"मूल्क" च्या निमित्ताने :
हिंदी चित्रपटसृष्टी ही मुळातच उचल्यांचा बाजार आहे. येथे तयार होणारे बहुतांश चित्रपट हे Tollywood किंवा इतर भाषेतील चित्रपटांच्या कॉपी असतात. मुळात बहुतांश Tollywood चे चित्रपट हे हॉलिवुडच्या चित्रपटांची कॉपी असतात. अश्या या उचलाउचलीच्या धंद्यात ती संकल्पना हिंदीत येताना तंत्रज्ञान आणि सादरीकरण यातील त्रुटी आणि मागासापणामुळे अत्यंत सुमार चित्रपटांची निर्मिती होते. एकूण प्रदर्शित चित्रपटांमध्ये या उचलाउचलीचे प्रमाण जवळपास ८०% टक्के आहे. सध्या हे प्रमाण आणखी वाढत चालले आहे कारण प्रेक्षकांचा दर्जाही तितकाच सुमार झाला आहे. अनेक दक्षिणी थाटाचे सुमार कथा आणि अभिनय असलेले चित्रपट 'दे मार' स्टाईल मुळे सहज १०० ते २०० कोटीचा व्यवसाय करू लागले आहेत. व्यवसाय म्हणून हे ठीक असले तरी चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच सामाजिक अभिसरण घडवून आणणारे एक प्रभावी माध्यम आहे त्यामुळे कशा प्रकारचे चित्रपट लोक बघतात त्यावरून त्यांचाही दर्जा आणि बौद्धिक कुवत ठरत असते आणि त्यातूनच एकूण समाजाचाही दर्जा लक्षात येतो.
दुर्दैवाने भारतातील प्रेक्षकांचा दर्जा इतका घसरला आहे की, चांगल्या कलाकृती कशाला म्हणायचे? आणि त्या कशा पहायच्या? याचे कोणतेच ज्ञान बहुतांश प्रेक्षकांना विशेषत: युवा प्रेक्षकांना नाही हे अनेक चांगल्या कलाकृती बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरतात तेव्हा प्रकर्षाने जाणवत राहते. जे काही मोजके, चांगले आणि आशयघन चित्रपट येतात ते एक तर प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत आणि पोहचले तरी बऱ्याच जणांना ते कळत नाहीत. त्यामुळे सामजिक आशय आणि विषय मांडायला निर्माते आणि दिग्दर्शक पुढे येत नाहीत. तरीही out of box विचार करणारे काही लेखक, पटकथाकार आणि निर्माते दिग्दर्शक हा धोका पत्करून चागल्या कलाकृती समोर घेऊन येतात. पण जेव्हा त्याला प्रेक्षक नसतो तेव्हा मात्र वाईट वाटते. त्यामुळे "मूल्क" सारख्या अत्यंत दर्जेदार, आशयघन आणि वास्तव मांडणाऱ्या चित्रपटाच्या नशिबी असे दिवस येतात तेव्हा वाईट वाटते.
"मूल्क" च्या बाबत आज काही बोलणार नाही कारण हा लेख वाचून प्रेक्षकांनी स्वतः तो सिनेमागृह जाऊन बघतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे "मूल्क" ने समोर आणलेल्या सध्याच्या वास्तवावर प्रकाश टाकने आवश्यक ठरते. या सिनेमाने अनेकांच्या तोंडावरचे बुरखे टरकवल्यामुळे तो वादग्रस्त तर बनला होताच पण त्याला प्रेक्षक आणि सिनेमागृह मिळणार नाही याचीही व्यवस्था करण्यात आली होती की काय? अशी शंका घ्यायला बरीच जागा आहे. (पुण्यासारख्या शहरात एखाद दुसरा शो चालू आहे) चित्रपट गृहाचा मालक ओळखीचा नसता तर मलाही तो पाहायला मिळाला नसता. (आयुष्यात पहिल्यांदाच फक्त आठ लोकांबरोबर चित्रपट पाहिला त्यातले चार घरातले आणि चार मित्र) मुस्लिमांचे प्रश्न मांडले असतानाही पाकिस्तानने त्यावर बंदी घातली हे त्यांच्या लौकिकाला साजेशेच. पण भारतीय मनांचे वाढत चाललेले एकारले पण त्याहूनही गंभीर. आपण आपली वैचारिक तुलना आणि स्तर यांचा विचार करताना आपल्यासमोर पाकिस्तानी आणि तालिबानी यांना समोर ठेवत असू तर तेही गंभीर.
एखादा माणूस एखाद्या धर्माचा आहे म्हणून तू चुकीचा असू शकतो ही मानसिकताच भयंकर आहे. त्याहीपेक्षा भूतकाळात एखाद्या माणसांकडून कळतनकळत एखादी चूक झाली म्हणून तो आजही तसाच आहे असे समजणे हा शुद्ध गाढवपणा. तो पक्षपातीपणा समोर ठेवून एखाद्या समस्येकडे पाहिले तर ती समस्या धर्माशी आणि जातीशी जोडणे हे भारतासारख्या खंडप्राय आणि सर्वधर्माची माणसे वास्तव्यास असणाऱ्या देशातील एक सोपा खेळ. माणसाची मुले मोठी झाली की ती मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्या आपल्या पालकांपासून दुरावतात हे नैसर्गिक आहे आणि त्याला कोणत्याही जाती आणि धर्म अपवाद नसतात. त्यात पालकांच्या जगण्याचे प्रश्न गंभीर असतील तर आपल्या मूलभूत गरजा भागविणे ही प्राथमिकता असते आणि त्यातून आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच असते. ही कोनत्याही जातीत आणि धर्मात सहज घडून येणारी प्रक्रिया आहे. मुले आपले अवकाश शोधत असताना चुकीच्या लोकांच्या संपर्कात आली तर त्यांच्याकडून होणाऱ्या चुका अक्षम्य असतात. त्यातून मुस्लीम दहशतवादी आणि इतर मुले चुका करूनही चांगली असा भेद करता येत नाही. नाहीतर हिंदू, मागासवर्गीय आणि आदिवासीच्या मुलांनी हातात शस्त्रे घेतली नसती.
१९४७ ला भारताची फाळणी झाली तरी तिच्याकडे कोणत्याही तत्कालीन विचारवंताने आणि समाजसुधारकांनी धर्माच्या चष्म्यातून पाहिले नव्हते की धर्माच्या आधारे फाळणीची मांडणी केलेली नव्हती. ज्यांनी ती केली ते सगळे राजकारणी आणि स्वार्थी लोक होते. त्यामुळे फाळणीच्या जखमा सतत भळभळत राहिल्या तरी ज्यांच्या अनेक पिढ्या इथल्या मातीत रुजल्या त्या सगळ्यांना भारताबाबत नेहमीच एक आदर राहिलेला आहे कारण त्यांची नाळ इथल्या मातीशी जोडलेली आहे. त्याही पलिकडे ही माणसे आपल्या जाती आणि धर्म आपल्या उंबराच्या आत ठेऊन एकमेकाशी प्रामाणिक राहिलेली आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात कायम एकमेकांच्या पाठीशी राहिली आहेत. असे असताना ज्यांनी एकमेकाची सुख दुःख वाटून घेतली त्या घरातील एखादा पोरगा चुकीच्या वाटेने गेला म्हणून इतके दिवस तुमच्याशी घरोबा करून असलेली माणसे अचानक दुरावतात, संबंध तोडतात किंवा संपूर्ण त्या कुटुंबाला कालांतराने त्या संपूर्ण जाती धर्मालाच गुन्हेगार समजायला लागतात. संकटकाळी खंबीर साथ द्यायचे सोडून त्यांना टाळणे किंवा त्यांच्यावर बहिष्कार घाला किंवा देश सोडून जा म्हणून सांगणे ह्या खूपच टोकाच्या बाबी आहेत. दुर्दैवाने मुस्लीम समाजाच्या बाबतीत या गोष्टी सातत्याने घडत आल्यात.
आतंकवाद
दुसऱ्याला कमी लेखणे.
देवाचा जागर
मैत्री
बेरोजगारी
अज्ञान.

Comments
Post a Comment