कविता - 'गुरु'त्व
'गुरु'त्वामागचे हेतू एकदा समजून घ्यायला हवेत,
लाभला मोठा गुरु म्हणून कोणी जाऊ नये हवेत.
द्रोण जितका मोठा होता,
तितकाच तो खोटा होता.
एकलव्याचा अंगठा त्याने कपटाने घेतला होता,
ज्ञानाचा साठा त्याने पांडवांनाच वाटला होता.
शूर असला तरी कर्ण सूत म्हणून बाटला होता.
सूत्रे हाती राहावीत म्हणून कृष्ण पांडवांना भेटला होता.
Comments
Post a Comment