कविता - पोपट
एक पोपट दुसऱ्याला म्हणाला,
थांब रे तू मध्ये मध्ये बोलू नको.
तुला खूप कळत असल्यासारखे,
नाकाने कांदे सोलू नको.
तसे पाहिले तर,
मला सुद्धा काही कळत नाही.
पण मी तुझ्यापेक्षा थोर आहे,
आजपासून मीच राजबाबूंचा मोर आहे.
माझ्या तालावरच सगळयांनी नाचायचे,
मी जे लिहून देईन तेच तुम्ही वाचायचे.
उंची माझी लहान म्हणून,
कुणी नाही मला टोकायचे,
मी वाक म्हटले की,
तुम्ही गुमान वाकायचे.
तुम्हा सर्वांत मीच ज्येष्ठ आहे,
कळत नसले काहीतरी मीच खरा श्रेष्ठ आहे.
आलो मी दौऱ्यावर की,
सगळयांनी हजर रहायचे,
जमत नसेल तर सरळ सगळ्यांनी घरी जायचे.
पुन्हा एकदा सांगतो,
माझा नाद कुणी करू नका,
फुका वाद माझ्याशी घालू नका.
एकेकाकडे मी आता पाहणार आहे,
इथून पुढे मी राजबाबूंच्या गोटातच राहणार आहे.
©के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment