Skip to main content

छिंदमच्या निमित्ताने.........!

छिंदमच्या निमित्ताने.........!
10 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने खळबळजनक ठरला आहे. कारण आज बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि त्या सगळ्यामुळे देशातील तमाम लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या चिंता वाढविणाऱ्या आहेत.  या घटनेला मुळात सुरुवात झाली ती शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या अहमदनगर महापालिकेतील एकतर्फी विजयाने, पाठोपाठ मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते या वकिलांना जालना येथील वैद्यनाथ पाटील या युवकाने न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. या दोन विरोधी घटनांचे धक्के पचवत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलाचे खात्रीलायक वृत्त प्रसारमाध्यमात झळकले आणि पाठोपाठ उपगव्हर्नर विरल आचार्य यांनीही राजीनामा दिल्याचे बोलले गेले पण सरकारने त्यांच्या राजीनाम्यावर  अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही.  या चारही घटना गंभीर असल्याने मल्ल्याच्या प्रत्यर्पणाची समाधान वाटावी अशी बातमी पूर्णपणे झोकाळली गेली.  कोणी म्हणेल या सगळ्याचा काही संबंध तरी आहे का? वरवर पाहता अर्थाअर्थी त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही पण जिथे या घटना घडल्या त्या महाराष्ट्रात आणि देशात एकाच पक्षाचे राज्य आहे आणि ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटना घडण्यात या सरकारचा आणि त्यांच्या धोरणांचा सरळ सरळ हात आहे असे म्हणायला बरीच जागा आहे . म्हणून या घटनांचा एकेक करून सहसंबंध आणि परामर्श घराणे क्रमप्राप्त आहे.
           सगळ्यात अगोदर  छिंदम महोदयांकडे जाऊया. हे महोदय नगर शहरातील भाजपचे लाडके व्यक्तिमत्त्व. स्थानिक निवडणुकीत ते निवडून आले आणि पक्षाने त्यांची निवडून येण्याची क्षमता (?) पाहून त्यांना मानाचे पानही दिले पण "उतणार नाही, मातनार नाही" हा वसा विसरून त्यांनी पालिकेतील एका किरकोळ कामावरून महाराजांबद्दल अपशब्द वापरले आणि उभा नगर जिल्हा आणि महाराज म्हणजे आमचे दैवत आहेत असे छाती ठोकून सांगणार्याच्या झुंडीच्या झुंडी नगरसह महाराष्ट्रभर रस्त्यावर आल्या. काहींनी छिंदमला मारहाण केली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्याचा राजीनामाही घेतला आणि त्याला काहीदिवस नगरमधून  तोंड काळे करायला सांगितले. त्याकाळात सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने आपले अपेक्षित हेतू साध्य केले आणि आरोपांचा हा धुरळा खाली बसून संपूर्ण  प्रकरणच अवसायनात गेले. आणि काही दिवस परागंदा झाल्यानंतर पुन्हा नगरमध्ये उजळ माथ्याने फिरू लागले. आणि आता तर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांची आघाडी घेऊन निवडून आले तेही अपक्ष म्हणून. मग प्रश्न हा पडतो की महाराज आमचे दैवत म्हणणारे, महाराजच्या नावाने राजकारण करून आपली पोटे भरणारे आणि त्यांच्या नावाचा राजकीय फायदा करून घेणारे सर्वच पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी त्याला मते का दिली? लगेच यांना या अपमानाचा विसर कसा काय पडला? याचे साधे सरळ उत्तर असे आहे की, महाराष्ट्रातील कोनात्याच राजकीय पक्षाला त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनासुद्धा महाराजांबद्दल मुळीच आस्था राहिलेली नाही. पण त्यांचे नाव घेतले की राजकीय आणि आर्थिक फायदे मिळतात ना मग करा नावाचा जयजयकार! असा हा साधा सरळ व्यवहार आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्याबाबत कणव आहे पण त्यांचा महाराष्ट्र आणि त्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहास भूगोल यांचा अभ्यास अत्यंत कीव करावासा आहे. महाराष्ट्रातील आजची कित्येक सर्वपक्षीय राजकीय घराणी, आमदार, खासदार आणि नेते यांचे पूर्वज महाराजांचे थेट विरोधक राहिलेले आहेत. महाराज जेव्हा मावळ्यांना घेऊन दऱ्या खोऱ्यात फिरून स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पराकाष्ठा करत होते तेव्हा यांचे पूर्वज तत्कालीन मुस्लिम राजसत्तेची आणि नंतर आलेली ब्रिटिश राजसत्तेचा तळी उचलून त्यांची गुलामी आनंदाने करत होते. कित्येक मराठे आणि ब्राह्मण राजे, सरदार आणि सेनापती महाराजांच्या विरोधात त्याच्या विरोधकांचे हात बळकट करत होते. शिवाय त्यांना सामान्य लोकांची लूट करून आपले पोट तडस लागेपर्यत भरता येत होते. ही सगळी दुकानदारी राजांनी बंद केली आणि रयतेला मनाची पदे दिली त्यामुळे हे लोक महारांजाच्या विरोधातच होते. आज सर्वपक्षीय राजकारणात याच गुलामांचे अनुयायी आणि त्याच विचारधारेचे लोक ठाण मांडून आहेत. महाराजांनी आपल्या वाड वडिलांची सद्दी संपविली याची खदखद आजही त्यांच्या मनात आहे.  त्यामुळे संधी मिळेल तेव्हा शिवाजी आणि संभाजी महाराज यांची बदनामी केली जाते. पण जनतेच्या मनात महाराजांचे स्थान अढळ असल्याने सर्वपक्षीय नेते कांगावा करत रस्त्यावर उतरतात आणि आपली राजकीय पोळी भाजून झाली की महाराज आणि त्यांचे कर्तृत्व विसरतात. छिंदम सारख्या प्रवृत्तींचे म्हणूनच फावते. आज छिंदम जरी अपक्ष म्हणून निवडून आला असला तरी त्याला याच महाराजद्वेष्ट्या सर्व पक्षीय घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांनी निवडून देऊन सर्वोतोपरी मदतच केली आहे. आणि त्यात सगळ्यात जास्त गुन्हेगार ठरतो तो राज्यातील सत्ताधारी पक्ष. छिंदम मुळात याच पक्षाचा. यांचे कर्तृत्व म्हणावे असे काही नाही त्यामुळे सतत कोणत्यातरी समाजसेवक, राष्ट्रभक्त आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व यांना आपल्या गोटात कसे ओढता येईल यासाठी प्रयत्न करतात. मुळात शेटजी भटजींच्या या पक्षाला सत्तेत यायचे असेल तर, जनतेचे प्रेम मिळवायचे असेल तर महाराजांना हायजॅक करावे लागेल हे उमगले होते त्यातूनच आम्ही कसे महाराजप्रेमी आहोत हे वरवर तर दाखवायचे आहेच पण जमेल तेव्हा जमेल तसे त्यांचे चारित्र्यहनन ही करायचे आहे. त्याला महाराजच्या विचाराचे लोक बळी पडून अविचाराने वागतात आणि रस्त्यावर उतरतात. त्यातुन त्यांचे मूळ सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते, मोर्चा, आंदोलने यात नव्या पिढीवर गुन्हे दाखल होतात आणि त्यांचे सगळे आयुष्य बरबाद होते.   आणि हे उमदे युवक दिशाहीन होऊन आपल्या अपयशाला दुसऱ्याला जबाबदार धरून समाजात तेढ वाढायला मदतच करतात. यातूनच हा  महाराजद्वेष्ट्या लोकांचे इप्सित साध्य होते. हा सगळा युवक वर्ग सत्ता आणि स्पर्धेतून बाहेर फेकला गेला की, मनाची पदे आणि सत्ता भोगायला यांना मोकळे रान मिळते आणि त्यासाठी छिंदम सारखी माणसे यांना प्रिय वाटतात. आज जरी छिंदम महाराजांसमोर नतमस्तक झाला असला तरी त्यातून महाराजांबद्दल त्याच्या मनात लगेच आदर निर्माण झाला आहे किंवा त्याचे मतपरिवर्तन झाले आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण ज्या विचारसरणीशी आणि राजकीय पक्षाशी त्याची बांधिलकी आहे ती विचारसरनी आणि राजकीय पक्ष त्याच्या जन्मापासूनच एक विशिष्ट जातीच्या हिताशी निगडित आहे. आणि त्यात महाराज आणि त्यांचे खरे अनुयायी येत नाहीत. म्हणूनच छिंदम सारखे लोक विक्रमी मताधिक्याने निवडून येणे लोकशाहीला आणि सामाजिक सलोख्याला घातक आहे
क्रमशः
©के. राहुल

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...