Skip to main content

लघुकथा : फोटो



मिराला कृष्णकुंज सोसायटीत रहायला येऊन आठ दिवस झाले होते. त्यामुळे ती आता स्थिरावली होती. कामावरून आठ दिवसाची काढलेली सुट्टी आता संपणार होती. उद्या तिला कामावर हजर व्हावे लागणार होते. त्यातच ती आयटी कंपनीत कामाला असल्याने इतकी मोठी सुट्टी तिला फारच प्रयासाने मिळाली होती त्यामुळे आता तिला अजून करणे सांगता येणार नव्हती. तसे तिने आपल्या आईला तिच्या कडे रहायला बोलाविले होते पण आईला यायला अजून  चार पाच दिवस अवकाश होता. पण मिराला एकटेपण खायला उठले होते त्यामुळे तिच्या आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला अनय ला पुढे पाठवून दिले. अनय दहा वर्षाचा असला तरी खूपच हुशार होता. तिच्या आईने त्याला एकट्यालाच ट्रेनने बसवून दिले होते. पण ट्रेनला मध्येच अपघात झाल्याने ती चिंतेत होती. तिने रेल्वेच्या आपतकालीन हेल्पलाईनला फोन करून माहिती घेतली होती. शेवटी आज तिने कामाला दांडी मारून रेल्वे हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधील जखमी प्रवासाच्या बेडवरील एका बेडवर अनयला बगून तिला हायसे वाटले. त्याला किरकोळ लागले होते. पण त्याच्या मनात अपघाताची भीती बसल्याने तो बेशुद्ध झाला होता. एकमेकांना पाहून दोघे रडू लागले. मिराने त्याला मिठीत घेतले आसनी सगळ्या formality कम्प्लिट करून ती त्याला घरी घेऊन आली. पण ती कामावर हजर ना झाल्याने कंपनीतून अर्जेन्ट कॉल आला होता. दुपारून का होईना कामावर हजर व्हा नाहीतर उद्या कामावर येऊ नका असा दमच वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याने तिला अनय ला एकट्याला घरात सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी गेलीतर खाण्या पिण्याचे वांधे तर होतीलच पण एकदा सोडलेल्या नवऱ्याकडे पुन्हा जायची वेळ येऊ नये यासाठी तिने मोठ्या कष्टी मनाने अनय ला एकट्याला घरी सोडले आणि कामावर निघून गेली.
दुपारची शिफ्ट असल्याने तिला घरी यायला रात्रीचे बारा एक तरी वाजणार होते.  शिवाय सकाळी लवकर पुन्हा फर्स्ट शिफ्ट ला जावे लागणार होते. शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास ती घरी आली तर तिला अनय कोणाबरोबर तरी घरात खेळतोय असे जाणवले. तिने बेल वाजवली तर घरातून दुसऱ्याच मुलाने दरवाजा उघडला. त्याला बघून तिने 'तू कोण?' अशी चौकशी केली. तो म्हणाला, मी अमर, तिसऱ्या मजल्यावर राहतो. हा एकटाच दिसला म्हणून याच्या सोबतीला थांबलोय. अरे पण तुझे आई बाबा..... बाबा नाहीत मला आई आणि मी, आम्ही दोघेच असतो. अरे पण आईला माहित आहे ना तू इथे आहेस ते. हो तर मी तिला सांगूनच आलोय. ठीक आहे बरं झालं तू थांबलास त्याच्या सोबतीला. चल तुला घरी सोडते. नको काकू मी जाईन एकटा.  असे म्हणून अमर झटक्यातच घरातून बाहेर गेला . मिराने दार लावून घेतले आणि दोघे झोपी गेले. सकाळी परत मीरा कामावर गेल्यावर अमर अनय बरोबर खेळायला हजर. मिरालाही आपल्या गैरहजेरीत अनय च्या सोबतीला अमर आहे हे पाहून बरे वाटले. आज मिरची विकली ऑफ होत त्यामुळे ती घरीच होती. शिवाय आज तिची आईपण येणार होती त्यामुळे आज ती आणि अनय फारच खुशीत होते. मीरा  अनय ला घेऊन बाहेर फिरायला चालली होती. सोबत तिने आपला नविनच घेतलेला kodak digital कॅमेराही घेतला होता. तिने घराला टाळा लावला आणि ते निघाले तर अमर बाहेर जिन्यात बसलेला दिसला. तिने त्याला बाहेर फिरायला येणार का? असे विचारले तर तो लगेच तयार झाला. तिघांनी मिळून खूपच धमाल केली. सगळं पुणे फिरून घेतले आणि आपल्या नवीन कॅमेऱ्यातून फोटोही काढले. येत येता लक्ष्मी रोडला तिने फोटो developing साठी दिले आणि घरी आली तर तिची आई बाहेर वाट बघत उभी होती. तिला बघून अनय आणि मिराला खूप आनंद झाला दार उघडून तिघे घरात गेले आणि अमर अनयला टाटा करत आपल्या घरी निघून गेला.  मिराच्या आईंने मिराला विचारले की, अनय कोणाला टाटा करतोय मला तर कोणीच दिसले नाही. त्यावर मीरा म्हणाली, "काहीतरी काय आई, मी पण पहिले अमरला, तुलाच कसे कोणी दिसले नाही". पण मिराच्या आईला चैन पडेना. दुसऱ्या दिवशी मीर कामाला गेल्यावर ती अमरच्या घरी गेली. घराचा दरवाजा उघडाच होता. आत अमरची अशी मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळली होती. तिने अमरच्या आईकडे चौकशी केली असता अमर चार वर्षांपूर्वी वारला असल्याचे सांगितले. तिने मीरा कामावरून आली की ही गोष्ट मिराला सांगितली शिवाय आज ती दिवसभर अनय कडे खेळायला आला नसल्याचे सांगितले पण मिराला विश्वास वाटला नाही. पण आई ऐकत नाही हे बघून तिने अनय ला घरी ठेवले आणि आईला घेऊन थेट जिथे फोटो develop करण्यासाठी दिले होते तिथे गेली.  फोटो develop करून झाले होते. मिराने बिल चुकते केले आणि फोटो बाहेर काढून आईला दाखविले. ते बघून आई म्हणाली, "हे काय? एकटीचेच फोटो काढलेस, आणि यातून काय सिद्ध करणार आहेस?" आईचे बोलणे ऐकून मिराने स्वतः फोटो पहिले तर तिला धक्काच बसला. अमर च काय पण अनय चेही फोटो आलेले नव्हते. कॅमेऱ्यामध्येच काही तरी प्रॉब्लेम आहे असे म्हणून ती घरी आली अनय घरात नव्हता पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. तिने कपाटातून कॅमेरा काढला आणि open करून पहिले तर अमर आणि अनय फोटोतून तीच्याकडे पाहून खदाखदा हसत होते.
©के.राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...