्व मुलांनी आपापसात ठरवलं आणि ते गणिताच्या शिक्षकांकडे गेले.आम्हाला गणित शिकायचं आहे, असं त्यांनी सांगितलं; परंतु गणिताच्या शिक्षकांनी त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला नाही. तुम्हाला काय शिकायचं आहे? कशासाठी? असे प्रश्न मुलांना विचारले. यानंतर मुलांनी विचार केला. आपल्याला गणितामध्ये नेमकं काय शिकायचं आहे, हे त्यांनी ठरवलं आणि शिक्षकांकडे गेले. शिक्षकांनी लगेच मुलांना होकार दिला नाही. कधी शिकवायचं, त्याची वेळ ठरवा आणि मग मला सांगा. हे ठरवून मुलं पुन्हा शिक्षकांकडे गेली. मुलांना खरोखरच गणित शिकायचं आहे याची शंभर टक्के खात्री जेव्हा त्या शिक्षकांना पटली, त्या वेळेला शिक्षकांनी मुलांना काही अटी घातल्या. जी वेळ गणिताच्या अभ्यासासाठी ठरलेली आहे, ती वेळ पाळायची. त्यादरम्यान कोणीही गैरहजर राहायचं नाही. तासाला यायला उशीर करायचा नाही.शिक्षकांनी मुलांवर घातलेल्या त्या सर्व अटी मुलांनी ताबडतोब मान्य केल्या. कारण त्यांना गणित शिकायची घाई झाली होती. त्यांच्या मनात गणिताविषयी खरंखुरं कुतूहल निर्माण झालं होतं. यानंतर शिक्षकांनी अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली. मुलं अत्यंत उत्साहाने शिकत होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, जवळपास दोन वर्षांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांतच शिकवून झाला. सर्व मुलांना गणितं कळली. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा झाला की, मुलांना गणित विषयाची गोडी लागली.
या सगळ्याच्या मुळाशी गेलं तर काय दिसतं?
मुलांच्या मनात गणिताविषयी कुतूहल निर्माण झालं होतं हे एक. दुसरं म्हणजे गणित शिकायचं हा निर्णय त्यांनी आपण होऊन घेतलेला होता. त्यांच्यावर हा निर्णय कोणीही लादलेला नव्हता.
जी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, तिकडे लक्ष एकाग्र केलं जातं. याचा अर्थ असा की, ज्या गोष्टीमध्ये कुतूहल निर्माण होईल, ती गोष्ट आपण मनापासूनच करतो.
=========
मेंदूशी मैत्री
   
लर्निग स्टाइल्स

प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. आपली अभ्यासाची पद्धत कोणती आहे?
– काही जण एकांतात अभ्यास करतात. त्यांनी मनातल्या मनात वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं. हे लोक कितीही वेळ एका जागेवर बसून एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. त्यांना कोणत्याही प्रकारे आवाजाचा व्यत्यय सहन होत नाही.
– काही जणांना मित्रमत्रिणींबरोबर, मोठय़ा आवाजात वाचल्यावर लक्षात राहतं; गाणी लावून, टीव्हीसमोर अभ्यास होतो.
– काहींचा एका जागेवर बसून अभ्यास होत नाही. दर दहा-पंधरा मिनिटांनी हालचाल करावीच लागते.
अशा प्रकारे प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगवेगळी असते. शिकलेलं समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची पद्धत वेगळी असते. आपण मात्र सर्व मुलांना एकाच पद्धतीनं शिकवतो. एकाच पद्धतीनं, एकाच वेळेस अभ्यास करायला सांगतो. साधारणत: चौथी-पाचवीच्या टप्प्यापर्यंत मुलांची अभ्यासाची नैसर्गिक शैली कोणती आहे, हे समजून येतं. आपण त्याची अशी पद्धत शोधून त्याला मदत करायला हवी. शिक्षणशास्त्रात याला ‘लर्निग स्टाइल्स’ असं संबोधलं जातं. आपल्या स्वत:च्या किंवा आपण त्यांना सुचवत असलेल्या पद्धतीपेक्षा मुलांची पद्धत वेगळी असू शकते. एकदा का अभ्यासाची पद्धत त्यांना सापडली, की अभ्यासाचा लवकर कंटाळा येणार नाही.
परंतु हे लक्षात न घेता मुलं आपली एकाच पद्धतीनं शिकत असतात. आपला अभ्यास कशा पद्धतीनं केला तर लक्षात राहतं, हे आपण स्वत:च बघायचं असतं. आपली पद्धत आपणच जाणीवपूर्वक तपासायला हवी. कारण प्रत्येकाच्या मेंदूची गरज आणि भूक या बाबतीत वेगवेगळी असते.
साधारणपणे आठवी-नववीपर्यंत कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा, हे मुलं आपणहूनच ठरवतात. मात्र, त्याही आधी प्राथमिक वर्गात शिकत असतानाच त्यांना शिक्षक किंवा पालकांनी मदत केली, तर त्यांना अभ्यासाची त्यांची पद्धत सापडू शकेल. ही शैली ओळखून त्यांना त्यांच्या नैसर्गिक शैलीत शिकण्याची, समजून सांगण्याची किंवा अगदी पाठ करण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी मदत केली पाहिजे.
==========
मेंदूशी मैत्री

बाबा आणि न्युरॉन्स

बाळ घडत असतं तेव्हापासून बालसंगोपनाला सुरुवात होते. ज्या घरामध्ये आई-बाबा दोघेही नोकरी करतात, त्या घरातही बाळाची बहुतांश काळजी, जबाबदारी ही आईच उचलताना दिसते. वास्तविक, इथं बाबाची भूमिका फार महत्त्वाची असते. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. प्रत्यक्षात तसं घडत मात्र नाही. परंतु आधुनिक घरांमध्ये बाळाचं संगोपन दोघांनी करायचं असंच ठरवायला हवं.

अशीही मांडणी केली जाते की, बाबा पैसे कमावून आणतो, तो दिवसभर घरात नसतो आणि म्हणून मुलांना सगळ्यात जास्त सहवास आईचाच मिळतो. आता काही घरांमध्ये तरी हे चित्र बदललेलं आहे. बाबाप्रमाणे आईसुद्धा दिवसभर नोकरी करते, काम करते; पण तरीसुद्धा असंच चित्र दिसतं की, आईचा सहवास मुलांना जास्त आहे. याचं कारण आपल्या समाजाच्या जडणघडणीत तर आहेच, पण बाबाच्या मानसिकतेतसुद्धा आहे. आपल्या लहानग्या मुलाला किंवा मुलीला वाढवणं, त्याच्या/ तिच्यासाठी काही करणं, यात आपणही काही भूमिका बजावू शकतो याची ओळखसुद्धा कित्येक घरातल्या बाबा मंडळींना झालेली नसते. मुलं सांभाळणं हा जणू काही बायकांचा प्रांत आहे, असं समजून बहुतेकांनी हात झटकलेले असतात.
पण यात त्या बाबाचंच नुकसान जास्त होतं. बाबाला बाळाचा सहवास मिळत नाही. लहानसं बाळ आपापल्या पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये न्युरॉन्सची जोडणी करत असतं. विविध माणसं, त्यांची भाषा.. अशा अनेक गोष्टींबद्दलच्या अनुभवांचा संचय करण्याचं काम चालू असतं. अशा वेळी विविध कारणांमुळे बाबाचा सहवास मिळाला नाही, तर मेंदूत आवश्यक त्या जोडण्या होत नाहीत.
आपल्याकडे बालसंगोपनात नेहमी आई पुढं असते. बाबा जवळपास नसतोच.  यामुळे बहुतांशी घरांमध्ये आई व मुलं यांचं मेतकूट असतं. आणि बाबा वेगळा असतो. मुलं कोणत्या इयत्तेत आहेत, हेही बाबाला माहीत नाही, याचं कौतुक केलं जातं. मुलांपासून असं अंतर पडतं. पुढे ते वाढतच जातं. तरुण झाल्यावर मुलं एकवेळ आईशी बोलतात, बाबाशी नाही. त्याचं मूळ या दिवसांत झालेल्या न्युरॉन-जोडणीत आहे.
===========
मेंदूशी मैत्री
विचारांच्या सहा टोप्या

एडवर्ड डी बोनो यांनी ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’ या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात लेखकानं विचारप्रक्रियांबद्दल लिहिलं आहे. आयुष्यात किती तरी निर्णय घ्यावे लागतात. हे सर्वच निर्णय खरोखरच महत्त्वाचे असतात. ‘चलता है’, ‘पुढे बघू या’ अशी वृत्ती ठेवली, तर कदाचित हातातला खूप महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते. योग्य निर्णय घेण्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित व्हायला हवी. ही क्षमता विकसित झाली की, जास्तीत जास्त अचूक निर्णयापर्यंत जाता येतं. त्यासाठी बोनो यांनी सहा मुद्दे दिले आहेत. या मुद्दय़ांना प्रतीकात्मक रंग दिले आहेत. हे रंग बाजूला ठेवले, तरी मेंदूच्या डाव्या व उजव्या गोलार्धातल्या केंद्रांना स्पर्श करणारे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.

(१) व्यवस्थापन : अनेक गोष्टी आसपास आहेत. त्या सगळ्या आपल्यासाठी नाहीत. त्यातली योग्य गोष्ट निवडून घ्यायची आहे. त्या योग्य गोष्टीकडे जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हा तो प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यातून वस्तुस्थितीची जाणीव होईल. या मुद्दय़ाचा रंग निळा आहे.

(२) माहिती : काय करायचं आहे, हे ठरल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- आपल्याकडे पूर्ण माहिती हवी. नसेल तर ती गोळा करायला हवी. याला बोनो यांनी पांढरा रंग म्हटलं आहे.

(३) भावना : जे करायचं आहे, त्याबद्दल आपल्या मनात नक्की आतून काय भावना आहे, याचा शोध घेणं फार आवश्यक असतं. भावनांना त्यांनी लाल रंग संबोधलं आहे.

(४) वास्तववादी : एखादी कल्पना कितीही आवडली तरी ती वास्तववादी आहे का, हे तपासून बघायला हवं. काळा रंग यासाठी वापरला आहे.

(५) आशावादी प्रतिक्रिया : आपल्या मनातल्या विचारांकडे सकारात्मक दृष्टीनं बघता येणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी या मुद्दय़ाला पिवळा रंग दिला आहे.

(६) सर्जनशीलता : आपल्याला ज्या कल्पनेवर विचार करायचा आहे आणि नुसताच विचार नाही तर ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर कोणत्याही ठरीव चौकटीबाहेरचा, अगदी वेगळा विचार केला पाहिजे. हा हिरवा रंग.
विचारातून कोणत्याही कृतीकडे यायचं असेल, तर या सहा मुद्दय़ांपकी जास्तीत जास्त मुद्दय़ांवर वैचारिक खल करायला हवा.
डॉ. श्रुती पानसे
=========
मेंदूशी मैत्री
डेन्ड्राइट्सचं जंगल

‘ज्या माणसाला भरपूर अनुभव आहेत, त्या माणसाचा मेंदू म्हणजे जणू काही डेन्ड्राइट्सचं जंगलच,’ असं मत शिकागो मेडिकल स्कूलचे डॉ. लिसे इलियट यांनी मांडलं आहे. न्यूरॉन्सबद्दल आपल्याला माहीत आहेच. या न्यूरॉन पेशीच नव्या अनुभवांचं उत्साहाने स्वागत करण्याचं काम करत असतात. या प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं. त्याच्या बाजूने अनेक शाखा फुटलेल्या असतात, या शाखांना डेन्ड्राइट्स (Dendrites) म्हणतात. प्रत्येक न्यूरॉनला एक लांब धागा असतो, त्याला अ‍ॅक्झॉन (axon) म्हणतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात, पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच. स्वत:चं आरोग्य, स्वत:चा सन्मान, स्वत:साठी बौद्धिक खुराक, स्वत:साठी कलेचा आस्वाद – अशा गोष्टींमुळे मनाला निश्चितपणे नवी उमेद मिळते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ताजा होतो. नवी, आधिक अवघड, अधिक आव्हानात्मक कामं करण्याकडे कल वाढतो. स्वत:वरचा विश्वास वाढीला लागतो. थोडक्यात काय, तर आपण ‘सुधारतो’!

यासाठी चार गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी, माझं घर, माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय आणि माझा परिसर.
मी- रोज रात्री झोपताना स्वत:शी बोलायला हवं. आज विशेष चांगलं काय चांगलं झालं, काय चुकलं, याचा हिशेब रोज ठेवायचा. त्याचवेळेस उद्या कोणत्या चुका टाळायला हव्यात. उद्याच्या दिवसातली महत्त्वाची कामं कोणत्या प्रकारे पार पाडायला हवीत, याचं व्हिज्युअलायझेशन रोजच्या रोज व्हायला हवं.
माझी माणसं- माणूस हा समाजशील प्राणी आहे. घरातल्या आणि अन्य सर्व व्यक्तींशी सुसंवाद म्हणजे स्वत:शी सुसंवाद साधल्यासारखंच आहे.
माझं शिक्षण / नोकरी / व्यवसाय- शिक्षण आणि काम यांवर लक्ष केंद्रित करणं, हे मेंदू सुस्थितीत ठेवण्याचं लक्षण आहे.
माझा परिसर- अशी एखादी गोष्ट ज्यामुळे आपल्या परिसराला, तिथल्या लोकांना, निसर्ग – पर्यावरणाला उपयोग होईल. आपला संकल्प एकटय़ानेच पूर्ण करायला हवा असं नाही.  एखादं काम एकत्र, सगळ्यांनी मिळून करण्यात एक वेगळीच मजा असते. त्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटत राहतो. संपर्क वाढतो. या सर्वातून दुसऱ्या कोणाला तरी मदत होते तशी आपल्यालाही मदत होणार असते.

 डॉ. श्रुती पानसे/ contact@shrutipanse.com
=========
मेंदूशी मैत्री
 उगवत्यांचं संपणं!

मेंदू हा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठीचा खास अवयव आहे, म्हणूनच तो हुशार आहे.. कोणत्याही प्रसंगातून जिवाला वाचवतो!  वेदना- जखमा- आजार झाला तरी काही दिवसांत आपोआप बरं होण्याची ताकद  मेंदूत- शरीरात असताना काही जण मृत्यूला कसे कवटाळतात, हा प्रश्न फार गहन आहे.

अमुक एका परीक्षेत नापास झाल्यामुळे, विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, कोणी रागावलं म्हणून, इंटरव्ह्य़ू चांगला झाला नाही म्हणून, ‘ती’ मुलगी नाही म्हणाली म्हणून स्वत:चा जीव द्यावासा का वाटतो? एक परीक्षा, एक इंटरव्ह्य़ू संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठं कधीच नसतं. वास्तविक प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो. स्वत:च्या अस्तित्वावर फार प्रेम करत असतो. छोटीशी मुंगीसुद्धा स्वत:च्या जिवाला जपते. एखादा धोका आला तर धावून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करते.
जन्म घेऊन ज्यांनी अजून वयाची वीसेक वर्षही पूर्ण केलेली नाहीत ती मुलं हे छोटंसं आयुष्य का संपवतात? याचा अर्थ मुलं अत्यंत ताणाखाली असतात. त्यांच्या अंतर्मनातला ताण  त्यांना सहन करता येत नाही. मुलांच्या जवळच्यांनाही जाणवत नाही.
वास्तविक शिक्षण घेत असताना, कोणत्या तरी कारणाने जीव संपवण्याचा निर्णय घ्यावा, हा खरं तर संपूर्ण व्ययस्थेलाच काळिमा आहे. अभ्यास, शिक्षण यांनी मुलांना आधार द्यायला हवा, प्रोत्साहन द्यायला हवं की पायाखालची जमीन काढून घ्यायला हवी? मुलांना आयुष्यातून उठण्याची वेळ येतेच का? प्रश्न असतातच. ते नव्याने पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात, ते प्रश्न सोडवायला शिकवलं पाहिजे.
आत्यंतिक ताणकारक विचारांमध्ये गुरफटणारी मुलं असुरक्षिततेच्या छायेत वावरतात. त्यांच्या मनाचा एक कोपरा कायम भीतीच्या सावटाखाली असतो. अशी मुलं एरवी नीट वागली, तरी त्याच्या मनावर घातक परिणाम झालेले असतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू – बोलू शकत नाही. मोकळेपणाने कुणाशी मत्री करू शकत नाही. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. असे नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत असतात. या नकारात्मकतेच्या मुळाशी असलेली भावना जास्त घातक आहे ती म्हणजे स्वत्वाला बसलेला धक्का. मुलांशी आपण उपदेशविरहित संवाद करायला शिकलो, तर अशी वेळ येणार नाही.

 डॉ. श्रुती पानसे
===========
मेंदूशी मैत्री
 
अतिताण

ताणाची व्यक्त- अव्यक्त कारणं अनेक असतात. आपल्या हातून योग्य प्रकारे, जास्तीत जास्त चांगलं काम व्हावं यासाठी काही वेळा ताण येतो, तो आवश्यक ताण असतो. या आवश्यक ताणामुळे फारशा चुका आणि त्रुटी न राहता चांगलंच काम हातून व्हावं यासाठी आपण प्रवृत्त होतो.

कधीकधी हा आवश्यक ताण हाताबाहेर जातो. याची लक्षणं शरीरात कुठे ना कुठे नक्कीच जाणवतात. अस्वस्थ वाटतं. हृदयाची धडधड वाढते. जे काम चालू आहे, जिथे आपलं लक्ष होतं, तिथून ते लक्ष उडतं. काहीतरी चुकीचं घडतंय, हे काम जमणार नाही असं वाटतं. पुन्हा त्या कामाकडे मन एकाग्र होत नाही. काहीही करू नये. नुसतं बसून राहावं असं वाटतं. आहे त्या परिस्थितीतून माघार निघून जावंसं वाटतं. याचा अर्थ आपल्याला कसलातरी ताण जाणवतोय.
हे ताण मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत कोणालाही येतात. मुलं हे सांगू शकत नाहीत. काही वेळेस मुलं रडण्यातून, किंचाळून, ओरडून, विरोध करून, गप्प बसून, सगळ्यांकडे पाठ फिरवून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेले हे इशारे आपल्याला समजले पाहिजेत. काही मुलं ताण सहन करतात. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. पोटात दुखणं, ताप येणं, वजन कमी होणं ही शारीरिक लक्षणं असतात. पण आत काय चाललं आहे हे समजत नाही. चेहरा हसरा नसला, नजर स्वस्थ वाटली नाही तर मनात काहीतरी खळबळ माजलेली असू शकते.
हा ताण नराश्यापर्यंत (डिप्रेशन) जाणंही योग्य नाही. कारण यातून माणसाच्या हातून मोठय़ा चुका घडू शकतात. एका क्षणी असं होतं की माणसाला जगावंसं वाटत नाही. असे विचार मनात येणं वेगळं आणि तशी कृती होणं वेगळं!
नव्या संशोधनावरून असं दिसून आलं की स्वत:ची घृणा वाटणं, आपल्याने आता परिस्थितीवर कोणताही उपाय होऊ शकत नाही, सगळ्या आशा-अपेक्षा संपून गेल्या आहेत असं वाटणं आणि त्यापुढे जाऊन या सर्वावर उपाय म्हणून स्वत:ला मारून टाकायचं हे घडतं ते मेंदूतल्या क्विनोलिनीक अ‍ॅसिडच्या प्रभावामुळे!
या स्थितीपर्यंत माणसांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं आधी त्याच्या स्वत:च्या आणि त्यानंतर आसपासच्या लोकांच्या हातात असतं.

 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
=======
मेंदूशी मैत्री
   आपण मेंदू किती वापरतो?
जेव्हा एखादी ज्ञानशाखा उदयाला येते, तेव्हा ती पूर्णत शास्त्रीय तत्त्वावर आधारित असली पाहिजे. त्या संदर्भात केली जाणारी विधानंही शास्त्रीय तत्त्वावर असली पाहिजेत. परंतु काही वेळेला त्या शास्त्रीय तत्त्वाखेरीज इतरही काही विधानं निर्माण होतात आणि ती व्यावहारिक पातळीवरही लोक वापरायला लागतात. अनेकदा वापरल्यानंतर तीच विधानं खरी वाटायला लागतात. सध्याची एक नवीन ‘न्यूरो-मिथ’ म्हणजे ‘आपण आपल्या मेंदूचा दहा टक्के वापरसुद्धा करत नाही’ (म्हणे).
व्यावहारिक पातळीवर आपण आपल्या मेंदूचाच वापर दिवसरात्र आपल्या कामांसाठी करत असतो. आपल्या मेंदूमध्ये प्रचंड क्षमता आहे. कदाचित खूप काही करण्याची क्षमता निसर्गत: असताना आपण पुरेसा न्याय देत नाही इथपर्यंत ठीक आहे. पण यापुढे जाऊन जेव्हा ‘१० टक्केच भाग वापरला जातो’ असं म्हणतो तेव्हा ते योग्य ठरत नाही.
याचं कारण मेंदूचा वापर हा आपल्याला अशा कोणत्याही टक्केवारीमध्ये मोजता येत नाही. मेंदूतले सर्व अवयव, त्यातल्या रक्तवाहिन्या, त्यात वाहणारी रसायनं या सर्व गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात आणि ते प्रत्येक क्षणी आपलं काम करत असतात. आपण किती टक्के मेंदू वापरतो याचं गणित आपल्याला मांडता येत नाही.
‘शास्त्रीय तत्त्वावर आधारित’ असं म्हटलं तरीसुद्धा ते शास्त्रीय तत्त्वावर आधारित असेलच असं नाही. याचं कारण मेंदू संशोधनाला न्यूरो इमेजिंग तंत्राचा भक्कम आधार असावा लागतो. अत्याधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने उदाहरणार्थ ‘एफएमआरआय’ तंत्राने प्रत्यक्ष आणि जिवंत काम करणाऱ्या मेंदूच्या प्रतिमा टिपल्या जातात. त्या प्रतिमांवरून निघालेल्या निष्कर्षांचा आधार मेंदू संशोधनाला आहे. आधुनिक मेंदू संशोधन हे यावर आधारित आहे आणि अशा कुठल्याही प्रतिमांमध्ये, ‘केवळ दहा टक्केच मेंदू वापरला जातो,’ अशा प्रकारचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
मेंदूविषयी अचाट आणि अतक्र्य विधानं आणि त्या आधारावर विविध टेस्ट्स बाजारात आलेल्या आहेत. ‘आपल्या मुलांचे मार्क वाढवण्या’चा हव्यास भारतीय जनतेत किती फोफावला आहे याचा चांगलाच अंदाज बाजाराला आहे. त्यामुळे बाजार अशी उत्पादनं आणतो. पैसे कमवून मोकळाही होतो. हजारो रुपये खर्च करून भलंमोठं बाड ग्राहकाच्या हातात सोपवलं जातं! ..इथे मात्र ‘मेंदू वापरण्या’ची खरी गरज आहे.
डॉ. श्रुती पानसे
=======
मेंदूशी मैत्री
‘ज्ञानरचनावाद’ आणि मेंदूची प्रयोगशाळा

आधुनिक मेंदू संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचा वापर कोणत्याही वर्गातल्या, कोणत्याही इयत्तेतल्या, कोणत्याही मुलांसाठी करता येतो. त्यासाठी न्यूरो इमेजिंग तंत्राद्वारे केलेले प्रयोग आहेत. त्या प्रयोगांचे निष्कर्ष आपल्याला वर्गात वापरता येतात. यातून निघालेले निष्कर्ष हे त्या वयोगटासाठी पूरक असल्यामुळे ती तत्त्वं आपण वर्गात वापरली तर त्याचा थेट परिणाम दिसून येतो.
मुलांच्या कल्पनाशक्तीला संधी देणं, त्यांच्यातल्या विविध बुद्धिमत्तांचा शोध घेऊ देणं, केवळ लेखन, वाचन, पाठांतर यावर भर न देता कल्पकता वापरून विविध विषय स्वत:हून शिकू देणं, या सगळ्यालाच ज्ञानरचनावादाचा पाया असं म्हटलं जाऊ शकतं. ही तंत्रं वापरून मुलांना शिकवायचं याचा अर्थ मुलं आपणहून शिकू शकतील असं वातावरण वर्गात तयार करायचं, हे वातावरण वर्गात उपलब्ध झालं तर शिक्षकांच्या मदतीने मुलं स्वत:हून स्वत:च्या ज्ञानाचा पाया रचत जातात. यालाच ज्ञानरचनावादी सिद्धांत म्हणतात.

यामध्ये मुलांना विषय समजण्यासाठी अनेक पद्धती वापरणं- उदा. चर्चा, गटचर्चा, प्रकल्प, चित्र, प्रयोग, मॉडेल्स, रोल प्ले, विविध खेळ, कोडी, अशा अनेक तत्त्वांचा वापर केला जाऊ शकतो. अशा सर्व गोष्टी इयत्तेनुसार वर्गात वापरल्या तर मुलं आनंदाने शिकतील. ‘शिक्षण आनंददायी असायला हवं’ असं म्हटलं जातं. पण या आनंदासाठी अभावानेच उपाययोजना शाळेत केल्या जातात किंवा ज्या उपाययोजना केल्या जातात त्यातून मुलांना कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो, हे तपासावं लागेल.
‘मुलांना हल्ली शिकायचंच नसतं, फक्त दंगा करायचा असतो,’ असं शिक्षक आणि पालक म्हणतात. मुलं मात्र एकाच वेळी अनेक विषय अभ्यासत असतात. त्यासाठी शाळा- क्लास- विविध स्पर्धा परीक्षा यांमधून फिरत असतात. पण अशा काही तत्त्वांचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला तर  शिकण्यापासून दूर जाणाऱ्या मुलांना शिकण्यात आनंद वाटेल.
मुलांना शिकवताना घाई करून चालणार नाही. तर मूल शिकेल यावर विश्वास ठेवून त्याच्या अवतीभोवती विषयाला साजेसं वातावरण तयार करावं लागतं. मेंदू-प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रयोगांची अंमलबजावणी वर्गामध्ये करता आली तर मुलांना याचा खरोखर फायदा होऊ शकेल.

 डॉ. श्रुती पानसे
==========
आपलं वय दर दिवशी वाढत असतं, तरीही ते पूर्ण वय असतं.
मेंदूशी मैत्री
   
ज्ञानाची स्वयंपूर्ण रचना

माणूस आपल्याला हवं असलेलं ज्ञान स्वत: मिळवतो. हे लहानपणापासूनच चालू असतं. ज्ञानरचनावादाचा सिद्धांत हेच सांगतो की, पूर्वज्ञानावर आधारित नव्या माहितीची रचना आपला मेंदू करत असतो. याच पद्धतीने आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही कला शिकत असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाला सहजपणे काही माहिती मिळालेली असते. हे असतं आपलं पूर्वज्ञान. या पूर्वज्ञानाच्या आधारावर नवे अनुभव रचून – त्यासाठी नवे कष्ट घेऊन पुढचं शिक्षण घडणार असतं. ही प्रक्रिया प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याच्या बाबतीत आतापर्यंत घडलेली असते –  पुढच्या प्रत्येक वेळेस घडणार असते. कारण स्वत:ला बदलत नेत शिकणं हे जन्मापासून सुरू असतं ते सुरू राहणार असतं. शिकण्याला पूर्णविराम असा कधी नसतोच.

विनोबा म्हणतात, आपलं पूर्ण शिक्षण हे पूर्णाकडून पूर्णाकडे असंच असतं. एका पूर्ण अवस्थेकडून दुसऱ्या पूर्ण अवस्थेकडे. कोणत्याही वयाचं मूल ही देखील एक पूर्ण व्यक्ती असते. पूर्ण व्यक्तिमत्त्व असतं. ‘मूल’ या शब्दाची जी व्याख्या कॉन्रेल विद्यापीठाने केलेली आहे त्यानुसार लहान मूल म्हणजे उपव्यक्ती किंवा सब-पर्सन नव्हे. सहा महिन्याचं मूल असलं तरी ते सहा महिन्याचं पूर्ण व्यक्तिमत्त्व असतं. वीस, चाळीस किंवा नव्वद वर्षांची व्यक्ती ही देखील पूर्ण व्यक्ती आहे. एक विशिष्ट वय आलं की तिथे माणूस पूर्ण झाला, असं कोणत्याही वयात म्हणता येत नाही. दर दिवशी माणसाच्या पेशी बदलत जातात. त्याचं वय वाढत जातं. त्यानुसार त्याच्यात शारीरिक बदल होत राहतात, ते अगदी त्याच्या अंतापर्यंत. त्यामुळेच माणसाला कधीही पूर्णत्व येत नाही. प्रौढ वयात माणसाची- स्त्री किंवा पुरुषाची पूर्ण वाढ झाली असं आपण म्हणतो. मात्र तेव्हाही ती वाढ पूर्ण नसते. त्यानंतरसुद्धा अनेक बदल त्याच्या शरीररचनेत होत राहतात. विशीत असलेली व्यक्ती चाळिशीत वेगळी दिसते आणि ऐंशीव्या वर्षी केवढी बदललेली दिसते. यातले काही बदल दृश्य असतील तर काही अदृश्य. पण बदल होणं थांबत नाही. म्हणूनच त्याची प्रत्येक अवस्था ही पूर्णावस्था असते, हे मानलं पाहिजे.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
=========
बोलण्यापूर्वी डोक्यात कोणत्या बारीकसारीक गोष्टी घडत असतात?
मेंदूशी मैत्री
बोलण्यापूर्वी..

आपण खूप सहजपणे बोलतो, सतत भाषा वापरत असतो. त्यावेळेला नकळत मेंदूत अनेक घडामोडी घडत असतात. विविध अवयवांमध्ये देवाणघेवाण चालू असते. आणि त्यातूनच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं.
ज्यांच्या मेंदूला काही प्रकारची इजा झालेली आहे, ज्यामुळे त्यांच्या भाषेवर परिणाम झाला आहे, अशांच्या मेंदूवर संशोधन करून युनिव्हर्सटिी ऑफ आयोवातील कॉलेज ऑफ मेडिसीनचे डॉ. अंतानियो दमशिओ यांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
मेंदूच्या डाव्या अर्धगोलामध्ये भाषा निर्मिती कशी होते याचे नकाशे त्यांनी दिले आहेत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा विविध भागांमध्ये हे काम चालतं.
(१) काय बोलायचं आहे याचं आकलन असणं.
(२) कोणते शब्द हवे आहेत याचा विचार करून शब्द शोधणं,
(३) त्यानुसार स्वरयंत्रातून योग्य ते ध्वनी निघणं,
(४) त्याच्यातून काही अर्थपूर्ण शब्द तयार होणं. (५) क्रियापदं शोधणं,
(६) योग्य व्याकरण वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार होणं – साधारणपणे अशा कृतींतून एक वाक्य आकाराला येतं. या कृतींसाठी डाव्या अर्धगोलातलं एक मोठं क्षेत्र काम करत असतं.
दमशिओ यांच्या म्हणण्यानुसार मूक व्यक्ती साईन लँग्वेजचा वापर करून बोलते. त्यावेळेला प्रत्यक्ष ध्वनींचं साहाय्य फारसं होत नसलं, तरी काय बोलायचं आहे हे पक्कं माहीत असतं. त्यामुळे हीच भाषाक्षेत्रं वापरली जातात.
या संशोधनाचा वापर अन्य भाषा शिकताना करता येऊ शकतो. त्यानुसार प्रत्येक बारीकसारीक तुकडय़ांकडे लक्ष दिलं तर नव्या भाषेचं आकलन आणि त्यातला ओघवतेपणा वाढवता येऊ शकेल.
याच संशोधनानुसार असंही म्हणता येतं की, ज्यावेळेला माणसं रागाच्या- अतीव संतापाच्या भरात अद्वातद्वा बोलत असतात त्यावेळी बोलण्याची सगळी क्षेत्रं चालू असतात. पण काय बोलावं, कसं बोलावं, आपण नको ते बोलतो आहोत, या गोष्टी बोलल्या नाही तर चालतील यावरचं आकलनाच्या क्षेत्रातलं नियंत्रण काही प्रमाणात सुटतं. कारण संताप या भावनेने या क्षेत्रांचा ताबा घेतलेला असतो. मेंदूने भावनांकडे रक्तप्रवाह सुरू केलेला असतो, त्यामुळे बोलल्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. यामुळे आकलनाच्या क्षेत्रावर नियंत्रण असलं पाहिजे. आपला मुद्दा शांतपणे पोहोचवणं यासाठी कौशल्य असावं लागतं किंवा ते कमवावं लागतं.

 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse
[08/08, 06:50] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १५५*
    *दिनांक- ८ अॉगस्ट १९*

🎯 *भूली हुई यादों..*

जुन्या आठवणींत रमायला माणसांना फार आवडतं. काही माणसांचा ‘आज’ अतिशय दु:खी, अस्वस्थ असतो. का? तर, त्यांना ‘काल’च्या आठवणी त्रास देतात. सारखं डोकं वर काढतात. त्या आठवणी आल्या, की माणसं पुन्हा दु:खी होतात. काय आहे याचं मेंदूतलं कारण?

स्मिथ आणि स्क्वियर या दोघा मेंदूशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात नव्या व जुन्या आठवणींची नोंद घेण्यात आली. काही व्यक्तींना १६० प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं होतं. मात्र, या प्रश्नांची रचना वेगवेगळ्या पद्धतीनं केली गेली होती. उत्तर देताना व्यक्तीला अलीकडचं- पलीकडचं- जुनं – खूप जुनं – अगदी नवं आठवावं लागेल, अशी ही रचना होती. अगदी या १६० प्रश्नांतल्या पहिल्या काही प्रश्नांबद्दलसुद्धा यात विचारलं गेलं. कारण तीच सर्वात अलीकडची आठवण म्हणून ग्राह्य धरली होती.
समाजजीवनविषयक तसंच काही वैयक्तिक प्रश्नही विचारले गेले. हे प्रश्न त्यांच्या नव्या-जुन्या आठवणींच्या संदर्भात होते. प्रत्येक वेळी मेंदूतला रक्तप्रवाह कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आहे, हे तपासलं गेलं. त्यानुसार असं आढळलं, की ‘हिप्पोकॅम्पस’ या मूळ स्मरणक्षेत्रात तर या आठवणी साठवलेल्या होत्याच; मात्र त्याशिवाय ‘फ्रंटल लोब’मध्येदेखील उद्दीपन दिसून आलं. जुन्या आठवणी आठवताना नव्या आठवणींच्या तुलनेत वेळ जास्त लागत होता, तसंच वैयक्तिक आयुष्यातील आठवणी सामाजिक जीवनातल्या आठवणींपेक्षा तुलनेत लवकर आठवत होत्या.
या विषयावर संशोधन सुरू आहे. हिप्पोकॅम्पस व्यतिरिक्त इतर क्षेत्रांची नक्की काय भूमिका आहे, त्यात नक्की कोणत्या स्वरूपाची देवाणघेवाण होते आणि कशासाठी, हे संशोधकांना शोधायचं आहे.
भूतकाळातल्या वाईट आठवणी आठवून काही जण आज आनंदात राहत नाहीत. तर सकारात्मक मनाची माणसं जुन्या काळातल्या चांगल्या आठवणी आठवून आज खूश राहतात. जुन्या आठवणी लक्षात राहणं ही मेंदूसाठी चांगली बाब आहे; मात्र नकारात्मक आठवणींच्या छायेत राहण्यामुळे नकारात्मक रसायनं शरीरात निर्माण होतात. त्यापेक्षा चांगल्या, आश्वासक आठवणी आठवाव्यात. त्याने मेंदू चपळ राहायला मदत होईल. ‘भूली बिसरी यादें’ तितक्याशा वाईट नसतात; पण त्यातच गुंतून वर्तमानाकडे दुर्लक्ष होत असेल, तर मात्र ‘भूली हुई यादों, मुझे इतना न सताओ..’ अशी अवस्था होते!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[16/08, 06:27] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १६१*
*दिनांक-१६ अॉगस्ट १९*

🎯 *डाल्टनचा अणू*

जॉन डाल्टन (१७६६- १८४४)
जुन्या काळात अणूचे अस्तित्व हे फक्त वैचारिकदृष्टय़ा व्यक्त केले गेले होते. प्रयोगांतून काढलेल्या निष्कर्षांद्वारे अणूचे अस्तित्व दर्शवणारा पहिला संशोधक म्हणजे इंग्लंडचा जॉन डाल्टन! डाल्टनची अणूची कल्पना ही जोसेफ लुई-प्राउस्ट, गे-ल्युझ्ॉक आदींनी अठराशे सालाच्या आसपास केलेल्या रासायनिक अभिक्रियांच्या अभ्यासावर आधारलेली होती. खुद्द जॉन डाल्टननेही यासाठी अनेक प्रयोग केले. या सर्व प्रयोगांतून डाल्टनचा अणुसिद्धांत जन्माला आला. यातला एक प्रयोग म्हणजे गे-ल्युझ्ॉकने अभ्यासलेली नायट्रोजनच्या ऑक्साइडची निर्मिती. या निर्मितीत नायट्रोजनचे तीन वेगवेगळे ऑक्साइड तयार होतात. यातील एक ऑक्साइड बनण्यासाठी जितक्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो, त्या तुलनेत दुसऱ्या प्रकारचा ऑक्साइड बनण्यासाठी दुप्पट, तर तिसऱ्या प्रकारचा ऑक्साइड बनण्यासाठी चौपट प्रमाणात ऑक्सिजन लागतो. कार्बनचे ऑक्सिजनबरोबर संयुग होऊन त्याचेही दोन प्रकारचे ऑक्साइड तयार होतात. (आजच्या भाषेत कार्बन मोनोक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड.) यातील दुसऱ्या ऑक्साइडसाठी लागणारे ऑक्सिजनचे प्रमाण हे पहिल्या ऑक्साइडसाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.
या प्रयोगांचे स्पष्टीकरण शोधताना, जॉन डाल्टनने एका निरीक्षणाचा आधार घेतला. सर्वच वायू पाण्यात सारख्या प्रमाणात विरघळत नाहीत. कार्बन डायऑक्साइड वायू हा नायट्रोजनपेक्षा पाण्यात अधिक प्रमाणात विरघळतो. यातून डाल्टनला सुचले की, वायू किती विरघळायला हवा- हे वायूतील कणांच्या वजनावर आणि स्वरूपावर अवलंबून असायला हवे. इथेच डाल्टनला अणूंच्या अस्तित्वाची जाणीव झाली. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया होताना त्यांचे प्रमाण किती हवे- हे त्या मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांच्या वजनानुसार ठरायला हवे. वजनामुळेच या कणांना स्वतचे अस्तित्व प्राप्त होते.

यावरूनच डाल्टनने आपला पाच मुद्दय़ांचा अणुसिद्धांत मांडला : ‘प्रत्येक पदार्थ हा अणूंपासून तयार झालेला असून, तो अणूपेक्षा अधिक विभागता येत नाही. एका ठरावीक मूलद्रव्याचे सर्व अणू सारखेच असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू हे वेगवेगळ्या वजनाचे व वेगवेगळ्या आकारांचे असतात. संयुगे ही या अणूंच्या पूर्णाक संख्येच्या एकत्रित येण्यातून निर्माण होतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे संयुगांतील विविध अणूंची पुनर्रचना.’ जॉन डाल्टनचे हे निष्कर्ष ‘लिटररी अ‍ॅण्ड फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ मँचेस्टर’ने १८०५ साली प्रकाशित केले. त्यानंतर १८०८ मध्ये डाल्टनचा अणुसिद्धांतावर लिहिलेला ‘ए न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी’ हा ग्रंथही प्रसिद्ध झाला.

✍ *हेमंत लागवणकर*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[16/08, 06:27] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१६१*
    *दिनांक-१६ अॉगस्ट १९*

🎯 *भीती*

लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती असते. मोठय़ा माणसांना आपल्याला कशाची भीती वाटते आहे, हे समजतं. त्यांचे ते मार्ग काढू शकतात. पण लहान, विशेषत: शालेय मुलांना भीती वाटते- भीती दाखवली जाते, ते त्यांना नेहमीच घरी येऊन सांगता येतं असं नाही.

शाळेची भीती, काही वेळा विशिष्ट शिक्षकांची, कधी वर्गमित्रांचीही भीती वाटते. कधी कधी कोणी कसली तरी धमकी दिलेली असते. कधी आक्रमक वर्तन केलेलं असतं. व्हॅनमध्ये हवी ती जागा पकडणं, विनाकारण दुसऱ्याच्या वस्तू पळवणं, वस्तू मुद्दाम दुसरीकडे ठेवून गोंधळात पाडणं किंवा मारहाण करणं, असे प्रकार होत असतात. शाळेत या प्रकारे कोणाला तरी भीती दाखवली जाते, हे शिक्षकांना किंवा मोठय़ा माणसांना नेहमीच कळत नाही. सगळं लपवून केलं जातं.
आपलं वागणं सहन केलं जातं आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा त्रास दिला जातो. यामुळे मुलं अजूनच घाबरून जातात. काय करावं, हे त्यांना समजत नाही. पालकांना सांगितलं तर स्वत:ची बाजू ठामपणे मांडता आली पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, आमच्यापर्यंत तक्रारी येऊ  द्यायच्या नाहीत, असं जर पालकांनी सांगितलं तर मुलांना कसलाच आधार मिळत नाही.
काही एका मर्यादेपर्यंत आजच्याही काळात असं सांगणं हे योग्यच आहे. कारण प्रत्येकाला स्वत:ची लढाई अक्षरश: स्वत:च लढायची असते. मात्र, मुलांनी धीट व्हावं यासाठी आधीच प्रयत्न करणं हे वेगळं आणि मुलांना घाबरट म्हणून चिडवून मग त्याला धीट व्हायला सांगणं हे सर्वस्वी वेगळं. मूल अस्वस्थ असेल, काळजी करत असेल, दु:खी असेल वा घरातल्यांवर चिडचिड करत असेल, तर असं का होतं आहे हे समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्याशी स्पष्टपणे बोलावं.
त्यांचं बळ वाढवायला हवं. असे प्रश्न कसे सोडवायचे असतात, कोणत्या वेळेला कोणाची मदत मागायची असते, हे सांगायला हवं. त्याला एकटं आणि एकाकी वाटून उपयोग नाही. कारण यामुळे त्यांना योग्य मार्ग सापडणार नाही. जास्त काळ मूल याच अवस्थेत राहिलं, तर ते त्याच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[19/08, 06:15] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १६२*
*दिनांक- १९ अॉगस्ट १९*

🎯 *अणूचा घटक*

जे. जे. थॉमसन (१८५६-१९४०)

जॉन डाल्टनच्या सिद्धांतानुसार एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असायला हवेत. तसेच डाल्टनचा अणू हा एखाद्या भरीव गोळ्यासारखा, म्हणजेच एकसंध कण असायला हवा. परंतु वास्तव काही निराळेच असल्याचे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रयोगांनी दाखवून दिले. हवेचा अत्यंत कमी दाब असलेल्या नळीतून विद्युत प्रवाह पाठवला, तर त्यामुळे प्रकाशाच्या स्वरूपातला विद्युत विमोच (इलेक्ट्रिक डिस्चार्ज) निर्माण होत असल्याचे अठराव्या शतकातही ज्ञात होते. उच्च दर्जाचे पंप उपलब्ध झाल्यानंतर, जर्मनीच्या ज्युलियस प्ल्युकेर याने १८५८ साली उच्च दर्जाची पोकळी निर्माण करून हेच प्रयोग केले. या प्रयोगांत त्याला, कॅथोडच्या (ऋणभारित इलेक्ट्रोड) विरुद्ध बाजूला असलेला नळीचा भाग, हिरव्या प्रकाशाने चमकायला लागल्याचे दिसून आले. ही दीप्ती कॅथोडमधून निघत असलेले अज्ञात किरण निर्माण करीत असल्याने, या किरणांना ‘कॅथोड किरण’ म्हटले जाऊ लागले. याच किरणांवरील १८७९ सालच्या प्रयोगांत, इंग्लडच्या विल्यम क्रूक्स याला हे किरण चुंबकामुळे दिशा बदलत असल्याचे दिसले. या दिशाबदलाचे स्वरूप या कणांवर ऋण विद्युत प्रभार असल्याचे दाखवत होते. क्रूक्सने वेगवेगळे वायू आणि वेगवेगळ्या धातूंचे इलेक्ट्रोड वापरून हेच प्रयोग केले. परंतु या किरणांमुळे निर्माण होणाऱ्या दीप्तीत कोणताही फरक पडला नाही. यावरून विल्यम क्रूक्स याने हे कॅथोड किरण म्हणजे इलेक्ट्रोडकडून येणारा विद्युत प्रवाहच असल्याचा निष्कर्ष काढला.
सन १८९७ मध्ये इंग्लंडच्या जे. जे. थॉमसन याने अत्युच्च दर्जाची निर्वात पोकळी वापरून केलेल्या प्रयोगांत, नळीच्या बाहेर बसवलेल्या अ‍ॅल्युमियमच्या दोन पट्टय़ांत विद्युत प्रवाह पाठवून विद्युतक्षेत्र निर्माण केले. या विद्युत क्षेत्रामुळे हे ऋण प्रभारित कॅथोड किरण अपेक्षेनुसार धन प्रभारित पट्टीकडे झुकत होते. चुंबकीय व विद्युत क्षेत्रांमुळे होणाऱ्या या कणांच्या मार्गबदलाच्या प्रमाणावरून थॉमसनने या कणांचा विद्युतभार व वस्तुमान काढले. या कणांचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत अत्यल्प होते. या निरीक्षणांवरून कॅथोडपासून निघणारे हे ऋण प्रभारित कण अणूंचे मूलभूत घटक असले पाहिजेत, असा निष्कर्ष थॉमसनने काढला आणि त्यांना ‘इलेक्ट्रॉन’ या नावे संबोधले. अणूतील या घटकाच्या शोधाद्वारे, थॉमसनने अणूचे एकसंध स्वरूप संपुष्टात आणले. वायूंतील विद्युतवहनावरील केलेल्या संशोधनासाठी, थॉमसनला १९०६ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

✍ *हेमंत लागवणकर*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[19/08, 06:15] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १६२*
    *दिनांक- १९ अॉगस्ट १९*

🎯 *ऑनलाइन*

तरुण मुलं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. त्यांना हटकलं तर ती एकदम भडकतात. याचं कारण काय असावं? कधी कधी त्यांच्या चालू टाइमपासमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून चिडू शकतात. तर असंही असू शकतं की, नुकताच मोबाइल हाती आलेल्या मुलांना दुसरं कोणी त्रास देत नाहीये ना. स्वत:ची निराशा आणि हताशा लपवण्यासाठी मुलं-मुली एकदम भडकतात का?
काही गंभीर प्रकार असेही घडतात; ज्याबद्दल सहसा मुलं कोणाशीच काही बोलत नाहीत. मुलं जसजशी मोठी होतात तशी ‘सोशल मीडिया’ हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन जातो असं चित्र सध्या दिसतं आहे. तरुण मुलांना कशावरून तरी घाबरवण्याचे प्रकार ऑनलाइनही चालतात. ग्रुपमध्ये एखाद्याला मुद्दाम त्रास देणं, कोणत्याही कारणावरून हिणवणं, तुझ्याबद्दल काही तरी लिहिणार आहोत, तुझे फोटो टाकणार आहोत, अशा धमक्या काही जण देत असतात. कधी कधी हे अजिबात गंभीर नसतं. कधी कधी मात्र टोकाचं गंभीर असतं.

अनेकदा हे संवाद वाचल्यावर यात काही विशेष नाही असं वाटू शकतं. पण साध्या साध्या शब्दांच्या आडही काही धमक्या असू शकतात. एखाद्याच्या वैगुण्यांवर वाईट पद्धतीने बोट ठेवणं असू शकतं. मुलांना कोणी तरी घाबरवत असेल तर हा त्यांचा दोष नसतो. भीती दाखवणं हा मुळीच लपवण्याचा विषय नाही. जो बळी पडला आहे त्याला दोषी ठरवण्याचे प्रकार व्हायला नकोत. जर मुला-मुलींचा विश्वास असेल की काहीही घटना घडली तरी पालक- शिक्षक कोणीही त्याच्या पाठीशी उभे आहेत, तर मुलं कोणतीही त्रासदायक गोष्ट घरी येऊन नक्की सांगतात. म्हणून याविरोधात योग्य ती कृती करावी लागेल. अशा प्रकारे ऑनलाइन घाबरवण्याचे प्रकार शाळेतल्या मुलांच्या पातळीवर, कॉलेजवयीन मुलांच्या बाबतीत घडू शकतात. ग्रुपमध्ये काय चालतं यावर कोणाचंही नियंत्रण नसतं.
ऑनलाइन त्रास देणं ही तशी साधीसोपी गोष्ट वाटत असली तरी ती भयंकरही आहे. यामुळे मुलंमुली बेचन होतात, निराश होतात, अभ्यासाकडे लक्ष जात नाही. चिंतातुरता वाढते. नकारात्मक भावना मनात साचून राहिल्यामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[21/08, 07:19] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १६४*
*दिनांक-२१ अॉगस्ट १९*

🎯 *बोहरचा अणू*

सन १९११मध्ये अर्नेस्ट रुदरफर्डने सूर्यमालेशी साधर्म्य असलेली अणूरचना सुचवली. या रचनेनुसार अणूतील ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन हे अणूच्या धन प्रभारित केंद्रकाभोवती विविध कक्षांमधून फिरत असतात. रुदरफोर्डच्या या प्रारूपात दोन प्रमुख उणिवा होत्या. प्रस्थापित विज्ञानानुसार, वर्तुळाकार कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन सतत ऊर्जा उत्सर्जति करत राहिले पाहिजेत. यामुळे या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी होत होत त्यांच्या कक्षा लहान व्हायला हव्यात आणि हे इलेक्ट्रॉन अखेर अणुकेंद्रकावर आदळायला हवेत. पण वास्तवात अणू हा स्थिर असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अणूंना ऊष्णता मिळाली, की ते विशिष्ट तरंगलांबींचा प्रकाश उत्सर्जति करतात. यामुळे त्यांचा रेषांच्या स्वरूपातील वर्णपट पाहायला मिळतो. रुदरफर्डच्या प्रारूपानुसार, इलेक्ट्रॉनच्या सततच्या ऊर्जा उत्सर्जनामुळे मूलद्रव्याचा वर्णपट हा रेषांच्या नव्हे, तर अखंड स्वरूपात असायला हवा.
रुदरफोर्डच्या प्रारूपामध्ये असलेल्या या उणिवा दूर करणारे प्रारूप १९१३ साली डेन्मार्कच्या नील्स बोहरने मांडले. यासाठी त्याने क्वांटम मेकॅनिक्स, या नुकत्याच विकसित होऊ घातलेल्या शाखेतील संकल्पनांचा आधार घेतला. बोहरच्या अणूप्रारूपानुसार, इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती ठरावीक कक्षांमधूनच फिरतात. ते दोन कक्षांच्या मधल्या भागात कोणत्याही परिस्थितीत वावरू शकत नाहीत. तसेच प्रत्येक कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ठरलेली असते. यातील प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची मर्यादाही ठरलेली असते. जोपर्यंत हे इलेक्ट्रॉन एका ठरावीक कक्षेत फिरत आहेत, तोपर्यंत ऊर्जेचे उत्सर्जन होत नाही व इलेक्ट्रॉनची ऊर्जाही कमी होत नाही. मात्र जेव्हा या अणूला बाहेरून ऊर्जा पुरवली जाते, तेव्हा मात्र एखादा इलेक्ट्रॉन आपली कक्षा सोडून बाहेरील कक्षेत उडी मारतो. मात्र हे घडण्यासाठी अणूला पुरवली जाणारी ऊर्जा ही ठराविकच असावी लागते. जेव्हा हा बाहेरील कक्षेत गेलेला इलेक्ट्रॉन पुन आपल्या मूळच्या कक्षेत येतो, तेव्हा अणूकडून आधी शोषली गेलेली ही विशिष्ट ऊर्जा एका विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाच्या स्वरूपात उत्सर्जति केली जाते. वर्णपटात दिसणाऱ्या प्रकाशरेषा या याच विशिष्ट तरंगलांबींच्या प्रकाशरेषा असतात. ‘फिलॉसॉफिकल मॅगॅझिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे, नील्स बोहर १९२२ सालच्या नोबेल पारितोषिकास पात्र ठरला. नील्स बोहरच्या या अणुप्रारूपात कालांतराने जरी बदल झाले असले, तरी त्याचा ढाचा मात्र तोच राहिला.

✍ *हेमंत लागवणकर*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[21/08, 07:19] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १६४*
    *दिनांक- २१ अॉगस्ट १९*

🎯 *तुलना*

कोणतीही दोन मुलं सारखी नसतात. एकाच वयाची असली तरी, सख्खी भावंडं आणि जुळी भावंडं असली तरी एकसारखी नसतात. प्रत्येकाला स्वतंत्र अनुभव येतात, त्याप्रमाणे त्यांच्या मेंदूची जडणघडण होत असते. आणि त्यामुळे दोन मुलांमध्ये कधीही तुलना करू नये हे आपल्याला माहीत असतं. पण तरीही तुलना केली जाते.
समाजमाध्यम हे काही वेळा फार चांगलं माध्यम आहे. पण सध्या काही पालकांच्या दृष्टीने हेच अस्वस्थतेचं कारण बनू पाहतंय. असं अनेकदा दिसतं की जिथे पालकांना स्वत:च्या मुलांचे दोषच दोष आणि इतरांच्या मुलांचे गुण सतत दिसत असतात. आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी पालक लहानग्यांशी संबंधित पोस्ट टाकतात आणि ती बघून आपल्या मुलाशी त्या मुलांची तुलना करण्याचा मोह पालकांना आवरत नाही.
लहान मुलांना याचं कारण समजत नाही की आपल्यावर अशा अचानक राग का निघतो आहे? इतरांची उदाहरणं का दिली जाताहेत? आपल्या मुलांचे अंगभूत गुण सुधारण्यासाठी त्याला खतपाणी घालणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यावरून दोन मुलांमधे तुलना करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.
अशी तुलना करताना पालक काय शब्द वापरतात हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण यामुळे अनेकदा ज्या मुलांचं कौतुक  होतं, त्यांच्यातली मूळ कौशल्यं, त्यासाठी असलेली बुद्धीची चमक किंवा घेतलेली मेहनत या गोष्टी गौण राहतात आणि पालकांमुळे मुलांच्या मनात एक प्रकारची स्पर्धेची किंवा ईष्रेची भावना तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रभावना. ही अत्यंत सकारात्मक भावना आहे. पण पालकांमुळे ही भावना चांगल्या प्रकारे निर्माण होत नाही. या भावना प्रगतीकारक नाहीत. मुला-मुलींनी चांगलं काही करावं यासाठी सकारात्मक पद्धतीने प्रेरणा द्यायला हव्यात. तर अयोग्य शब्द वापरून  तुलना करणं ही निश्चितच नकारात्मक प्रेरणा आहे.
कारण दुसऱ्यांची नक्कल करून मोठं होता येत नाही तर आपल्यातल्या गुणांची ओळख पटली तर मुलांमधल्या खऱ्याखुऱ्या गुणांना योग्य न्याय मिळेल. पालकांना हव्या त्या दिशेला मूल वळत नसेल तर त्याचा प्रवाह त्यांनीच शोधावा यासाठी प्रोत्साहन आणि खरं सांगायचं तर तेवढं मोकळेपण मिळायला हवं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[23/08, 07:36] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १६६*
*दिनांक-२३ अॉगस्ट १९*

🎯 *न्यूट्रॉनचा शोध*

जेम्स चॅडविक (इ. स. १८९१-१९७४)

सन १९२० साली इंग्लंडच्या अर्नेस्ट रुदरफर्डने अणुकेंद्रकातील प्रोटॉनचा शोध लावला. त्यानंतर काही काळातच अणूभार आणि अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणूक्रमांक, यांत फरक असल्याचे स्पष्ट झाले. उदाहरणार्थ, हेलियमचा अणूक्रमांक हा दोन असला, तरी त्याचा अणूभार मात्र दोन नसून चार होता. यावरून अणूकेंद्रकात प्रोटॉनव्यतिरिक्त आणखी एखादा कण अस्तित्वात असण्याची शक्यता दिसत होती. १९२० साली लंडनच्या ‘रॉयल सोसायटी’त दिलेल्या व्याख्यानात रुदरफर्डने या वजनदार परंतु विद्युत प्रभाररहित असलेल्या कणाचे भाकीतही केले होते. त्याच्या अपेक्षित गुणधर्माचे वर्णन करताना, रुदरफर्डने या कणांना ‘न्यूट्रॉन’ हे नावसुद्धा दिले.
सन १९३१ मध्ये जर्मनीतील वाल्थेर बोथे आणि हर्बर्ट बेकर हे संशोधक, अल्फा कणांच्या माऱ्यांमुळे विविध मूलद्रव्यांतून होणाऱ्या गामा किरणांच्या व प्रोटॉनच्या उत्सर्जनावर संशोधन करत होते. या प्रयोगांत त्यांनी जेव्हा बेरिलियम या मूलद्रव्यावर अल्फा कणांचा मारा केला, तेव्हा त्यांना विद्युत प्रभार नसलेली, परंतु तीव्र भेदनक्षमता असलेली प्रारणे उत्सर्जित होताना आढळली. त्यानंतरच्या वर्षी आयरिन आणि फ्रेडरिक ज्युलिओ-क्युरी यांनीही पॅरिसमध्ये अशाच प्रकारचे प्रयोग केले. त्यांना असे आढळले की, हे भेदक ‘गामा किरण’ जेव्हा पॅराफिनसारख्या हायड्रोजनयुक्त पदार्थामधून पार होतात, तेव्हा त्या पदार्थामधून प्रोटॉन उत्सर्जित होतात. पॅराफिनमधून वजनदार प्रोटॉन कणांना गामा किरणांनी बाहेर ढकलणे, हे आश्चर्यच होते. त्यामुळे हे गामा किरण असल्याचे, रुदरफोर्डला आणि जेम्स चॅडविक या त्याच्या सहकाऱ्याला पटत नव्हते.

जेम्स चॅडविक हा केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत १९२० सालापासून अणूकेंद्रकातील या अज्ञात कणाचा शोध घेत होता. आता त्यानेही आयरिन आणि फ्रेडरिक ज्युलिओ-क्युरी यांनी केलेल्या प्रयोगांप्रमाणेच पॅराफिनवरील प्रयोग सुरू केले. चॅडविकने या गामा किरणांच्या माऱ्यामुळे पॅराफिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रोटॉन कणांच्या ऊर्जेचा तपशीलवार अभ्यास केला. या संशोधनावरून चॅडविकने, हे किरण म्हणजे गामा किरण नसून ते प्रोटॉनएवढेच वस्तुमान असलेले, अणूच्या केंद्रकातले ‘न्यूट्रॉन’ कण असल्याचा निष्कर्ष काढला. हायड्रोजनच्या अणूइतकेच वजन असल्याने, न्यूट्रॉन कण हे हायड्रोजनच्या केंद्रकांना- म्हणजे प्रोटॉनना पॅराफिनमधून सहजपणे बाहेर ढकलू शकत होते. १९३२ साली लावलेल्या या न्यूट्रॉनच्या शोधामुळे जेम्स चॅडविकला १९३५ सालच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले.

✍ *हेमंत लागवणकर*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[23/08, 07:36] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १६६*
    *दिनांक-२३ अॉगस्ट १९*

🎯 *शिस्तीसाठी धाक*

घरात शिस्त कशी लावावी, हा कळीचा मुद्दा असतो. वास्तविक चांगली शिस्त लागणं ही एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ती अंगवळणी पडण्यासाठी नकारात्मक मार्गाचा अवलंब केला जातो. इथे थोडा गोंधळ आहे.

मुलांनी वेडंवाकडं वागू नये, त्यांच्या आयुष्याला नीटनेटकेपणा असावा यासाठी मुलांना तयार करावं लागतं. त्यामुळे शिस्त ही एक आवश्यक गोष्ट आहे. पण केवळ धाकापोटी नाही, तर स्वत:ला हवं म्हणून आणि पालक किंवा शाळेत शिक्षकांबद्दल असलेला आदर म्हणून अंगी शिस्त यायला हवी.
पसारा आवरायचा आहे; अभ्यास करायचा आहे; गृहपाठ करून ठेवलेली वही विसरायची नाही; वर्गात शिक्षक बोलत असतील तर ते ऐकायचं; हे का ऐकायचं? शिक्षा होईल म्हणून ऐकायचं की स्वत:ला योग्य वाटतं म्हणून ऐकायचं?
यासाठी घरातल्या सर्वानी शिस्तीनं वागायला हवं. कोणाचीही तक्रार असू नये यासाठी घरातली कामं वाटून घेणं, प्रत्येकानं आपापली कामं करणं यावर सर्वाची सहमती घडवून आणावी लागेल. घरातली शिस्त ही धाक दाखवल्याशिवायही लागू शकते.
कदाचित हा मार्ग थोडा अवघड असेल. पण शांतपणा, संयम आणि प्रत्येकाची स्वयंशिस्त हे जमलं तर परिणाम कायमस्वरूपी होतील.
जेव्हा मुलं इतरांच्या संगतीत येतात, तेव्हा ही शिस्त काहीशी बिघडणं नैसर्गिक आहे. एकदा स्वयंशिस्तीचा पाया पक्का असेल तर अशी वळणं येऊन जातील; पण मूळ सवयींत फरक पडणार नाही.
शिस्त लागणं म्हणजे विशिष्ट प्रकारची सवय लागणं. सवय ही बाब न्यूरॉन्सच्या जोडण्यांवर अवलंबून असते. न्यूरॉन्सचं ‘हार्डवायिरग’ झालं, की सवय अंगवळणी पडते. सकारात्मकरीत्या न्यूरॉन्स जुळणं हे फार महत्त्वाचं आहे. एकदा ही जोडणी झाली, की ती सवय लागते.
पण जेव्हा जेव्हा शिस्त लावण्यासाठी मुलांच्या मनात धाक निर्माण करून ठेवणं, प्रत्यक्ष मारहाण करणं, जोरात ओरडणं, अपमानकारक बोलणं आणि मोठय़ा शिक्षा.. अशा गोष्टींची भीती दाखवली जाते, तेव्हा शिस्तीशी नकारात्मक जोडण्या करून ठेवल्या जातात. नकारात्मक जोडण्या असल्यामुळेच शिस्त मोडण्याची इच्छा होते, बंड करावंसं वाटतं. लपूनछपून शिस्त मोडण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. याने कधीही स्वयंशिस्त लागत नाही हे एकप्रकारे सिद्ध होतं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[16/09, 07:00] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १८१*
    *दिनांक-१६ सप्टेंबर १९*

🎯 *गोंधळ*

माणसांना बोलता येतं. पण काही वेळा नक्की काय बोलायचं, याचा मेंदूमध्ये गोंधळ उडतो. शब्द सापडत नाहीत. योग्य अर्थ व्यक्त होईल असे शब्द त्यावेळी आठवत नाहीत. अक्षरओळख असते, वाचता येतं; पण आपण काय वाचत आहोत, याचा अर्थ नेमकेपणानं समजतोच असं नाही. इतरांचा चाललेला संवाद न समजणं, वाचन/वाचलेल्या मजकुराचा अर्थ न लागणं, अंक न समजणं अशा गोष्टी यामुळे घडून येतात. याचा माणसाच्या बुद्धिमत्तेशी काही संबंध नाही. अत्यंत बुद्धिमान माणसाला- ज्याला नव्या कल्पना सुचतात, जो त्याच्या कामात अव्वल आहे, अशा माणसालाही ही समस्या असू शकते.

काय बोलायचं आहे, हे माहीत आहे; पण शब्दांची योग्य क्रमाने जुळवाजुळवी होत नाही. त्यामुळे इतरांशी संवाद साधता येत नाही. काही वेळा प्रत्येक गोष्टीचा शब्दश: अर्थ घेतला जातो. लक्ष्यार्थ समजत नाही. माणसाला व्यवस्थित भाषा येत असते. शब्दसंपत्तीही मेंदूत साठवलेली असते. पण तरीही शब्दांशी झगडा चालू असतो. अशा माणसांना बोलण्यासाठी वेळ लागू शकतो. ते शब्द शोधत असतात. काही वेळा अर्थाचा अनर्थ होईल असेही शब्द तोंडातून बाहेर पडल्यामुळे आणि समोरच्याचा गोंधळ उडाल्यामुळे पुढच्या वेळेला ही माणसं फार जपून बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला वेग राहत नाही.
अनेकदा याचं कारण ताण हे असतं. मेंदूतल्या हिप्पोकॅम्पसमध्ये स्मरणात असलेले शब्द + वर्निक क्षेत्रात घडणारं आकलन + ताणरहित अवस्था म्हणजे अमिग्डालातल्या सर्व भावनांचं योग्य प्रकारे संतुलन. एवढय़ा किमान गोष्टींनी एकत्र येऊन नीट काम करणं आवश्यक असतं. बोलणं, गप्पा मारणं, आठवणीत रमणं, भाषण करणं, सूत्रसंचालन करणं, शिकवणं, वादविवाद घडणं ही सर्व संवादाची साधनं आहेत. संवादासाठी मेंदूतली बरीच क्षेत्रं एकत्र येऊन काम करत असतात. यातल्या एका जरी भागात लहानशा समस्या आल्या, तरी माणसांना योग्य पद्धतीनं बोलता येत नाही.
पण काही वेळा गोष्टी फारच गुंतागुंतीच्या होतात. तेव्हा वैद्यकीय भाषेत याला ‘एफेशिया’ असं म्हणतात. विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये ही समस्या येऊ लागते. ही एक प्रकारची ‘कम्युनिकेशन डिसॉर्डर’ आहे. मेंदूची समस्या आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[19/09, 06:36] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १८४*
*दिनांक- १९ सप्टेंबर १९*

🎯 *ग्रॅहॅम बेलचा दूरध्वनी*

आपला आवाज न ओरडता दूरवर पोहोचवता यावा, ही मानवाची इच्छा काही नवी नाही. यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेकजण असे साधन तयार करण्याच्या प्रयत्नात होते. याच काळात ग्रॅहॅम बेल हा स्कॉटिश-अमेरिकी तंत्रज्ञ ‘हार्मोनिक टेलिग्राफ’ हे साधन विकसित करत होता. विद्युतप्रवाहांत वेगवेगळे बदल घडवून, एकाच तारयंत्रातून एकाच वेळी अनेक संदेश पाठवण्याची शक्यता तो पडताळून पाहत होता. दोन खोल्यांतील एकमेकांना जोडलेल्या तारयंत्रांवरील बेलचे प्रयोग चालू असताना, बाजूच्या खोलीतील सहकाऱ्याने आपल्याकडील यंत्रातील घट्ट झालेली एक विशिष्ट पट्टी मोकळी करण्यासाठी वर-खाली केली. यामुळे बेलच्या खोलीतील साधनावर एक हळू, पण स्पष्ट आवाज ऐकू आला. या अनपेक्षित घटनेनंतर बेलने आपले लक्ष तारयंत्रावरून काढून प्रत्यक्ष आवाजाच्या प्रक्षेपणावरील प्रयोगांवर केंद्रित केले.
बेलने आपल्या एका प्रयोगात अतिपातळ पटल घेऊन त्याच्या पृष्ठभागाला एक सुई उभी जोडली. त्यानंतर एका भांडय़ात पाणी घेऊन विद्युतप्रवाहाचे वहन होण्यासाठी त्यात थोडेसे आम्ल मिसळले. आता पटलाला जोडलेली सुई या द्रावणात अर्धवट बुडत होती. बेलने नंतर या सुईतून व द्रावणातून विद्युतप्रवाह पाठवला. या पटलाजवळ काही आवाज केला, तर त्यामुळे पटल कंप पावायचे, सुई द्रावणात वर-खाली व्हायची आणि त्यामुळे विद्युतप्रवाहात किंचितसे बदल व्हायचे. विद्युतप्रवाहातील हे बदल याच विद्युतमंडलाजवळ, परंतु दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या पट्टीपर्यंत पोहोचून ती पट्टी कंप पावायची आणि त्यातून नेमका तोच आवाज निर्माण व्हायचा. हा होता १० मार्च १८७६ रोजी तयार झालेला ग्रॅहॅम बेलचा पहिलावहिला दूरध्वनी!

पाण्याचा वापर करणारा हा दूरध्वनी व्यावसायिक वापराला सोयीचा नसल्याने, त्यानंतर काही आठवडय़ांतच बेलने दूरध्वनीचे स्वरूप यशस्वीरीत्या बदलले. नव्या दूरध्वनी यंत्रात त्याने अतिपातळ पटलाला लोखंडाचा तुकडा जोडला. आवाजामुळे पटलात आणि पर्यायाने लोखंडाच्या तुकडय़ात निर्माण होणारी कंपने थेट जवळच्या विद्युतमंडलातील विद्युतप्रवाहात बदल घडवून आणायची. विद्युतप्रवाहातील या बदलामुळे दूरवरच्या, लोखंड जोडलेल्या पटलात अशाच प्रकारची कंपने निर्माण होऊन तोच आवाज ऐकू यायचा. १८७६ सालच्या जून महिन्यात फिलाडेल्फियात भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ग्रॅहॅम बेलने हे आपले क्रांतिकारी यंत्र सर्वापुढे सादर केले आणि दूरसंपर्कशास्त्राला नवे वळण लाभले.

✍ *सुनील सुळे* office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[19/09, 06:37] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १८४*
    *दिनांक-१९ सप्टेंबर १९*

🎯 *काळजी कशा कशाची?*

माणूस हा आनंदी होण्यासाठी जन्माला आला आहे की काळजी करण्यासाठी, असा प्रश्न पडतो. कारण काळजी करणं हा मानवी स्वभावाचाच एक भाग होऊन गेलेला असतो. काळजी करण्यासारखी परिस्थिती असेल आणि योग्य काळजी घेऊन प्रश्न सुटणार असतील, तेव्हा हे योग्यच आहे. पण काय होईल, काही चुकीचं किंवा वाईट होणार तर नाही ना, याची काळजी करणं हे मेंदूसाठी फारसं बरं नाही.

एका प्रमाणापर्यंत काळजी करणं हा प्रेमभावनेचा एक भाग आहे. मेंदूमध्ये ‘ऑक्सिटोसिन’ हे प्रेमाचं रसायन निर्माण होतं. पण याचं प्रमाण अतिरिक्त वाढतं व प्रचंड काळजी वाटत राहते आणि तशीच सवय बनून जाते. तेव्हा या काळजीचं (केअर) रूपांतर चिंतेमध्ये (वरीज्) होतं. सकारात्मक आणि आनंदी भावनेचं रूपांतर नकारात्मक रसायनांमध्ये आणि त्यामुळेच नकारात्मक भावनेमध्ये होतं.
स्वत:ची काळजी, मुलांची किंवा आई-बाबांची, जवळच्या नातेवाईकांची आणि इतरांची काळजी. या सर्वाच्या वागण्याची, आरोग्याची, अभ्यासाची, नोकरी-व्यवसायाची, बढतीची, वृद्धापकाळाची. त्यांना दुसऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची किंवा त्रास होऊ  नये याची काळजी. आयुष्यात दु:ख न मिळता सुख-समाधानच मिळावं याची काळजी. कधीच न संपणाऱ्या आर्थिक काळज्या. याशिवाय समाजाची, देशातल्या ढासळत्या परिस्थितीची, वाढत्या गुन्हेगारीची, अपघातांची आणि अशाच किती तरी काळज्या मनात घर करून राहिलेल्या असतात.
यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच.. आपण निर्थक काळज्या करत असतो, तेव्हा आपलं मन भरकटतं. एकाग्रतेनं काम होत नाही. त्यामुळेच निर्णयक्षमता गमावून बसतो. आपण जास्तीत जास्त काय वाईट होऊ  शकतं, याची प्रत्यक्ष कल्पना करतो व मनानं परिस्थिती स्वीकारतो, तेव्हा चित्रविचित्र कल्पना बाजूला पडून समस्येकडे लक्ष केंद्रित होतं. कारण नसताना वा ज्यावर आपण काही करू शकत नाही अशा काळज्या बाजूला ठेवून तार्किक पद्धतीनं विचार करणं, तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष पावलं उचलणं या गोष्टी व्हाव्यात. यामुळे ‘कॉर्टिसोल’चं प्रमाण कमी होऊन सारासार विचारशक्ती काम करायला लागते. सतत काळजीत राहिलो, तर शरीराचा रक्तप्रवाह ‘लिंबिक सिस्टीम’कडे- म्हणजे भावनांच्या प्रदेशातच घोटाळत राहतो. तो विचारांच्या प्रदेशाकडे- म्हणजेच ‘निओ कॉर्टेक्स’कडे वळवायचा असेल, तर सक्तीनं तार्किक विचार करावे लागतात.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[23/09, 07:00] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १८६*
*दिनांक-२३ सप्टेंबर १९*

🎯 *विजेचा दिवा*

विजेचा दिवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सर्वत्र सहजपणे दीर्घकाळासाठी वापरता येईल असा विजेचा दिवा जरी १८७०च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी शास्त्रज्ञ थॉमस एडिसनने विकसित केला असला, तरी या दिव्याची जन्मकथा त्याआधी कित्येक दशके सुरू होते. १८०९ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याने कार्बनच्या काडय़ांचा वापर करून ‘आर्क लॅम्प’ बनवला. यात दोन कार्बनच्या काडय़ांमधल्या लहानशा फटीतील हवेतून विद्युत मोचन (डिसचार्ज) होऊन डोळे दिपवून टाकणारा प्रकाश निर्माण व्हायचा, पण तो अल्पकाळच टिकून राहायचा. काही काळ अगोदर याच हम्फ्री डेव्ही याने प्लॅटिनमच्या पट्टीमधून विद्युतप्रवाह पाठवून, त्याच्या विद्युतरोधामुळे (रेझिस्टन्स) निर्माण होणाऱ्या उष्णतेद्वारे प्रकाश निर्माण करण्याची सूचना केली होती. १८२० साली इंग्लंडच्या वॉरेन दे ला ऱ्यू याने प्लॅटिनमच्या तारेचे वेटोळे निर्वात नळीत ठेवले आणि त्यातून विद्युतप्रवाह पाठवून अशा प्रकारचा विजेचा दिवा तयार केला. परंतु हा दिवा त्यातील प्लॅटिनममुळे अत्यंत महागडा ठरला.
यानंतरच्या काळात दिव्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून पाहिले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात निर्वातीकरणासाठी वापरण्यात येणारे पंप फारसे प्रगत नव्हते. त्यामुळे अशा काचगोळ्यांमध्ये हवा राहायची आणि हे प्रकाश देणारे विविध पदार्थाचे धागे अल्पावधीतच जळून खाक व्हायचे, शिवाय या काचेला आतून काजळीचा थरही बसायचा. १८६४ साली हर्मान स्प्रेंगेल याने लंडनमध्ये चांगल्या प्रतीचा, पाऱ्याचा वापर करणारा पंप बनवला आणि कार्बनवर आधारलेले धागे दिव्याच्या बल्बमध्ये वापरणे सुलभ झाले. सन १८७९ च्या सुमारास अमेरिकी संशोधक थॉमस एडिसन आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही विविध प्रकारचे कार्बनयुक्त तंतू वापरून हजाराहून अधिक दिव्यांच्या चाचण्या घेतल्या. त्यातील कापसाच्या तंतूंपासून बनवलेला दिवा सुमारे साडेचौदा तास चालला. त्यानंतर एडिसनने

यात आणखी बदल करत अखेर बांबूच्या तंतूंपासून दिवा तयार केला. या दिव्याचे आयुष्य बाराशे तासांचे होते! १९००-१० या दशकात दिव्यातील कार्बनची जागा त्याहून टिकाऊ , परंतु स्वस्त असणाऱ्या टंगस्टन धातूने घेतली. पुढे निर्वातीकरणाऐवजी काचगोळ्यात नायट्रोजनसारखा उदासीन वायूही वापरात आला. अशा रीतीने अनेक समस्यांवर मात करीत तयार झालेला हा आद्य विद्युतदीप आजही क्वचित कुठे मंद सोनेरी प्रकाश देत तेवत असलेला दिसून येतो.

✍ *सुनील सुळे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[23/09, 07:00] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १८६*
    *दिनांक-२३ सप्टेंबर १९*

🎯 *उच्च प्रेरणा*

आपल्याला जमेल तेवढं कष्ट करणारी, नाही जमलं तर सोडून देणारी किंवा प्रत्यक्ष कामाला भिडण्याआधीच ‘नाही’ म्हणणारी अशी काही माणसं असतात. आता सगळं संपलं, समोर पराभव दिसतो आहे, अशा वेळेला आपले प्रयत्न संपवून टाकणं हा एक प्रकारचा स्वभाव आहे. परंतु शेवटपर्यंत हार न मारणारे, प्रयत्न न सोडणारे खेळाडू आपण अनेक खेळांमध्ये बघितलेले आहेत. कोणाची तरी हार किंवा जीत होणार हे माहीत असलं, तरीसुद्धा यशाला आपल्या बाजूनं वळवण्याचा अथक प्रयत्न करणारे काही जण असतात. योग्य त्या मार्गानं सर्व प्रयत्न करणे हे या माणसांचं वैशिष्टय़ असतं.

आपण जो प्रयोग करत आहोत, त्या प्रयोगातून नक्की काय साध्य होणार आहे, खरंच काही साध्य होणार आहे की हा प्रयोग सपशेल अयशस्वी होणार आहे, हे माहीत नसताना अत्यंत चिकाटीनं अहोरात्र कष्ट करून एखाद्या शोधामागे लागलेले संशोधक असतात.
गाण्याची एखादी तान आपल्या गळ्यावर यावी म्हणून तासन्तास रियाज करणारे गायक, नृत्यातला योग्य पदन्यास जमावा यासाठी प्रयत्न करणारे नर्तक, नाटक वा चित्रपटामध्ये योग्य पद्धतीनंच संवादफेक जमावी यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न करणारे अभिनेते/ अभिनेत्री, कंपनीला यशाच्या शिखरावर नेणारे उद्योजक.. या साऱ्यांमध्ये ध्येय गाठण्यासाठी प्रचंड ध्यास असला पाहिजे.
अशा स्वभावाच्या माणसांमध्ये काही तरी सामायिक गोष्ट असते. हा स्वभाव सगळ्यांकडे का नसतो? काहीच माणसांकडे का असतो? अशी कोणती प्रेरणा त्यामागे कार्यरत असते, की ज्यामुळे ही माणसं कोणत्याही परिस्थितीत हातातलं काम अर्धवट तर टाकत नाहीतच, पण अत्यंत उच्च मानसिक शक्ती वापरून ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतात. त्यांना प्रेरणेसाठी कोणतंही घातक उत्तेजक औषध घ्यायची गरज नसते.
या विषयावर अनेक संशोधनं झाली आहेत. या संशोधनातून पुन्हा एक गोष्ट अधोरेखित होते. या माणसांवर ‘डोपामाइन’ या रसायनाचा प्रभाव जास्त असतो. या रसायनाचं कामच हे आहे, की माणसाचं लक्ष पुन:पुन्हा ठरवलेल्या ध्येयाकडे वळवायचं. ‘सहज मिळालं तर ठीक, जास्त आटापिटा नको’ या पायरीवरून ‘मिळवायचंच आहे, करून दाखवायचंच आहे’ या दोन उक्तींमध्ये जे अंतर आहे, त्यामागे हे रसायन आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[24/09, 06:43] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १८७*
*दिनांक-२४ सप्टेंबर १९*

🎯 *राइट बंधूंचे विमान*

मानवाची आकाशात झेप घेण्याची इच्छा फार पुरातन आहे. सुरुवातीच्या काळात आकाशात झेप घेण्यासाठी हायड्रोजनसारख्या वायूने भरलेले फुगे किंवा मोठय़ा फुग्यासारखे ‘झेपेलिन’, तसेच पतंगासारखी ग्लायडर वापरात आली. ग्लायडरला बांधलेल्या दोऱ्या पकडून तीन-चार जण जोरात धावायचे. या धावण्यामुळे ही ग्लायडर पतंगासारखी हवेत वर जायची. त्यानंतर धावणाऱ्यांच्या हातातल्या दोऱ्या सोडून दिल्या जायच्या आणि ग्लायडर हवेत उडायचे. अनेक उत्साही वैमानिकांना ही ग्लायडर चालवत असताना अपघाती मृत्यू आले. यापैकी ग्लायडरच्या अपघातात मृत्यू पावलेल्या ओटो लिलेन्थाल या जर्मन संशोधकाने ग्लायडरचा शास्त्रोक्त अभ्यास केला होता.
अमेरिकेत डेटन येथील ऑव्‍‌र्हिल आणि विल्बर राइट या सायकलचे दुकान चालवणाऱ्या बंधूंना ग्लायडिंगचा छंद होता. लिलेन्थालला झालेला अपघात हा ग्लायडरवर पुरेसा ताबा ठेवता येत नसल्यामुळे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पंख्याचा आकार हा ग्लायडरच्या स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी जाणले. १९०० सालापासून उत्तर कॅरोलिनातील किट्टी हॉक येथील प्रशस्त समुद्रकिनाऱ्यावर सुरू केलेल्या चाचण्यांत त्यांनी ग्लायडरच्या पंखांत अनेक बदल करून पाहिले. यातील अपयशानंतर अखेर राइटबंधूंनी घरगुती स्वरूपाचा, पत्र्याचा छोटासा बंदिस्त ‘विंड टनेल’ तयार केला. एका बाजूला पंखा लावलेल्या या साधनाच्या आत, ग्लायडरच्या छोटय़ा प्रारूपांच्या उड्डाणाचे बाहेरील काचेतून निरीक्षण करता येई. या चाचण्यांवरून राइट बंधूंनी अनेक ग्लायडर तयार करून, ती १९०२ साली किट्टी हॉक येथून उडवून पाहिली. वर-खाली, डावीकडे-उजवीकडे, स्वत:भोवती अशा सर्वच नियंत्रणासाठी त्यांनी या ग्लायडरच्या पंखात सोयी केल्या होत्या.

त्यानंतर १९०३ मध्ये त्यांनी, यापैकीच समाधानकारक ठरलेल्या एका ग्लायडरची थोडी मोठी आवृत्ती बनवली. स्प्रूसच्या हलक्या लाकडाची चौकट आणि मलमलसारखे तलम कापड वापरून केलेल्या या ‘विमाना’चे वजन पावणेतीनशे किलोग्रॅम होते आणि त्याच्या पंखांचा (विंग) पसारा बारा मीटरचा होता. वर उचलले जाण्यासाठी या विमानाला अडीच मीटर व्यासाचे पंखे (प्रॉपेलर) होते. हे पंखे फिरवण्यासाठी विमानात इंजिन बसवण्यात आले होते. १७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंच्या या ‘राइट फ्लायर’ विमानाने स्वबळावर आकाशात झेप घेतली आणि विमानयुगाला सुरुवात झाली! या दिवशीच्या सर्वोत्तम उड्डाणात या विमानाने ५८ सेकंदांत सुमारे पाव किलोमीटरचा प्रवास केला.

✍ *सुनील सुळे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[24/09, 06:43] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१८७*
    *दिनांक-२४ सप्टेंबर १९*

🎯 *मनातल्या विचारांवर प्रकाश*

आपला मेंदू सतत कोणती ना कोणती तरी माहिती ग्रहण करत असतो. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांमधून मेंदूवर सतत कोणती ना कोणती तरी माहिती येत असते. या आवश्यक आणि अनावश्यक माहितीतलं मेंदूतल्या हिप्पोकॅम्पसमध्ये काय साठवून ठेवायचं आणि काय नाही, याचा निर्णयही मेंदू्च घेतो. परंतु ज्या वेळी ही माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूच्या विविध संबंधित अवयवांपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा नेमकं घडतं काय?

ज्ञानेंद्रियांद्वारा आलेली माहिती विद्युत संदेश या प्रकारची असते. एक न्यूरॉन विद्युत स्वरूपात संदेश आणतो. आणलेली माहिती अ‍ॅक्झॉनद्वारे दुसऱ्या न्यूरॉनला दिली जाते. या प्रक्रियेत विद्युत संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं. अवघ्या काही सेकंदांत हा सारा व्यवहार घडून येतो.
माणूस नवनवीन माहिती ग्रहण करत असतो आणि मेंदू अशा प्रकारे अखंडपणे न्यूरॉन्सच्या जोडण्या करण्याच्या कामात असतो. अशा जोडण्या होतात, हा शोध डोनाल्ड हेब या कॅनेडियन संशोधकानं १९४९ मध्ये लावला. यामुळेच माणसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर खऱ्या अर्थानं प्रकाश पडला. हेब यांना ‘न्यूरोसायकोलॉजी’चे जनक मानलं जातं.
या आधारावर संशोधकांनी संशोधन सुरू ठेवलेलं आहे. त्यामधला एक मुख्य भाग म्हणजे- ज्या वेळी या न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात, त्या वेळी ती माहिती नेमकी कशा प्रकारे मेंदू साठवून ठेवत असेल? यात संशोधकांना दोन प्रकार आढळून आले आहेत :
(१) एकाच वेळेला सर्व माहिती पुरवणं आणि ती साठवून ठेवणं हा एक प्रकार; आणि
(२) पुन्हा काही वेळानंतर ती माहिती नक्की पोहोचली आहे की नाही, हे बघणं आणि ती पाठवत राहणं. यावर संशोधन सुरू आहे.
ज्या वेळी हे संशोधन पूर्ण होईल, त्या वेळी एखादा विषय आत्मसात करत असताना, शिकत असताना मेंदूत नक्की कोणत्या स्वरूपाच्या रचना होतात, कोणत्या क्रमानं मेंदू लक्षात ठेवतो, माणूस जेव्हा मनातल्या मनात एखादा विचार करतो तेव्हा मेंदूमध्ये कशा प्रकारे प्रक्रिया घडतात, हे समजणं अधिक सोपं होईल. मेंदूसंशोधनातला हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[25/09, 07:39] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१८८*
*दिनांक-२५ सप्टेंबर१९*

🎯 *स्थिरावरणाचा शोध*

वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होऊ लागते. सन १७८७ साली होरस डी सॉश्युअर या जिनेव्हातील संशोधकाने माउंट ब्लांक या पर्वतावर विविध उंचीवर उपकरणे ठेवून तापमानाचे मापन केले. या मापनानुसार प्रत्येक शंभर मीटर उंचीवर तापमानात सरासरी ०.७ अंश सेल्सियसची घट होत होती. कालांतराने जर्मन संशोधक हेल्महोल्ट्झ आणि इतर काही संशोधकांनी हे तापमान वाढत्या उंचीबरोबर कमी होत होत ३० किलोमीटर उंचीवर शून्याखाली २७३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल, असे गणित मांडले. या तापमानाला पदार्थातील अणूंची हालचाल थांबते!
उंचावरील हवेचे तापमान शोधून काढण्यासाठी गरम हवेच्या, मानवरहित फुग्यांचा वापर १८९२ साली पॅरिस येथून सुरू झाला. विविध उपकरणे बसवलेले हे फुगे पुन्हा जमिनीवर पडल्यानंतर, त्यातील उपकरणांनी नोंदवलेल्या माहितीचा अभ्यास केला जायचा. हे फुगे दहा किलोमीटरपेक्षा अधिक उंची गाठत होते. तापमानाच्या नोंदींवर सूर्यकिरणांचा परिणाम होऊ नये म्हणून ही उड्डाणे रात्री केली जायची. १८९६ साली १३-१४ नोव्हेंबरच्या रात्री पॅरिसहून केल्या गेलेल्या उड्डाणातल्या फुग्याने ११,७०० मीटर आणि १४,००० मीटर उंचीवर असताना अनुक्रमे शून्याखाली ५१ अंश व शून्याखाली ५३ अंश सेल्सियसची नोंद केली. तापमानाचे असे जवळपास स्थिर राहणे अपेक्षित नसल्याने, ही मापनातील त्रुटी असल्याचे मानले गेले. खरे तर हा एक महत्त्वाचा शोध होता! अशा प्रकारच्या नोंदी त्या काळातल्या अनेक उड्डाणांत केल्या गेल्या.

अखेर १९०२ साली फ्रान्सच्या टायसेरेन दे बोर्त याने, १८९२ सालापासून पॅरिसमधून केल्या गेलेल्या २३६ उड्डाणांतील माहितीचे विश्लेषण पॅरिसच्या फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस्कडे सादर केले. या विश्लेषणात त्याने काही (आठ ते बारा) किलोमीटरनंतर वातावरणाचे तापमान स्थिर होत असल्याचे स्पष्ट केले. स्थिर तापमानाचा हा पट्टा काही किलोमीटर जाडीचा असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली. यानंतर अल्पावधीतच जर्मनीच्या रिशार्ड अ‍ॅसमान यानेही १९०१ साली एप्रिल ते नोव्हेंबर या काळात बर्लिनहून केल्या गेलेल्या सहा उड्डाणांवर आधारलेले, अशाच प्रकारचे निष्कर्ष जाहीर केले. अ‍ॅसमानने या उंचीवर गरम वाऱ्याचे प्रवाह वाहत असण्याची शक्यता दर्शवली होती. पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याचे दर्शवणारा हा शोध हवामानशास्त्राच्या वाटचालीत महत्त्वाचा मानला गेला आहे.

✍ *डॉ. राजीव चिटणीस*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[25/09, 07:39] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१८८*
    *दिनांक-२५ सप्टेंबर १९*

🎯 *नियोजनातला मदतनीस : ‘ग्रे मॅटर’*

आपल्या मेंदूमध्ये ‘ग्रे मॅटर’ या नावाचा एक भाग असतो. योग्य प्रकारे निर्णय घेणं हे या भागाचं मुख्य काम. ज्या माणसांचा ग्रे मॅटर हा योग्य प्रकारे काम करतो, ती माणसं अधिक नीटनेटकी, सर्व गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करणारी आणि नियोजनाप्रमाणे वेळेत कामं पार पाडणारी अशी असतात. ही माणसं केवळ काम नीट पार पाडतात असं नाही, तर यांची विचारप्रक्रिया अतिशय व्यवस्थित असते.

स्वत:चं आरोग्य, आहार, व्यायाम, आचार-विचार या सर्व बाबतींत अशी माणसं संतुलित असतात. सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, या माणसांचं आपल्या भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण असतं. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व इतर लोकांपेक्षा वेगळं दिसतं, उठून दिसतं. या सर्व सवयींचा फायदा त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी होत असतो. आपल्या मेंदूची काळजी नीट घेतल्यामुळे आणि मेंदूतल्या ग्रे मॅटरनं त्यांना साथ दिल्यामुळे, अशा माणसांचा मेंदू हा वृद्धापकाळीसुद्धा अतिशय निरोगी असतो, कार्यरत असतो.
याउलट बोलायचं, तर जी माणसं अशा प्रकारची काळजी घेत नाहीत, चुकीचा आहार, चुकीची दिनचर्या, चुकीची जीवनशैली अंगीकारलेली असते, त्यांच्या मेंदूतली रसायनं असंतुलित होतात. अशी माणसं चिडचिडी असतात. व्यक्ती आणि प्रसंगांशी जुळवून घेऊ  शकत नाहीत. पटकन भावनांच्या आहारी जातात. स्वत:च्या आरोग्यावर आणि त्यायोगे विचारांवर परिणाम करून घेत असतात. जी माणसं नकारात्मक भावना कवटाळून बसतात, त्या माणसांच्या एकूण आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
संशोधकांच्या मते, अशांच्या मेंदूचा आकार काहीसा आखूडही होतो. चिडचिडणाऱ्या माणसांच्या हातून चुकाही जास्त घडतात. निर्णयक्षमता काहीशी कमी होते. नवीन गोष्टी शिकायला अडचणी येतात. नियोजन करताना काही चुका राहून जातात. सर्व बाजूंनी विचार करायचा असला, तरी महत्त्वाचे मुद्दे निसटून जातात; ते लक्षातच येत नाहीत किंवा विस्मरणात जातात.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात; परंतु त्या अडचणींनी खचून जाऊन, स्वत:ला दु:खात – नैराश्यात ठेवणं यामुळे मेंदूवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन मेंदूची आणि विशेषत: आतल्या ग्रे मॅटरची काळजी सर्वानीच घ्यायला पाहिजे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[26/09, 07:18] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१८९*
*दिनांक- २६ सप्टेंबर १९*

🎯 *फसवे करोनियम*

मूलद्रव्यांची ओळख पटवण्यात वर्णपटशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. ७ ऑगस्ट १८६९ रोजी उत्तर अमेरिकेतून दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणात विल्यम हार्कनेस आणि ऑगस्टस यंग या संशोधकांना सूर्याभोवती दिसणाऱ्या सौरप्रभेच्या (करोना) वर्णपटात एक हिरवी रेषा दिसली. या रेषेचे वर्णपटावरील स्थान पाहता ही रेषा सौरप्रभेतील लोहामुळे निर्माण झाल्याचे दिसून येत होते. पण या वर्णपटात लोहाच्या इतरही अनेक रेषा दिसायला हव्या होत्या. या इतर रेषा मात्र या वर्णपटात दिसत नव्हत्या. त्यानंतर १८९८ साली जेव्हा अधिक अचूक उपकरणांद्वारे या रेषेची तरंगलांबी मोजली गेली, तेव्हा लोहामुळे निर्माण होणाऱ्या रेषेपासून ही रेषा किंचितशी दूर असल्याचे दिसून आले. यावरून ही रेषा एका नव्या मूलद्रव्यामुळे निर्माण झाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे मूलद्रव्य सौरप्रभेत आढळल्याने त्याला ‘करोनियम’ हे नाव दिले गेले. आवर्तसारणीची निर्मिती करणाऱ्या दीमित्री मेंडेलीव्हनेही या मूलद्रव्याची दखल घेतली. मेंडेलीव्हच्या मते, या अज्ञात मूलद्रव्याचा अणू हायड्रोजनच्या अणूच्या तुलनेत कमी वस्तुमानाचा असायला हवा.
दरम्यानच्या काळात, अणुरचनाशास्त्रातील प्रगतीमुळे वर्णपट आणि अणूंची रचना यांतील संबंध स्पष्ट झाला. सन १९४० च्या सुमारास, जर्मन संशोधक वाल्टेर ग्रोट्रिआन आणि स्वीडिश संशोधक बेंग्ट एडलेन यांनी आपल्या संशोधनाद्वारे सौरप्रभेच्या वर्णपटावरील ही रेषा करोनियम या मूलद्रव्यामुळे नव्हे, तर लोहामुळेच निर्माण होत असल्याचे दाखवून दिले. लोहाच्या अणूतील २६ इलेक्ट्रॉन्सपैकी जर १३ इलेक्ट्रॉन्स दूर केले, तर लोहाचा उर्वरित आयनिभूत अणू अशा प्रकारची रेषा निर्माण करू शकत होता. मात्र, लोहाचे इतक्या मोठय़ा प्रमाणात आयनिभूत होणे, हे सौरप्रभेचे तापमान किमान दहा लाख अंश सेल्सियस असले तरच शक्य होणार होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान फक्त सहा हजार अंश सेल्सियस असताना सूर्यापासून हजारो किलोमीटरच्या अंतरापर्यंत पसरलेली ही सौरप्रभा इतकी तप्त असणे, हे एक वैज्ञानिक आश्चर्यच मानले गेले. ही सौरप्रभा ‘सौरवाऱ्यां’च्या स्वरूपात अंतराळात सर्वत्र प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनसारखे विद्युतभारित कण उधळत असते. पृथ्वीचे चुंबकत्व हे आपल्या दिशेने येणाऱ्या कणांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही किलोमीटर अंतरावर व्हॅन अ‍ॅलन पट्टय़ांच्या स्वरूपात थोपवते आणि यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे या कणांपासून रक्षण होते.

✍ *डॉ. राजीव चिटणीस*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[26/09, 07:18] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १८९*
    *दिनांक- २६ सप्टेंबर १९*

🎯 *वेदनांची मुळं*

माणूस दु:खी असतो तो कशा कशामुळे? याची कारणं शोधून एक यादी करायला घेतली, तर केवढी मोठी यादी होईल! त्या यादीमध्ये अनेक प्रकार आणि उपप्रकार असतील.

‘सेंटर फॉर डिसीज् प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल’ या अमेरिकेतल्या संस्थेमार्फत एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात, ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या आजारांमुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शारीरिक वेदना सहन कराव्या लागत होत्या, अशा व्यक्तींची सखोल माहिती घेण्यात आली.
विशिष्ट प्रकारच्या वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही. याचं मूळ त्या व्यक्तीच्या शरीरात होणाऱ्या बदलांमध्ये आहे, की चुकीच्या सवयींमध्ये आहे, की अयोग्य आहार, अयोग्य औषधं यांमध्ये आहे, की इतरत्र कुठं आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. त्या वेळी संशोधकांना आढळून आलं, की ज्या व्यक्तीला आयुष्यात खूप दु:ख सहन करावं लागतं, त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा परिणाम तिच्या शरीरावर होत असतो. आयुर्वेदानंही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे.
नक्की कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना याचा जास्त त्रास होतो आहे, हे जेव्हा शोधून काढलं तेव्हा माणसांच्या वेदनांची मुळं केवळ शरीरात नाही, मनात नाहीत, तर समाजात असल्याचं आढळून आलं. तिथले सामाजिक प्रश्न वेगळे आहेत. परंतु अस्थिर समाज, माणसांचं हिंसायुक्त वर्तन, निम्न सामाजिक दर्जा, बेभरवशाचे आर्थिक स्रोत,  मानसिक-बौद्धिक ताणयुक्त कामं.. अशा ढासळलेल्या सामाजिक परिस्थितीमुळे मानसिक परिणाम व मानसिक परिणामांमुळे शरीरामध्ये वेदना निर्माण होतात, असा हा संबंध आहे हे लक्षात येतं.
माणसाला असलेल्या शारीरिक वेदनांचं मूळ शोधण्यासाठी समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि मेंदूशास्त्र या सर्वाचा एकमेकांशी असलेला संबंध या संशोधनात शोधला गेला.
आर्थिक स्थिती आणि मानसिक स्थिती यांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात येणं ही नव्यानं लक्षात आलेली गोष्ट नाही. परंतु या संस्थेच्या अभ्यासानुसार, माणसाच्या मेंदूवरदेखील याचा थेट परिणाम झालेला असतो. या परिणामामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये प्रत्यक्ष वेदना दिसून येतात, हे तंत्रज्ञानामध्ये झालेल्या नवीन बदलांमुळे अधोरेखित झालं आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[30/09, 06:46] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१९१*
*दिनांक- ३० सप्टेंबर १९*

🎯 *एल निन्यो – ला निन्या*

‘एल निन्यो’ ही हवामानातली दर तीन ते सात वर्षांच्या अंतराने घडणारी घटना एक चर्चेचा विषय बनलेली आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पेरू या देशातल्या मच्छीमारांना या घटनेची पूर्वीपासून जाणीव होती. एखाद्या वर्षी, दक्षिण गोलार्धातल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत, तिथल्या तीव्र उन्हाळ्यामुळे समुद्राचे तापमान नेहमीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सियस जास्त असते. या वेळी या प्रदेशातले सागरी हवामानही खराब झालेले असते. अशा काळात मासेमारीसुद्धा फार कमी होते. ही घटना ख्रिसमसच्या सुमारास घडत असल्यामुळे मच्छीमारांनी त्याला नाव दिले आहे- ‘एल निन्यो’ (लहान मुलगा, म्हणजेच नवजात येशू ख्रिस्त)! काही वर्षी मात्र तिथल्या हवामानाची स्थिती याच्या अगदी उलट असते. अशा हवामानाला ‘ला निन्या’ (म्हणजे लहान मुलगी) म्हणतात!
सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश हवामानतज्ज्ञ गिल्बर्ट वॉकर याने दक्षिण गोलार्धातील उष्णकटिबंधीय प्रदेशांतल्या सागरी हवामानात होणाऱ्या चढ-उतारांवर सखोल संशोधन केले. हवेच्या दाबात कालानुरूप होणाऱ्या चढ-उतारांना त्याने ‘सदर्न ऑसिलेशन्स’ असे संबोधले. या सदर्न ऑसिलेशन्सचा अभ्यास करताना त्याच्या हे लक्षात आले, की जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इण्डोनेशियाच्या जवळील, प्रशांत महासागराच्या उत्तरेकडील भागात खूप मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडतो, तेव्हा वाऱ्यांचे नेहमीचे स्वरूप बदलून तिथल्या सागराच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब वाढलेला असतो. मात्र याच काळात प्रशांत महासागरातील दक्षिणेकडे मात्र हवेचा दाब खूपच कमी झालेला असतो. वॉकर याने केलेल्या हवेच्या दाबावरील या संख्याशास्त्रीय अभ्यासात, हवेच्या दाबातील या आंदोलनांचे पडसाद जगभर उमटतात हे दाखवून दिले.

त्यानंतर १९५०-६०च्या दशकात कॅलिफोर्निया विद्यापीठातील जाकोब जर्कनेस या हवामानतज्ज्ञाने सदर्न ऑसिलेशन्सच्या दरम्यानचा कमी दाबाचा काळ हा पेरूच्या सागरी किनाऱ्यावरील वाढणाऱ्या तापमानाशी निगडित असल्याचे दाखवून दिले. यामुळे ‘एल निन्यो’चा सदर्न ऑसिलेशन्सशी असलेला संबंध स्पष्ट झाला. याकोब जर्कनेस याने ‘एल निन्यो’ आणि जागतिक स्तरावरील हवामान यांच्यातील संबंधांवर आधारलेले प्रारूप तयार केले. या प्रारूपामुळे जगाच्या विविध भागांतील आगामी काळातल्या पावसासंबंधीचे आडाखे बांधायला ‘एल निन्यो’ची मदत होऊ  लागली. या सर्व संशोधनावरून ‘एल निन्यो’ आणि ‘ला निन्या’ हे एकाच चक्राचे दोन भाग आहेत हेही सिद्ध झाले.

✍ *कॅ. सुनील सुळे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[30/09, 06:46] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९१*
    *दिनांक-३० सप्टेंबर१९*

🎯 *बालवाडीशास्त्र*

मुला-मुलींचं सुरुवातीच्या काळातलं शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलाला/मुलीला बालवाडी शिक्षण मिळायला हवं. मोकळी जागा, प्रेमळ, प्रशिक्षित मार्गदर्शक, भरपूर खेळ, खेळायला मित्रमैत्रिणी, सुरक्षिततेची उबदार जाणीव एवढय़ा गोष्टी असल्या, की मुलं आनंदी होतात. आनंदी वातावरणात बुद्धिमत्तेला पोषक असे अनुभव त्यांना मिळायला हवेत.
मुलांना लहानपणापासून- म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं का आहे, हे सांगणारी ही गोष्ट.. शंभर वर्षांपूर्वी एका माणसानं ऑस्ट्रियन सम्राज्ञी एलिझाबेथ हिचा खून केला. या घटनेशी संबंधित चर्चा चालू होती. त्या वेळी व्यवसायानं डॉक्टर असलेल्या मारिया मॉण्टेसरी सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या की, ‘‘हा खून खरं म्हणजे तुम्हीच केला.’’ या वाक्याचा अर्थ कुणालाच कळेना. तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘‘समाजातल्या सुशिक्षित वर्गाचं लहान मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे, त्यांच्या शिक्षणाकडे, मानसिकतेकडे कोणी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे ज्या वयात त्यांना योग्य संस्कार मिळायला हवेत, ते मिळाले नाहीत. यातूनच ही मुलं मोठी होऊन गुन्हेगारी मार्गाला लागली. त्यांच्यातल्याच एकानं हा खून केला. त्यामुळे ही जबाबदारी समाजातल्या सुशिक्षित वर्गावरच येऊन पडते.’’

डॉ. मॉण्टेसरी यांना आज आपण शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. पण त्या डॉक्टर होत्या; या घटनेनंतर त्यांनी आपलं लक्ष लहान मुलांच्या शिक्षणाकडे वळवलं.
एका वस्तीत त्यांनी बालवाडी सुरू केली, तीच जगातली पहिली बालवाडी! मुलांवर संपूर्णपणे विश्वास ठेवणं हेच या बालवाडीचं वैशिष्टय़. ‘बालवाडीशास्त्र’ इथून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. मूल मोठं होत जातं, तसतसं त्याच्याकडे, त्याच्या बोलण्याकडे, त्याच्या मतांकडे, त्याच्या मागण्यांकडे, प्रगतीकडे लक्ष पुरवलं जातं. लहान मुलाला काही विशेष म्हणणं नसतं, मतं नसतात असा एक समज आहे. सतत कसला तरी हट्ट करणं हा त्यांचा छंद आहे असं वाटतं. मात्र, या वयातल्या मुलांचे विचार ऐकण्यासारखे असतात, त्यांच्या कल्पना काही वेगळ्याच असतात. त्या ऐकून घेतल्या पाहिजेत.
आपली लहानगी मुलं ज्या बालवाडय़ांमध्ये जातात, तिथं असं वातावरण मिळतं का, इकडे लक्ष द्या. ते मिळायला हवं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[01/10, 06:37] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १९२*
*दिनांक-१ ऑक्टो १९*

🎯 *ओझोनचे छिद्र*

सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर. अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनचे तीन अणू मिळून तयार झालेला आहे. वातावरणातील ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमीटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात (स्ट्रॅटोस्फिअर) होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपटमापकाचा वापर केला जातो. ओझोनच्या रेणूंचे वातावरणातील प्रमाण स्थिर असणे अपेक्षित आहे.
वातावरणातील ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत. १९८० सालानंतर, ब्रिटिश अंटार्क्टिक सव्‍‌र्हे या मोहिमेतील संशोधकांना, अंटार्क्टिका येथे बसवलेल्या मापकांत वेगळीच गोष्ट आढळली. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिथल्या हिवाळ्यानंतरच्या महिन्यांत, ओझोनचे प्रमाण १९५७ सालापासून आतापर्यंत कधीही नव्हते इतके कमी झालेले आढळले. १९८५ साली ब्रिटिश संशोधकांनी आपली ही निरीक्षणे ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली. या संशोधकांनी ओझोनच्या प्रमाणातील या घटीसाठी क्लोरोफ्लुरोकार्बन या गटातील रसायने जबाबदार असल्याची शक्यता व्यक्त केली. अल्पकाळातच कृत्रिम उपग्रहावरील मापकांद्वारे या ब्रिटिश संशोधकांच्या निरीक्षणांची पडताळणी केली गेली. उपग्रहाने केलेल्या या पडताळणीतून, दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घटले असल्याचे स्पष्ट झाले. वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ‘ओझोनचे छिद्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होण्यास, कृत्रिम खतांच्या वापराद्वारे निर्माण होणारा नायट्रस ऑक्साइड, रेफ्रिजरेटरमध्ये तसेच फवारे मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांतील क्लोरोफ्लुरोकार्बन व इतर अनेक रसायने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. १९७०च्या दशकात केलेल्या, वातावरणातल्या ओझोनच्या या रसायनशास्त्रविषयक संशोधनासाठी डच संशोधक पॉल क्रुटझेन, तसेच अमेरिकन संशोधक मारिओ मोलिना व शेरवूड रोलँड यांना १९९५ सालच्या नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले. या संशोधनाचा परिपाक म्हणून १९८९ साली अस्तित्वात आलेल्या ‘माँट्रिअल प्रोटोकॉल’ या नियमप्रणालीनुसार ओझोन थराला घातक ठरणाऱ्या रसायनांच्या निर्मितीवर आणि वापरावर अनेक बंधने आली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून, काही वर्षे रुंदावत चाललेले हे छिद्र आता पुन्हा भरू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

✍ *कॅ. सुनील सुळे* office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[01/10, 06:37] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-१९२*
    *दिनांक-१ ऑक्टो १९*

🎯 *उच्चार*

मराठी भाषक ‘ळ’चा उच्चार करतात, तसं हिंदी भाषिक लोकांना का जमत नाही? अरबी लोक ज्या पद्धतीने ‘ख’ म्हणतात, तसा उच्चार करायचा तर फार सराव का करायला लागतो?

मूल पहिल्या वर्षभरात जे ऐकतं, ते शब्द स्वतंत्रपणे एका कोषात जाऊन साठत असतात. शब्द ऐकून ठेवण्याची यंत्रणा आधी कामाला लागते. ऐकलेल्या शब्दांचा- वाक्यांचा अर्थ समग्रपणे लक्षात यायला लागतो. ऐकलेले शब्द  स्मरणकेंद्रातून काढून प्रत्यक्ष तोंडावाटे बोलून दाखवण्याची यंत्रणा थोडय़ा काळानंतर कामाला लागते.
मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं. कारण आकलनाचं वर्णिक क्षेत्र हे जन्मापासून कार्यरत असतं, तर भाषानिर्मिती केंद्र म्हणजेच ब्रोका हे साधारणपणे १०-११ व्या महिन्यात विकसित होतं. प्रत्येक मूल बोलायला लागण्याचा काळ थोडाफार मागेपुढे होत असतो. याचं कारण ब्रोका क्षेत्र अद्याप विकसित होत असतं. प्रत्येकाचं हे क्षेत्र वेगवेगळ्या वेळेला विकसित होतं. त्यानंतर मुलं बोलतात.
जे शब्द- ज्या शब्दांचा उच्चार मुलांसमोर होतो, तेच त्यांना बोलता येतं.  या संदर्भात एका विद्यापीठात संशोधन झालेलं आहे. जपानी लोक बोलताना ‘र’ आणि ‘ल’ वेगवेगळे उच्चारत नाहीत. जपानी बाळांवर जे संशोधन झालं त्याआधारे हे सिद्ध झालं आहे की ‘र’ आणि ‘ल’ वेगवेगळा उच्चारण्याची क्षमता त्यांच्या मेंदूत वयाच्या दहा महिन्यांपर्यंत असते; पण त्यांना ‘र’ आणि ‘ल’चे वेगवेगळे अनुभव न दिल्यामुळे पुढे ही क्षमता नष्ट होते.
मात्र जपानी मूल जर जन्मापासून दुसऱ्या समाजात वाढलं, जपानीशिवाय इतर भाषा त्याला ऐकवल्या, र आणि ल ऐकवले तर त्यांनाही हे शब्द नक्की उच्चारता येतील. सारा-जेन ब्लॅकमोर आणि उटा फ्रिथ यांनी या संशोधनावर  प्रकाश टाकला आहे.
आसपासचं सगळं जग मूल आपल्या नजरेनं न्याहाळत असतं. मुलाच्या समोर जे काही प्रसंग घडतात त्यातूनच मूल अनेक गोष्टी न सांगताच शिकत असतं. त्याला जे दिसतं, त्याची नोंद त्याचा मेंदू घेतो. त्या वेळेस झालेलं संभाषण तो लक्षात ठेवतो. त्यांचा मेंदू या काळात सतत काही तरी ग्रहण करण्याच्या अवस्थेत असतो. म्हणून तर थोडय़ा कालावधीत तो खूप काही शिकतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[02/10, 06:50] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१९३*
*दिनांक- २ऑक्टो.१९*

🎯 *पेशी सिद्धांताचा पाया*

सजीवांतील पेशींचे वर्णन करणारा पहिला संशोधक इंग्लडचा रॉबर्ट हूक. १६६०-७० च्या दशकात आपल्या सूक्ष्मदर्शकाद्वारे त्याने प्राण्यांच्या तसेच वनस्पतींच्या पेशींचे निरीक्षण केले. डच संशोधक अँटनी व्हॅन ल्यूएनहॉकसह इतरांनीही त्यानंतरच्या काळात पेशींचे निरीक्षण केले. मात्र या पेशींचे जीवशास्त्रीय महत्त्व समजण्यास एकोणिसावे शतक उजाडावे लागले. दरम्यानच्या काळात पेशींतील इतर घटकांची माहिती होऊ लागली. १८२४ साली फ्रान्समधील हेन्री डय़ूट्रोशे आणि फ्रँकॉय-व्हिन्सेट रास्पेल या संशोधकांनी वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या पेशींच्या रचनेतील साम्य ओळखले. त्यानंतर सात वर्षांतच इंग्लडच्या रॉबर्ट ब्राऊनने पेशीतील केंद्रकाचा शोध लावला. या सर्व संशोधनानंतर थिओडोर श्वान आणि मॅथिहॅस श्लायडेन या जर्मन संशोधकांनी पेशी सिद्धांताचा पाया घातला.
मॅथिहॅस श्लायडेनने आपले लक्ष वनस्पतींच्या अभ्यासावर केंद्रित केले होते. १८३८ साली केंद्रकातील बारीक कणांपासून इतर केंद्रकांची निर्मिती होत असल्याचे (चुकीचे) मत त्याने मांडले. मात्र पेशींच्या वाढीत पेशींतील केंद्रक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्याने ओळखले होते. श्लायडेनच्याच प्रयोगशाळेतील थिओडोर श्वान याला, श्लायडेनशी याच विषयावर चर्चा करताना, प्राण्यांच्या चेतातंतूंच्या (नोटोकॉर्ड) पेशीत पूर्वी पाहिलेल्या अशाच केंद्रकांचे महत्त्व उमगले. आता वनस्पतीच्या पेशींतील केंद्रकाचे कार्य आणि प्राण्यांच्या चेतातंतूंच्या पेशींतील केंद्रकाचे कार्य सारखेच आहे का, याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. या निरीक्षणांचा परस्पर संबंध लक्षात घेता थिओडोर स्वान याने प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला आहे असा सिद्धांत मांडला. यालाच ‘श्वान-श्लायडेन पेशी सिद्धांत’ असे म्हणतात.
थिओडोर श्वानने यानंतर, विविध संशोधकांनी त्या काळापर्यंत केलेल्या पेशीविषयक निरीक्षणांचे सविस्तर विश्लेषण करणारे पुस्तक लिहिले. १८३९ सालच्या या पुस्तकात त्याने, वनस्पतींतील आणि प्राण्यांतील उती जरी वेगळ्या दिसत असल्या, तरी त्या पेशींपासूनच बनल्या असल्याचे दाखवून दिले. पेशी ही तीन भागांत बनलेली असल्याचे त्याने स्पष्ट केले – केंद्रक, पेशीद्रव आणि पेशीभित्ती. पेशींची निर्मिती ही पेशींच्या केंद्रकांद्वारे होत असल्याचे मत व्यक्त करताना, पेशींच्या बाहेरही केंद्रके असून त्यातूनही पेशींची निर्मिती होत असल्याचा श्लायडेनप्रमाणेच त्याचाही समज होता. परंतु १८८०-९०च्या सुमारास जर्मनीच्या वाल्थेर फ्लेिमग आणि इतरांनी केलेल्या गुणसूत्रांच्या विभाजनावरील संशोधनानंतर हा गैरसमज दूर झाला.

✍ *डॉ. रंजन गर्गे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[02/10, 06:50] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९३*
    *दिनांक- २ऑक्टो.१९*

🎯 *निसर्ग-शिक्षण*

डॉ. हॉवर्ड गार्डनर यांच्या ‘बहुआयामी बुद्धिमत्तां’च्या सिद्धांतानुसार निसर्गविषयक बुद्धिमत्ता ही एक स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे. ती केवळ निसर्गात फिरण्याची आवड किंवा छंद नाही, तर निसर्गाचा शोध घेण्याची – त्यातून शिकण्याची एक वेगळी पद्धत आहे. यासाठी न्यूरॉन्सची विशिष्ट पद्धतीने  जुळणी असावी लागते. अशी क्षमता सगळ्या लोकांमध्ये नसते, तर केवळ काही लोकांमध्येच असते. यामुळे आपल्या शाळांमध्ये निसर्गाचे विविध उपक्रम द्यायला हवेत. पर्यावरण हा विषय शाळांमध्ये असतो; पण प्रत्यक्ष निसर्गात नेलंच जातं असं नाही.

आपल्याकडे रूढ शिक्षणाच्या चाकोरीबाहेर पडण्याचे प्रयत्न काहींनी केले. त्यांपैकी एक होते रवींद्रनाथ टागोर. लहान असताना त्यांना स्वत:ला शाळा नकोशी झाली होती. ते शाळेत जायला ठाम नकार द्यायचे. काही काही कारणं शोधून काढायचे. मुलांच्या अशा ‘वेडय़ावाकडय़ा’ वागण्याला तसंच उत्तर देण्याची म्हणजे मारून मुटकून शाळेत पाठवण्याची त्या काळी पद्धत होती, तरीही त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला समजून घेतलं. ते आपल्या लहान मुलाला घेऊन एका निसर्गरम्य ठिकाणी गेले. दिवसातला काही काळ वडील मुलाला झाडाखाली, तळ्याकाठी बसवून औपचारिक विषयांचं शिक्षण द्यायचे, तर उरलेला संपूर्ण वेळ रवींद्रनाथ निसर्गात हवा तसा घालवायचे. या दिवसांचा अतिशय सखोल परिणाम रवींद्रनाथांच्या मनावर झाला. पुढे त्यांनी बोलपूरजवळच्या रम्य परिसरात शांतिनिकेतन हे विद्यालय सुरू केलं.
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ताराबाई मोडक- अनुताई वाघ- सिंधूताई अंबिके यांनी चालवलेली कोसबाडची शाळा हिलाही शाळेचं बंदिस्त स्वरूप नव्हतंच. मुलं शाळेत येत नाहीत, म्हणून त्यांच्या अंगणात जाऊन शिकवायचं हे ‘अंगणवाडी’ शब्दाचं मूळ रूप. मुलं कुरणात जातात, तर त्यांना तिथे जाऊन शिकवायचं ही ‘कुरणशाळा’, मुली दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येतात, तिथे जाऊन शिकवायचं ती रात्रशाळा. नदीकाठी जाऊन झाडं, दगड यांच्या साह्य़ाने बेरीज- वजाबाक्या या शिक्षिकांनी शिकवल्या आहेत.
प्रसिद्ध विचारवंत रूसो यांनीदेखील मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने निसर्गशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं होतं. आजच्या शहरीकरणाच्या काळात हे सर्व हरवून गेलं आहे.
आठवडय़ातला किमान एखादा तास मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात रमवून शिकवता येईल का आपल्याला?

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[03/10, 06:58] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १९४*
*दिनांक- ३ ऑक्टो १९*

🎯 *मेंडेलची आनुवंशिकता*

आजच्या आनुवंशिकतेवरील संशोधनाचा पाया ऑस्ट्रियाच्या ग्रेगॉर मेंडेल याने १८६० च्या दशकात घातला. आनुवंशिक गुण हे मातापित्यांच्या गुणांचे मिश्रण असल्याचा पूर्वी समज होता. परंतु मेंडेलने संततीतील गुण हे मिश्रण नसून, एखादा गुण पुढील पिढय़ांत स्वतंत्रपणे वाहून नेला जातो हे सिद्ध केले. मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे. मेंडेलने वाटाण्याच्या रोपांचे परागीभवन घडवून आणून मूळ रोपांचे गुण पुढील पिढय़ांत कसे उतरतात, याचे निरीक्षण केले. या प्रयोगांसाठी मेंडलने बियांचे रंग (हिरवा-पिवळा), त्यांच्या फुलांचे रंग (पांढरा-जांभळा), खोडांची उंची (उंच-खुजे) अशा वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारलेल्या वाटाण्याच्या जोडय़ा वापरल्या.
मेंडेलने आपल्या एका प्रयोगात शुद्ध स्वरूपातील हिरव्या व पिवळ्या वाटाण्यांच्या बिया घेतल्या. त्यांच्यात त्याने स्वयं-परागीभवन केले असता, या बियांची रोपे ही सतत एकाच विशिष्ट रंगाचे वाटाणे निर्माण करत होती. म्हणजे यात जातीचा अस्सलपणा टिकवून ठेवण्याचा गुणधर्म होता. दुसऱ्या प्रयोगात, या दोन प्रकारच्या बियांतून निर्माण झालेल्या रोपांवरील फुलांचे त्याने एकमेकांत पर-परागीभवन घडवून आणले. यातून निर्माण झालेले वाटाणे हे सर्व पिवळ्या रंगाचे होते. त्यानंतर या पिढीतील वाटाण्यांच्या स्वयं-परागीभवनातून निर्माण झालेल्या पुढच्या पिढीत मात्र दोन्ही प्रकारच्या वाटाण्यांची रोपे निर्माण झाली होती. यांतील पिवळ्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे आणि हिरव्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे, यांचे गुणोत्तर तिनास एक असे होते. या रोपांवरील वाटाण्यांपासून निर्माण झालेल्या पुढील पिढय़ांतही पिवळ्या व हिरव्या वाटाण्यांच्या रोपांचे प्रमाण तिनास एक असेच राखले गेले होते. परंतु कोठेही दोन्ही रंगांचे मिश्रण मात्र झाले नाही.

या निष्कर्षांवरून मेंडेलने मांडलेल्या सिद्धांतानुसार, प्रत्येक सजीवाची आनुवंशिकता स्वतंत्रपणे काम करते. प्रत्येक सजीवाकडे त्याच्या गुणानुरूप घटकांची जोडी असते. या घटकांपैकी जो घटक प्रभावी असेल त्या घटकाचे पुढील पिढय़ांत प्राबल्य राहते. या प्रयोगातील रोपांत पिवळ्या रंगाचा घटक हा प्रभावी होता. म्हणून नंतरच्या पिढय़ांत पिवळ्या रंगाचे प्राबल्य कायम राहिले. जनुकाची संकल्पना जन्माला येण्याअगोदरच केलेल्या या संशोधनात मेंडेलने आनुवंशिकतेचे महत्त्व ओळखले होते. मात्र मेंडेलच्या या पायाभूत संशोधनाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतर सोळा वर्षांनी – १९०० साली!

✍ *डॉ. रंजन गर्गे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[03/10, 06:58] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९४*
    *दिनांक- ३ ऑक्टो. १९*

🎯 *शाळा कधी आवडेल?*

शाळेला सुट्टी असली की मुलांना खूप आनंद होतो. का बरं? शाळा कशी असावी, याबद्दल अमेरिकी मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत मार्शल रोझेनबर्ग यांनी म्हटलं आहे की, शाळा आयुष्य समृद्ध करणारी असावी. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर, शाळा ही ‘लाइफ एन्रिचिंग’ असावी. त्यांनी शाळेला व्यापक अर्थ देऊ केला आहे.

मुलांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या अशा शाळांचं ध्येय काय असेल, याबद्दल सुचवताना ते म्हणतात, अशा शाळेत येऊन :
– मुलांचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे.
– प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या गरजेनुसार ज्ञान, माहिती मिळाली पाहिजे.
– त्याला स्वत:शी आणि इतरांशी जोडून घेता यायला हवं. इतरांशी आदानप्रदान करण्यात एक आनंद असतो. तो नैसर्गिक असतो. त्यातूनच आपण बरंच काही शिकत असतो. त्यामुळेच इतरांशी मोकळेपणानं मत्री होईल, असं वातावरण तयार व्हायला हवं.
शाळेचं हे एक आदर्श चित्र आहे. मात्र पारंपरिक शाळा अशा नसतात. रोझेनबर्ग यांच्या मते कशी असते पारंपरिक शाळा? तर :
– कोण बरोबर वा चूक, हे ती सिद्ध करत असते.
– ज्येष्ठांचं कसं ऐकायचं असतं, याचे पाठ देते.
– शिक्षा, बक्षिसं, अपराधी भावना, शरम, कर्तव्य (नेमून दिलेलं काम करणं), दुसऱ्याचे उपकार मानणं अशा गोष्टींच्या आधाराने मुलांच्या वर्तनाला वळण लावण्याचं काम करते.
यातल्या काही मुद्दय़ांचा नीट विचार केला, तर आपण आपल्या शाळेत हा नवा दृष्टिकोन आणू शकू. तसंच आपल्या घरातल्या लहान मुलांच्या बाबतीतही आयुष्य-समृद्धीचा विचार करू शकू.
‘आयुष्य समृद्ध करणं’ म्हणजे काय? तर :
– एखाद्या कलेनं आपलं आयुष्य समृद्ध होतं.
– भरपूर फिरता यायला यावं. सगळं जग नाही, पण आपल्या आवाक्यातला परिसर पाहिला तरी आयुष्य समृद्ध होतं माणसाचं.
– पसा आणि आरोग्य असलं की आपण समृद्ध असतो, असं म्हणायला हरकत नाही.
– नवीन काही तरी शिकण्याची इच्छा जागती असणं म्हणजे आयुष्य समृद्ध असणं.
– आपण आयुष्यात कोणासाठी तरी काही करणं म्हणजे आपलं आयुष्य समृद्ध करणं.
शाळा किंवा पालक म्हणून यातलं काय करतो आपण?

🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[08/10, 06:42] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- १९७*
*दिनांक-८ ऑक्टो.१९*

🎯 *मूलपेशी*

मूलपेशी म्हणजे अपरिपक्व पेशी – ज्या पेशींना अजून निश्चित रचना लाभलेली नाही, परंतु कालांतराने विशिष्ट प्रकारच्या पेशींचे स्वरूप ज्या धारण करू शकतील अशा पेशी. या पेशी विविध प्रकारच्या असतात. मूलपेशींच्या अस्तित्वाबद्दलची चर्चा १८८०-९०च्या दशकात झाली होती. शरीरातील जैविक वाढीची सुरुवात अशा पेशींपासून होत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. रक्तातील पेशींचा उगम अशाच प्रकारच्या मूलपेशींतून होत असल्याचे मतही व्यक्त झाले होते. रक्तनिर्मिती ही अस्थिमज्जेत (बोन मॅरो) होते. सन १९६० सालाच्या सुमारास प्रथम उंदरांत व नंतर व्याधिग्रस्त माणसांत, अस्थिमज्जेचे प्रत्यारोपण करण्यात संशोधकांना काही प्रमाणात यश आले. मूलपेशींचा वैद्यकीय उपचारांसाठी केला गेलेला हा वापर होता!
सन १९६१ मध्ये कॅनडातील आँटेरिओ कॅन्सर इन्स्टिटय़ूटमधील संशोधकांनी केलेला प्रयोग मूलपेशींवरील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या संशोधकांनी प्रथम उंदरांवर तीव्र किरणोत्साराचा मारा करून त्यांची संरक्षण यंत्रणा आणि रक्तनिर्मिती करणारी यंत्रणा निकामी केली. त्यानंतर त्यांनी निरोगी, व्यवस्थित प्रकृती असणाऱ्या उंदरांची अस्थिमज्जा घेतली आणि क्षारांच्या द्रावणाद्वारे ती या उंदरांना टोचली. त्यानंतर बारा दिवसांनी, या संशोधकांनी या उंदरांची प्लीहा (स्प्लीन) बाहेर काढली. नष्ट झालेल्या रक्तपेशी काढून टाकण्यात प्लीहा महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधकांना या उंदरांच्या प्लीहेत पेशींचे समूह निर्माण झाल्याचे दिसून आले. निर्माण झालेल्या या समूहांची संख्या ही, टोचलेल्या अस्थिमज्जेतील पेशींच्या संख्येशी सम प्रमाणात असल्याचे आढळले. अस्थिमज्जेतल्या पेशी मूलपेशी असण्याची शक्यता यावरून दिसून येत होती.

त्यानंतर १९७०-८०च्या दशकात इतर प्रकारच्या मूलपेशींचा शोध लागत गेला. सन १९८२ मध्ये थेट उंदराच्या भ्रूणातून या मूलपेशी वेगळ्या करून त्यांची प्रयोगशाळेत वाढ करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. प्राण्यांच्या शरीरात किंवा प्रयोगशाळेत या पेशींची वाढ केल्यावर, त्यांच्यात वाढीच्या दृष्टीने अपेक्षित असणारे सर्व बदल घडून येत होते. सन १९९८ मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सन-मेडिसन विद्यापीठातील संशोधकांना मानवी भ्रूणातून मूलपेशी वेगळ्या करून त्यांची वाढ करण्यातही यश आले. ज्या व्याधींत निरोगी पेशींचा नाश होतो, अशा पार्किन्सन किंवा अल्झायमरसारख्या विकारांत मूलपेशींच्या वापराद्वारे निरोगी पेशी निर्माण करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे अशा व्याधींवरील उपचारासाठी मूलपेशींचा वापर भविष्यात मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल.

✍ *डॉ. राजीव चिटणीस*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[08/10, 06:42] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९७*
    *दिनांक-८ ऑक्टो.१९*

🎯 *चुकीचं भाषाशिक्षण*

मुलांच्या भाषाशिक्षणातली पहिली समस्या म्हणजे शिक्षणाचा अयोग्य क्रम. भाषाशिक्षणाच्या चार पायऱ्या सांगितल्या जातात. (१) श्रवण (२) संभाषण (३) वाचन (४) लेखन.

घरात मुलं पहिली भाषा शिकतात ती केवळ श्रवण करून. जन्माला आल्यापासून दीड-दोन वर्षांत मुलं बोलायला लागतात. चुकत-माकत, पण शिकत-सुधारत अस्खलितपणे बोलतात. एक- दोन शब्दांपासून सुरू झालेला हा भाषेचा प्रवास पुढे लाखो शब्दांपर्यंत पोहोचतो. एक भाषा ओलांडून दोन- तीन भाषांपर्यंत सहजच जातो.
वेगवेगळ्या भाषांचं वातावरण समाजातून अनौपचारिकरीत्या  मिळत असतं. घरात बोलली जाणारी घरभाषा ही कानावर पडणारी पहिली भाषा. मातृभाषेपेक्षाही घरभाषेचा प्रभाव मोठा असतो. आजकाल अनेक घरांमध्ये आईची आणि बाबांची भाषा वेगळी असू शकते. अशा वेळेस जी भाषा जास्तीत जास्त कानावर पडते, ती चटकन आत्मसात केली जाते.
परिसरात बोलली जाणारी परिसरभाषा हीदेखील सहजपणे ऐकली आणि बोलली जाते. टी.व्ही. आणि चित्रपटांमधून वेगळ्या भाषा कानावर पडतात. शेजारी, मित्र-मत्रिणींची वेगळी म्हणजे िहदी- गुजराती- कन्नड भाषा नीट ऐकली आणि बोलण्याचा प्रयत्न केला तर तीही येऊ शकते.
श्रवणाच्या पुरेशा संधी दिल्यानंतर संभाषण करायला भरपूर वेळ दिला पाहिजे. ज्या मुलांनी भरपूर वेळा भाषा ऐकली आहे आणि बोलली आहे, त्यांना आता तिसरं कौशल्यं शिकायचं आहे ते आहे वाचन. लेखन बहुतांशी शाळेवरच सोपवलेलं असतं. मात्र सर्वस्वी दुसरी भाषा शिकताना (उदा. इंग्रजी) सुरुवात कुठून केली जाते? तर लेखनापासून. आधी एबीसीडी शिकवायचं, ही पद्धत म्हणजे ‘आधी कळस’.. आणि पाया नाहीच! या पद्धतीची आहे.
मराठी भाषा शिकवायची सुरुवातही अशीच छोटय़ा धडय़ाचं- कवितेचं वाचन आणि गमभन लेखनापासून करतात. वास्तविक श्रवण आणि संभाषणाच्या खूप जास्त संधी पहिल्या पायरीवरच दिल्या पाहिजेत. मात्र त्याला फारशी जागाच ठेवलेली नाही. वर्गात जाणीवपूर्वक अनौपचारिक वातावरण ठेवलं तर दडपणाविना मुलं भाषा शिकतील. शाळा, भाषा शिकवणाऱ्या वेगवेगळय़ा क्लासमधून औपचारिक शिक्षण घेता येतं. पाठय़पुस्तकांची, परीक्षेत लिहिली जाणारी ही प्रमाणभाषा असते. ती नेहमीच्या वापरातल्या  घरभाषेपेक्षा वेगळी असते. त्याचा सराव हळूहळू होत जातो. यातल्या वेगवेगळ्या छटा मुलांना ऐकून- बोलून चांगल्या समजतात.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[09/10, 06:53] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१९८*
*दिनांक- ९ऑक्टो.१९*

🎯 *तंबाखूतील जनुकबदल*

पिकाचे गुणधर्म त्याच्या पेशींतील जनुकरचनेवर अवलंबून असतात. त्यामुळे पिकाच्या जनुकरचनेत योग्य बदल केल्यास त्यातून अधिक चांगल्या गुणवत्तेची पिके तयार व्हायला हवीत. मोन्सॅन्टो या अमेरिकन कंपनीतील संशोधकांनी १९८२ साली जनुकीय बदल केलेले असे पहिले पीक तयार केले. मात्र तंबाखूच्या रोपावर केलेल्या या पहिल्या यशस्वी प्रयोगात संशोधकांनी प्रतिजैविकविरोधी गुणधर्म निर्माण केले होते. तंबाखूच्या रोपांतील पेशींची वाढ सहज होत असल्यानेच या प्रयोगासाठी तंबाखूच्या रोपाचा वापर केला गेला.
एखादा जनुक वनस्पतीच्या पेशींत जर थेट टोचला, तर त्या वनस्पतीत जनुकीय बदल घडून येण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच यासाठी ‘अ‍ॅग्रोबॅक्टेरियम टय़ुमेफेशियन्स’सारख्या जिवाणूंचा वापर केला जातो. असे जिवाणू इतर जनुकांना आपल्या पेशींत सहजपणे सामावून घेतातच, पण त्याचबरोबर आपल्याकडचे जनुकही ते दुसऱ्या वनस्पतीत सहजपणे स्थानांतरित करू शकतात. मोन्सॅन्टो कंपनीतील संशोधकांनी यीस्टमध्ये आढळणाऱ्या, एका प्रतिजैविकविरोधी जनुकाचा वापर आपल्या प्रयोगात केला. त्यांनी प्रथम या जनुकाची इ. कोलाय या जिवाणूंत मोठय़ा प्रमाणात निर्मिती केली व तो जनुक जैवरासायनिक पद्धती वापरून इ. कोलायपासून वेगळा केला. त्यानंतर या जनुकाच्या सान्निध्यात अ‍ॅग्रोबॅक्टेरियम जिवाणूची वाढ केली. या क्रियेत अ‍ॅग्रोबॅक्टेरियमने हा जनुक आपल्यात सामावून घेतला. त्यानंतर हे अ‍ॅग्रोबॅक्टेरियम जिवाणू या संशोधकांनी तंबाखूच्या रोपात टोचले. परिणामी जनुकीय बदल झालेल्या पेशींची या रोपात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन, कॅनामायसिनसारख्या प्रतिजैविकांना दाद न देणारे गुणधर्म या रोपात निर्माण झाले.

सन १९८७ मध्ये जनुकांच्या स्थानांतरासाठी ‘जीन गन’चा वापर होऊ लागला. या प्रक्रियेत प्रथम सुमारे एक सहस्रांश मिलिमीटर आकार असणाऱ्या सोन्याच्या सूक्ष्म कणांवर डीएनएच्या रेणूंचा लेप दिला जातो. त्यानंतर ‘जीन गन’द्वारे या कणांचा वनस्पतीवर मारा केला जातो. हे कण वनस्पतीच्या पेशींत शिरतात व त्यानंतर त्या पेशींत जनुकीय बदल घडवून आणू शकतात. या जनुकीय बदलामुळे त्या वनस्पतीचे गुणधर्म बदलतात. आजच्या संशोधनातील जनुकीय रोपणासाठी अ‍ॅग्रोबॅक्टेरियमसारखे जिवाणू तसेच जीन गन या दोन्हीही पद्धतींचा वापर सोयीनुसार केला जातो. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे, नवे गुणधर्म असणाऱ्या नव्या पिकांची निर्मिती करणे शक्य झाल्याने, जनुकीय अभियांत्रिकीची आजच्या आघाडीवरील संशोधन क्षेत्रात गणना होते.

✍ *डॉ. राजीव चिटणीस*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[09/10, 06:53] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९८*
    *दिनांक-९ऑक्टो.१९*

🎯 *‘मूल’ ते ‘समस्याग्रस्त मूल’*

आपलं मूल हसरं असावं, खेळकर असावं असं पालकांना वाटतं. मुलं तशीच, नौसर्गिकपणे वागत असतात, तेव्हा त्यांच्या या नैसर्गिकतेवर बंधनं घातली जातात. यातून त्यांच्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक जण त्यांच्या छोटय़ांचा प्रत्येक क्षण अक्षरश: वापरतात. त्यांच्या प्रत्येक क्षणाचा वापर केला जातो. सतत विविध क्लासेसमध्ये अडकवून ठेवतात. यामुळे हसऱ्या खेळकर मुलावर खूप ओझं येतं.
काही घरांमध्ये पाश्चात्त्य देशातल्या पद्धतीप्रमाणे मुलांना तान्हं असल्यापासून वेगळं झोपवतात. वेगळं ठेवतात. ते रडलं तरी त्याला लगेच जवळ घेत नाहीत. चार पाच वर्षांच्या मुलाला रात्री आईबाबांच्या जवळ झोपायचं असेल तर त्याला तसं करू देत नाहीत. अशा ‘चुकीच्या’(?) वागण्याला लगेच एक नाव दिलं जातं – ‘सेपरेशन अँग्झायटी’. मूल कायम, मोठं झाल्यावरही आईबाबांना चिकटून झोपण्याचा आग्रह करणार आहे का? ते लहान आहे म्हणूनच असं वागतंय ना? मूल बाहेर जाऊन चिखलात खेळतं, असं कसं? माझ्या मुलात काही प्रॉब्लेम तर नाही? चित्र काढत नाही, अभ्यास करत नाही, बुद्धिबळ खेळत नाही त्याऐवजी चिखलात खेळतं, हे विचित्र नाही का? असं पालक विचारतात.
मूल खूप खेळतं, दमतच नाही, तेव्हा काय त्याला खरोखर ‘अटेन्शन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसॉर्डर’ (एडीएचडी) तर झालेला नाही ना, असल्या शंका-कुशंका सतत पालकांच्या मनात येत असतात.
आपलं मूल हे अगदी ‘सर्वसामान्य’ आहे, यावर विश्वास ठेवायला हवा. एखाद्या रोगाची लक्षणं वाचत असताना, ही सर्व लक्षणं आपल्यातही दिसतात, असं खूप जणांना वाटतं. नुसत्या शंकेनेच लोक गळाठून जातात. असंच मुलांच्याही बाबतीत होत नाही ना? आपलंच मूल विचित्र आहे, असं उगाच वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही.
एक लक्षात घ्यायला हवं की, मूल लहान आहे. या वयात मुलं असंच वागतात. मोठं झाल्यावर असंच वागत नाहीत. मुलांना नैसर्गिक वागू द्यायला हवं. थोडा खोडकरपणा करायला काहीच हरकत नाही, हे स्वीकारायला हवं. तसं करू दिलं नाही तर समस्याग्रस्त मुलांची संख्या भावी काळात नक्कीच वाढेल. त्यांना खरोखरच मानसोपचारांची गरज भासेल. त्यापेक्षा आत्ताच काळजी घ्यायला हवी.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[10/10, 06:48] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-१९९*
*दिनांक- १० ऑक्टो. १९*

🎯 *डॉलीची गोष्ट*

‘क्लोनिंग’ म्हणजे सजीवांच्या हुबेहूब प्रती तयार करण्याचे तंत्र. १९९७ साली स्कॉटलंडमधील रोझलीन इन्स्टिटय़ूटच्या इयान विल्मुट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्लोनिंगच्या यशस्वी प्रयोगावरील शोधनिबंध ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्याअगोदर दहा वर्षे या संशोधकांचे क्लोनिंगद्वारे मेंढीच्या निर्मितीचे प्रयत्न चालू होते. या काळात या संशोधकांनी मेंढीची प्रत तयार करण्याचे सुमारे पावणे तीनशे प्रयत्न केले.
या प्रयोगासाठी ‘फिनिश डॉर्सेट’ या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीचा वापर केला गेला. प्रथम त्यांनी या मेंढीच्या आचळातील पेशी काढून घेतल्या. त्यानंतर ‘स्कॉटिश ब्लॅकफेस’ या काळे तोंड असणाऱ्या जातीच्या मेंढीचे फलन न झालेले बीजांड घेतले. या बीजांडाचे केंद्रक काढून टाकण्यात आले. या दोहोंचे फलन घडवून आणण्यासाठी पेशी आणि बीजांड एकमेकांच्या जवळ आणण्यात आले. विद्युत स्पंदाद्वारे हे बीजांड पेशीच्या पटलातून आत ढकलण्यात आले. यामुळे पेशी आणि बीजांड एकत्र येऊन त्यांचे फलन घडून आले. बीजांड आणि पेशीच्या फलनातून तयार झालेल्या पेशीची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याचे सहा-सात दिवस प्रयोगशाळेतच निरीक्षण केले गेले. त्यानंतर ही फलित पेशी दुसऱ्या एका स्कॉटिश ब्लॅकफेस जातीच्या पाहुण्या मेंढीच्या गर्भाशयात प्रस्थापित केली गेली. गर्भारपणाचा सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यावर या ब्लॅकफेस मेंढीने, जिच्या आचळाच्या पेशी वापरल्या होत्या त्या फिनिश डॉर्सेट जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीला जन्म दिला. तिचेच नाव ‘डॉली’! डॉली ही मूळ फिनिश डॉर्सेट मेंढीची हुबेहूब प्रत होती. ही डॉली एकूण पावणेसात वर्षे जगली. फुप्फुसाचा विकार व तीव्र संधिवात जडल्यामुळे डॉलीला मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्लोनिंगमध्ये अपत्याच्या पालकाच्या केंद्रकातील डीएनएचा क्रम राखला जात असल्याने, जन्माला येणाऱ्या अपत्यात आणि त्याच्या पालकात अतिशय साम्य असते. डॉलीच्या क्लोनिंगच्या अगोदर, दोन्ही पेशी भ्रूणस्थितीतील घेऊन त्यांचे क्लोनिंग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात केंद्रक काढून टाकलेल्या बीजांडाशी एखाद्या भ्रूणाच्या केंद्रकसहित पेशीचा किंवा फक्त त्यातील केंद्रकाचा संयोग घडवून आणला जातो. अशी उदाहरणे १९५०-६० च्या दशकांपासून आढळतात. परंतु क्लोनिंगच्या तंत्रात स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या मीलनातून गर्भधारणा केली जात नाही. क्लोनिंगच्या तंत्राचे वेगळेपण हेच आहे!

✍ *डॉ. रंजन गर्गे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[10/10, 06:49] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- १९९*
    *दिनांक-१० ऑक्टो.१९*

🎯 *आक्रमकता*

काही घरांमध्ये एकमेकांवर भयंकर मोठमोठय़ानं आवाज चढवून बोलण्याची, साध्या साध्या गोष्टींत एकमेकांवर रागावून बोलण्याची सवय असते. अशा घराचं तापमान बरंच वाढलेलं असतं.

इथं वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. मुलांनी जर हे आक्रमक वागणं घरात नाही तर माध्यमांमध्ये पाहिलं असेल; तरी त्यांना असंच वाटतं, की हेच वागणं नैसर्गिक आहे, योग्य आहे. म्हणून मुलं पुन्हा पुन्हा तसंच वागतात. समजा मुलांची पालकांशी भेट होत नसेल किंवा भेटले तरी एकमेकांत संवाद होत नसेल, त्यामुळे मूल आणि पालक यांच्यात दरी असेल, अशा स्थितीतही हळूहळू मुलांची वृत्ती आधी हट्टी आणि त्यातून आक्रमक होत जाते. आक्रमकता ही केवळ शारीरिक नाही, तर शाब्दिकही असते. सुस्थिर कुटुंबातून आलेली मुलंदेखील आक्रमक असतात.
इथं मूल असं का करत आहे, याच्या मुळाशी जाण्याची गरज असते.
आक्रमकता ही सोडून देण्याची गोष्ट निश्चितच नाही. गांभीर्यानं घ्यायला हवं हे नक्की. आक्रमक मुलाच्या वागण्याची सारवासारव करून विषय बंद करायची गरज नसते. टीन एजमधलं मूल असेल तर शरीराच्या आत असलेल्या संप्रेरकांचा आणि मेंदूतल्या रसायनांचा वादळी परिणाम म्हणून मुलं आक्रमक होत असतात. त्यावेळी वादळाला तोंड देण्यापेक्षा, नंतर बोलण्याची आवश्यकता असते.
मतभेदांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या गोष्टी सकारात्मक पद्धतीनं हाताळायला हव्यात. मुलांशी जाणीवपूर्वक बोलायला हवं. जर मुलांचं वर्तन आक्रमक असेल, तर काही नियम करावे लागतील. आक्रमकता वाढली तर टोकाचं असामाजिक वर्तनदेखील घडू शकतं. अशा आक्रमकतेशी सामना करावा लागला तर काय करायचं, हे आधीच आपसात ठरवून घ्यावं लागतं.
मुलांनी पालकांशी आक्रमक वागणं, एखाद्या प्रसंगी हिंसक वर्तन करणं या गोष्टी सध्या वाढत आहेत. हा काही संपूर्णपणे पालकांचा दोष नाही. वातावरणातल्या अन्य गोष्टींमुळेसुद्धा हे घडू शकतं. अशा समस्या भावनांच्या आहारी जाऊन नाही, तर शांतपणे आणि योग्य पद्धतीनंच सोडवाव्या लागतात. हे आक्रमक वर्तन घडण्यामागचं कारण प्रत्येक वेळी पालकांचं वागणं असं म्हणून त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[11/10, 07:32] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- २००*
*दिनांक- ११ ऑक्टो.१९*

🎯 *क्रिस्पर क्रांती*

सजीवांतील डीएनएच्या रेणूंत जैवरसायन-शास्त्राद्वारे बदल घडवून आणणे, हे १९७० च्या दशकापासून शक्य झाले. हे बदल घडवून आणण्यासाठी प्रथम पेशींतील डीएनए जैवरासायनिक पद्धतीद्वारे वेगळा केला जातो. त्यानंतर काही विशिष्ट विकरांद्वारे (एन्झाइम) रासायनिक क्रिया घडवून डीएनएचे हे रेणू अपेक्षित जागी तोडले जातात, त्यात बदल केले जातात व गरजेनुसार पुन: जोडले जातात. हे सुधारित रेणू सजीवांना टोचले जातात. डीएनएमध्ये बदल घडवून आणण्यासाठी वापरली जाणारी प्रचलित तंत्रे ही वेळखाऊ आणि खर्चीक आहेत. परंतु २०१२ साली अस्तित्वात आलेले क्रिस्पर तंत्रज्ञान हे यावर उपाय ठरण्याची शक्यता आहे.
क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलर इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीट्स’! सन १९८७ साली जपानच्या ओसाका विद्यापीठातील योशिझूमी इशिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात, त्यांना ‘ई. कोलाय’ जिवाणूंत जनुकांची पुन्हा पुन्हा आढळून येणारी अशी एक अनोखी मालिका सापडली असल्याचा दावा केला गेला होता. १९९३ साली केलेल्या संशोधनात, फ्रान्सिस मोजिका या स्पॅनिश संशोधकालाही अनेक जिवाणूंमध्ये हेच वैशिष्टय़ आढळले. फ्रान्सिस मोजिकाने ‘ई. कोलाय’ जिवाणू वापरून या पुनरावृत्तीचा तपशीलवार अभ्यास केला. दोन पुनरावृत्तींच्या मधल्या भागात मोजिकाला, ‘ई.कोलाय’ जिवाणूंना नेहमी लागण होणाऱ्या विशिष्ट विषाणूंतील डीएनएच्या क्रमाचे अस्तित्व आढळले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या ‘ई. कोलाय’च्या डीएनएमध्ये ही विशिष्ट रचना होती, त्यांना या विषाणूंची लागण होत नव्हती. ‘ई. कोलाय’च्या डीएनएतील हा विशिष्ट जनुकक्रम ‘ई. कोलाय’चे त्या विषाणूंपासून संरक्षण करत होता.
डीएनएतील जनुक आपले कार्य विशिष्ट विकरांद्वारे करून घेतात. सन २००५ मध्ये, जिवाणूंत आढळलेल्या विशिष्ट जनुकक्रमामुळे निर्माण होणाऱ्या ‘कॅस ९’ या विकराचा शोध लागला. हा विकर त्या जिवाणूवर हल्ला करणाऱ्या विषाणूच्या विकरांतील डीएनएची कापाकाप करून त्याला निष्प्रभ करतो. ‘कॅस ९’ प्रकारच्या विकराची ही क्षमता ओळखून २०१२ साली शास्त्रज्ञांनी या ‘क्रिस्पर-कॅस ९’ प्रणालीचा वापर जनुकांत बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारकरीत्या करता येईल, हे ओळखले. या प्रणालीद्वारे ‘कॅस ९’ विकराचा वापर करून डीएनएत बदल घडवून आणण्यासाठी अधिक जलद आणि कमी खर्चाची पद्धत उपलब्ध झाली आहे. सदोष जनुकांमुळे निर्माण होणारे आजार दूर करण्यासाठी, भविष्यात ही पद्धत मोठय़ा प्रमाणावर वापरली जाऊ  शकते.

✍ *डॉ. रंजन गर्गे*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[11/10, 07:32] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २००*
    *दिनांक- ११ऑक्टो.१९*

🎯 *परफेक्ट*

‘परफेक्ट’ माणूस असा कधी कुठं असतो का? जसा ‘सुखी माणसाचा सदरा’ नसतो, तसं परफेक्ट माणूसही नसतो. त्यामुळे आपण परफेक्ट नाही, असं समजून खंत वाटून घेण्यात काय अर्थ आहे?

एखादी आई जर दिवसभर घरात असेल आणि मुलांकडे-घराकडे बघत असेल; तर- आपण बाहेर जाऊन काम करत नाही, आपल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही, अशी खंत तिला वाटत राहते. ज्या स्त्रिया बाहेर जाऊन काम करतात, त्यांना ही खंत असते की, आपण मुलांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही.
खूप जास्त काम करणाऱ्या बाबांना वाटतं की, आपण मुलांना रोज वेळ देऊ शकत नाही, त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही, त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही. काही बाबांना वाटतं, आपण आणखी काम करायला पाहिजे, कुटुंबाची आणखी प्रगती करायला पाहिजे. स्वत:शी विसंवादी भूमिका कराव्या लागतात म्हणून अनेकांच्या मनात खंत असते.
एखाद्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेत आणखी जास्त गुण का मिळत नाहीत, ही खंत असते. एखाद्या आजीच्या मनात आपलं आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीनं जगायला हवं होतं, अशी खंत असते. तर एखाद्या आजोबांच्या मनात किती तरी गोष्टी शिकायच्या होत्या त्या राहून गेल्या, अशी खंत असते. कशासाठी खंत वाटून घ्यायची, हे फक्त आपल्याच हातात असतं?
सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे की, खंत वाटत राहणं ही कमालीची नकारात्मक आणि तितकीच हतबल भावना आहे. खंत मनाला आणि मग जिवाला कुरतडूत राहते. समाधानी होऊच देत नाही. सतत पण-परंतु चालूच असतात. मात्र, हे ओझं डोक्यात ठेवून जगण्याची काहीच गरज नाही. दु:ख-हतबलता-खंत-निराशा अशी ही साखळी आहे. या भावना एकमेकांत गुंफलेल्याच असतात. ती साखळी अगदी ठरवून मोडावी लागते.
शिवाय खंत वाटून परिस्थितीत काहीच सुधारणा घडवून आणता येत नाही. उलट यानं निष्क्रियता वाढते.
प्रश्न आणि समस्या याशिवाय आयुष्य नसतंच. कोणाचंही आयुष्य ‘परफेक्ट’ किंवा आदर्श नसतं. प्रत्येक जण आपापल्या समस्यांशी लढत असतो. हा संघर्ष कमी पडला म्हणून की काय, त्यात आणखी खंत या नकारात्मक भावनेला जागा कशासाठी करून द्यायची?

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[14/10, 07:38] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २०१*
    *दिनांक- १४ऑक्टो.१९*

🎯 *थकवा*

काम केल्यानं थकवा येतो, की काम न केल्यानं? अति शारीरिक किंवा अति बौद्धिक कष्ट केले की तात्पुरता थकवा येतो; पण त्यात काम पूर्ण केल्याचा आनंद खूपच जास्त असतो. ‘झालं एकदाचं!’ असा सुटकेचा नि:श्वासही असू शकतो.

याउलट काम न करणं, काहीही न करणं, अगदी बसल्या बसल्या कसलाही विचारही न करणं- यामुळे काय होतं, हे बघू या. सुट्टी थोडेच दिवस बरी वाटते. सुट्टीचं नियोजन चांगलं असेल, त्यातही वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी कामं असतील, तर सुट्टी चांगली जाते. काहीही केलं नाही, तर सुट्टी कंटाळवाणी जाते. अशा काहीही न करता घालवलेल्या दिवसांचा थकवा जास्त येतो.
याचं कारण काय? तर, आपल्या मेंदूला सतत चालना हवी असते. नवनवीन गोष्टी ऐकायच्या, बघायच्या असतात. स्वत: हातांनी करायच्या असतात. बोलायचं असतं. आपले अनुभव इतरांना सांगायचे असतात. या सर्व गोष्टी हव्या असतात. थकवा येतो तो ‘रुटीन’मुळे, तोचतोपणामुळे; कामामुळे नाही.
खूप थकलेली एखादी व्यक्ती घरी आली- आता अगदी पाऊलही पुढे टाकवत नाही, कोणाशी बोलायचं नाही, अशा अवस्थेत ती आहे. पण घरी आल्यावर एखाद्या जुन्या मित्राचा- मैत्रिणीचा फोन आला, तर अचानक कुठून उत्साह येतो माहीत नाही. गप्पा सुरू होतात. ‘दहा मिनिटांचं काम आहे, येणार का?’ असं विचारल्यावर ते काम दोन तासांवर गेलं तरी चालतं.
कधी संपूर्ण थकलेल्या माणसावर अचानक कोणाला तरी रुग्णालयात नेण्याची जबाबदारी येते. अशा प्रकारचं आणीबाणीचं काम आलं की थकवा वगैरे सर्व विसरून माणसं कामाला लागतात. कारण एकच : आपली काम करण्याची क्षमता भरपूर असते. अर्थात, जर आपण निरोगी असलो तरच!
अनेकदा थकवा हा शारीरिक नसतो, तर भावनिक असतो. या संदर्भात प्रत्येकाला स्वत:वर प्रयोग करण्याची पुरेपूर संधी आहे. असा एखादा दिवस, ज्या दिवशी ठरवलेल्या कामात अडथळे येत होते; पण आपण ते सोडवले. नेहमीपेक्षा त्या दिवसात खूप कामं पूर्ण केली. एकामागोमाग एक खूप लोक भेटले. प्रत्येकाशी बोलण्याचे विषय वेगळे होते. आणि तरीही थकवा आला नाही, उलट छान वाटत होतं.
स्वत:वर हा प्रयोग करून बघायलाच हवा!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[17/10, 07:27] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक- २०४*
*दिनांक- १७ ऑक्टो २०१९*

🎯 *समस्थानिके*

युरेनियम, थोरियम, रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होत जातो, याची कल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच संशोधकांना आली. मूलद्रव्याचा ऱ्हास होताना नवी ‘किरणोत्सारी मूलद्रव्ये’ निर्माण होऊन या ऱ्हासाचा शेवट शिसे या मूलद्रव्यात होत होता. या ऱ्हासात वेगवेगळा किरणोत्सार दर्शवणारी ४० वेगवेगळी मूलद्रव्ये निर्माण होत होती. आता ८२ अणुक्रमांक असणारे शिसे व ९२ अणुक्रमांक असणारे युरेनियम, यांदरम्यान या ४० ‘किरणोत्सारी मूलद्रव्यां’ना सामावून घेण्यास जागाच नव्हती. यातील काही मूलद्रव्यांचे गुणधर्म इतके सारखे होते, की रासायनिक पद्धतींद्वारे त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे अशक्यच होते. तसेच रासायनिक साधर्म्य असणाऱ्या आयोनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांचे वर्णपटही अगदी सारखे असल्याचेही आढळले होते. १९१३ साली याचे स्पष्टीकरण देताना, या मूलद्रव्यांवर संशोधन करणारा इंग्रज संशोधक फ्रेडरिक सॉडी याने- यातील सारखेच रासायनिक गुणधर्म असणारे अणू हे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू नसून ते एकाच मूलद्रव्याचे, परंतु वेगवेगळा अणुभार असणारे अणू असल्याचे सुचवले. अशा अणूंना त्याने ‘समस्थानिक’ (आयसोटोप) ही संज्ञा सुचवली.
याच काळात इंग्रज संशोधक जे. जे. थॉमसन याचे धनविद्युतभारित कणांवर संशोधन चालू होते. थॉमसन या संशोधनात- निऑनचे धनविद्युतभारित आयन विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रातून कसा प्रवास करतात, ते अभ्यासत होता. प्रवासानंतर हे अणू कुठे आदळतात, हे पाहण्यासाठी थॉमसनने फोटोग्राफिक फिल्मचा वापर केला. विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली निऑनच्या आयनांचा मार्ग काही अंशात वळणे अपेक्षित होतेच. तसे ते झालेही! परंतु निऑनचा झोत दोन मार्गामध्ये विभागला गेल्याचे त्याला आढळले. या निरीक्षणांवरून थॉमसनने निऑन वायुमधील ९० टक्के अणूंचा अणुभार २० असावा, तर उर्वरित दहा टक्के अणूंचा अणुभार २२ असावा, असे गणित मांडले. हे दोन्ही अणू निऑन या मूलद्रव्याचे समस्थानिक होते.

थॉमसनच्या या संशोधनामुळे सॉडी याचे निष्कर्ष खरे ठरले. यानंतर सहा वर्षांतच, थॉमसनचाच विद्यार्थी असणाऱ्या फ्रान्सिस अ‍ॅस्टन याने समस्थानिकांचे प्रमाण मोजण्यासाठी ‘मास स्पेक्ट्रोग्राफ’ हे साधन तयार केले. समस्थानिकांच्या शोधात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या फ्रेडरिक सॉडी याचा १९२१ सालचे, तर मास स्पेक्ट्रोग्राफच्या निर्मितीबद्दल फ्रान्सिस अ‍ॅस्टन याचा १९२२ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

✍ *डॉ. मानसी राजाध्यक्ष*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[17/10, 07:27] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २०४*
    *दिनांक-१७ ऑक्टो १९*

🎯 *अनुभव-वय*

आपल्या शरीराचं एक निश्चित वय असतं. पण विविध अनुभवांच्या पातळीवर आपली वयं पूर्णपणे वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, पहिलीतल्या मुलांचं शारीरिक वय हे सहा वर्ष पूर्ण असेल; पण पहिलीतले विद्यार्थी म्हणून त्यांचं वय शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ एक दिवस असेल.

एखादी साठ वर्ष वयाची व्यक्ती प्रथमच संगणक हाताळत असेल; तेव्हा तिचंही संगणक शिक्षणातलं वय जेवढे दिवस संगणक हाताळून झाले तेवढंच असतं, असं मानायला हवं. एखादी व्यक्ती अभियंता म्हणून पाच वर्ष काम करत असेल, तर ते वय साहजिकच पाच वर्ष; पण या व्यक्तीला पहिलं बाळ होईल, त्या दिवशी पालक म्हणून त्याचं वय केवळ एक दिवस असेल, कारण या क्षेत्रात ही व्यक्ती अगदी नवी आणि अननुभवी आहे.
प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक शिक्षणात, प्रत्येक कामात वेगवेगळी आव्हानं असतात. ती आव्हानं पेलताना आणि समस्या सोडवताना कस लागतो. कारण प्रत्येक अनुभव वेगळा असतो. या समस्याही वेगळ्या असतात. ‘सहा वर्षांचा घोडा झालास, तरी वजाबाकी जमत नाही,’ या वाक्याला काहीच अर्थ नाही. पहिल्या मुलाचं करताना चुका झाल्या, असं कबूल करणारे अनेक असतात.
असे आपण कायमच वेगवेगळ्या अनुभव-वयाचे बनून समाजात वावरत असतो. समजा, आपल्याला दोन मुलं असतील, तरी दोन्ही मुलं आपल्याला वेगवेगळा अनुभव देतात. परीक्षेला बसवतात. एकाचा स्वभाव दुसऱ्यापेक्षा पूर्ण वेगळा असतो. एकाच्या वस्तू कदाचित दुसऱ्याला चालतील; पण एकाच्या वेळचे आपले अनुभव दुसऱ्याच्या वेळेला चालतीलच, असं सांगता येत नाही. अशा वेळी आपल्या अनुभव-वयाचं महत्त्व फार जाणवतं.
आपण नवीन गोष्टी शिकत असतो, नव्या कामावर रुजू झालेलो असतो, तेव्हा तिथले आधीचे अनुभव तुलनेने कमी असतात किंवा अजिबातच नसतात. न्यूरॉन्सच्या जोडण्या झालेल्या असतील तर त्या काही प्रमाणात मदत करतील; पण नव्यानं प्रयत्न करावेच लागतील. ज्या दिवशी अनुभव घेऊ, त्या दिवसापासून पुढे न्यूरॉन्सच्या जोडण्या सुरू होतील. तेच आपलं त्या क्षेत्रातलं वय. हे समजून घेतलं, तर अनेक गोष्टी सोप्या होतील. आणि शिकण्याचं.. अनुभवांचं महत्त्व वाढेल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[18/10, 07:51] +91 75880 52291: *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-२०५*
*दिनांक-१८ऑक्टो१९*

🎯 *केंद्रकीय अभिक्रिया*

बेक्वेरेलने १८९६ साली किरणोत्साराचा शोध लावला. त्यानंतर १९०१ साली अर्नेस्ट रुदरफर्ड आणि फ्रेडरिक सॉडी यांनी थोरियमच्या किरणोत्सारी ऱ्हासात रेडियमची निर्मिती होत असल्याचे दाखवून दिले. असा किरणोत्सारी ऱ्हास हे एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यात होणारे रूपांतर असते. अशाच प्रकारचे रूपांतर कृत्रिमपणे, केंद्रकीय अभिक्रियेद्वारे घडवून आणणे शक्य असल्याचे रुदरफर्डचे मत होते. केंद्रकीय अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेत मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा सहभाग असतो अशी क्रिया. इ.स. १९१७ मध्ये रुदरफर्डने नायट्रोजनच्या अणूंवर अल्फा कणांचा मारा केला आणि त्यातून प्रोटॉनचे उत्सर्जन झाले. (या प्रयोगाद्वारेच रुदरफर्डने अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनच्या अस्तित्वाचा शोध लावला.) रुदरफर्डचा कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील सहकारी असणाऱ्या पॅट्रिक ब्लॅकेटने अशा प्रयोगात नायट्रोजनच्या अणूंचे ऑक्सिजनच्या अणूंत रूपांतर होत असल्याचे कालांतराने दाखवून दिले. रुदरफर्डचा हा प्रयोग म्हणजे कृत्रिमपणे घडवलेली केंद्रकीय अभिक्रिया होती.
अशी केंद्रकीय अभिक्रिया मोठय़ा प्रमाणावर घडवून आणण्यासाठी विद्युतभारित कणांकडे मोठय़ा प्रमाणात ऊर्जा असणे गरजेचे होते. जर अत्यंत कमी दाबाखाली असणाऱ्या हायड्रोजन वायूत विद्युतविमोच (इलेक्ट्रिक डिसचार्ज) निर्माण केला, तर हायड्रोजनच्या केंद्रकांची- म्हणजे प्रोटॉनची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होऊ  शकते. उच्च विद्युतदाबाद्वारे या प्रोटॉनची ऊर्जा हवी तशी वाढवताही येते. काही वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतीलच जॉन कॉकक्रॉफ्ट आणि एर्नेस्ट वॉल्टन यांना १९३२ साली अशा प्रकारचे साधन निर्माण करण्यात यश आले. या साधनांचा वापर करून या संशोधकांनी लिथियमच्या लक्ष्यावर ऊर्जाधारी प्रोटॉनचा मारा केला. या माऱ्यामुळे प्रत्येक लिथियमच्या अणूपासून दोन अल्फा कण निर्माण होणे अपेक्षित होते.

कॉकक्रॉफ्ट आणि वॉल्टन यांनी या माऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या कणांची प्रतिदीप्त (फ्लुओरेसन्ट) पडद्यावरील स्फुल्लिंगांद्वारे (फ्लॅश) संख्या मोजली. तसेच या कणांचा विद्युतभार व वस्तुमान तपासल्यानंतर हे कण अपेक्षेप्रमाणेच अल्फा कण निघाले. बोरॉन व फ्लुओरिन या मूलद्रव्यांवर प्रोटॉनचा मारा केल्यासही अल्फा कणांची निर्मिती होत होती. या प्रयोगांतून ऊर्जाधारी विद्युतभारित कणांच्या माऱ्याद्वारे केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणता येत असल्याचे सिद्ध झाले. या संशोधनाने किरणोत्सारी समस्थानिकांच्या निर्मितीचा नवा मार्ग सापडला. जॉन कॉकक्रॉफ्ट आणि एर्नेस्ट वॉल्टन हे या संशोधनामुळे १९५१ सालच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले.

✍ *डॉ. मानसी राजाध्यक्ष*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[18/10, 07:52] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२०५*
   *दिनांक-१८ऑक्टो१९*

🎯 *शक्तिस्थान*

आपण अनेकांना आपलं प्रेरणास्थान मानत असतो. इतर व्यक्तींकडून शिकण्यासारखं खूप काही आहे असं वाटतं, तेव्हा आपण त्यांना आदर्श मानतो. कधी असाही विचार करायला हवा, की आपल्यातही काही आदर्श वाटतील अशा गोष्टी आहेत का? आपल्यातली शक्तिस्थानं कोणती?

किमान एक गोष्ट अशी कोणती आहे, की जी आपलीच आपल्याला आवडते? उत्साही स्वभाव, निर्णयक्षमता, न रागावण्याची वृत्ती, प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची सवय अशी काही विशिष्ट प्रकारची स्वभावरचना? किंवा एखादं शिकून घेतलेलं विशेष कौशल्य? अशा एक किंवा अनेक घटना- ज्यात आपण घेतलेले आणि योग्य ठरलेले निर्णय, जे कदाचित दुसरा कोणी घेऊ  शकला नसता? अशा गोष्टी शोधून, तपासून या बाबतीत ‘आपणच आपलं प्रेरणास्थान’ असं आपण म्हणू शकतो.
स्वत:ला काय आवडतं, काय चांगलं जमतं, हे माहीत नसणारी बरीच माणसं असतात. कधी स्वत:कडे बघायला, स्वत:चं विश्लेषण करायला वेळच झालेला नसतो. स्वत:ला कमी लेखण्याची प्रवृत्ती असल्यामुळे – आपल्यात काही चांगलं असू शकत नाही असा न्यूनगंड असतो. संसार, नोकरी वा घरकामात गुंतल्यामुळे स्वत:तल्या गुणांची जाणीवच हरवून बसते. असं होऊ  नये म्हणून सर्वात जास्त प्रयत्न आपणच करायला हवेत.
यासाठी स्वत:ला मोकळं करायला हवं! आपण अनेकदा इतरांसाठी अनेक कामं उत्कृष्ट पद्धतीने करतो. दुसऱ्या कोणाकडून शाबासकी मिळावी, प्रोत्साहन मिळावं याची अपेक्षा करतो. मात्र, स्वत:ची शाबासकी मिळण्यासाठीही काही गोष्टी करायला हव्यात. अशी स्वत:चीच सतत शाबासकी मिळवत राहिलो, स्वत:शी मोकळेपणानं बोलत राहिलो, तपासत राहिलो तर आपल्या वाटेवरच्या खाणाखुणा आपल्याला नक्कीच सापडतील.
जर शोधूनही अशा खाणाखुणा सापडल्या नाहीत; सतत चुकलेले निर्णय, अपयशच डोक्यात भिरभिरत राहिलं, तर त्यापासून दूर जायला हवं. कारण अपयश आपल्याला हेच शिकवतं की, काहीतरी चुकलंय नक्की! काय चुकलंय, ते शोधायचं आणि मार्ग काढायचा! कदाचित ‘मार्ग काढणं’ हेच आपलं शक्तिस्थान असू शकतं!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[21/10, 06:57] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २०६*
    *दिनांक-२१ऑक्टो १९*

🎯 *चूक कबूल!*

हातून एखादी चूक होऊन जाणं म्हणजे नक्की काय असतं? मेंदूच्या भाषेत बोलायचं तर अनवधानाने झालेली गफलत. योग्य ठिकाणी कदाचित पुरेसं लक्ष न दिल्यानं योग्य कृती झाली नाही. लक्ष दिलं नाही, तिथं अवधान (अटेन्शन) गेलं नाही म्हणून घडून येते ती चूक.. गोंधळ.

अशा चुका प्रत्येकाकडून वारंवार होत असतात. चूक होऊ  नये, याची खबरदारी घ्यायची असते. पण चूक झालीच तर?
आपल्या लक्षात आलं की, आपल्या हातून काही तरी चूक झालेली आहे, तर आपण स्वत:च कबूल करून टाकणं जास्त योग्य असतं. पण हे कित्येकांना जमत नाही. त्यांना चूक मान्य नसते. काहींना अवघड वाटतं, तर काहींना त्यात कमीपणा वाटतो. काही जण चुकांवर पांघरूण घालायला जातात. काही तरी सारवासारवी करायला जातांत. यातून अजूनच गुंतागुंत निर्माण होते. काही जण तर स्वत:च्या चुका कबूल न करता उलट माझंच कसं बरोबर, हे सांगायला लागतात.
अशा वेळी आपण मूळ प्रश्नापासून बरेच लांब चाललो आहोत, हे लक्षात येत नाही. कारण चूक कशी लपवायची, याचा विचार मेंदू करायला लागल्यामुळे, ती सुधारायची कशी हे त्याला कसं सुचणार? कारण मेंदू एकावेळी एकच विचार करू शकतो.
असं कसं झालं? का झालं? माझ्या हातून असं झालंच कसं? नुकसान किती झालं? कोणाचं झालं? अशा प्रश्नांच्या गर्तेत राहून तेच तेच विचार मनात घोटाळत राहतात. त्यापेक्षा जे घडून गेलं आहे, त्याच्यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असते.
खरं तर, स्वत:च्या चुका मान्य करायच्या असतील तर धाडस असावं लागतं. एकदा का धाडस एकवटून चूक कबूल केली, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा ताण जातो. हलकं वाटायला लागतं. जे काही समोर वाढून ठेवलेलं आहे, त्याला सामोरं जायची हिंमत येते. ‘कॉर्टिसॉल’ हे ताणकारक रसायन काहीही बरं सुचू देत नाही आणि मार्ग काढण्यासाठी डोकं शांत ठेवण्याची गरज असते. हे काम ‘ऑक्सिटोसिन’ हे रसायन करायला घेतं. याचा परिणाम म्हणजे-जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडवण्याचा तार्किक विचार मेंदू करायला लागतो. हेच तर त्याक्षणी सर्वात आवश्यक आहे.

🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[22/10, 07:28] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २०७*
    *दिनांक- २२ऑक्टो १९*

🎯 *हसरं विज्ञान*

‘हसणं’ या कृतीचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल? – चेहऱ्यावरचे असे हावभाव; ज्यात ओठांचे स्नायू दोन्ही टोकांकडे ताणले जातात. ज्यामुळे माणसाच्या मनातला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हसणाऱ्या माणसाचे डोळे हसतात. त्याचा पूर्ण चेहराच बोलतो. अनोळखी माणसाकडे बघून स्मितहास्य केलं तरी उत्तरादाखल ती व्यक्तीही हसते. आंतरसांस्कृतिक संशोधनांतूनही हे स्पष्ट झालं आहे की, जगभरात कुठेही चालणारी भाषा म्हणजे हास्याची भाषा.

अवघ्या सृष्टीत माणसालाच फक्त हसता येतं. इतर प्राण्यांपैकी काही प्राण्यांना विविध कारणांमुळे आनंद होतो, वेगवेगळ्या पद्धतीने हे प्राणी झालेला आनंद दाखवतातही. पण त्यांना हसता येत नाही.
तीन महिन्यांनंतर छोटी बाळं आईकडे बघून नीट, अगदी डोळ्यातून हसतात. इतरांकडे बघून हसतात, तेव्हा ते मूल हळूहळू सामाजिक होत चाललं आहे, याची ती खूण असते.  लहान मुलं दिवसातून खूप वेळा हसतात. हसतात तेव्हा अगदी खळखळून हसतात. मनापासून हसतात. लहान मुलांच्या तुलनेत मोठी माणसं फार कमी हसतात. अनेकदा माणसांवर गंभीर परिस्थिती ओढवते. कर्ज, कुटुंबातले वाद- चिंता यामुळे त्यांच्यावर ताण येतो. माणसं दु:खात असतात, त्या वेळी आधाराचं स्मितहास्य केलं तरी समोरच्या माणसाच्या मनात आनंदाची भावना निर्माण होते. एक साधंसं हास्य माणसाला खूप काही देतं. आपण हसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण जातो. नकारात्मक भावना दूर होतात. सेरोटोनिन, एन्डॉर्फिन आणि डोपामाईन ही तीनही आनंद निर्माण करणारी रसायनं निर्माण होतात आणि काही क्षणांतच ती रक्तप्रवाहात उतरतात. यामुळे शरीरभर ही आनंदाची भावना पसरत जाते. एन्डॉर्फिन या रसायनाला तर नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ओळखलं जातं. हे एन्डॉर्फिन निर्माण करण्याचं काम आपण आनंदी राहून- हसून करू शकतो. शरीरातच तयार झाल्यानं पूर्णत: नैसर्गिक असलेल्या या रसायनाचे कसलेही ‘साइड इफेक्ट’ असण्याची कसलीही शक्यता नाही. या रसायनांचा अतिशय चांगला परिणाम हृदयाची गती आणि रक्तदाब यावर होतो.   हसणं हे अनेकदा उपचारांचं काम करतं ते असं. या हास्योपचारांवर आधारित हास्य क्लब आपल्याला माहीत आहेत. मनापासून हसलो तर रसायनं आपली कामं योग्य बजावतात. या सकारात्मक भावनांमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही आपोआपच वाढते. म्हणून हसण्याची ही नैसर्गिक देणगी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[23/10, 06:38] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२०८*
    *दिनांक-२३ऑक्टो१९*

🎯 *समाजाची प्रतिकृती- वर्ग*

शाळेतले वर्ग हा समाजाचा एक छोटासा घटक असतो. मोठं झाल्यावर ज्या गोष्टी सामोऱ्या येणार आहेत, त्याची तयारी लहानपणापासूनच वर्गामध्ये होते – होऊ शकते.

या वर्गामध्ये येऊन मुलं विविध विषयांचं शिक्षण घेतात; ही शाळेची शिक्षणविषयक एक बाजू झाली. पण शाळा काही एवढंच शिकवत नाही.  मुला-मुलींचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व इथेच कळत-नकळत फुलत असतं.
शाळेत मुलांना खेळायला, मत्री करायला अनेक मुलं मिळतात. या वातावरणात मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. समजून घेत असतात. घराबाहेर पडल्यावर कसं वागायचं असतं, मत्री कशी करायची असते, परस्परांमध्ये मतभेद कसे निर्माण होतात, मतभेद झाले तर काय उपाय, भांडाभांडी किंवा मारामारी हा त्यावर उपाय आहे का? आपले मुद्दे कसे पटवून द्यायचे? समोरच्या माणसाचे मुद्दे कसे मान्य करायचे, एखादी गोष्ट कुठपर्यंत ताणायची, कुठे सोडायची ही सर्व कौशल्ये आहेत. आजकाल यालाच ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. अशी ‘ सॉफ्ट स्किल्स’ शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु लहानपणी एक चांगली शाळा आणि खेळायला भरपूर मित्र- मत्रिणी मिळाले तर ही कौशल्यं लहानपणीच आत्मसात होतात, मुद्दाम शिकावी लागतच नाहीत. या कारणासाठीही शाळेत मोकळेपणा असायला हवा. शाळेत सर्व तऱ्हेची मुलं- मुली शाळेत आली तर त्यातून प्रत्येक न प्रत्येक मूल नवीन नक्कीच शिकेल.
एकाच प्रकारच्या आर्थिक – सामाजिक- धार्मिक- सांस्कृतिक गटातल्या मुला-मुलींबरोबर सतत राहिल्याने इतर समाज काय आहे, इतरांची मूल्यं, त्यांची जीवनशैली, त्याचे प्रश्न, त्यांच्यातले गुण समजत नाहीत. विशिष्ट गटासाठी असलेल्या शाळांमध्ये मुलं शिकली तर  इतर गटातल्या मुलांशी मत्री होत नाहीत. त्यामुळे त्यांचं जगणं कसं असतं, ती कशी राहतात, हे इतरांना कधी कळत नाही. एकमेकांविषयी आत्मीयता निर्माण होत नाही. यामुळे धोका असा निर्माण होतो की आपलं जे जग तेच खरं जग असं वाटत राहतं. आणि असं प्रत्येकच वर्गाला वाटत राहतं. त्यामुळे समाजात  सर्व गटांची  सरमिसळ होत नाही.
विविध गटातली मुलं एकत्र राहतील, खेळतील, दंगा करतील, एकमेकांच्या डब्यातलं खातील – त्याबरोबर सुख-दु:खंही वाटून घेतील. तेव्हाच खरी मत्री निर्माण होईल. मुख्य म्हणजे समाजाची बहुसांस्कृतिक वीण कळत जाईल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[30/10, 07:52] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२११*
    *दिनांक-३०ऑक्टो.१९*

🎯 *एका वेळी काय काय?*

आपण अनेकदा एक गोष्ट करत असतो आणि त्यावेळी मनात दुसरं चालू असतं. शिवाय तिसरंही चालू असतंच. एकापाठोपाठ एक वेगवान विचार असतात हे. तेही बऱ्याचदा चालू कामापासून, चालू अनुभवापासून विचलित करणारे!

समजा आपल्याला जुना मित्र किंवा मैत्रीण भेटली, खूप सुंदर आणि वेगळाच पक्षी अचानक समोर आला, हिरवागार डोंगर किंवा अगदी काहीही. तर त्याच वेळी लक्षात येतं की, चला, या क्षणाचा फोटो तर काढायला हवाच. मग मोबाइल बाहेर काढायचा. इथे नेटवर्क असेल का, याची मनात आधी चिंता. नेटवर्क असलं, फोटो काढला आणि फेसबुक/ व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांवर टाकला की पुन्हा चालू कामात यायला आपल्याला वेळ मिळतो.
नेटवर्क नसेल तर जोवर फोटो टाकत नाही, तोपर्यंत एक बारीकशी अस्वस्थता मनात येतेच. हे विचार रेंगाळताहेत तोपर्यंत इतर लोक काय करताहेत, काय म्हणताहेत, याची उत्सुकता बाजूला टाकता येत नाही.
या सगळ्यामुळे आत्ता आपण काय बघत होतो, आपल्याला काय दिसलं होतं, आपण काय खात होतो, आपल्याला कोण भेटलं होतं, या सगळ्या गोष्टी मनापासून लांब लांब निघून जातात. जगण्याचा छान अनुभव हाताशी असूनही आपण तो घेत नाही.
आपल्या आत एक मन असतं. ते सतत, न थांबता ‘नोटिफिकेशन’ देतच राहतं. आपण जगत असतो तो प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस या नोटिफिकेशन्सकडे लक्ष द्यावं लागतं. आपण ज्या काळात जगतो आहोत तो काळ एकावेळी अनेक कामं करण्याचा आहे. नेहमीच्या भाषेत-मल्टिटास्किंग. आपला मेंदू एका वेळी अनेक गोष्टी करू शकत नाही. त्या त्या वेळी खूप ताण येतो असं नाही, तर आपण जे काही काम किंवा अभ्यास करत असतो ते तितकंसं चांगलं होत नाही, कारण त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही.
आपण जे करत आहोत तिथेच आपलं लक्ष असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर हे खूप साधं आहे. ऐकायला-वाचायला फारच सोपं. पण स्वत:ला वर्तमानात ठेवण्यासाठी, स्वत:च्याच मनात जागा करणं हे अनेकांना अवघड जातं आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[31/10, 07:09] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२१२*
    *दिनांक-३१ ऑक्टो१९*

🎯 *मेंदूचा शोध आणि मी*

आपला मेंदू केवळ आपल्या ताब्यात असतो, दुसऱ्या कोणाच्याही नाही, असं म्हटलं तरी त्याचा शोध मात्र लागत नाही. आपण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबाबत म्हणतो की, ‘ते असे वागतील असं वाटलं नव्हतं.’ आपण इतरांबद्दल अशी सहजपणे विधानं करतो, पण आपला मेंदू कुठल्या प्रसंगात कसा वागतो, कसा वागेल हे स्वत:च्या मेंदूबद्दल तरी सांगता येतं का?
मेंदुसंशोधानातून मनोव्यापाराच्या जवळ जायचा प्रयत्न चालू आहे. मेंदूत खेळत असलेल्या रक्तप्रवाहावरून विचारप्रक्रिया आणि भावना यांचा शोध लावला तर ‘मी’ चा संपूर्ण शोध लागू शकेल. तोपर्यंत आपल्यालाच स्वत:चा शोध चालू ठेवावा लागेल.

या शोधातूनच जे प्रसंग आपल्या संदर्भात नेहमी घडतात, घडण्याची शक्यता असते, त्याला आपला मेंदू कसा प्रतिसाद देतो-देणार आहे, हे बऱ्यापैकी माहीत असतं. पण अनपेक्षित प्रसंगात आपला मेंदू कसा वागणार आहे याबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता बरीच असते. एखादी आपत्ती ओढवली आणि त्यात योग्य निर्णय घेऊन ती परिस्थिती अचूक हाताळली असंही होऊ  शकतं. तसंच एखाद्या प्रसंगात ‘मला असं करायचं नव्हतं, तरीही मी का केलं? हे माझ्या हातून झालंच कसं?’ असे टोकाचे प्रश्नही पडतात. या दोन्ही प्रसंगी कार्यरत असणारा, निर्णय घेणारा तो एकच मेंदू आहे, याची गंमत वाटते.
अनेकदा स्वत:चं मन कसोशीने जपणारी माणसं, दुसऱ्याचं मन मात्र नकळत किंवा अगदी कळतही दुखावतात. अशा प्रकारे वागल्याबद्दल पश्चात्ताप असेलच असं नाही. उलट यातून ‘विकृत आनंद’ मिळतो. कधी कधी आपण दुसऱ्याच्या चुकांवर छानसं पांघरूण घालण्यात यशस्वी होतो. पण स्वत:ला मात्र तशाच प्रकारच्या वागण्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. स्वत:ची भरपूर निंदा करतो. अपराधी वाटून घेतो.
हे सर्व एकाच माणसाच्या मेंदूतले मनोव्यापार असू शकतात. माझा स्वभाव नक्की कसा, हा प्रश्न प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी पडतोच. हे प्रश्न पडायला हवे. गोतावळ्यात राहून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू असतो. अर्थात हे काही फार जाणीवपूर्वक चालू असतं असं नाही. पण मनात-अंतर्मनात-सुप्तमनात कुठे तरी ‘मी’ ला शोधणं, ओळखणं,  हे असतंच. असायला हवं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[01/11, 07:39] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २१३*
    *दिनांक-१ नोव्हें १९*

🎯 *आपलंसं..*

आपलंसं वाटणं- मेंदूची, मनाची, व्यक्तिमत्त्वाची, समतोल भावनांची, आरोग्याची, निर्णयक्षमतेची, बुद्धीच्या समस्थितीची- केवढी मोठी गरज!
आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते, की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं; प्रेम करायला आवडतं, तसं प्रेम करवून घ्यायलाही आवडतं; आपलं कोणीतरी आहे, ही भावना आवडते. ज्या माणसांना लहानपणापासून घरात, शाळेत, समाजात प्रेम मिळत जातं,  त्यांना आयुष्याच्या अगदी सुरुवातीपासूनच ‘आपलेपणा’ या शब्दाचा अर्थही कळत जातो.

माझी अशी एक जागा आहे, माझ्यावर प्रेम करणारे जवळचे लोक आहेत, तिथं माझं निश्चितपणे ऐकलं जातं आणि माझं कोणीतरी आहे – ही भावना फार महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाला मिळायला हवी. आयुष्यात जेव्हा वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याची वेळ येते, तेव्हा याच भावना प्रचंड आधार देतात.
परंतु असा आपलेपणा प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही. घरात सर्व वस्तू असतात, पण मानसिक दुरावा फार असतो. आणि काहींच्या वाटय़ाला घरच नसतं. अनेकांना आपलेपणाच्या शोधात राहावं लागतं. आपलेपणा माहीतच नाही, अशा मानसिकतेत जी मुलं मोठी होतात, त्यांच्या भावना फार वेगळ्या असतात.
कोणीतरी आपल्याला आपलं समजण्याची भावना आणि आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण्याची भावना, या दोन्हीत बराच फरक आहे : (अ) सर्वाच्या मनात जेव्हा आपलेपणाची भावना असते; तेव्हा हे माहीत असतं की, आपण जसं आहोत तसं स्वीकारले जाणार आहोत. (ब) विशिष्ट पद्धतीनंच वागलं आणि परिस्थितीशी जुळवून घेतलं तरच स्वीकारले जाणार आहोत.. या दोन गोष्टी पूर्णच वेगळ्या आहेत.
आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहीत असतं, की आपलेपणा कुठं मिळेल, आपण जसं आहोत तसं कुठं वागू शकतो? स्वभावातल्या गुण आणि दोषांसह विचित्रपणाही स्वीकारला जाईल, अशा जागा माणूस शोधत असतो आणि जिथं आपल्याला छान, हलकं आणि आपलंसं वाटतं त्यांच्याशी जोडले जातो.
वर्गात मुलांना आपलंसं वाटलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं शिकतात. सौहार्दपूर्ण वातावरणात माणसं जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतात. अशा पद्धतीत अभ्यास करण्याची किंवा काम करण्याची ऊर्जा वाढण्याची शक्यताही असते. यासाठी किमान एक तरी आपलंसं वाटण्याची जागा प्रत्येकाकडे असली पाहिजे!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[04/11, 06:41] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २१४*
    *दिनांक-४नोव्हें१९*

🎯 *वास्तव उत्तरं*
वयात यायच्या काळात मुलांना आसपास बघून कित्येक मूलभूत प्रश्न पडायला लागतात. साहजिकच अशा प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर शोधली जातात. पण अनेकदा लक्षात आलंय की, आपल्या- भारतीय मुलांचे प्रश्न आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली उत्तरं ही वेगळी असतात. एखाद्या प्रश्नावर भलतीच माहिती समोर येते. जास्तीची माहिती येऊन मनावर अक्षरश: आदळते. या सगळ्या माहितीचं मुलांनी काय करायचं असतं? मुलं छायाचित्रं बघतात. व्हिडीओ बघतात. एकमेकांना दाखवतात. पण यामुळे प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ती तशीच अनुत्तरित राहतात.
इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात. आपल्या परिस्थितीचा काही संबंधच नसतो. उदा. टीन एजर्ससाठी चालवलेल्या एका संकेतस्थळावर- नऊ  वर्षांच्या मुलीला संतती प्रतिबंधक औषधांबद्दल कसं सांगावं, याची चर्चा होती. तर एका १३ वर्षांच्या मुलीनं मानसशास्त्रज्ञ स्त्रीला असा प्रश्न विचारला होता की- मी वयात आले आहे, पण हे कळत नाहीये की आईला कसं सांगू? आपल्याकडे हा असा प्रश्नच गैरलागू ठरतो. कारण आई कितीही ‘बिझी’ असली, तरी तिचं स्वत:च्या वयात येऊ  घातलेल्या मुलीकडे लक्ष असतंच. मात्र यांसारखे अनेक प्रश्न इंटरनेटवरील संकेतस्थळांवर असतात.

त्यामुळे इंटरनेटवर सल्ले विचारताना आणि दिलेले सल्ले विचारात घेताना हा संस्कृतीतला फरक नक्कीच लक्षात घ्यायला हवा. तिकडे चौदा-पंधराच्या वयात मुलं स्वतंत्र होतात. तर आपल्याकडे हळूहळू सुटी होऊ  लागतात. आपल्याकडची आई नेमकं तेव्हाच ठरवते, की खूप वर्ष नोकरी केली, आता जरा काही वर्ष मुलांकडे बघू. आपल्याकडचं ‘मुलांकडे बघू’ प्रकरण कधी आणि कोणत्याच वयात संपत नाही. त्यामुळे आपल्या वागण्याला आणि प्रश्नांना इंटरनेटवरून कधी कधी उत्तरं मिळत असतील, तरी ती ‘संपूर्ण उत्तर’ ठरू शकत नाहीत. यासाठी वयात येणाऱ्या मुला-मुलींना प्रश्न पडणार आहेत; पण मुलं ते प्रश्न आपणहून विचारणार नाहीत, कधी कोणाशीही बोलणारही नाहीत, हे लक्षात घेऊन जाणत्या आणि शहाण्या माणसांनी त्यांच्याशी बोलत राहणं हेच योग्य उत्तर आहे!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[05/11, 07:07] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२१५*
    *दिनांक-५नोव्हें १९*

🎯 *दृष्टी*

आपल्या प्रत्येकाकडे भरपूर निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता असते. पण ती पुष्कळवेळा वापरली जात नाही. एखादी वस्तू कशी असते हे एकदा समजलं की पुन्हा म्हणून आपण त्या वस्तूच्या बांधणीचं निरीक्षण करायला जात नाही. विश्लेषण ही त्यापुढची गोष्ट आहे. अगदी आठ-दहा वर्षांपर्यंतची मुलं दिसलेल्या प्रत्येक वस्तूचं निरीक्षण करतातच. माणसांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतात, तेव्हा ते रचना बघत असतात. पुढे त्या रचनेतलं सौंदर्यही दिसलं पाहिजे, नाही तर ते दाखवलं पाहिजे.  उदाहरणार्थ, मधाच्या पोळ्याच्या एखाद्या तुकडय़ात काय बघायला मिळतं? एकसारख्या सुबक षटकोनांच्या रांगा. हात लावला तर एक वेगळाच निसर्गनिर्मित पोत. हाच तुकडा सरळ, उलटा, तिरका बघितला, भिंगातून बघितला, तर दर वेळी एक नवीन चित्र बघितल्यासारखं वाटतं. याच पद्धतीने कोणताही एक विषय घेऊन आपण निरीक्षण आणि त्यातून विश्लेषणाकडे जाऊ शकतो. काही माणसं ही कलात्मक नजर कायम जागती ठेवतात. म्हणून तर दगड कोरून निर्माण केलेली शिल्पं दिसतात. फांदीला, अगदी वाळलेल्या फुला-पानांपासूनही कलाकृती तयार होतात. काष्ठशिल्पं तयार होतात.

वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बघायला काहीच हरकत नसते. कारण त्यातून नव्या गोष्टी समजत जाण्याची शक्यता फारच असते, हे एक. आणि दुसरं म्हणजे, त्यातून आपण चिकित्सक होत जातो. एखादं पुस्तक वेगवेगळ्या वयात वाचलं तर त्यातून जाणवलेल्या, आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. पंधरा-सोळाव्या वर्षी वाचलेल्या काही गोष्टींचा अर्थ पंचविसाव्या वर्षी नव्याने लागतो. तोच अर्थ चाळिसाव्या आणि साठाव्या वर्षी वेगवेगळा भासतो. कारण मधल्या काळात आपण अनुभवी झालेले असतो. त्यामुळे अर्थाची वलयं बदलत असतात. विश्लेषणाची सवय लागलेली असते. पाठय़पुस्तकात वाचलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल, कवितेबद्दल, लेखक किंवा कवीबद्दल, त्यातल्या एखाद्या शास्त्रीय संकल्पनेबद्दल, चित्रकृतीबद्दल, इतिहासातल्या एखाद्या घटनेबद्दल – पुढे अनेक वर्षांनी ‘याचा शोध घ्यावा’, असं वाटू शकतं. यातून लहानपणी जाणता किंवा अजाणतेपणी केलेलं निरीक्षण असतं. लहानपणी ती संकल्पना मेंदूत रुजून बसलेली असते. त्यामुळे पुढे विश्लेषणाला वाव मिळतो.
(चित्र : पिकासोचा ‘सायकल बैल’)

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[06/11, 07:14] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२१६*
    *दिनांक-६नोव्हें १९*

🎯 *सहानुभूती आणि समानुभूती*

नाटक आणि सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून प्रेक्षकांनाही दु:ख वाटतं. त्यांना रडताना बघून रडायला येतं आणि त्यांना आनंद झाला तर आनंद होतो.  समोर चाललेली दृश्यं वास्तव नाहीत, हे माहीत असूनही असं घडतं. आपल्या ओळखीची व्यक्ती, नातेवाईक, मित्र यांच्यापैकी कोणी दु:खात असेल तरी आपल्याला वाईट वाटतं आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटतो. अन्य व्यक्तीच्या भावनांना अनुरूप आपल्या भावना होत जातात. याचं मेंदूतलं कारण म्हणजे भावना जाणवण्याचं क्षेत्र एकच आहे. त्यामुळे अन्य आणि स्वत: यांच्यात सहानुभूती तर असतेच. पण समानुभूतीदेखील असते. जे समोरच्याला वाटतं, तेच आपल्याला जाणवतं.

काही माणसं स्वत:च्या दु:खाचे कढही आतल्या आत जिरवतात आणि दुसऱ्यांच्या दु:खातही तटस्थ राहतात. तसे भासवण्यात यशस्वी होतात. कारण स्वत:च्या भावनांवर नव्हे; तर त्या भावनांच्या अभिव्यक्तीवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं असतं. नाटक- सिनेमा बघून तर ते ‘आतून हललेले’ इतरांना कधीच दाखवत नाहीत. त्यांना ते मुळीच आवडत नाही.

काही वेळा दुसऱ्यांच्या दु:खात दु:ख वाटेल. पण दुसऱ्यांच्या आनंदात आनंद वाटेलच असं नाही. खरं तर दुसऱ्यांच्या आनंदाने आनंद होतोच. या दोन्ही भावना अतिशय नैसर्गिक आहेत. पण हा आनंद किती क्षण, किती काळ टिकतो, हे या संदर्भात जास्त महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या आनंदामुळे झालेला आनंद दोन क्षणच टिकला तर तो आनंद झाल्याचंही कदाचित कळून येत नाही. लगेचच मत्सराची भावना ती जागा घेते. त्यामुळे आपल्याला आनंदही झाला होता, हेच आपण विसरून जातो. मात्र, ज्या माणसांना प्रामाणिकपणे कधीच सहानुभूती किंवा समानुभूती जाणवत नाही, त्यांच्यामध्ये काहीशी समस्या असू शकते. असं असेल तर ही माणसं स्वत:च्या भावनांकडेही अलिप्तपणे बघत असतील. एकतर त्या भावनांशी संबंधित रसायनांच्या प्रमाणामध्ये घोळ असेल किंवा मग भावनांच्या पलीकडे जाणारं प्रशिक्षण स्वत:ला दिलेलं असेल किंवा मेंदूत कसल्याच भावना उरू नयेत असे भयानक अनुभव लहानपणापासून आलेले असतील आणि त्या भावनांचं काय करायचं अशी दाहक परिस्थिती आली असेल तर संवेदना बोथट होण्याचा मानसिक आजार जडल्याची दाट शक्यता असते.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[07/11, 07:22] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२१७*
    *दिनांक- ७नोव्हें १९*

🎯 *चांगल्या ताणांच्या गोष्टी..*

ताण हे वाईट असतात. ज्या प्रकारच्या ताणामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात, ते अपकारक आणि  नकारात्मक असतात. उदाहरणार्थ, जी माणसं नीट वागत नाहीत, अपमानित करतात, त्यांच्याबरोबर राहणं हा एक नकारात्मक ताण आहे. त्यांनी नीट वागावं यासाठी किंवा आपली त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे नकारात्मक ताण येणार नाही.

केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही  हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो. अशा ताणात काय करावं, ते सुचत नाही. ही टोकाची अवस्था आहे. पण चांगले ताण आपलं आयुष्य घडवायला मदत करतात.

चार-पाच महिन्यांचं बाळ पालथं पडून पुढे सरकण्यासाठी जी काही अथक मेहनत घेत असतं, तेव्हा त्याला एक प्रकारचा ताण असतोच. म्हणून तर मधूनच ते रडून-ओरडून ताणाला मोकळी वाट करून देतं आणि पुन्हा आपल्या प्रयत्नांना लागतं. आपण पोहायला शिकत असतो. शिकवणारा एक दिवस अचानक आपल्याला सोडून देतो, मुळीच आधार देत नाही. अशा वेळी तुम्ही शक्य तितक्या जोरात हात-पाय मारता. इथं तुमच्यावर ताण असतो, पण तो उपकारक असतो. हा ताण खऱ्या अर्थानं पोहायचं कसं, हे शिकवतो. सायकल चालवायला शिकतानाही असंच घडतं. शिकवणारा हात सोडून देतो, तेव्हा ताण येतो. सायकल तशीच पुढे रेटली तरच ती चालवायला शिकतो. हा उपकारक ताण आहे. तो सकारात्मक असून जगण्यासाठी आणि नवी कौशल्यं शिकण्यासाठी आवश्यक असतो.

उपकारक तणाव असला, की चांगल्या प्रकारे काम होतं. प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. पण एखाद्याला कसला ताणच नसेल तर? आयुष्यात काही ध्येयच उरलं नाही, माणसाला काहीही काम नसेल, तर त्याला कसलाच आणि कधीही ताण येणार नाही. अशा माणसाचं आयुष्य नीरस होऊन जाईल. छोटी मुलंसुद्धा काहीही काम नसतानासुद्धा प्रयत्नपूर्वक वेगळ्या गोष्टी करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवतात. ज्येष्ठ नागरिकांनाही फारसं काम नसतं, पण ते मुद्दाम वेगवेगळी कामं स्वीकारतात. ताण ओढवून घेतात. अशा उपकारक ताणांमुळे त्यांचं आयुष्य आनंदी होतं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[08/11, 07:09] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २१८*
    *दिनांक- ८नोव्हें १९*

🎯 *स्वीकार*

अनेकदा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशी कोणतीही परिस्थिती- जशी आपल्याला हवी- तशी नसते. अशा वेळी आपण परिस्थितीशी झगडत राहतो. अशी परिस्थिती असेल, तर काही माणसं सगळा दोष नशिबावर ढकलतात; पण काही माणसं अवघड असलेल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. खूप झटतात. मेंदूला सतत नकारात्मक भावनांच्या रसायनांमध्ये ठेवलं, तर त्यातून ताणतणाव – सर्व प्रकारे भावनिक असंतुलन – नराश्य – खचलेपण – निद्राविकार – औषधांच्या आहारी जाणं – निर्णयक्षमता संपून जाणं – दिवसा उत्साह न वाटणं – त्यामुळे कामावर परिणाम होणं – नातेसंबंधांवर परिणाम होणं – परिणामी जगण्यातला रस संपून जाणं.. अशा क्रमाक्रमानं माणूस मनानं संपत जातो.  हे टाळायचं असेल, तर अनपेक्षित घटनांचा स्वीकार  करण्याची वृत्ती बाळगायला हवी.

नको असलेल्या परिस्थितीला शक्यतो टाळणं, तिला पुढे पुढे ढकलणं हे फारच सरळसाधे उपाय झाले. या उपायामुळे परिस्थिती बदलत नाही. फक्त ती तशी नाही, याचा आभास निर्माण होतो. हा आभास थोडय़ा काळासाठी आनंद देत असेल, पण आपली सुटका करत नाही.

त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला हवा. अशा प्रकारे स्वीकार करणं हे आपल्याला वाटतं तेवढं अवघड नसतं. ही एकदाच ठरवण्याची गोष्ट असते. ते झालं की, सगळे आभास संपतात. समोर फक्त वास्तव परिस्थितीच उरते.

एकदा का परिस्थितीचा स्वीकार करता आला, की त्यातून मार्ग काढणं शक्य होतं. नाही तर परिस्थितीशी मेंदूचा झगडा सतत चालू राहतो. यात मेंदूची खूपच ऊर्जा वाया जाते. नकारात्मक वातावरणात मेंदूला काम करणं, निर्णय घेणं, कार्यवाही करणं जड जातं. मात्र आहे त्या गोष्टींचा स्वीकार केला, की मार्ग काढणं तुलनेनं सोपं जातं.

त्याकडे सापेक्षतेनं बघायला हवं. आधी कधीही बघितलं नाही अशा नजरेनं बघायला हवं. दु:ख, संकटं, भीती यांना टाळता येत नाही; ते आजवर कोणालाही टळलेले नाहीत. पण त्यांना भिडलं, तर ते निघून जाण्याची शक्यता तरी निर्माण होते!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[11/11, 06:51] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२१९*
    *दिनांक-११नोव्हें१९*

🎯 *प्रोत्साहन आणि प्रेरणा*

आपल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात; पण त्या आपण तितक्याशा वापरत नाही. सढळपणे तर नाहीच. त्यातलीच एक क्षमता म्हणजे खरोखरच कौतुकास्पद गोष्टींना मनापासून प्रोत्साहन देणं. कोणत्याही कामाचं पुरेसं (अति नव्हे!) कौतुक होतं, तेव्हा त्या कामाला प्रोत्साहन मिळतं. या प्रोत्साहनामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. काम योग्य दिशेनं पुढे जाण्याची शक्यता वाढते.

– अभ्यास करणारं मूल > योग्य प्रमाणात प्रोत्साहन > योग्य प्रमाणात अभ्यास > यश > आत्मविश्वास.

– अभ्यास करणारं मूल > प्रोत्साहन नाही > अभ्यास > यश > आत्मविश्वास.

– अभ्यास न करणारं मूल > प्रोत्साहन नाही, फक्त टीका > अभ्यासापासून दुरावा > यश नाही > आत्मविश्वास नाही (परिणामी : न्यूनगंड किंवा आक्रमकता).

– अभ्यास न करणारं मूल > प्रोत्साहनपर शब्द > अभ्यास करण्याची शक्यता > यश मिळण्याची शक्यता > आत्मविश्वास वाढीला लागण्याची शक्यता.

– अभ्यास करणारं मूल > अतिकौतुक > फाजील आत्मविश्वास > यश/ अपयश > आत्मविश्वासावर सापेक्ष परिणाम.

..आणि या प्रोत्साहनातून त्यांना त्यांच्यातल्या क्षमतांची जाणीव करून देणं. ही खरोखर जादूई क्षमता आहे; पण आपण याचा फारसा वापर करत नाही.

कोणाच्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा प्रोत्साहनपर शब्द वापरून सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अपेक्षित परिणाम मिळू शकतात, किमान तशा शक्यता वाढतात. अर्थात, अभ्यास न करणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर शब्द वापरणं ही गोष्ट फारच अवघड आहे, असं बहुतेकांना वाटू शकतं. खूप जणांना हे चुकीचंच आहे, असंही वाटू शकतं. आपल्या समाजात हे शक्यच नाही, असं वाटणारेही असतात. कारण हा लांबचा वळसा आहे.

सुरुवातीला असं वाटतं की, काहीच धड होत नाही, सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत; पण हळूहळू परिस्थिती सुधारते. चुकीच्या गोष्टी करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि मुलं आपणहून योग्य मार्ग निवडतात. याचा परिणाम फार चांगला होतो. प्रत्येक वयात एक अहं असतोच. आपली कोणी तरी जाणीव ठेवतं आहे, यातून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[12/11, 07:12] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२०*
    *दिनांक-१२ नोव्हें १९*

🎯 *अक्कल*

पुस्तकी ज्ञानातून पूर्ण अक्कल येत नाही, तर पुस्तकातलं ज्ञान किंवा अनुभवातलं ज्ञान योग्य वेळेला वापरण्याची क्षमता म्हणजे अक्कल किंवा व्यवहारज्ञान असं आपण म्हणू शकू. आपल्या मुलांना ही अक्कल किंवा हे व्यवहारज्ञान यावं असं प्रत्येकच आईबाबांना वाटतं. मुलांच्यात ते नाही, असं का वाटत असतं, हे कळायला काही मार्ग नाही.

गंमत म्हणजे मुलं अतिशय बारकाईने आई-बाबांचं निरीक्षण करत असतात. आपल्या आई-बाबांचं कुठे चुकतंय, आपले आईबाबा कोणाशी चांगले वागतात, कोणाशी वाईट वागतात, कोण त्यांचा गैरफायदा घेतंय का, कोणाचा गैरफायदा आपले आई/बाबा घेत आहेत आईबाबांनी एकमेकांशी आणि इतरांनी कसं वागायला हवं, हे मुलांना न सांगताही समजत असतं. मुलं जशी मोठी होतात तसतसे ते आई-बाबांचे ही गुरू बनतात आणि आपल्या आई-बाबांना व्यवहारज्ञान शिकवायला लागतात.

मुलांना बाहेरच्या जगाचं ज्ञान यायला हवं यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार काही कामगिरी सोपवता येते.

– वय वर्षे पाचच्या पुढे मुलं एकमेकांशी खेळतात तेव्हा ती सामाजिकतेचे पहिले धडे घेत असतात. ते त्यांचे त्यांना घेऊ द्यावेत. आपलं लक्ष असावं पण त्यांना मैत्री करायची असते. मुलं मैत्री करत असतात.  एखादं खेळणं आपापसात वाटून खेळता येतं की नाही हे बघावं. मुलं भांडतात, पण अधूनमधून एकमेकांशी खेळता यायला हवं. ज्या खेळांमध्ये टीमवर्कची गरज असते असे क्रिकेट, फुटबॉल असे खेळ त्यांनी अवश्य शिकावेत.

– घरात बसून अभ्यास करायला लावून ज्ञान मिळेल, पण व्यवहारज्ञान नाही हे लक्षात घेऊन वेळोवेळी घराबाहेर, शिबिरांत, अन्य माणसांमध्ये त्यांनी मिसळायला हवं.

– गिर्यारोहण, साहसी खेळ मुलांना आवडतात. यामुळे समस्या सोडवण्याची सवय लागेल.

कायम कोशात राहणारी किंवा आई-बाबांच्या पंखाखाली असणारी मुलं व्यवहारज्ञान कसे शिकतील?

त्यामुळे ही फुलपाखरं कोशातून बाहेर येतील. जिथे-तिथे त्यांना मदत करण्यापेक्षा थोडंसं स्वतचं डोकं वापरून एखाद्या समस्येतून बाहेर पडायला त्यांना जेव्हा जमेल, तेव्हा त्यांच्यात चांगल्या प्रकारे आत्मविश्वास येऊ शकेल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[13/11, 08:05] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२१*
    *दिनांक-१३ नोव्हें १९*

🎯 *मेंदूपूरक हक्क*

मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा विचार करता बालहक्कांची मांडणी केलेली आहे. या हक्कांमध्ये एक भाग आहे – प्रोव्हिजन (उपलब्धता किंवा पुरवठा), म्हणजे ज्या गोष्टी मुलांना दिल्या पाहिजेत. जगण्याचा हक्क ही यातली प्रमुख बाब. अन्न, वस्त्र, निवारा मिळायला हवा. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, वैद्यकीय सुविधा, सुरक्षित वातावरण मिळायला हवं. निरनिराळ्या प्रकारच्या संकटांत, आपत्तीत मुलं सापडली असतील तर त्यांना हे मूलभूत हक्क मिळत नाहीत, तेव्हा अशा सर्व परिस्थितीत त्यांची काळजी समाजाने घ्यायला हवी. याप्रमाणे मुलांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करून घेण्याचा हक्क आहे. जी माणसं किंवा संस्था मुलांच्या समवेत असतात, त्यांना या बालहक्कांची जाणीव असायला हवी.

दुसऱ्या विभागात संरक्षण (प्रोटेक्शन) या तत्त्वाचा विचार केलेला आहे. मुलांना विविध पद्धतीच्या शिक्षा केल्या जातात. लहानग्या आणि निरागस मुलांचं शोषण करणं तर फार सोपं असतं असं विविध उदाहरणांवरून दिसून येतं. कोणत्याही प्रकारे मुलांचं शोषण कोणीही करू नये. यात शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक कारणांचा समावेश केलेला आहे.  शारीरिक कारणांमध्ये – मारणं, इजा करणं, उपाशी ठेवणं अशा गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. मानसिक कारणांमध्ये – दुर्लक्ष, अपमान करणं, शिव्या देऊन मानहानी करणं याचा समावेश आहे. प्रत्यक्ष लैंगिक कृती, बोलणं – हावभावांद्वारे, चित्रं- फिल्म दाखवून किंवा भीती दाखवून लैंगिक शोषण करू नये असं लैंगिक शोषणाच्या कारणांमध्ये स्पष्ट केलेलं आहे.  आर्थिक कारणांमध्ये – मुलं गरीब आहेत, म्हणून त्यांना मजुरी करायला लावणं वेठबिगारी करायला लावणं हा गुन्हा म्हणून नमूद केलेला आहे. सामाजिक कारणांमध्ये – मुलं उपेक्षित आहेत, भटके विमुक्त प्रवर्गातील आहेत, अनुसूचित जातींमधील आहेत किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या जातीधर्मातले आहेत या कारणासाठी त्यांचं कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही, असं कायद्यात म्हटलं आहे.

सहभाग (पार्टिसिपेशन) हा आहे तिसरा विभाग. घरी किंवा शाळेत मुलांचा सहभाग असायला हवा. मुलांचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र विचारक्षमता लक्षात घेऊन त्यांचा सहभाग घ्यायला हवा. याचा विचार मोठय़ांनी केला तर योग्य प्रकारे व्यक्तिमत्त्व विकास होईल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[14/11, 07:52] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२२*
    *दिनांक-१४ नोव्हें१९*

🎯 *रोजच असावा बालदिन!*

‘बालदिन’ साजरा करणं म्हणजे मुलांना महागडय़ा वस्तू देणं, त्यांच्यासोबत छान फोटो घेऊन प्रसारित करणं, पार्टी करणं- एवढंच आहे का? हा तर ‘इव्हेन्ट’ झाला. ते करावेतच. त्यामुळे मजा येते. आपण मुलांसाठी बालदिन साजरा केल्याचा आनंद होतो. पण एक दिवस बालदिन साजरा करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो विसरण्यापेक्षा, मुलांना कायमस्वरूपी समजून घेण्यातून तो साजरा होईल.
‘मुलांना समजून घेणं’ याचा खरा अर्थ काय? त्यांचं सर्व काही ऐकणं, त्यांचे लाड करणं, त्यांना हवं ते पुरवणं हा आहे का? असं झालं तर मुलं जबाबदार होतील का? की लाडावली जाऊन बिघडतील?

तरीही मुलांना समजून घ्यायचं असेल तर?

लहान वयात मूल कुतूहलामुळे अनेक वस्तू हाताळतं. किती तरी प्रश्न विचारतं. या प्रश्नांना उत्तरं द्यायला जवळ कोणी तरी मोठं असेल, तर ती मुलांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणायला हवी. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. या काळात जर मुलांशी भरपूर बोललं नाही, तर त्यांचा भाषाविकास अपुरा राहतो. पण आज आई-बाबांना आपल्या मुलांशी गप्पा मारायला वेळच नाही. ‘गप्पा मारणं’ म्हणजे अभ्यासाची चौकशी करणं किंवा उपदेश करणं हे नाही!

गप्पा मारणं म्हणजे- आज काय काय झालं, हे एकमेकांना सहजपणे सांगणं. आपला दिवस कसा गेला, हेही मुलांशी बोलावं, त्यातून गप्पा होतात. आज हा संवाद दुर्मीळ झाला आहे.सर्व स्तरांतल्या मुलांचे स्वत:चे काही भावनिक-मानसिक प्रश्न असतात; त्यात वाढ होते आहे. लहान मुलांमध्येही मानसिक समस्या निर्माण होताहेत. मानसिक समस्यांचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. या समस्या निर्माण होण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. या सगळ्याला अनेकदा आई-वडील जबाबदार असतात. शाळा आणि कडक शिक्षक यामुळे समस्या वाढतात. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण आनंदी आहे का, हे तपासायला हवं. मुलांना ‘श्रीमंत’ आई-बाबा नको असतात; ‘आनंदी’ आई-बाबा हवे असतात. हे वातावरण निर्माण करता यावं.

केवळ आपलं मूलच नाही, समाजात अनेक वंचित मुलं आहेत, त्यांचाही विचार आणि संबंधित कृती म्हणजे बालदिन!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[15/11, 06:36] +91 75880 52291: 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२३*
    *दिनांक-१५ नोव्हें१९*

🎯 *माध्यमं*

टीव्ही आणि सोशल मीडिया हे मुलांचे गुरू आहेत. सहा महिन्यांच्या छोटय़ाशा बाळाचं रडणं थांबत नाही म्हणून त्याचा बाबा सहज मोबाइलची रिंगटोन चालू करतो आणि बाळ रडायचं थांबतं. तीन वर्षांचं बाळ लॅपटॉपवर यूटय़ूबवरील बडबडगीतं पाहतं; ते पाहिल्याशिवाय ते जेवत नाही! आठ वर्षांचं मूल घरी येतं, टीव्ही बघत बघत एकीकडे अभ्यास करतं, आणि आई-बाबांचं डोकंही मोबाइलमध्ये असतं.त्यात बघून मुलं अनेक प्रयोग करतात. त्यातून अधिक उग्र समस्या जन्माला येऊ  शकतात. मुलांमध्ये वाढता हिंसाचार, नव्या पद्धतीनं चोऱ्या करणं, नवे गुन्हे करणं, व्यसनं करणं आणि हे सर्व करताना काहीही विशेष चूक नाही असं समजणं, या वृत्तीला पुढच्या काळात आवर घालणं हे आव्हान ठरणार आहे. शालेय वयातल्या मुली आणि मुलांपुढे अतिशय सवंग प्रकारची करमणूक ठेवली जाते. यापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत राहणं गरजेचं आहे. ‘काम’ आणि ‘टाइमपास’ यांतला फरक ज्यांना कळतो आणि त्यांचं प्रमाण किती असायला पाहिजे हे ज्यांना कळतं, त्यांना या व्यसनाचा काहीच धोका नाही. पण ज्यांच्या नकळत हे प्रमाण व्यस्त होतं, किती वेळ टाइमपास करायचा याचं भान सुटतं, ते धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन ठेपतात.मुलांना खेळू द्या, असं सांगायला लागणं हीच व्यवस्थेची हार आहे. खेळणं हा ‘टाइमपास’ नाही! अभ्यास टाळायचा म्हणून मुलं खेळतात, असं कित्येक पालकांना वाटतं. ते चूक आहे! खेळणं हा मुलांचा बौद्धिक-शारीरिक आविष्कार आहे. ती त्यांच्या मेंदूची गरज आहे. मुलांच्या अंगात जी प्रचंड ऊर्जा असते, ती ऊर्जा मैदानी खेळ न खेळल्यामुळे, घाम येईपर्यंत भरपूर हालचाल न झाल्यामुळे वापरली जात नाही. मग ही ऊर्जा काय करते? तर, नको तिथं बाहेर पडायचा प्रयत्न करते. याचा इतरांना त्रास होतो. कधी वस्तूंची जोरात फेकाफेकी, आदळआपट, कधी आरडाओरड, चिडचिड करणं यांद्वारे ऊर्जा बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो, तर कधी दुसऱ्याला चावणं, मारणं यांतूनही! ..आणि एक हसरं, खेळकर मूल समस्याग्रस्त होतं. थोडक्यात, न खेळल्यामुळे मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
=================
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२५*
    *दिनांक-१८नोव्हें १९*

🎯 *बागेतलं ‘शिकणं’*

लहान मुलांना बागेत काय आवडतं? मोकळी हवा, झाडं, हिरवळ, खेळणी आणि त्यावर खेळणारी आपल्यासारखीच मुलं बघून त्यांना अतिशय उत्साह वाटतो. नेहमी बुटा-चपलेत असलेले पाय हिरवळीवर नाचतात. हिरवळीवरून हात फिरवणं, मातीत- चिखलात हात घालायला मिळाले, की आणखी काय हवं?

बागेत गेल्यावर कधी एकदा घसरगुंडीवरून घसरायला मिळतंय, असं त्यांना झालेलं असतं. सी-सॉ, झोके आणि विविध खेळण्यांमधून त्यांच्या मेंदूला जणू ऊर्जा पोहोचत असते. काही पालक नित्यनेमाने मुलांना घेऊन जवळच्या बागेत जातात. मुलं याचा भरपूर आनंद घेतात.

घसरगुंडी तीच आणि तशीच असली आणि झोका तोच असला, तरी मुलं त्यातून विविध प्रकारच्या वेगांचा अनुभव घेत असतात. विविध पद्धतींचे हे वेग त्यांना आवडतात. कधी वरून खाली, कधी मागं-पुढं जाणारा वेग, तर कधी वर-खाली होणारा वेग त्यांना पुन्हा पुन्हा तेच खेळण्यासाठी प्रवृत्त करतो. घसरगुंडीतून घसरल्यावर जिना चढून यावा लागतो, की पुन्हा तो काही सेकंदांचा वेगाचा अनुभव मिळतो. यात ती खूश असतात. पुन्हा पुन्हा जिना चढायलाही तयार असतात. पाच मिनिटं झोक्यावर खेळायला मिळावं म्हणून पंधरा मिनिटं रांगेत उभं राहायची त्यांची तयारी असते, कारण वेगाचा हाही अनुभव त्यांना अनुभवायचा असतो. रोज एकाच बागेत जाण्यापेक्षा अधूनमधून दुसऱ्या बागेत न्यायला हवं. बागेची रचना, वेगळी झाडं, वेगळी खेळणी आणि नवे मित्र मिळतील.

एखाद्या दिवशी टेकडीवर फिरणं त्यांना वेगळा अनुभव देऊन जाईल. टेकडीवर फिरणं हे बागेतल्या खेळण्यापेक्षा वेगळं असतं. जवळ आलेलं आकाश, खूप जास्त चढण, संध्याकाळी सूर्याचं दिसेनासं होणं, एकेक चांदणी दृश्य होताना बघण्याची संधी, ठळक होत जाणारा चंद्र आणि अंधारात अदृश्य होत जाणारी झाडं.. अशा किती तरी गोष्टी त्यांना यातून बघता येतात. आभाळाच्या खाली जमून खेळ खेळणं, चित्र काढणं, गाणी ऐकणं – म्हणणं, गप्पा मारणं यातून मिळणारा आनंद वेगळाच. मुलांना एकसाची अनुभवांतून बाहेर काढलं, तर त्यांचा मेंदू नव्या जागेतून नव्या गोष्टी शिकेल. त्यांच्यासाठी बागा आणि टेकडय़ा जिवंत ठेवायला मात्र हव्यात!

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव


🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२५*
    *दिनांक-१९ नोव्हें १९*

🎯 *मुलांचा मेंदू का थकतो?*

मुलं शाळेत, घरात त्रास देतात. हट्टीपणा करतात. अस्थिर आहेत. चिडचिड करतात. काहीच करायला नको असतं, असं बऱ्याचदा घडून येतं. ‘कंटाळा’ हा  शब्द सध्या बालपणाला चिकटलेला आहे. मुलांना सारखा कंटाळा आलेला असतो. हा कंटाळा नेमका कसला असतो?  खरं तर त्यांना जर पुरेसं खेळायला – पळायला दिलं,  त्या त्या मुलाला किंवा मुलीला स्वत:ला ज्यात रमावंसं वाटतं, त्यात रमू दिलं तर कंटाळा येणार नाही. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं. सगळ्यांनाच खेळायला आवडतं असं नाही. काहींना खूप आवडतं – काहींना अजिबात नाही. सगळ्यांनाच चित्र काढायला आवडेल असं नाही. सगळ्यांनाच बडबड करायला – गप्पा मारायला आवडेल, असं नाही. प्रत्येकाची आवड आणि नावड वेगवेगळी असते.

पूर्वी शाळेत संगीत, नृत्य,  चित्रकला, मातीकाम, घडीकाम, चिकटकाम, खेळ, शारीरिक शिक्षण यांचे तास तुलनेत जास्त असायचे. मुलं चालत, सायकलने गप्पा मारत यायची- जायची.  त्यामुळे जास्तीतजास्त मेंदू वापरायला मिळे.  आता अभ्यास एके अभ्यास- यामुळे त्यांचाही दिवस मोठय़ा माणसांसारखा बराचसा एकसुरी असतो.  प्राधान्याने फक्त डाव्या मेंदूलाच काम. भाषा, लेखन-वाचन, गणित, प्रश्नांची उत्तरं अमुक शब्दात लिहिण्याची तयारी इत्यादी. पूर्ण मेंदू वापरण्याची १०० टक्के क्षमता आणि इच्छा असताना केवळ एकसुरी कामात गुंतवून ठेवलं जातं,  याने मेंदूला कंटाळा येतो. तो थकतो. वास्तविक मेंदूला नवीन गोष्टी शिकायला- करायला हव्या असतात. पण शाळा आणि बरोबरीने पालक जर अभ्यासात जखडून टाकणारे असतील तर एकूण मेंदूला काही आव्हानच उरत नाही. उजव्या मेंदूतल्या तितक्याच आवश्यक क्षेत्रांना – रंग, विविध कला, संगीत यांना पुरेसं उद्दीपन मिळत नाही.  त्यामुळे मेंदू शारीरिकदृष्टय़ा ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहत नाही.

शरीर आणि मेंदू दोन्ही उद्युक्त झाले तरच खरी मजा! मुलं लहान असतील तर अगदी घर घर, शाळा शाळा असे साधेसुधे खेळ खेळली तरी चालतील. पण या खेळातून संवाद, योजना, भावना, ताíककता या गोष्टी मेंदूत घडून येतात. शिवाय मुलं कल्ला करत हे खेळतात, त्यातून भरपूर गडबड, अगदी भांडाभांडी – आणि शेवटी आनंदच मिळतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२६*
    *दिनांक-२०नोव्हें१९*

🎯 *घर शाळेत आणि शाळा घरात*

घर शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे, विनोबा भावे यांचं खूप महत्त्वाचं वाक्य आहे हे!

असे दोन वेगळे कप्पे किमान प्राथमिक शाळेत तरी नसावेत. घर आणि शाळा या दोन वेगवेगळ्या जागा असतात. तिथली माणसं वेगवेगळी असतात. रचना, सूचना, मांडणी, नाती सगळंच वेगळं असतं. सुरुवातीच्या काळात यामुळे मूल भांबावून जातं. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा काळ हा मुलांच्या दृष्टीने संवेदनशील असतो. शाळेत मूल जे काही शिकतं त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध कुठेतरी जीवनाशी असतोच. घराशीही असतो. भाषा, सामाजिक शास्त्रं, विज्ञान, गणित हे घरात असतं. पण त्याचा संबंध लावला जात नाही. मुळात शाळेत जे विषय शिकले जातात त्याचा संबंध केवळ प्रश्नोत्तरं लिहिण्यापुरता आणि गुण मिळवण्यापुरता आहे असा घट्ट समज झाला आहे.

अभ्यसक्रम म्हणजे शिक्षण असे कप्पे तयार  झाले आहेत. मुलं अभ्यासक्रम ऐकून घेतात  आणि परीक्षेत मांडतात. शाळेतल्या प्रयोगशाळेत प्रयोगही करतात. पण त्या प्रयोगाचा घरच्या कोणत्या गोष्टींशी संबंध आहे हेही सांगायला पाहिजे. घर आणि शाळा, समाज आणि शाळा – हे जोडकाम व्हायला हवं.

शिक्षकांनी अभ्यासक्रम समजावून सांगावा, ही पहिली पायरी. आणि त्यासंबंधित काही सोपे आणि साधे उपक्रम मुलांना करायला द्यावेत.  असे उपक्रम जे विकत मिळणार नाहीत, जे पालकांना करता येणार नाहीत, ज्यात स्पर्धा आणि गुण नसतील.  असे केवळ विचारप्रक्रियेला चालना देणारे उपक्रम. ते अर्थपूर्ण शिक्षण असेल. मग हे उपक्रम मुलाने शाळेत करावेत किंवा घरात करावेत. मात्र स्वत:ने करावेत.

मूल शाळेच्या आवारात प्रवेश करतं झालं की घरातल्या गप्पा बंद. घराविषयी कोणाशी फार बोलायचं नाही. शिक्षकांशी तर नाहीच. माझं घर, माझी आई असे विषय आले की तेवढय़ापुरतं घरात डोकावून यायचं आणि घराचा कप्पा बंद करायचा. अशी आपली व्यवस्थाच आहे.

तसंच शाळेतून घरी गेलं की ‘काय झालं आज शाळेत? काय अभ्यास दिलाय?’ अशा दोन- चार प्रश्नात शाळा हा विषय संपतो. अभ्यास कर, अभ्यास का करत नाहीस? असा धोशा सुरू होतो. यापलीकडे शाळा या विषयावर गप्पा होत नाहीत.

🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[21/11, 06:21] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२७*
    *दिनांक-२१ नोव्हें १९*

🎯 *चर्चा का आवश्यक?*

माणसं समूहात राहतात. समूहाचे बरेच फायदे असतात. एखाद्या शाळेत एखादं मोठं कार्य तडीला न्यायच्या वेळी, चर्चामध्ये सगळ्यांच्या सहमतीनं निर्णय घेतले जातात तेव्हा ते चुकण्याची शक्यता कमी असते. याउलट एखादा नेता सर्वानी मिळून ठरवलेला असतो, तरीही त्यानं घेतलेले एकतर्फी निर्णय, आदेश इत्यादी चुकण्याची शक्यता जास्त असते. यासाठी चच्रेअंती घेतलेला निर्णय केव्हाही फायदेशीर असतो.
लहान समूहांमध्ये जेव्हा चर्चा केली जाते, तेव्हा त्यात प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळते. विचारविनिमय करण्याची आणि नवोदितांना विचारविनिमय ऐकण्याचीदेखील संधी मिळते. अशा प्रकारे सामील होण्यातून प्रत्येकावरच सहभागाचे संस्कार होत असतात. ज्या गोष्टी सर्वाच्या हिताच्या नाहीत, त्या टाळण्याची सुबुद्धी त्यातून निर्माण होते. एकाच गोष्टीला अनेक बाजू असू शकतात, त्यांचे फायदे-तोटे जोखून घेण्याची संधी मिळते. ती मेंदू विकासाच्या दृष्टीने फार आवश्यक असते.

चच्रेमध्ये कोणीही एक वक्ता नसतो, ते व्याख्यान नसतं, तर सर्वानी मिळून बोलायचं असतं. आपलं मत मांडायचं असतं. आपलं मत संपूर्ण गटाच्या विरुद्ध असलं तरीही ते मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. छोटय़ा गटचर्चातून स्वत:मधली अनेक गुणवैशिष्टय़ं प्रकट होत असतात.

‘इतरांची मतं ऐकून घेणं’ या अगदी साध्या गोष्टीतून आपली ऐकण्याची क्षमता वाढते. इतरांची मतं ऐकून स्वत:चं मत तयार करता येतं. आपल्या शब्दांत ते व्यक्त करण्याची क्षमता वाढते. इतरांना आपली बाजू समजावून सांगण्याची क्षमता वाढते. आपल्या विचारांत, विचार मांडण्याच्या क्षमतेमध्ये काही चूक असल्यास ती कळून येते. आपली चूक असल्यास माघार घेणं जमायला पाहिजे, सहजपणे नाकारणं आणि पुढे जाणं आवश्यक आहे, याची जाणीव होते. आपल्यामधले ठळक गुण व दोष कोणते, हे स्वत:लाच कळू लागतं. सुधारण्याची संधी मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यानिमित्तानं विविध विषयांचा अभ्यास आपोआपच होतो. एका विषयावर अनेकांची वेगवेगळी मतं असतात; ती आपल्यापेक्षा निराळी असू शकतात, हे कळतं. त्यामुळे स्वत:मध्ये आपोआपच चांगला बदल होतो. नियोजन, निर्णयक्षमता हे ‘फ्रण्टल लोब’चं काम. त्याच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
≠=============
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२८*
    *दिनांक-२२नोव्हें १९*

🎯 *सतत विद्यार्थी*

‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू’ अशी ग. दि. माडगुळकरांची एक कविता आहे. समाजातला प्रत्येक घटक आपलं सहज शिक्षण करत असतो. प्रत्येकाचा संबंध समाजाशी असतो. म्हणूनच समाजाला समजून घ्यायला हवं. त्यासाठी त्यात मिसळायला हवं.
‘सध्याचा काळ ज्ञानाधारित आहे’, ‘हे माहितीचं युग आहे’, ‘ज्याच्याकडे आधुनिक शिक्षण असेल, त्याला आयुष्यात प्रगती करण्याची शंभर टक्के संधी आहे’ अशी विधानं आपण सतत ऐकत-वाचत असतो. तसेच करिअरच्या अतोनात संधी आता उपलब्ध आहेत. शिवाय ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, तो तर शिक्षणासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. अन्य राज्यांतले, परदेशांतलेही विद्यार्थी महाराष्ट्रात येऊन शिकतात. अशा वातावरणात आपणही मागे राहू नये, अशी इच्छा कोणाचीही असणारच!

शहरांमध्ये व मोठय़ा गावांमध्ये अनेक प्रकारचे नवे अभ्यासक्रम चालतात. फोटोग्राफीपासून संगणकापर्यंत, स्क्रिप्ट रायटिंगपासून अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्रापर्यंत सर्व काही शिकवणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असतात. शिकण्याची इच्छा असेल तर आपण कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो, अशी परिस्थिती आहे. नोकरदारांसाठी शैक्षणिक कर्जाची सोय असते. अशा वातावरणात कोणत्याही वयाच्या, कोणत्याही पदावरच्या माणसाला शिकता येईल/ राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करता येईल, अशा छान संधी आसपास आहेत. आपलं लक्ष्य ठरवून ते साध्य करता येईल.

नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यापुरतं शिक्षण घ्यायचं, ही जुनी समजूत आहे. आता नोकरी मिळाली की प्रश्न संपला, असं वातावरण नाही. नोकरीतही सतत नवीन गोष्टी, नवीन तंत्रं शिकत राहावी लागतात. अन्यथा मागे पडण्याचा धोका असतो. मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यात धन्यता मानण्याचाही काळ गेलाच. कितीही पगार असला व कामात समाधान असलं, तरी नव्या संधी प्रत्येकाला हव्या असतात हे वास्तव आहे.

यासाठी वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वत:चा कौल घ्यायलाच हवा. आपल्याला नक्की काय करायचं आहे, आणखी काय करायचं, असे प्रश्न आधी विचारायला पाहिजेत. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थीदशा संपते, असं समजायचं कारण नाही. ती कायम चालूच असते.. चालू असायला हवी. तरच न्यूरॉन्सची नव्यानं बांधणी होणार आहे!

🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२२९*
    *दिनांक-२५ नोव्हें. १९*

🎯 *ताल आणि नाच*

जन्मत:च मेंदू नक्की काय घेऊन आलेला असतो, हा अतिशय औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. नवजात मुलांच्या मेंदूत नक्की कोणत्या यंत्रणा आधीपासून असतात आणि कोणत्या गोष्टी नंतर भरल्या जातात?
डॉ. झेन्टर आणि त्यांच्या संशोधक चमूने एका संशोधनानुसार असं सांगितलं आहे की, जन्मजातच माणसाला बोललेलं ऐकण्याच्या क्षमतेशिवाय तीन विशेष क्षमता असतात : (१) कान देऊन संगीत ऐकण्याची (२) साध्या बोलण्यापेक्षा संगीत अधिक लक्षपूर्वक ऐकण्याची आणि (३) ताल ऐकून त्यावर डोलता येण्याची.

नवजात बालक जन्मापासून कान देऊन इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतं. तसंच ते संगीतही ऐकत असतं. साधारणपणे तीन महिन्यांची बाळं बोलणाऱ्याकडे नीट नजर देऊन हुंकार देतात. लोकांनी बाळाशी किंवा खोलीत इतरांशी बोललेलं त्याला आवडतं. ते प्रतिक्रिया देत असतं; परंतु आता यापुढे जाऊन असं लक्षात आलं आहे की, साधं बोलणं आणि एखादा छानसा ठेका यांची तुलना केली, तर तालाकडे बालके अधिक लक्षपूर्वक बघतात आणि ऐकतात. ताल ऐकून त्यांच्या मनात आनंद निर्माण होतो. मात्र, त्या वेळेला त्यांना तो आनंद व्यक्त करता येत नाही. बसायला लागलेलं बाळ मात्र एखाद्या तालाला प्रतिसाद देताना स्वत:च्याच नादात मागेपुढे डोलतं. मूल तोल सावरून उभं राहायला लागलं की, गुडघ्यात वाक-वाकून प्रत्यक्ष नाचण्याचा प्रयत्न करतं. चालता यायला लागलं की, दोन पावलं मागे-दोन पावलं पुढे जाऊन थिरकतं. कोणीही शिकवलेलं नसताना आणि अशा हालचाली कधीही पाहिलेल्या नसतानासुद्धा मुलं आनंदानं नाचून प्रतिसाद देतात.

संगीत आणि विशेषत: नाच ही खास माणसाला मिळालेली देणगी म्हणता येईल. उत्क्रांतीनुसार, जलचर प्राण्यांमध्ये ही क्षमता नाही. सस्तन प्राण्यांच्या प्राणिगटात भावना आहेत, परंतु संगीताचा आनंद त्यांच्यात नाही. काही वानरांना संगीत आवडतं. माणसाला मात्र प्रगत स्वरूपाच्या भावनांच्या जोडीला आनंद निर्माण करणाऱ्या पूरक उपक्रमांची साथ आहे. त्यातलंच एक संगीत आणि  जोडीला नृत्य. मेंदूतल्या ‘ऑडिटरी कॉर्टेक्स’चा संबंध संगीताचा ताल, त्याच्याशी संबंधित पदन्यासाशी व म्हणून आनंदाशी असा अगदी जवळून असतो.
         

🎯 *खेळणं*

लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. खेळण्यांशी मुलं खूप आनंदाने खेळतात अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना विकत आणलेली खेळणी आवडतातच असं नाही, तर मोठी माणसं ज्या ज्या वस्तू हाताळतात, त्या वस्तूंशी ते जास्त काळ घालवतात. त्या सर्व वस्तू मुलांना हव्या असतात आणि हे नैसर्गिक आहे. अतिशय हौसेने आणलेल्या महागडय़ा खेळण्यांकडे अनेकदा मुलं  ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्याऐवजी आई-बाबांच्या हातातला मोबाइल मुलांना जास्त हवाहवासा वाटतो.

मुलांच्या मेंदूचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू ही वस्तूच असते. ‘खास आपल्यासाठी तयार केलेलं खेळणं’ असं काही नसतं. एखादी वस्तू रंगीबेरंगी दिसते, वाजते, हलते, पुढे सरकते, झोके घेते, गाते, नाचते, म्हणून मुलं काही काळ त्याच्यामध्ये रमतात. परंतु त्यांच्या दृष्टीने घरातलं लाटणं, पोळपाट, चपला, मोबाइल, लॅपटॉप, गरगर फिरणारा पंखा आणि खेळण्यातल्या ससा-बाहुल्या हे सर्व सुरुवातीच्या काळात तरी सारखंच असतात. मुलांना चेंडू खेळायला विशेष आवडतो. कारण तो सतत हालचाल करत असतो.

वयाच्या याच टप्प्यावर मुलांच्या हातात अत्यंत घातक पद्धतीने मोबाइल दिला जातो. लहानगी मुलंही त्यात गुंततात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते त्यातली चित्रं हलती असतात. त्याला वेग असतो. ते रंगीत-संगीत असतं. मात्र मोबाइल हे मुलांचं खेळणं कोणत्याही परिस्थितीत असू शकत नाही.

मुलांच्या हातात खेळणी दिलीच नाहीत तरी ती नक्कीच स्वत:च्या डोक्याने काही तरी शोधून काढतात. प्रकाश नारायण संत यांच्या कथेत मुलांनी एका पडक्या घराच्या मोडलेल्या दरवाजाचं खेळणं म्हणून वापर केला होता आणि त्यांचे काही दिवस त्या दरवाजाशी विविध प्रकारे खेळण्यात गेले होते. त्यात स्वत:च्या कल्पना वापरून मजा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. लहान मुलं-मुली अशाच प्रकारे टाळ्यांचे भरपूर खेळ आणि त्यावरची असंबद्ध गाणी शोधून काढतात. स्वत:ला छान रमवतात. एकामागोमाग कितीही वेळ खेळू शकतात. कमीत कमी साधनांच्या साह्याने खेळले जाणारे टिक्करबिल्ला, डबा ऐसपस, विटीदांडू, लपाछपी, जोडसाखळी असे प्रकार अशा डोकेबाज मुलांनीच शोधून काढलेले आहे.
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३३*
    *दिनांक-२९नोव्हें १९*

🎯 *लहानग्यांचे ताण*

मुलांना जर कसला ताण येत असेल, तर ते स्वत:हून सांगत नाहीत. कारण आपल्याला कसला ताण येतो आहे, हे त्यांना कळलेलंच नसतं. पण त्या ताणाचा परिणाम त्यांच्या वागण्यातून, अस्वस्थ चेहरा आणि हालचालींमधून कळून येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. कधी पोट, डोकं दुखतं. ताण जास्त झाला तर तापही येतो. असं जर जास्त काळ चाललं, तर त्यांचा अभ्यास, खेळ, कला, मत्री यांवरही परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सतत ताण मनावर घेतले, तर स्वभावात बदल होतात. स्वभाव चिडका नसला तरी अकारण चिडचिड होते. मनाविरुद्ध काही घडलं तर डोळ्यांत पाणी येतं. कोणाशी बोलावंसं वाटत नाही. भूक लागत नाही. भूक लागलेली असूनही खाण्याची इच्छा होत नाही. वजन कमी होतं. त्यामुळे जास्त काळ ताण राहणं चांगलं नाही. त्याची कारणं शोधून ती दूर केली पाहिजेत.

यासाठी पालक किंवा शिक्षकांनी मुलांना अशा प्रकारे प्रश्न विचारावेत : तुला कुठे फार अस्वस्थ वाटतं- घरात, शाळेत, की आणखी कुठे? आनंदी/ छान वाटत नाही का? जवळपासच्या कोणाचा त्रास होतोय का? तू कोणाला ठरवून त्रास देत आहेस का? कोणाला टाळत आहेस का? घराबाहेर घडलेल्या सर्व गोष्टी घरातल्यांना सांगू शकतो/ शकते का? घरच्यांपासून काही लपवत आहे का? शाळेत जावंसं वाटतं की नाही? कोणते विषय आवडतात, कोणते आवडत नाहीत? कोणत्या शिक्षकांचं शिकवणं समजतं? विषय समजत नाही म्हणून ताण येतो का? अभ्यास करावासा वाटत नाही का? अभ्यासाची पद्धत चुकते आहे का? मित्रांशी/मत्रिणींशी भांडण झालं आहे का? मित्रमंडळींपैकी कोणी दबाव टाकत आहे का? कोणी हिणवतं आहे का? शाळेत जायच्या रस्त्यावर कोणी त्रास देत आहे का?

अशा प्रकारचे प्रश्न न रागावता, शांतपणे विचारले तर यातून अस्वस्थतेचं, ताणाचं खरं कारण कळेल आणि तरच त्यावर मात करता येणं शक्य होईल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव4
[02/12, 06:25] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३४*
    *दिनांक-२ डिसें.१९*

🎯 *राग आणि असुरक्षिततेची भावना*

जन्मत:च माणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना असते. भूक लागली की मूल रडतं. तेव्हा आपल्याला भूक लागली आहे, हे त्याला माहीत नसतं. काही तरी चुकीचं घडतंय, मी सुरक्षित नाही, ही भावना असते. ओळखीचे चेहरे, आवाज, स्पर्श यांबाबतीत सुरक्षित वाटतं. अनोळखी चेहरे, अचानक खूप माणसं भेटणं, प्राणी, अनोळखी घर, नवं वातावरण यांमुळे असुरक्षित वाटून मुलं रडतात. पहिल्या काही महिन्यांमध्ये कोणाच्याही कडेवर जाणारं बाळ नंतर मात्र अनोळखी माणसांकडे जायला घाबरतं. तिथून ओळखीच्या आणि सुरक्षित हातांमध्ये जाण्यासाठी रडतं, धडपडतं.

असुरक्षिततेची भावना नैसर्गिक आहे. पण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही, तर काही नकारात्मक भावना यातून निर्माण होतात. नराश्य, राग, भीती, मत्सर अशा भावनांच्या मुळाशी असुरक्षितता असते. या सर्व भावना वेगवेगळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त होतात.

उदाहरणार्थ, बसमध्ये/ रेल्वेमध्ये जागेवरून माणसं एकमेकांशी भांडतात. त्यावेळी ती रागाची भावना आहे असं वाटलं; तरी मुळात- मला बसायला जागा हवी आहे, ती मिळाली नाही तर काय, ही असुरक्षिततेची भावना मनात असते. ही भावना रागातून व्यक्त होते.

रागाच्या पुढची पायरी म्हणजे हिंसा. याची अनेक रूपं, वेगवेगळ्या छटा दिसून येतात.. दुसऱ्यावर हात उगारणं, दादागिरी करणं, गुंडगिरी करणं, वगैरे. या भावना कमी करायच्या असतील तर मुळातली भावना कमी करावी लागेल.

संतापी, हिंसक माणसं असली की घर चिडीचूप होऊन जातं. पूर्वी संताप व्यक्त करणं ही बहुतेक ज्येष्ठ व्यक्तींची मक्तेदारी होती. पण आता सर्व वयाची माणसं खूप चिडचिड करतात. वास्तविक या रागभावनेचं नियोजन लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. कारण ही भावना माणसाला कुठेही भडकावते. त्यात आपली तार्किकतेची शक्ती पूर्ण नष्ट होऊन जाते. अगदी थोडक्यासाठी रागीट माणसावर कसले कसले शिक्के बसतात. त्यानं आजवर केलेल्या बऱ्या कामांवर पाणी पडतं. दुसरीकडे ज्याला त्यानं दुखावलेलं आहे, ती व्यक्ती हे जन्मात कधी विसरू शकत नाही. माणसं काहीही विसरतात; पण आपला ‘इगो’ दुखावला गेला तर ते विसरू शकत नाहीत. म्हणून या भावनांचा उद्रेक व्हायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[03/12, 06:29] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३५*
    *दिनांक-३डिसें १९*

🎯 *भीती आणि असुरक्षिततेची भावना*

भीती कशाहीमुळे वाटत असो; तिच्या मुळाशी असुरक्षिततेची भावना असते. बऱ्याच मुलांना परीक्षेची भीती वाटत असते. त्यावेळी, परीक्षेत मार्क मिळाले नाहीत तर काय होईल. घरी लोक रागावतील, वर्गात कमी मार्कामुळे मित्र चिडवतील ही असुरक्षिततेची भावना मोठय़ा प्रमाणावर असते. त्याचा परिणाम म्हणून भीती वाटते. वास्तविक, भीती वाटावी असं परीक्षागृहामध्ये काहीच नसतं.

अशी एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडतं, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते. पाय जड होतात, हातांचे चाळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो म्हणजेच भीतीचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. हे केवळ प्रौढ व्यक्तींच्याच बाबतीत घडतं असं नाही. मुलांनादेखील कितीवेळा तरी भीतीला सामोरं जावं लागतं. भीतीची भावना जास्त प्रमाणात निर्माण होते, तेव्हाच नैराश्य ग्रासून टाकतं. कायम असुरक्षित वाटणाऱ्या व्यक्तीला नैराश्याच्या बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नाही.

जर वातावरण ताणलेलं असेल तर ‘मनावर’-  मेंदूवर ओझं येतं. ज्या माणसाची भीती वाटते, तिथे थांबावंसं वाटत नाही. मग ते आईबाबा असोत, शिक्षक, बॉस, क्लायंट.  असा नकारात्मक अनुभव टाळावासा वाटतो. तिथून सुटका करून घ्यावीशी वाटते.

आपल्या मनातली भीती सांगता आली पाहिजे. यासाठी ती आधी आपल्याला नीट कळली पाहिजे. भीती का वाटते आहे हे कळलं तर त्यावर उपाय करता येतात. पण आपल्या या भावना कोणत्या शब्दात सांगायच्या हा अत्यंत साधा प्रश्न मुलांना पडलेला असतो. तर मोठय़ा माणसांना आपल्याला कशाची भीती वाटते आहे हे दुसऱ्याला सांगणं चुकीचं वाटतं.  वास्तविक शांत मनाने विचार करून भीतीच्या पाठीमागे असलेल्या असुरक्षिततेचं कारण शोधलं तर ‘यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही’ असा साक्षात्कार होतो.

भीती वाटते त्या वेळेस काही माणसं अगदी  घाबरून एका जागेवर बसतात, तर काही माणसं येरझाऱ्या घालतात, असं आपण पाहिलं असेल. भीती वाटू नये, भीतीची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढलं, आनंदी रसायनं निर्माण झाली की मार्गही सुचतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                चाळीसtu
[04/12, 07:49] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २३६*
    *दिनांक-४ डिसें १९*

🎯 *मत्सर ‘मेंदू’त असतो का?*

मत्सराच्या मुळाशीदेखील असुरक्षितता हीच भावना असते. माझ्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणजे माझ्यात काही तरी कमतरता आहे, ही ती मुळातली भावना. उदा. एखादी ठरावीक वस्तू नसेल, परीक्षेत चांगले गुण नसतील किंवा आणखी काहीही. ‘आपल्याकडे नाही’ असं वाटायला लागलं, तर ‘या टीममध्ये मी बसू शकत नाही’ असं वाटतं. या अपुरेपणा/ असुरक्षिततेच्या भावनेतून, ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल असूयेची भावना निर्माण होते.

ही भावना काही प्रमाणात नैसर्गिक आहे. ती अगदी लहानपणापासून निर्माण होते. दोन लहान मुलं एकाच खेळण्यासाठी भांडतात किंवा दोन भावंडं आईचं प्रेम माझ्यावर जास्त की तुझ्यावर, यावरून. दुसऱ्याला जास्त दिलं, दुसऱ्याचं जास्त ऐकतात, दुसऱ्याला रागावत- मारत नाहीत, असं वाटतं. असं वाटणं हेच कित्येकदा चुकीचं असतं. पण तरी ही अपुरेपणाची भावना असतेच. यातून ‘इगो’ला- अस्तित्वालाच धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. स्थान डळमळीत होतं आहे असं वाटतं. सुरक्षित वाटत नाही.

या भावनेची सभ्य आणि असभ्य रूपं असतात. ती माणसागणिक बदलतात. अनेक माणसं ही मत्सर भावना फक्त स्वत:शीच ठेवतात. इतरांची तुलना केली तरी स्वत:शी तडजोड करतात. स्वत:ची समजूत घालतात. स्वत:तली मत्सरभावना जाणीवपूर्वक वाढू देत नाहीत, दाखवत नाहीत. काही लहान मुलंही अशीच समजूतदार असतात.

पण काही जण या भावना इतरांपाशी बोलून दाखवतात. अशा वेळी त्या माणसाचा मत्सरी स्वभाव दिसून येतो. या भावनेचं प्रदर्शन कोणालाच आवडत नाही. मोठी माणसंसुद्धा अनेकदा अशी वागतात. दुसऱ्याचा पगार, घर, नाती अशा कशाहीवरून मत्सरी होतात. लहान मुलांसमोर असं अनेकदा बोललं गेलं, तर काही मुलं मोठय़ा माणसांना समजावतात. अशीही उदाहरणं आहेत.

या विषयावर अनेक प्रयोग झाले तेव्हा ‘न्यूरो इमेजिंग’ तंत्रानुसार प्रयोगावेळी मेंदूत ही प्रक्रिया कुठे घडते, हे दिसून आलं आहे. ‘फ्रंटियर्स इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्युशन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलं आहे की, ही भावना ‘सिंग्युलर कॉर्टेक्स’ आणि ‘लॅटरल सेप्टम’ या दोन क्षेत्रांशी संबंधित आहे. कारण हे दोन्ही भाग सामाजिक बंध आणि सामाजिक दु:ख यांच्याशी संबंधित आहेत. दु:ख करायचं की बंध जपायचे, याचा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[05/12, 07:43] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३७*
    *दिनांक-५डिसें १९*

🎯 *नैतिकता*

माणूस जेव्हा स्वत:शी स्वत:बद्दल बोलत असतो, तेव्हा तो अतिशय समजूतदार आणि नैतिक असतो. समाजसुसंगत विचार करत असतो. हाच माणूस जेव्हा इतरांमध्ये (उदा. महाविद्यालय, नोकरीचं ठिकाण) जातो, त्यावेळी आसपासच्या लोकांच्या मानसिकतेचा त्याच्या वागण्यावर परिणाम होतो. जर माणूस मनापासून आणि ठामपणे नैतिक असेल, तत्त्वनिष्ठ असेल; तर आसपासचं वातावरण काहीही असो, त्याच्यावर फरक पडत नाही. काही गोष्टी तो माणूस तत्त्वांसाठी सहनही करतो, पण नैतिक राहतो.

ठाम नसलेली माणसं इतरांच्या सहवासात येऊन इतरांसारखी होतात. काही जणांची तर नैतिकता पूर्ण शून्यावर येते. हे सर्व एकाच माणसाच्या मेंदूत होऊ शकते. याचं कारण समूहाचा त्याच्या मनावर झालेला परिणाम. माणसं एकत्र आली तर ती काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतात किंवा पूर्णपणे वाईट. समूहाचा मनावर दोन्ही प्रकारे परिणाम होतो.

जेव्हा समूहानं काम करायचं असतं, तेव्हा चमूचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं तर सर्वाची कामगिरी सुधारते. काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतं. जेव्हा एखादी टीम खेळत असते, तेव्हा  संघभावनेनं माणसं प्रेरित झालेली असतात. त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडून येते. परंतु काही वेळेला हा समूह अत्यंत वाईट गोष्टी करायला निघतो. कोणी तरी एक जण सांगत आहे आणि त्याच्या मागोमाग इतर माणसं जातात, त्या वेळेला त्यांची नैतिकता काम करेनाशी होते. उदाहरणार्थ, ‘दहावी फ’ चित्रपटातला तोडफोडीचा प्रसंग. एरवी चांगली असणारी ही मुलं समूहाच्या दबावाखाली येऊन विचारशक्ती विसरतात.

या संदर्भातल्या एका प्रयोगामध्ये एका सभागृहात दोनशे माणसं होती. त्यातल्या केवळ पाच-सहा माणसांना सूचना देऊन सभागृहाबाहेर जायला सांगितलं गेलं. ती पाच-सहा माणसं बाहेर निघाली, तर त्यांच्या मागोमाग सर्व माणसं बाहेर गेली. बाहेर का जायचं आहे, हे कोणीच विचारलं नाही. हे अगदी साधं उदाहरण आहे. पण याच पद्धतीनं एखाद्याला ठरवून त्रास देणं, रॅगिंग करणं किंवा झुंडीनं बळी घेणं असं काहीही घडून येतं. ही समूह मानसिकता असते. ती चांगली आणि वाईट कृत्यं करायला लावते. म्हणून उच्चनैतिक मूल्यं रुजली असतील, ती माणसं कोणत्याच झुंडीच्या/ नेत्याच्या मागे जात नाहीत.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३८*
    *दिनांक-६ डिसें १९*

🎯 *माइन्ड मॅप*

प्रसिद्ध लेखक टोनी बुझॉन यांनी माइन्ड मॅप / ब्रेन मॅपची संकल्पना मांडली. ज्यावेळेस आपल्याला काही मुद्दे- ते अभ्यासातले मुद्दे असतील, कामाच्या संदर्भातले मुद्दे असतील- लिहून काढायचे असतात, त्यावेळेस वहीवर जशा रेघा आखलेल्या असतात, त्याप्रमाणे आपण एका रेघेखाली एक अशा पद्धतीनं मुद्दे काढत जातो. अभ्यास करण्याची सर्वमान्य पद्धत हीच आहे. मात्र जेव्हा अनेक मुद्दे मांडायचे असतात, काही कळीचे शब्द- की वर्ड्स- लक्षात ठेवायचे असतात, त्यावेळी माइन्ड मॅप उपयोगी पडतो.

कन्सेप्ट मॅप किंवा संकल्पचित्र, फ्लो चार्ट अशा कोणत्याही पद्धतीत सर्वसाधारणपणे वरून खाली येणारे मुद्दे असतात. परंतु माइन्ड मॅप हा प्रकार बहुदीश आहे. या प्रकारच्या नकाशात मध्यभागी एक केंद्र असतं. या केंद्रात आपला मुख्य विषय लिहायचा असतो. यानंतर मुख्य विषयाचे उपमुद्दे हे केंद्राच्या बाहेर बाण करून लिहायचे असतात. प्रत्येक उपमुद्दय़ांना नवे मुद्दे जोडायचे असतील किंवा उदाहरणं द्यायची असतील अथवा आपल्याला समजेल असं लहानसं चित्र काढायचं असेल, तरी माइन्ड मॅपमध्ये काढता येतं.

ही विशिष्ट रचना का करायची, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूत माहिती साठवण्यासाठी वहीसारख्या सरळ- एकाखाली एक रेघा नसतात. न्यूरॉन्सची रचना अशीच असते. याच पद्धतीनं न्यूरॉन्स माहितीची साठवणूक करत असतात. म्हणून माइन्ड मॅपची रचना न्यूरॉन्सच्या जुळणीसारखी असते, असं मत टोनी बुझॉन यांनी मांडलं आहे. मेंदूमध्ये शिकण्याची, नवे अनुभव घेण्याची हीच रचना आहे. तीच लक्षात ठेवण्याचीही रचना आहे.

दुसरं कारण असं की, दृष्टिक्षेपात आपल्याला कळीचे शब्द दिसतात. योग्य प्रकारे लिंक लागते. अभ्यास केलेला किंवा नोंदी ठेवलेल्या आठवतात. मुद्दय़ांची सरमिसळ होत नाही. अशा प्रकारे केलेला अभ्यास मेंदूपूरक आहे, असं म्हणता येईल. याच पद्धतीचा वापर करून टिपणं (नोट्स) काढली तर लक्षात राहीलच, शिवाय परीक्षेच्या वेळेस नुसती नजर फिरवली तरी आठवेल. आकलन आणि स्मरण या दोन्हींसाठी हा नकाशा उपयुक्त आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव

[09/12, 07:22] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२३९*
    *दिनांक- ९डिसें १९*

🎯 *समस्या सोडवणारी ‘टीम’*

एखाद्या खेळण्याची किल्ली फिरवून लहान मुलाला ते खेळणं खेळायला दिलं, तर जोपर्यंत खेळणं चालू आहे तोपर्यंत त्याला खूप मजा येते. ज्या क्षणी खेळणं बंद पडतं, त्या क्षणी ते बंद का पडलं, याचा मूल विचार करायला लागतं. हलवून, आपटून, किल्ली फिरवून ते पुन्हा चालू करायचा प्रयत्न करतं. ते चालू झालं की, खेळ पुन्हा सुरू होतो. या काही मिनिटांमध्ये त्या मुलाच्या मेंदूमध्ये काय काय घडून गेलं?

एखादा माणूस एक नोकरी सोडून दुसरी नोकरी करण्याचा विचार करतो. ही प्रक्रिया एका दिवसात घडून येत नाही. सतत काही दिवस त्यावर विचार होतो. पुन:पुन्हा विचार करून, तपासून बघून त्यानंतर एक निर्णय घेणं, या मधल्या काळामध्ये मेंदूत काय घडून येतं?

तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्न सोडवा, असं प्रश्नपत्रिकेत सांगितलं जातं; त्या वेळेला तीनही प्रश्न वाचून नक्की कोणते दोन प्रश्न सोडवायचे आहेत आणि जो तिसरा प्रश्न आहे- तो का नाही सोडवायचा, याचा निर्णय काही सेकंदांमध्ये मेंदूत घडून येतो.

इच्छित स्थळी निघालेले असताना या रस्त्यानं जायचं की दुसऱ्या रस्त्यानं, अशा अगदी साध्या उदाहरणातही मेंदूत खूप काही घडून येत असतं. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीपासून मिळणारा अपेक्षित लाभ होत नाही किंवा होणार नाही, असा प्रश्न निर्माण होतो; त्या वेळेला मेंदूतल्या ‘डोपामाइन’ या रसायनाची पातळी कमी होते. ती कमी झाल्याक्षणी आपण दुसऱ्या मार्गाचा विचार सुरू करतो. हा विचार ‘फ्रण्टल लोब’मधील नियोजन, समस्या निवारण या केंद्राकडे जातो. इथं, आपण नक्की कशा पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकेल, याचा अंदाज घेतो. पुन्हा प्रयत्न करत राहतो, त्या वेळेला ‘सेरोटोनिन’ या रसायनाचा प्रभाव सुरू होतो; कारण ते आपल्याला कार्यप्रवृत्त करत असतं. अशी अनेक क्षेत्रं आणि अनेक रसायनं मिळून हे काम करतात.

अशा प्रकारे समजा समस्या सुटली, तर निर्णय बरोबर आल्याच्या आनंदात मेंदूमध्ये आनंदाचं रसायन निर्माण होतं. जर समस्या सुटली नाही, तर दीर्घकाळ नकारात्मक रसायनांमध्ये मेंदू राहतो.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[10/12, 08:06] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४०*
    *दिनांक-१० डिसें १९*

🎯 *कंटाळा आणि सर्जनशीलता*

कंटाळा आणि सर्जनशीलता
आपल्याला अधूनमधून कंटाळा येत असतो. हा कंटाळा मेंदूत नेमका कुठे असतो, हे शोधण्याचा प्रयत्न मेंदू शास्त्रज्ञांनी केला तेव्हा त्यांना असं आढळलं की कंटाळ्याचं मूळ हे नकारात्मक भावनेमध्ये आहे.

कंटाळा ही एक नकारात्मक भावना आहे हे खरं. मुळात आपल्याला कंटाळा का येतो? याचं उत्तर सतत एकसुरी गोष्टी करत राहिल्यामुळे. वातावरणात कोणतीही नवीन आव्हानात्मक गोष्ट नसते त्या वेळेला कंटाळा येतो.

कंटाळा दिवसातून किती वेळा येतो, कोणाकोणाला येतो, कोणामुळे येतो, कोणामुळे जातो, तो जावा म्हणून आपण कोणकोणते उपाय करतो, अनेक उपाय केल्यानंतर नक्की कशामुळे कंटाळा जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने आपापल्या मनात दिली तरीसुद्धा एका प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की कंटाळा ही नकारात्मक भावना असली तरीसुद्धा त्यातून काहीतरी सकारात्मक सापडून जातं.

उदाहरणार्थ, कंटाळा कोणकोणत्या कारणांमुळे जातो, या प्रश्नाचं उत्तर सोडवायला गेलं तर त्यातूनच अनेक सर्जनशील गोष्टी जन्म घेताना दिसतात. लहान मुलांना कंटाळा येतो त्या वेळेला मुलं अनेक खेळ शोधून काढतात. खूप कंटाळलेली मुलं जास्त काळ या भावनेत राहत नाहीत. पळापळी करून, ते जमत नसेल तर वहीच्या कागदाचे बाण करून, तेही जमलं नाही तर एकमेकांच्या खोडय़ा काढून, ते स्वत:चा कंटाळा घालवतात. असं केल्यामुळे मोठय़ा माणसांना त्रास होत असला तरी त्यांच्या बुद्धीला मात्र त्यावेळेला गमतीदार चालना मिळालेली असते. मुलांचे अनेक खेळ हे कंटाळा घालवण्यासाठीचे उपाय आहेत.

मोठी माणसं कंटाळा घालवण्यासाठी काय करतात? तर तेदेखील अनेक सर्जनशील गोष्टी करतात. नवे छंद, नव्या ओळखी, नवे छंद, पुस्तक वाचणं, पर्यटन.. यांतूनच माणसं कंटाळा घालवत असतात. आपल्या घरांतले ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी उगाचच वादविवाद करताना दिसतात. खरं तर त्यातून काहीही फारसं निष्पन्न होणार नसतं. पण हाताशी वेळ भरपूर असतो. कंटाळा घालवायचा असतो आणि त्यायोगे मेंदू कार्यप्रवृत्त होतो.

सध्याच्या परिस्थितीत मात्र, आला कंटाळा की जा सोशल मीडियावर किंवा मोबाइल गेम्स खेळ, असं सुरू झाल्यामुळे नव्या, सर्जनशील कृती मुलं शोधणार नाहीत की काय, असं वाटून जातं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[11/12, 07:30] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४१*
    *दिनांक-*

🎯 *पळवाट की पायवाट?*

आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या मेंदूमध्ये नव्या पायवाटा (न्यूरल पाथवे) तयार करता येतात. जन्मल्यापासून आपण हेच करत आलो आहोत. फक्त या सर्व गोष्टी आपल्या नकळत होतात. आपल्याला जसजसे अनुभव मिळत जातात, तशा या वाटा तयार होतात. कोणत्या वाटेवर ताण आहे, अपमान आहे, दु:ख आहे आणि कोणत्या वाटेवर आनंद, समाधान आहे हे पूर्वीच्या अनुभवांवर अवलंबून असतं.

इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की, ज्या गोष्टींपासून दुख मिळतं, त्या शक्यतो टाळायच्या असतात अशीच मानवी प्रवृत्ती आहे. पण अपरिहार्य असेल तर टाळून चालत नाही. उदाहरणार्थ, नावडत्या विषयांच्या परीक्षा, कामाच्या ठिकाणची अवघड पण विशिष्ट जबाबदारी. या झाल्या शक्यतो टाळाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी. नावडत्या विषयाचा अजिबात अभ्यास न करणं, त्यातून कायम पळवाट शोधणं, अभ्यास लांबणीवर टाकत शेवटच्या क्षणी पुस्तक धरणं किंवा कामाच्या ठिकाणी दुसरं कोणी ती जबाबदारी घेतंय का बघणं, हे झालं नेहमीचंच; म्हणजे ही आपली जुनी पायवाट! जुन्या पायवाटेवरून चालल्यामुळे तात्कालिक आनंद मिळत असतो. आता आपल्याला नवी वाट तयार करायची आहे.

पळवाट शोधण्याऐवजी जर आपण तो नावडता विषय आत्मसात करायचाच असं ठरवलं किंवा आपणहून- मेंदूला वेगळं वळण लावून जबाबदारी स्वीकारलीच, तर इथं नवी वाट आपणच तयार करतो. इथं ‘स्वत:कडून करवून घेणं’ हे मात्र जमायला लागतं. परंतु दुसऱ्यावर हुकूम चालवणं सोपं असतं, पण स्वत:वर चालवणं अवघड!

यात काही काळ ताण जाणवणार हे नक्कीच. पण यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. कारण इथं आपण जुन्या पायवाटेवर मात करून, आव्हान स्वीकारून नवीन पायवाट तयार केलेली असते.

एखादी जुनी सवय जातच नाही, असं आपण नेहमी म्हणतो. कारण पायवाट जुनी झालेली असते. त्यामुळे तीवरून चालणं हे सोपं असतं. ती सवय मोडून नवीन सवय तयार करायची म्हणजे नव्यानं न्यूरॉन्स जुळवायला घ्यायचे. हे जाणीवपूर्वक आणि मुद्दाम करता येतं. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत राहिलो, तर ती अंगवळणी पडते. जुन्या सवयी मागे पडतात आणि आपल्याला हव्या त्या, नवीन सवयी निर्माण होऊ शकतात.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[12/12, 08:25] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४२*
    *दिनांक-१२ डिसें १९*

🎯 *सामाजिक विश्वास*

आपल्याला समाजाबद्दल वाटणारा विश्वास आणि समाजाला आपल्याबद्दल वाटणारा विश्वास ही माणसाच्या जडणघडणीतली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने घर ही जिव्हाळ्याची, प्रेमाची, आत्मीयतेची जागा असतेच, पण त्या घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर शाळेकडून, समाजाकडून, रस्त्यात, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या जागेवर, विस्तारित कुटुंबांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, अनोळखी व्यक्तींकडून, प्रवासामध्ये एकमेकांवर विश्वास असणं आणि त्यातून चांगल्या अनुभवांची भर पडणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेला असा विश्वास मिळत जातो, आपला स्वीकार केला जातो, त्या वेळेला स्वयंप्रेरणा वाढते, आत्मविश्वास वाढतो.

ज्या मुलांच्या घरामध्ये किंवा मुलं जिथे राहतात तिथे जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं नातं नसेल तर अशा मुलांना स्वत:विषयी आणि समाजाविषयी प्रेम निर्माण होणं हे अवघड असतं. घरातून प्रेम मिळत नसेल तर तो अभाव समाजाने दूर करायला हवा.

परंतु ज्या वेळेला असं होत नाही त्या वेळेला कमालीचा असुरक्षित समाज तयार होतो. अशा समाजात प्रेम नसतं, तर परस्परांबद्दल टोकाचा अविश्वास असतो. याची सुरुवात लहानपणापासून घडून येण्याची शक्यता खूपच असते. शाळेमध्ये, मित्रमंडळींमध्ये, एकमेकांमध्ये विचार, भावना, गप्पागोष्टी, खेळ यांची देवाण-घेवाण होत असते. त्याच वेळेला सामाजिक बंध निर्माण होत असतात.

अनेकदा हे बंध चांगल्या पद्धतीने निर्माण होण्याऐवजी त्यांना धक्का लागण्याचं काम होतं. एकमेकांमधला प्रेमाचा पाया भक्कम असेल, तर हा धक्कासुद्धा सहन करता येऊ शकतो. परंतु वारंवार जर असे धक्के समाजाकडून मिळत राहिले, तर समाजातल्या विविध जाती-धर्म गटांमध्ये टोकाचे भेद निर्माण होतात. आणि त्यामुळे विविधतेने नटलेल्या समाजातला कोणताही एक समाज अशा परिस्थितीत सुरक्षित राहू शकत नाही, आपल्या समाजातले ताणेबाणे एकमेकांमध्ये इतके घट्ट बांधलेले आहेत की कोणत्याही एका समाजाला दुसऱ्या समाजाबद्दल भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करून चालणार नाही. काही गट  दुसऱ्या गटाबद्दल जाणीवपूर्वक विघातक भावना निर्माण करू बघतात. हे तर निंदनीय आहे. कारण यामुळे पूर्ण घडी विस्कटण्याचा संभव असतो. सामाजिक विश्वास या संकल्पनेवरच कुऱ्हाड मारल्यासारखं आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगावg
🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४३*
    *दिनांक-१३ डिसें १९*

🎯 *आकलनासाठी रक्तप्रवाह*

आपल्या शरीरातलं रक्त ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की ती आपल्याला शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी अतिशय उपयोगाची आहे. ज्या वेळेस आपल्याला नवीन एखादी गोष्ट शिकायची असते, त्या वेळेला आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीकडे असतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा सायकल शिकत असतो तेव्हा पाय कसे ठेवायचे, हात कसे ठेवायचे, स्वत:ला तोलून कसं धरायचं, या गोष्टींकडे आपलं अतिशय लक्ष असतं. आपण एखादं नवीन वाद्य शिकत असतो, तेव्हा बोटांच्या हालचाली कशा करायच्या, आपलं काही चुकणार नाही ना, याकडे खूप लक्ष देत असतो.

जेव्हा आपण त्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देतो, त्या वेळेला मेंदूतला रक्तप्रवाह त्या विशिष्ट क्षेत्रांकडे विशेषत्वाने वळवला जातो. यामुळेच शंभर टक्के लक्ष देणं आपल्याला जमतं. ती गोष्ट आत्मसात होईपर्यंत हे चालू राहतं. जसजसं आपल्याला ते विशिष्ट कौशल्य प्राप्त होतं, तसतसं शिकण्याकडे, योग्य हालचालींकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज उरत नाही. मेंदूलाही हे कळतं की, आता पूर्वीसारखा रक्तप्रवाह तिथं वळवण्याची गरज नाही, त्यामुळे हळूहळू तिथला रक्तप्रवाहाचा वेग काहीसा कमी व्हायला लागतो.

याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे, जेव्हा आपण अतिशय सराईतपणे सायकल शिकल्यानंतर अगदी सहजपणे गाणं गुणगुणत, गप्पा मारत किंवा मनात वेगळेच विचार आणत व्यवस्थित सायकल चालवू लागतो. कारण सायकल कशी चालवायची, याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. सायकल चालवणं, गणित शिकणं, एखादा प्रयोग करून बघणं, चित्र काढणं, एखादं मशीन चालवायला शिकणं.. या शिकण्यात रक्तप्रवाह आपल्याला मदत करत असतो.

याचा थोडक्यात अर्थ असा की, जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असते तेव्हा आपलं लक्ष असायला पाहिजे. मन भटकता कामा नये. पूर्ण लक्ष देऊन जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो, पुन्हा पुन्हा सराव करतो, पूर्णपणे ते नवं शिकणं आत्मसात झालं की त्याची इतकी सवय होऊन जाते, की पुन्हा इतकं लक्ष देण्याची गरज उरत नाही.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
        भारत का इतिहास*       - चाळीसगाव

🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४४*
    *दिनांक-१६ डिसें १९*

🎯 *कला साकारताना..*

‘‘चित्रं काढत बसू नकोस; अभ्यास कर..’’ असा धोशा जेव्हा मुलांच्या मागे लावला जातो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की, चित्रंच काय, पण कोणतीही कला ही मेंदूविकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते.

माणूस जेव्हा एखादी कला साकारत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूत अनेक गोष्टी घडून येत असतात. कारण ही नवनिर्मिती असते. चित्रकला, शिल्पकला, कोलाज, एखादी सुंदर वस्तू तयार करणं यासाठी उच्च प्रतीची बुद्धिमत्ता लागते.

मेंदू संशोधकांच्या प्रयोगांतून असं लक्षात आलेलं आहे की, जेव्हा माणसं एखाद्या कलेत रमून गेलेली असतात, तेव्हा आकलनशक्ती काम करत असते. त्याचप्रमाणे एकाग्रतेची सर्वोच्च पातळी गाठलेली असते. या गोष्टींमुळे मेंदूतलं ‘सेरोटोनिन’ हे रसायन उद्दीपित होत असतं. मेंदूतल्या लहरींवर सकारात्मक परिणाम होत असतो. हातातल्या कारक कौशल्यांनाही उद्दीपन मिळत असतं. त्या माणसाच्या भावना तो करत असलेल्या कृतीवर एकवटलेल्या असतात. माणसाचा दृष्टिकोन बदलायला मदत होते. या साऱ्यामुळे मेंदूला उद्दीपन मिळत असतं. भावनिक आणि मानसिकरीत्या त्यात रमून गेल्यामुळे तो समाजाशी जोडला जातो आणि त्यामुळेच मेंदूचा विकास होतो.

अस्तित्वात नसलेली गोष्ट प्रत्यक्षात येत असते, म्हणजेच ‘सर्जनशील कृती’ घडत असते. या वेळी मेंदूमध्ये जे काही घडत असतं, त्याचा परिणाम शिकण्याच्या क्षमतेवरसुद्धा होत असतो. मेंदूशास्त्रातलं मूलभूत संशोधन आणि कला यांचा धागा जोडून यावर अभ्यास करणारे एरिक जेन्सेन यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाला कला ही प्रोत्साहन देण्याचं काम करते.  एकदा माणसानं कलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, की शिकण्यासाठी त्याची मनोभूमी तयार होत असते.

‘न्यूरो-अ‍ॅस्थेटिक्स’ म्हणजे मेंदू-सौंदर्यशास्त्राचे लंडनस्थित प्राध्यापक सेमीर झेकी यांनी एक प्रयोग केला. त्यात सहभागी झालेल्यांना अतिशय सुंदर चित्रं दाखवली. त्यात काही निसर्गचित्रं, काही स्थिरचित्रं होती. बघणाऱ्याला ज्या चित्रातून अतिशय आनंद होत होता, त्यावेळेला भावनिक मेंदूत उद्दीपन झाल्याचं दिसून आलं; म्हणजेच त्या क्षेत्रातला रक्तप्रवाह वाढलेला दिसून आला.

या सर्व कारणांसाठी शालेय जीवनात विविध कलांचा समावेश हवा, तसेच त्यानंतरही माणसाच्या जीवनात एखादी तरी कला हवी.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
=========
[17/12, 07:22] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २४५*
    *दिनांक-१७ डिसें १९*

🎯 *कॉपी आणि पेस्ट*

‘कॉपी आणि पेस्ट करायला काहीच अक्कल लागत नाही’, असं आपण नेहमीच म्हणतो. सोशल मीडियावर जेव्हा मजकूर कॉपी-पेस्ट केला जातो, तेव्हा खरोखर अर्ध्या सेकंदाच्या आत, विनाकष्ट हे काम होतं. कधी मुलं स्वत: अभ्यास न करता नुसतं पुस्तकातल्या आखून दिलेल्या कंसातल्या ओळी पुन्हा लिहून काढत असतात किंवा स्वत: अभ्यास न करता दुसऱ्याची वही घेऊन जसंच्या तसं लिहून काढत असतात आणि त्यालाच ‘अभ्यास करणं’ असं म्हणतात, तर इथे याला नक्कीच अभ्यास म्हणत नाहीत. तेही फक्त ‘कॉपी-पेस्ट’ आहे.

मेंदू केवळ शब्द वाचणं आणि लिहून काढणं याशिवाय वाचून, समजून लिहिण्याचं काम करत असेल, स्वत: उत्तर शोधून त्यात काही बदल करून लिहीत असेल तर आकलन क्षेत्र काम करत असतं. पण तेही होत नसेल तर अशा प्रकारच्या अभ्यासातून आकलन, स्मरण घडून येत नाही. काही जण सर्रास दुसऱ्यांची उत्तरं, गणितं, निबंध हेसुद्धा जसंच्या तसं लिहीत असतात. अशा प्रकारच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. कारण मेंदू त्या कामांमध्ये पूर्णाशाने कार्यरत नसतो.

एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं, त्यासाठी प्रश्न काढणं, एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नांना स्वत:हून उत्तरं देणं, विशिष्ट विषयावरची उत्तरं देणं, काही अभ्यासपूर्ण उत्तरं देणं, उत्स्फूर्त उत्तर देणं, पत्र लिहिणं, गोष्टी सांगणं, गोष्टी लिहिणं हे सर्व प्रकार मेंदूपूरक आहेत असं समजायला हरकत नाही.

मर्सयिा टेट या संशोधक लेखिकेने असं दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारे आपण जेव्हा कॉपी करतो, एखादी गोष्ट जशीच्या तशी लिहून काढतो, त्या वेळेला आपल्या मेंदूमध्ये नवीन डेन्ड्राइट्स तयार होत नसतात. न्यूरॉन्सची जुळणी होत नसते.

त्यापेक्षा इतरांशी विशिष्ट विषयावर मुद्देसूद  बोलणं,  विशिष्ट विषयावर उत्स्फूर्त लेखन करणं, काही पुस्तकं वाचून केलेलं लेखन- अशा प्रकारे मेंदूला चालना दिली, तर त्यामधून मात्र नक्कीच न्यूरॉन्सच्या नवीन जुळण्या तयार होतील. कविता वाचणं, कवितेचा अर्थ समजून घेणं, अर्थ दुसऱ्या कोणाला सांगणं,  स्वत: कविता लिहिणं, संवाद लिहिणं या पद्धतीने मेंदूला कामाला लावता येऊ शकतं.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[18/12, 07:18] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४६*
    *दिनांक-१८ डिसें १९*

🎯 *अनुकरण*

आपला मेंदू प्रत्येक क्षणी काम करत असतो. शांत बसलेलो असतो, तेव्हाही मनात विचार चालू असतात. घरच्या घरी टीव्हीवर एखादी मॅच बघत असलो, नृत्याचे कार्यक्रम बघत असलो किंवा प्रत्यक्ष समारंभाच्या ठिकाणी, स्टेडियममध्ये असलो आणि इतरांची कौशल्यं बघत असलो तरीही आपला मेंदू शांत बसलेला नसतो. तो तिथेही कामात असतो.

काही नर्तक जर आपली कला दाखवत असतील किंवा खेळाडू खेळत असतील आणि आपण त्यांच्या हालचाली मन लावून बघत असू, तर ते बघण्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. आपण यात पूर्णपणे तल्लीन होतो. त्याचा आस्वाद घेतो. समरसून जातो.  खेळ, नृत्य किंवा एखादं कौशल्यं या हालचाली बघत असताना, आपल्या मेंदूमध्ये नेमकं काय होत असतं? ज्या वेळेला कोणतीही विशिष्ट हालचाल आपण बघत असतो, त्या वेळेला ती हालचाल मेंदूत साठवून ठेवत असतो. त्या हालचालीचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपला मेंदू त्या हालचालींच्या पायऱ्या स्मरणशक्तीच्या केंद्रात टिपून ठेवत असतो. याचा अर्थ लगेच आपल्याला त्या निष्णात नर्तकाप्रमाणे नृत्य करता येणार नाही किंवा त्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे खेळता येणार नाही. परंतु हातात बॅट घेतली तर साधारणपणे काय करायचं असतं हे आपल्याला माहीत असतं. तशा प्रकारच्या हालचाली करायचा आपण प्रयत्न करतो.

जेव्हा अशा प्रकारचं कौशल्य दाखवायची वेळ येईल त्यावेळेला आपण या मेंदूत साठवलेल्या कौशल्यांचं अनुकरण करत असतो. आपल्याही नकळत या कौशल्यांचा अभ्यास मनामध्ये चालू असतो.

अनुकरण करतच लहान मुलं केव्हा तरी आई-बाबांप्रमाणे वेगवेगळी कामं करायला शिकलेली असतात. घरी ज्या प्रकारे वागतात, तसंच वर्तन लहान मुलं करताना दिसतात. म्हणून असं म्हणतात की पालकांनी बोलण्यापेक्षा अनुकरणातून आदर्श घालून द्यावेत. कारण मुलं अनुकरण करत असतात तशी मोठी माणसेदेखील अनुकरण करत असतात.

मोठं झाल्यानंतरही आपण अनुकरणाचा हा भाग वगळून टाकत नाही, तर कायमच आपण अनुकरणशील असतो. म्हणूनच अनेकदा असं म्हटलं जातं की मित्र-मैत्रिणीसुद्धा एकमेकांचे हावभाव, लकबी, हातवारे उचलतात. सर्व वयांत आपला मेंदू अनुकरणशील असतो, ही मोठी गोष्ट आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव

[19/12, 07:27] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक- २४७*
    *दिनांक-१९ डिसें १९*

🎯 *समृद्ध वाचनासाठी..*

हल्लीची मुलं वाचत नाहीत, असा एक सूर नेहमी आळवला जातो. मुलांना पुस्तकांकडे वळवायचं असल्यास त्यांना असे काही प्रश्न गप्पांच्या स्वरूपात विचारता येतील; परंतु प्रश्न विचारताना त्यांना आपलेही अनुभव जरूर सांगावेत :

– तुम्ही आजवर कोणत्या गोष्टी वाचल्या/ ऐकल्या आहेत? तुम्हाला कोणी गोष्टी सांगितल्या?

– मराठी/ हिंदी/ इंग्रजीच्या पाठय़पुस्तकातले धडे म्हणजे गोष्टीच असतात. त्या तुम्हाला आवडतात का?

– कोणत्या गोष्टी आवडतात? आठवतात? वाचलेली गोष्ट आठवते की ऐकलेली?

– मुलांना ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टी सांगायच्या असल्यास त्यांना प्रोत्साहन देणं.

– मुलांना खरेखुरे प्रसंग सांगायला सांगणं.

– पुस्तकातली गोष्ट वाचून दाखवायला सांगणं.

– पुस्तकात गोष्टींच्या मजकुरासोबत असलेली चित्रं दाखवणं. या चित्रांविषयीही बोलायला लावणं.

– प्रत्येक गोष्ट आवडतेच असं नाही, याकडे लक्ष वेधणं. जसं- सिनेमे, दूरचित्रवाणी मालिका खूप प्रकारच्या असतात. त्यातही एक गोष्टच असते. पण प्रत्येक सिनेमा/ मालिका आपल्याला आवडत नाही. तसंच पुस्तकांचंही आहे, हे सांगणं.

– गोष्ट आवडली का आणि का आवडली, यावर चर्चा. आवडली नसेल तर का नाही आवडली, हे जाणून घेणं.

– गोष्टीतले संवाद कसे  होते? त्यातल्या वेगळ्या शब्दांविषयी बोलणं; गोष्टीतली वर्णनं / वातावरण कसं होतं, यावर मुलांची मतं जाणून घेणं.

– गोष्टीत आलेले नवीन  शब्द, म्हणी-वाक्प्रचार यांकडे लक्ष वेधणं.

– गोष्टीचं नाव हेच का ठेवलं असावं? आणखी कुठलं नाव चाललं असतं? गोष्टीचं शीर्षक कसं लिहिलं आहे? त्याचं सुलेखन कसं आहे?

– गोष्टी किती प्रकारच्या असतात? परीकथा, साहसकथा, ऐतिहासिक कथा, विनोदी कथा, इत्यादी.

– प्रत्येक गोष्टीला एक आकर्षक सुरुवात असते. काही वेळानं त्यात एखादा पेच निर्माण होतो, एखादं संकट येतं. हा गोष्टीचा मध्य असतो. या संकटातून सुटका होते, तोच गोष्टीचा शेवट असतो; हे सांगणं.

अशा काही गप्पागोष्टींतून मुलं वाचनाकडे वळली तर ते त्यांच्या शाब्दिक/ भाषिक आणि बौद्धिक समृद्धीच्या दृष्टीनं योग्य ठरेल.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[20/12, 07:16] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४८*
    *दिनांक-२० डिसें १९*

🎯 *समाजमाध्यमं*

एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर न येता वेगवेगळ्या विषयांवर समूह बनवणं, आपल्या आवडीच्या- अभ्यासाच्या विषयांवर मनमोकळं आणि निर्भीडपणे व्यक्त होणं, जगाच्या वेगवेगळ्या टोकांवर बसून गप्पा मारणं, नाती जोडणं, एकमेकांना विविध कला-कौशल्यं शिकवणं, एकमेकांचे प्रश्न सोडवणं, वस्तूंची विक्री करणं, जाहिराती करणं इथपासून ते एकमेकांशी भरपूर वाद घालणं, पातळी सोडून शिव्या घालणं, आर्थिक फसवणूक करणं.. अशा व यापेक्षाही अनेक गोष्टी समाजमाध्यमांतून घडून येतात. यावर आपला मेंदू कसं काम करतो?

विविध समूहांमध्ये असलेले लोक दिवसातून अनेकदा एकमेकांच्या संपर्कात असतात. मेंदूला ही सर्व नाती खरी वाटतात. त्यामुळे एकमेकांना कधीही न भेटलेली, पण एकमेकांशी रोज लिहून गप्पा मारणारी माणसं प्रत्यक्ष एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात खरोखरीची नाती, बंध निर्माण झालेले असतात, मत्री झालेली असते. त्यातूनच समाजमाध्यमांवर सुरू झालेली विधायक कामं प्रत्यक्षात उतरली आहेत. तसंच प्रत्यक्षात चालू असलेली कामं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर जाऊन मोठय़ा जनसंख्येपर्यंत पोहोचलेली आहेत. समाजमाध्यमांचा चांगल्या कामांसाठी उपयोग होतो. पण अनेकदा वाईट आणि भयंकर कामांसाठीही उपयोग करणारे आहेत.

समाजमाध्यमांवरचे वाद ही एक महत्त्वाची बाब आहे. वादविवाद स्पर्धेसारखं वातावरण अशा वेळी असतं. या वादविवादांमुळे परिस्थिती काय आहे, हे लक्षात यायला मदत होते. विषयाच्या दोन्ही बाजू समजायला मदत होते आणि आपल्याला मत तयार करणं सोपं जातं. पण अनेकदा लोक एक बाजू वाचतात, त्याला चिकटून राहतात. इतरांच्या मतानुसार मत न बनवणं, खात्रीच्या स्रोताकडून माहिती मिळवणं फार आवश्यक ठरतं. योग्य गोष्ट ‘शेअर’ करणं ही फार गरजेची बाब झालेली आहे.

वादात आपली बाजू मांडण्यासाठी, दुजोरा देण्यासाठी ‘ट्रोल’धाड असते. अनेकदा ही धाड व्यावसायिक तत्त्वावर काम करणारी असते. यामुळे इथे एखाद्या विषयावर निकोप चर्चा होत नाही. विरोधासाठी विरोध होतो. निष्पन्न काहीच होत नाही. याचाच वाईट आणि क्रूर वापर झुंडीने बळी घेण्यासाठी होतो. तेव्हा केवळ भारतासाठी कंपन्यांना आपली ‘सेटिंग्ज’ बदलावी लागतात.

म्हणूनच समाजमाध्यमं सकारात्मक, विधायक मेंदूंच्या हातात असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे.

 🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव
[23/12, 06:52] Nitin Khandale (ATF): *🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬*
      🤔 *कुतूहल* 🤔
*लेखांक-२४९*
*दिनांक-२३ डिसें १९*

🎯 *मूरचा नियम*

काही वैज्ञानिक नियम मूलभूत आणि काटेकोर निर्देश देणारे असतात, तर सामाजिक विज्ञान आणि काही अन्य ज्ञानशाखांत मांडलेले नियम हे साधारण ढोबळ दिशा देणारे असतात. अशाच ढोबळ दिशा देणाऱ्या नियमांत, संगणकाच्या वाढणाऱ्या कार्यक्षमतेबाबत एक नियम प्रसिद्ध आहे. हा नियम ‘मूरचा नियम’ म्हणून ओळखला जातो. हा नियम १९६५ साली गॉर्डन मूर या अमेरिकी इलेक्ट्रॉनिक अभियंत्याने ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या शोधपत्रिकेत चार पानी लेखात मांडला. त्याचे तात्पर्य असे आहे की, ‘संगणकात वापरल्या जाणाऱ्या मायक्रोप्रोसेसरची (चिप) क्षमता दर अठरा महिन्यांनी दुप्पट होत जाईल!’ चिपमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट अधिकाधिक प्रमाणात संकलित करण्याचा कल बघून, मूर याने संबंधित आलेख वापरून आणि आकडेमोड करून हा निष्कर्ष काढला. या वाढीमागचे कारण हे या मायक्रोप्रोसेसरवर बसवलेल्या ट्रान्झिस्टरचा आकार अधिकाधिक लहान होणे हे आहे. १९४० सालच्या दशकात जे ट्रान्झिस्टर मिलिमीटर आकाराचे होते, त्यांचा आकार १९८० सालापर्यंत त्याहून एक हजार पटींहून लहान झाला होता. (२००० सालापर्यंत तर याचा आकार याहूनही शंभर पटींनी लहान झाला.)

१९७५ साली हा वेग काहीसा कमी झाल्यामुळे, ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होण्याचा काळ मूरने अठरा महिन्यांवरून दोन वर्षांवर नेला. मात्र आज वापरात आलेल्या त्रिमितीय ट्रान्झिस्टरमुळे, आजही ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होण्याचा वेग अठरा महिन्यांवरच असल्याचे आढळले आहे. मूरच्या नियमात एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरली आहे, ती म्हणजे या साधनाच्या निर्मितीत भविष्यातसुद्धा सिलिकॉन हेच मूलद्रव्य वापरले जाईल. सिलिकॉनच्या काही प्रतिकूल गुणधर्मामुळे ट्रान्झिस्टरच्या आकारावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. छोटय़ा जागेत बसवलेल्या इतक्या मोठय़ा संख्येतील ट्रान्झिस्टरमुळे निर्माण होणारी उष्णता ही या संख्येवर मर्यादा आणू शकते. तसेच सिलिकॉन हे काही इलेक्ट्रॉनसाठी उत्तम वाहक नाही. त्यामुळेही ट्रान्झिस्टरचा आकार फार लहान करणे कदाचित शक्य होणार नाही. जर चिपवर याहून अधिक ट्रान्झिस्टर बसवायचे तर त्यासाठी ग्राफिनसारख्या एखाद्या अधिक कार्यक्षम पदार्थाचा वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत पुन्हा मूरचा नियम पाळला जाऊ  शकतो. मात्र, मूरने स्वत:च २००५ साली, हा नियम भविष्यात पाळला न जाण्याची शक्यता व्यक्त केली होती.

✍ *डॉ. विवेक पाटकर*
office@mavipamumbai.org
=================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
 📡 *जय विज्ञान*🔬
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
*#दै_लोकसत्ता*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*
[23/12, 06:52] Nitin Khandale (ATF): 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠
       (दै.लोकसत्ता)
    *लेखांक-२४९*
    *दिनांक-२३डिसें १९*

🎯 *नातं पूर्वजांशी..*

जर आपण आपल्या बृहद् कुटुंबातल्या शंभर लोकांची छायाचित्रं गोळा करून त्यांचं निरीक्षण केलं, तर आपल्या असं लक्षात येतं की, जगभरात जेवढे वंश आहेत- त्यांची चेहरेपट्टी, केसांचा पोत, डोळ्यांचा रंग, आकार, त्वचेचा रंग, उंची, हाता-पायांची ठेवण, नाक, भुवया यातली कोणती ना कोणती वैशिष्टय़ं आपल्याला आपल्याच कुटुंबामध्ये दिसून येतील. उदाहरणार्थ, काहींचे कुरळे केस असतात, काहींच्या शरीरावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात, तर काहींच्या डोळ्यांची ठेवण जपानी व्यक्तीसारखी असते.

मुलांमधली ही वैशिष्टय़ं आपण आई, बाबा, काका, मामा, मावशी, आत्या, आजी, आजोबा यांच्यात शोधतो. आपल्या पूर्वजांची वैशिष्टय़ं ही केवळ एक-दोन पिढय़ा मागे जाऊन नाही, तर कित्येक शतकं मागच्या गुणसूत्रांच्या माध्यमातून पिढय़ान्पिढय़ांच्या प्रवासातून आलेली असू शकतात.

कित्येक शतकांपूर्वी- सहस्रकांपूर्वी आपले पूर्वज नक्की कोण होते, हे कोणाला सांगता येईल?
मुळातला मानववंश हा एकच आहे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत ‘सेपियन्स’ म्हणतो. हाच वंश जगामध्ये अनेक ठिकाणी विखुरला गेला. अनेकदा एकत्रही आला. परस्परांमध्ये गुणसूत्रांची देवाणघेवाण झाली, होत राहिली आणि पुढेही होत राहील.

जिथं माणसांच्या टोळ्या गेल्या, तिथल्या हवामानानुसार, प्राणीजीवनानुसार, त्या ठिकाणच्या नसर्गिक आव्हानांना तोंड देत माणसामध्ये काही बदल होत गेले. विशिष्ट संकटांचा सामना करण्यासाठी म्हणूनही हे बदल झाले. उदा. बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्यांनी अतिथंडीचा सामना केला, तसा उष्णकटिबंधात राहणाऱ्यांनी उष्णतेचा सामना केला. या सगळ्या परिस्थितीला पूरक अशी त्याची शरीररचना झाली. हीच उत्क्रांती आजही चालू आहे. पूर्वी कच्चं मांस खाण्यासाठी माणसाचा जबडा मोठा होता, तर आज शिजलेले पदार्थ खाण्यासाठी जबडय़ाचा आकार आणि तसे दात राहिले नाहीत. अशा प्रकारे मानवी जीवनात या पुढच्याही काळात बदल होत जाणार आहेत.

मानववंशाच्या इतिहासात अलीकडच्या काळामध्ये धर्म, जात यांचा शिरकाव झाला. या गोष्टींमुळे जरी माणसांमध्ये भेद तयार झाला असला, तरीही मुळातले आपण ‘सेपियन्स’ आहोत आणि त्यामुळेच एकमेकांची जवळची किंवा लांबची भावंडंही आहोत!

🖋 *डॉ. श्रुती पानसे* contact@shrutipanse.com
=================
*संकलक~नितीन खंडाळे*
                - चाळीसगाव

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...