काय करावे?
भिजत घातलेली घोंगडी,
पिळून वाळत एकदाची घालावीत.
फडताळातील बोचक्यात कोंबलेली,
पुस्तके पुन्हा एकदा चाळावीत.
विस्कटलेल्या नात्यांची,
पुरचुंडी पुन्हा बांधावी.
पाडून टाकाव्यात भिंती साऱ्या,
वीण तुटलेली सांधावी.
आवडले कोणी मनाला,
तर खुशाल तिच्यावर भाळावं,
आलाच पुढून होकार तर,
केसात तिच्या फुल एखादं माळावं.
बोललं कुणी मनापासून,
तर मनमोकळं बोलावं.
अहंकाराची किनार ज्याला,
ते नातं पुन्हा पुन्हा तोलावं.
वागलं कोणी वाईट म्हणून,
जाब विचारत बसू नये.
नकळत कोणी चुकलं तर,
उगी त्याच्यावर रुसू नये.
वर वर कोणी बोलेल गोड,
आपण त्याला फसू नये.
जिथं आपली किंमत शून्य,
घरात त्या घुसू नये.
हेही करू नये,
तेही करू नये.
पश्न पडतो मनाला,
मग करावे तरी काय?
भिजत घातलेली घोंगडी,
पिळून वाळत एकदाची घालावीत.
फडताळातील बोचक्यात कोंबलेली,
पुस्तके पुन्हा एकदा चाळावीत.
विस्कटलेल्या नात्यांची,
पुरचुंडी पुन्हा बांधावी.
पाडून टाकाव्यात भिंती साऱ्या,
वीण तुटलेली सांधावी.
आवडले कोणी मनाला,
तर खुशाल तिच्यावर भाळावं,
आलाच पुढून होकार तर,
केसात तिच्या फुल एखादं माळावं.
बोललं कुणी मनापासून,
तर मनमोकळं बोलावं.
अहंकाराची किनार ज्याला,
ते नातं पुन्हा पुन्हा तोलावं.
वागलं कोणी वाईट म्हणून,
जाब विचारत बसू नये.
नकळत कोणी चुकलं तर,
उगी त्याच्यावर रुसू नये.
वर वर कोणी बोलेल गोड,
आपण त्याला फसू नये.
जिथं आपली किंमत शून्य,
घरात त्या घुसू नये.
हेही करू नये,
तेही करू नये.
पश्न पडतो मनाला,
मग करावे तरी काय?
आपल्याच मनाशी,
आपणच साधावा संवाद.
आणि निघावे स्वतःच्याच शोधात स्वतः,
मिटवून सगळे वाद.
© के. राहुल 9096242452.
आपणच साधावा संवाद.
आणि निघावे स्वतःच्याच शोधात स्वतः,
मिटवून सगळे वाद.
© के. राहुल 9096242452.
Comments
Post a Comment