असे का होते कधी कधी?
असे का होते कधी कधी?
अचानक भंगतात प्रतिमा मनाला भावलेल्या.
आणि सूरु होतो प्रवास अस्वस्थतेचा,
अस्वस्थतेकडून पुन्हा अस्वस्थतेकडे.
असे का होते कधी कधी?
मेंदू समजावत राहतो पण मन मानत नाही.
चुकू शकतो कुणीही, मन मात्र जाणत नाही.
असे का होते कधी कधी?
अवधानाने का होईना, होतात चुका.
शब्द होतात मुके आणि भाव ठरतो फुका.
असे का होते कधी कधी?
आपलेच दात आपलीच जीभ चावतात.
गोड बोलणारी माणसे नकळत अंगावर धावतात.
असे का होते कधी कधी?
जिवाभावाची माणसे अचानक परकी वाटतात.
शब्द गोठू लागतात आणि आठवणींचे बांध फुटतात.
असे का होते कधी कधी?
मेंदू घेतो सावरून पण मन मात्र डाव उधळून टाकतो,
निरभ्र पौर्णिमा आकाशात आणि मनात काळोख दाटतो.
असे का होते कधी कधी?
कळत नाही काय करावे,
मोडून टाकावा आपणच की, डाव पुन्हा नव्याने मांडावा.
मन हलके होण्यासाठी सडा आसवांचा सांडावा.
असे का होते कधी कधी?
मनसोक्त रडण्यासाठी खांदा हक्काचा मिळत नाही,
जळावे की जाळावे हेच मनाला कळत नाही.
असे का होते कधी कधी................
© के.राहुल ९०९६२४२४५२
असे का होते कधी कधी?
अचानक भंगतात प्रतिमा मनाला भावलेल्या.
आणि सूरु होतो प्रवास अस्वस्थतेचा,
अस्वस्थतेकडून पुन्हा अस्वस्थतेकडे.
असे का होते कधी कधी?
मेंदू समजावत राहतो पण मन मानत नाही.
चुकू शकतो कुणीही, मन मात्र जाणत नाही.
असे का होते कधी कधी?
अवधानाने का होईना, होतात चुका.
शब्द होतात मुके आणि भाव ठरतो फुका.
असे का होते कधी कधी?
आपलेच दात आपलीच जीभ चावतात.
गोड बोलणारी माणसे नकळत अंगावर धावतात.
असे का होते कधी कधी?
जिवाभावाची माणसे अचानक परकी वाटतात.
शब्द गोठू लागतात आणि आठवणींचे बांध फुटतात.
असे का होते कधी कधी?
मेंदू घेतो सावरून पण मन मात्र डाव उधळून टाकतो,
निरभ्र पौर्णिमा आकाशात आणि मनात काळोख दाटतो.
असे का होते कधी कधी?
कळत नाही काय करावे,
मोडून टाकावा आपणच की, डाव पुन्हा नव्याने मांडावा.
मन हलके होण्यासाठी सडा आसवांचा सांडावा.
असे का होते कधी कधी?
मनसोक्त रडण्यासाठी खांदा हक्काचा मिळत नाही,
जळावे की जाळावे हेच मनाला कळत नाही.
असे का होते कधी कधी................
© के.राहुल ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment